Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
St. Vimali's urpha Vimalabai Garware ...

Hitguj » My city » Maharashtra (West) » Pune » Schools and Colleges » St. Vimali's urpha Vimalabai Garware High school « Previous Next »

Farend
Wednesday, June 13, 2007 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो छत्रपती, तू ही? मला टण्णू बद्दलच्या प्रश्नावरूनच वाटले :-) आम्हीही गोळा करायचो. प्रभात रोडवर कायम पडलेले असायचे.

Chhatrapati
Friday, June 22, 2007 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंचाळकर सर गेले ? मला माहिती नवते.
आत्ता हा बी.बी. पाहताना समजले.
फार चांगले शिकवायचे, शिस्तप्रिय होते.

कशामुळे गेले ? त्यांचे वय इतके जास्त नवते, कोणाला या बद्दल काही माहिती आहे का ?

Chhatrapati
Saturday, June 23, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Farend, तुझी कोणती बॅच ?
म्हणजे कोणत्या वर्षी दहावी केलीस तू ?

तू अलिकडे कधी गेला होतास का आपल्या शाळेत ? नवीन काय केले आहे का तिथे ? कशी वाटते शाळा ?

शाळेला भेट दिली की फार nostalgic वाटते. जुन्या आठवणी येतात आणि मन सद्गदीत होते. असे वाटते की चांगले दिवस फार लवकर संपले, आणि ते चांगले दिवस होते हे समजण्याइतकी अक्कल त्या दिवसात नवती. शाळेमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या अगदी पूर्ण कोऱ्या कागदावर संस्काराची अक्षरे लिहिली जातात, असे मला वाटते. जाऊ देत .. फार सेंटी होण्यात अर्थ नाही, ते दिवस कधीच परत येणार नाहीत ! ..... काही वेळेस मला वाटते की आपल्या स्वभाव वैशिष्ट्यालाही आपली शाळाच जवाबदार असते !




Farend
Sunday, June 24, 2007 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

८४ मधे मी दहावी होऊन बाहेर पडलो. नंतर कधी गेल्याचे आठवत नाही. आता आश्चर्य वाटते, २३ वर्षे झाली!

आठवणी बर्‍याच आहेत...


Chhatrapati
Tuesday, June 26, 2007 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या शाळेतले भांडार आठवतेय का ? :-)
फारच विनोदी गोष्ट होती ती !! धोतर नेसणारे गाडगीळ सर आणि त्यांचे ते भांडार ... जिन्याच्या खाली तयार झालेल्या कोनाड्यात चालणारे भांडार ! प्लॅस्टिकच्या डब्यातून विकायला ठेवलेल्या लिमलेटच्या गोळ्या, बिस्किटे, अंजिराच्या वड्या, गुलाबी रंगाची काजूची वडी; वगैरे. गाडगीळ सरांचे अलिकडचे वृतांत फार धक्कादायक होते, ते असो. पण हे सर आम्हाला आठवीत केमिस्ट्री शिकवायचे. आता मला कल्पना करवत नाही की केमिस्ट्रीसारखा विषय आम्ही आयुष्यात पहिल्यांदा गाडगीळ सरांकडून शिकलो.

Bsk
Sunday, July 01, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाडगीळ सर आणि केमिस्ट्री?? बापरे.. cant imagine...बाकी हे भांडार काय प्रकार आहे? आमच्या वेळेला नव्हते बहुतेक?
btw, शाळेला काही वर्षांपुर्वी पांढरा शुभ्र रंग दिलाय! इतकं बोर दिसतं ते.. आधीची दगडी इमारतच छान होती.. आता तर पावसाळ्यात त्यावर शेवाळे पण आलेय.. फार dull दिसते आता शाळा... :-(

Paragkan
Sunday, July 01, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाडगीळ सरांच्या चेमिस्ट्रीच्या वर्गात पहिल्या बाकावर बसत नव्हता ना? नाहीतर .... किती केस शिल्लक राहिलेत असं विचारलं असतं. :-)

Chhatrapati
Sunday, July 08, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यंदाच्या भारतभेटीमध्ये कर्वे रस्त्यावरून जाताना आपल्या शाळेला दिलेला पांढरा शुभ्र रंग पाहिला आणि खरोखरच वर लिहिल्याप्रमाणे ’बोअर’ दिसतोय तो रंग. असा रंग का दिला याचे कोडे मला उलगडलेले नाही. बहुतेक स्वस्तात काम केले असावे. एकाच रंगाचे ’बजेट’ कमी पडले असावे. दगडी इमारत कधीही जास्त चांगली दिसायची, यात वादच नाही.

आपल्या शाळेत पूर्वी सारखे दिवस राहिले नाहीत हे खरे. मला असेही समजले आहे की शिक्षकांचा दर्जादेखील दरवर्षी खालवतोय. प्रयोगशाळेतल्या वस्तूंचा दर्जा खालावतोय. लोकांकडे चांगल्या नोकऱ्या असल्यामुळे आजकाल सगळ्या मराठी पालकांचा कल मुलांना खाजगी शाळेत घालण्याकडे झुकतोय. पुण्यात असलेल्या खाजगी शाळांमध्ये फक्त एक शाळा मराठी माध्यमातून चालते. या वर्षीपासून दहावीची गुणवत्ता यादी प्रकाशित करण्याची प्रथादेखील बंद केली आहे. त्यामुळे ’विमलाबाईंचे’ कोणी बोर्डात आलेले देखील आपल्याला कधी ऐकायला मिळणार नाही. कोणत्या शाळेची किती मुले बोर्डात येतात अशी एकप्रकारची चांगली स्पर्धा पूर्वी पुण्यात अस्तित्वात होती. यामुळे आपल्या शाळेचे नाव या कारणामुळे तरी वर्तमानपत्रांतून झळकायचे आता तसे होणे बंद झाले आहे. थोडक्यात सांगायचे, तर सरकारी मराठी शाळांचे वैभव दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे. आपल्या आठवणींचे उमाळे हेच काय ते उरले सुरले वैभव !

Chhatrapati
Tuesday, August 28, 2007 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे गेली विमलाबाईची गॅंग ?

Shankasoor
Tuesday, August 28, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसांपूर्वीच नवले सर गेल्याची बातमी समजली.
नागरीक शास्त्र शिकवायचे आणि केसांना तेल लावले नसेल तर किंवा केस कापलेले नसतील तर कायम शिक्षा करायचे.

कुणाला मटकर बाई आठवतायत का

त्यांचा 'पोरांण्णो पानी प्यायला शिस्तीणे जा' हा dialogue आठवतोय का


Patwardp
Wednesday, November 14, 2007 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

me parag patwardhan 1992 madhe 10th pass out zalo vimlabaitun.koni ahe ka tya batch che ithe?

Chhatrapati
Saturday, May 24, 2008 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शंकासूर, परागकण, बी.एस.के, फार-एंड, पराग पटवर्धन .. अरे, इथले लोक कुठे गेले ? विमलाबाईंचे तमाम विद्यार्थी जगात अनेक ठिकाणी वास्तव्य करतात आणि तिथून मायबोलीचा संवाद-फलक वाचतात. पण इथे लिहिणारे फक्त दोन-तीनच ?? हे बरोबर नाही.

पुण्यातल्या शाळांचा जर वेगवेगळा फलक असेल, तर विमलाबाईंच्या फलकावर सर्वात जास्त संवाद उठावेत, असे मला कळकळीने वाटते.

विमलाबाईंच्या मित्रांनो, कुठे आहात ? जागे व्हा, मराठी टंकलेखन इतके क्लिष्ट नाही, इथे येऊन मनसोक्त मराठी लिहा. तुमच्या, माझ्या आणि आपल्या शाळेतल्या अनेक आठवणी आहेत, त्या इथे मनमोकळेपणाने लिहा. आपल्या शाळेच्या नावाखाली अत्यंत कमी लेख पाहून माझे मन गलबलून गेले आहे. "सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला" हे चार शब्द एकदा लिहून पाहा, तुम्हाला आपल्या शाळेच्या अनेक आठवणी पुन्हा भावनिक करतील.

हा फलक इतका दुर्लक्षित का ? यशस्वी लोकांनो, तुम्ही आपली शाळा विसरून गेलात की काय ?







.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators