Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 28, 2005

Hitguj » Hitguj Diwali Ank: Aapli pratikriya ! » 2005 » Archive through November 28, 2005 « Previous Next »

Swati Ambole
Wednesday, November 16, 2005 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sašÊ igarI ³jaolacaI hvaa´ Kasaca.
imalyaaÊ rahula AaiNa p`saadÊ h. h. pu.vaa. ²²


Vinayak
Wednesday, November 16, 2005 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jayaEaI cao pirpUNa- vaacalao. %yaa ibacaaáyaa tarannoom laa Xauw nasatanaa ho laÜ@sa itlaa Launch krayacaI svaPnao ka baGat hÜtoÆ ekaca gaÜYTIt p`omaÊ ÔomaÊ A%yaacaar AaiNa duK : d AMt kÜMbalyaa saarKo vaaTlao.

Sanghamitra P.
Wednesday, November 16, 2005 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaa² majaa yaotoya AMk vaacatanaa. saMpadkaMnaa manalaM pihjao.
sagaL\yaat pihlaI dad ica~aMnaa. AitXaya sauroK ica~M Aahot. f AaiNa rcanaa. baÜTaMtca EaImaMtI AsalaI kI rMgaaMcyaa maokpcaI garja nasato. :-)
kivata pNa ekapoxaa ek Aahot. sagaL\yaaca. sagaL\yaat jaast AavaDlaolyaa saaMgato.
vaaÉNaI dugQaat Aaho. ³kÜjaaigarI ´
pavasaacaI.. ³AazvaNa yaoto. ´
kuNaI saÜDvaavao KuLo ho ]KaNao ³ksao vhayacaoÆ´
tIhI ivaBaagalaI jaaNaar Asato catkÜr naahItr inatkÜr ³kÜr´
maÜhnaikmayaaÊ BayavyaakuLÊ navyaa manaUcaI idvaaLI yaa sagaL\yaa kivata AavaDlyaa.
AaiNa saMdIp KroMcaI kivata tr ...
kqaa sagaL\yaa vaacalyaa naahIt pNa pap AaiNa Ahova KUp Cana jamalyaat.
hsaro kvaDsao ³hI naavaM jaast saaQaI saÜpI ka naahIt mhNaoÆ´ AKMD Cana Aaho. imalyaa kaya hoÆ Aata tI gaarvaacaI gaaNaI kahI maI sauKanaM eokU XakNaar naahI :-)
khaNaI DayaT dovaacaI. Anaupmaa ho ekdmaca Jakasa Aaho. ' ]kDlaolaM jaovaU laagalaI '
rahula Qanya Aaho ro baabaa. ' baXaIXaI samaaMtr hÜNaara laaDU. ' ³pNa Katanaa dat hatt yaoNyaapoxaa laaDU Pyaayalaolaa bara ´ :-)
baakI AjaUna vaacato Aaho. ³huXXa´
AaiNa ³ho raihlaMca´ maaJyaa ³GaašGaašt Taklaolyaa´ kivataMvar p`itiËyaa idlaolyaa mayabaÜlaIkraMcaI maI AaBaarI Aaho.



Hems
Thursday, November 17, 2005 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaa² yaavaoLIhI Bargacca idsatÜya AMk !
mauKpRYz sauroK .. sagaLIkDo DÜkavaUna Aalao ... AjaUna vaacalaM naahI kahI . ica~ maa~ Ap`itma Aahot KrMca.
" Ahova " kqaovarIla p`itiËyaaMba_la manaapasaUna AaBaar. ( maayabaÜlaIvar p`itsaad imaLalaa kI Qanya Qanya vaaTtM !!) f , ica~ samap-k Aaho AgadI !



Girish P Sonar
Thursday, November 17, 2005 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

homsaÊAitXaya sauMdr kqaa²

AaiXaXaÊtumacaa laoK KUp AavaDlaa²
Baalabaa koLkraMcyaa saha pustkaMcyaa saMcaacaI AazvaNa JaalaI. maI lahana AsataMnaa hI pustkM vaacalaI hÜtI.
KgaÜlaXas~acaI gaMmat lahanaaMpasaUna maÜz\yaaMpya-nt sagaL\yaaMnaaca kLayalaa hvaI.
]<ama laoK²





Bee
Thursday, November 17, 2005 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aaja maI kahIca vaacaU XaklaÜ naahI. GarI vaoL imaLNaar kI naahI maaihtI naahI. toMvha gaUD baaya² malaa kuNaI ‘Ahova’ caa Aqa- saaMgaNaar Aaho kaÆ malaa sagaL\yaaMcaa hovaa vaaTtÜ Aaho :-(

Sankalp Vijay Dravid
Thursday, November 17, 2005 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

baIÊ Ahova mhNajao saÝBaagya.

anupama
Thursday, November 17, 2005 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

baracasaa vaacaUna Jaalaa.
AjayacaI ‘pap’ KUpca AavaDlaI. [t@yaa pirNaamakark irtInao Baavanaa vya> krayalaa takdIca ilaKaNa laagat. Ajayalaa Cana jamalaya to.
homsaÊ Aahova AgadI manaalaa iBaDNaarI Aaho.
rcanaacaI ‘jaaš’ sauroK Aaho.
baakI sava- kqaahI KUp AavaDlyaa. sava- laoKk p`itBaavaMt Aahot.

kivata kuzlaI sagaL\yaat AavaDlaI saaMgata yaoNa kzINa AahoÊ sagaL\yaa tÜDIsa tÜD.

‘pahta pahta purovaT ’mahana Aaho.
‘maUK-ta...’ pNa Krca AByaasapUNa ilaihlaya. mast jamalaya.
f AaiNa rcanaacaI ica~o ]tÌYT Aahot.
AaiNa hÜÊ maaJyaa ilaKNaavar p`itËIyaa doNaaáyaa savaa-Mcao AaBaar.
baakI saaih%yaÊ laoK AajaUna Jaalao naahIt vaacaUna. to vaacalyaavar baakIcyaa p`itËIyaa


Priya Palande
Thursday, November 17, 2005 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

qaÜDa AaNaKI vaacaUna Jaalaaya.

Ajaya - pap manaalaa spXaU-na gaolaI.

homsa - Ahova Cana jamalaI Aaho. Anaucao BaavabaMQa sauroK ]lagaDlao Aahot. AaiNa AajaIcaM XaovaTcaM maagaNaM tr DÜL\yaat paNaI AaNaUna gaolaM.

GS - naohmaIp`maaNaoca ]%kMza vaaZvaNaarI maaMDNaI. pNa tumacyaa AaQaI vaacalaolyaa kqaa yaapoxaa jaast pirNaamakark vaaTlyaa.

rcanaa - jaaš Ap`itma² iktI ga sauMdr iTplaM Aahosa itcaM mana. hovaa vaaTlaa tuJaa [tkM trla AaiNa hLvaM ilahIlyaaba_la...

Eawacyaa kqaonaI AgadI Cana AanaMdacaa Qa@ka idlaa. kqaocaa sauKaMt AgadI AavaDlaa.

Anaupmaa - cakvyaacaa malaa AnauBava naahI pNa vaacaUna BaItI vaaTavaI [tko Cana maaMDlao Aahosa.


Gajanandesai
Saturday, November 19, 2005 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

homsacaI ‘Ahova’ vaacalaI AaiNa AavaDlaI.
³homsaÊ tU kuzlaI gaÜÆ lahanapNaI AamhIpNa gaavaakDo Asao maatIt pDlaolao naajaUk KD\Do baarIk kaDInao TÜkrt basaayacaÜ. %yaa ikD\yaanao kaZlaaya tsaa KD\Da maatIt Aaplyaalaa kaZta yaavaa mhNaUna AgadI baarIkatlaI baarIk kaDI Gao}na maatIcao CÜTo ZIga ekaga`tonao kÜrt rhayacaÜ pNa tÜ ‘tsaa’ kahI kQaIca jamalaa naahI. iXavaaya to pana maQaÜmaQa dumaDUna %yaacyaa icakat AaBaaL baGaNaMÊ %yaa icakat saat rMga idsaayacao to baGaayacaMÊ %yaa icakavar fuMkr maarlyaavar to rMga gaÜla gaÜla ifrayacao. AajaIcaI fnaor poTI ho sagaLM malaa AazvalaM.´

AaiNa ica~ pNa mast jamaUna gaolaMya. ³f cao kI rcanaacaoÆ´


Avdhut Digambar
Saturday, November 19, 2005 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 Ê rahulaÊ kqaa AavaDlyaa. rahula tumacaI klpnaaXa>I AÔaT Aaho. GS1 tumhI malaa naohmaI GA caI AazvaNa kÉna dota.
AnaupmaaÊ homsa sauroK kqaa.


Milyaa
Monday, November 21, 2005 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maaJyaa gaaZvapNaacao kÝtuk kolyaaba_la sava- maayabaÜlaIkraMcao KUp AaBaar

weekend laa sava- kqaa vaacauna kaZlyaa...
[tko vaogavaogaLo ivaYaya hataLlaolao pahuna Cana vaaTlao

pap mastca tr Ahova caI maaMDNaI AaiNa laoKnaXaOlaI sauroK

KMDNaI ekdma vaogaLa AnauBava do]na gaolaI. rahulacyaa klpnaaXa>Ilaa salaama



krNaI pNa ek vaogaLa AnauBava hÜta pNa [tkI naahI AavaDlaI.. kdicat gaÜivaMd\kDUna KUp Apoxaa hÜ%yaa mhNaUna Asaola. toMDlyaa 20­ - 25 kaZuna out Jaalyaavar ksao vaaTto tsao Jaalao. ³Aajakala tÜ tovaZ\yaahI kaZt naahI ha Baaga vaogaLa....´

fÊ rcanaa ica~o maa~ sava-ca Ôar sauroK Aahot (at vaadca naahI.


Milind Agarkar
Monday, November 21, 2005 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीक एंड ला बरंचसं वाचून काढलं.
राहुलफाटक ची पुरेवाट आणि खंडणी आवडली.
प्रसाद शिर. चा मूर्खतेचा अभ्यास चांगला आहे
मिल्या चं गाढवा छान आहे
मिल्या म्हणतो तसेच मला पण जी एस ची कथा इतकी नाही आवडली. कदाचित त्याने अपेक्षा वाढवल्या आहेत म्हणून असेल.

कवितांबद्दल नंतर लिहीन.


Paragkan
Monday, November 21, 2005 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का रे घाबरलास की काय? की फार तयारी करावी लागणार आहे? :-O

वैभव, 'दिवस अन रात्र' आवडली!

संकेत, 'कट्टा' झकास आहे.

श्रीमंत, 'देहबोली' नेहमीप्रमाणे bouncer , पण नव्या मनूची दिवाळी आवडली.

PM , दंवबिंदू खासच! त्या बरोबरचं रचनाने काढलेलं चित्रही खास आहे! 'कोजागिरी' सुद्धा आवडली!

सुमती, 'मोहन किमया' छानच! ( Shuma ची आठवण झाली ही कविता वाचून.)

संदीप खरेंची कविता त्यांच्या ' वैविध्यपूर्ण ' लौकिकाला साजेशीच आहे.

सोमनाथ अहिररावांची ' शीव ' गावाची ओढ अगदी सहज शब्दांत उतरली आहे.


M. K. Sathe
Tuesday, November 22, 2005 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इंटरनेटवर एवढा सुंदर अंक काढल्याबद्दल हितगुजचे हार्दिक अभिनंदन. लिंक पाठवल्याबद्दल करमरकरसाहेबांचे पण आभार. आता अभिप्राय,

अहेव, करणी , खंडणी या कथा आणि देहबोली ही कविता हे कुठल्याही अत्यंत प्रथितयश दिवाळी अंकात द्यावे इतके उत्कृष्ट आहे.

अहेवमध्ये लेखकाने ज्या तरलतेने आजीच्या मनोवस्थेचे चित्रण केले आहे ते फारच उच्च दर्जाचे आहे. कथेचा प्रवाहही अत्यंत सहजपणे या भावनांमध्ये आपल्याला वाहून नेतो. involve करणारी कथा.

पलिकेतल्या भ्रष्टाचारामुळे रस्त्यावर खड्डे पडतात, त्यात पडुन एक बळी जातो आणि अशा सार्वत्रिक भ्रष्टाचाराचे आपण सगळेच victim होणार हे घिशापिट्या अतिपरिचयामुळे आपली संवेदना हरवलेले कथासूत्र घेऊन ते काय विलक्षण उंचीला नेऊन ठेवता येते आणि काळजाला भिडवता येते हे दिसते करणी या कथेतून. शेवटानंतर पुन्हा वाचले तर कथेतल्या प्रत्येक वाक्याला एक जबरदस्त संदर्भ प्राप्त होतो. एक सूचना मात्र आहे, लेखकाची वाक्यरचना, विशेषतः शेवटचे वाक्य फार लांबलचक व क्लिष्ट. आपल्या कल्पना, शैली, विचार व बाकी प्रत्येक पैलूने खूप प्रभावित झाल्यामुळेच ही प्रेमाची सूचना करत आहे राग मानू नये. I liked this best among the bests.

खंडणी. काय जबरदस्त कथाबीज ! कल्पनेलाच सलाम. a good example of fantasy. मांडणी मात्र आनखी उत्कंठावर्धक करता आली असते असे वाटते.

देहबोली. ग्रेस, ग्रेस आणि ग्रेस ! ही तुलना नाही, साम्य नाही तर कौतुक समजा. परिपक्वता आणी सखोलता भावली.

गेले आठ दिवस वाचत आहे. इतर साहित्यही छान आहे, पण सुधारणेला बराच वाव आहे. आपले वाचन वाढवा कुठे कंमी पडतो आहे ते बघा असा सर्व तरूण मित्रांना सल्ला व आपल्या या उपक्रमाला शुभेच्छा. मी आता या वयात बरहा ( विनामूल्य) वापरून संगणाकावर टंकलेखन करायला शिकलो. तुमच्य इथेहि तेच सहज चालते हे बघुन बरे वाटले. त्या उपक्रमाचाही शक्य तेवढा प्रसार करा ही विनंती.





Milyaa
Wednesday, November 23, 2005 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहेव, करणी , खंडणी या कथा आणि देहबोली ही कविता हे कुठल्याही अत्यंत प्रथितयश दिवाळी अंकात द्यावे इतके उत्कृष्ट आहे. >>> साठे साहेब आजकालच्या प्रथितयश अंकातल्या कथा वाचल्या की तर हे त्यात छपणे हे ह्या लेखकांचा अपमान होईल कि काय असे वाटते..

अजुन एक विनंति आहे. तुम्ही जे आवडले त्याबद्दल लिहिलेत पण जे आवडले नाही ते का आवडले नाही हे पण लिहिलेत तर कुठे आणि काय चुकतेय हे आम्हाला कळेल. एक त्रयस्थ वाचक ह्या नात्याने तुमचे मत महत्वाचे वाटते



Bee
Wednesday, November 23, 2005 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या ' गारवाचे ' विडंबन ' गाढवात ' केले.. त्यातल्या त्यात सगळी गाणी घेतलीस. खूप सहजपणा जाणवला वाचताना..

Jaya
Thursday, November 24, 2005 - 1:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देहबोली च्या अभिप्रयाबद्द्ल धन्यवाद साठेजी


Neeraja
Thursday, November 24, 2005 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्पंदन पूर्ण केले वाचून..
पाप - छोट्याश्या expanse मधली मोठी गोष्ट.. आवडली.
अहेव - मस्त गं हेम्स.
परीपूर्ण - माफ करा पण याला गोष्ट का म्हणायचे आणि ही संपादकांनी का निवडली असा मूलभूत प्रश्न आहे. एखाद्या क' वाल्या तद्दन भिकार डेली सोप सारखे वाटले.
खंडणी - संकल्पना आवडली. राहुल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने छान कलाटणी. बाकी details काय रोज भेटतो आहोतच तेव्हाच बोलू.
Covalent bond - कथेचे शीर्शक आणि त्याची समर्पकता यामुळे आवडली.
जाई - तुझी संकल्पना तुझ्या एरवीच्या कथांपेक्षा फारच वेगळी आणि ताजी होती. पण कुठेतरी धागा सुटला असे वाटले.
चकवा - start to end रचना आणि विषयाच्या दृष्टीने उत्तम कथा. गहन अर्थ दरवेळेलाच हवा असे नाही. (ही compliment च आहे.)
मी, ती आणि सिगारेट - छान. पण एखाद्या व्यक्तीला सोडून देणे ते ओढ लागून त्याच व्यक्तीकडे जाणे याचा आलेख इतका सोप्पा असेल? typical chickflick Hollywood films सारखे वाटले. तरीही मजा आली.
करणी - जीएस.. मजा येत होती आणि शेवटात गडबडले सगळे तुझ्याकडून अपेक्षाही मोठ्या होत्या ना..


Neeraja
Thursday, November 24, 2005 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. दिवाळी - nothing special विषय, आशय आणि रचनेच्या अनुषंगाने काहीही नवीन नाही आणि जुनेच असले तरी click व्हावे असे काही नाही. mediocre ..
२. बब्बलगम - संदीप खरे बद्दल मी काय बोलू. मस्तच.. मला बब्बलगम चे metaphore आवडलेच.
३. आठवण येते - ओके आहे. शब्द चांगले आहेत.
४. असे असावे - शब्द सुंदर. बाकी ओके.
५. ओली संध्याकाळ - पहिला अर्धा मस्त जात होता आणि नंतर ते एकदम cliche झाले.
६. कट्टा - मस्त कल्पना.. एकदम फ्रेश.. आणि एकदम खरी.. आवडली.
७. कविता तुझी माझी - ही कविता छानच आहे पण इतक का कमी समजतेस स्वतःला? तुम्हा दोघांमधे तुलना नाही होऊ शकत आणि तुझ्याही कविता (sporadic लिहितेस तरी) मला तेवढ्याच आवडतात.
८. कसे व्हायचे? - you are repeating yourself.. भर दुपारची वेळ म्हणे आत्ता आहे वेळ..) कविता काय नेहमीप्रमाणेच छान.
९. कोर - चांगला प्रयत्न आहे रे. काही नवीन कल्पना आणि शब्द सच्चे.
१०. देहबोली - आता काय बोलू रे जया.. परत एकदा पाणी आणलेस डोळ्यात..
११. दवबिंदू - wonderful!!! मस्त वाटलं.
१२. दिवस अन रात्र - क्या बात है!! मजा आली.
१३. धुके - कारे गिरी! इतकं सहजसोपं लिहीणारा तू इतक्या शब्दांच्या आश्रयाला का? १८मी बसलेलो असतो वाहत्या रस्त्याशेजारी.. १९ हे म्हणणारा गिरी आणि हा कोणीतरी वेगळाच.
१४. पिसे - ओके. शब्द छान.
१५. फेरा - छान. नवीन कल्पना.
१६. भयव्याकूळ - व्वा छानच!
१७. मोहनकिमया - कुठेच काही वाटलं नाही. नुसता शब्दांचा typical गुंता.
१८. मन - ठीक आहे.
१९. मी कोण - चांगली आहे.
२०. वेताळ - छंदोबद्ध रचना सोडून मुक्तछंदात? आवडलीच कविता.
२१. शीव - ट ला ट.. म ला म.. चालूद्या.. (या वाक्याचे copyrights पेशवे महाशयांकडे आहेत.)
२२. हरवलेला मी - शब्द.. शब्द.. शब्द.. नुसतेच शब्द..
२३. हे असं होतं म्हणून - छानच. फारच आवडली. असं सगल्याच बाबतीत होतं नाही का सन्मे! नको तोच विचार कुरतडत रहातो २६
२४. कोजागिरी - ठीक आहे. अनेक शब्द. पण शेवटची ओळ छान आहे.
२५. नव्या मनूची दिवाळी - बरा आहेस ना जया? खाल्लीस माती? जरा तुला चांगलं म्हणायची सोय नाही..


Neeraja
Thursday, November 24, 2005 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकीच्या भागांबद्दल उद्या लिहीते...
पण अंक एकदम मस्त झालाय. आतली रेखाटने... सहीच... फ आणि रचना.. well done

मुखपृष्ठ जरा वेगळे असते तर... म्हणजे नेहमीच्या दिव्यांपेक्षा झेंडूचे फूल छान वाटतेय पण तरी अजून envelope push करता आले असते तर... हा आपला माझा विचार.

वरती सगळ्यांच्या लिखाणावर मी जी मते दिली आहेत किंवा यापुढे देईन ती माझी प्रामाणिक मते आहेत. त्यासंदर्भात कोणी माझे सगेसोयरे नाहीत तेव्हा माझी मते पटली नाहीत तर पटली नाहीत असे म्हणा पण partial असल्याचा आरोप करू नका. तसेच मला फार समजतं म्हणून मी मते देते आहे अशी माझी भूमिका नाही. पण एक डोळस रसिक या नात्याने मते देण्याचा मला अधिकार आहे असे मी समजते.


maitreyee
Thursday, November 24, 2005 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरजा
सही लिहिली आहेस प्रतिक्रिया! पण तुझ्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची सन्धी आम्हाला कुठल्या वर्षीच्या दिवाळीअंकात देणार आहेस?:-)


Bee
Friday, November 25, 2005 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, प्रतिक्रिया खरच छान लिहिली आहेस. पण यंदा तू अगदी अपेक्षाभंग केलास. म्हणजे साहित्य द्यायच्या बीबीवर म्हणालीस की आता काहीतरी लिहिती आहेस मग मी आस लावून दिवाळी अंकाची वाट पाहत बसलो आणि अधाशीपणे अंक येता तू कुठल्या भागात दडली आहेस म्हणून शोधून पाहिले पण तू कुठेच नव्हतीस.. कसे वाटले असेल तुझ्या वाचकांना? .. अगदी हिरमोड झाला. आणि हे फ़क्त तुझ्याचबाबतीत घडले असे नाही त्यात मैत्रेयी देखील आहे आणि इतर नेहमी नाही पण वर्षातून एकदा तरी काहीतरी चटपटीत वाचायला देणारेही आहेत. त्या सर्वांनी अंकात लिहू नये म्हणजे काही बोलणे नको.. खूप राग आला खर तर :-( ह्या वर्षीचा अंक फ़क्त नविन सभासदांमुळे तयार झाला आहे. जुन्या मायबोलिकरांनी फ़ार कमी प्रतिसाद दिला.

Neeraja
Friday, November 25, 2005 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी मला माफ कर, मैत्रेयी same to you!! :-) ...
मी पूर्ण प्रयत्न केला होता पण नेमके सहित्य पाठवण्याची शेवटची तारीख किंवा तारखा आणि त्याच सुमारास माझ्या सर्व comps नी संप पुकारणे, साधारण एक दिवसाआड पुणे-मुंबई करायची गरज पडणे, अचानक कामाचे pressure वाढणे या सगळ्या गोष्टींनी माझा घात केला. आणि मी देत असलेला लेख २-३ पानी नव्हता ना. चांगली १०-१२ पाने खर्ची पडली असती इथली... एवढे लिहायचे म्हणजे शांतपणा हवा ना.. तेव्हा आता माफ करा. पुढच्या दिवाळीसाठी आत्तापासूनच लिहून ठेवीन.
बी, हा नवे-जुने मायबोलिकर चा मुद्दा इथे कुठून आला? आम्ही आळशी आहोत एवढाच मुद्दा आहे...


Neeraja
Friday, November 25, 2005 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड्स, वरती कवितांच्या परीक्षणात एका ठिकाणी मला cliche हा शब्द अपेक्षित असताना तिथे Cliché असे दिसतेय. word मधे cliche type केले की शेवटच्या e चे french मधे रूपांतर होते. पण इथे ते recognise होत नाही ह्यामुळे घोळ झालाय. मला हे कळेपर्यंत ७२० मिनिटे होऊन गेली होती. तेव्हा आता योग्य तो बदल घडवणे तुमच्या हाती आहे.

Neeraja
Friday, November 25, 2005 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हसरे कवडसे
गाढवा - ए मिल्या आता नवीन कहीतरी कर की. हे तुला चांगले जमते कळले, पण त्यात तरी काही नाविन्य आण की..!!
पाहता पाहता पुरेवाट - चांगले आहे पण नेहमीची मजा आली नाही. सर्वच किस्से मजेशीर आहेत पण तरी something is missing to make it hilarious!..
कहाणी डायट देवाची - महान.. माझं व्रत न मोडण्याची मी वाट पहातेय.. व्रत न मोडण्यासाठी काय व्रत करावं सांगाल का?
क्रिकेटवीर आणि दादा कोण्डके - good
मामा मला सोडा - पीक्या, बात कुछ खास जमी नही.
एका पी. एच. डी. डिफेन्सची कहाणी - कथा छान आहे. डिफेन्सची बसणारी दहशत मस्त वर्णन केलीये. पण शेवटी स्वप्नाची कलाटणी देऊन सगळे मिळमिळीत केले. हसरे कवडसे मध्ये का आहे? स्पंदन मधे असायला हवी होती.
मूर्खता एक अभ्यास - वा प्रसाद वा! आवडले.. पण परत हसरे कवडसे मधे असायची गरज होती का? असे वाटले. ललित मधे योग्य वाटले असते.
थकले गे बिल आता थकले गे - ओके आहे.
व्यंगचित्रे - good


Bee
Friday, November 25, 2005 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अच्छा! त्या मुद्द्याबद्दल माफ़ कर. हवे तर sportingly घे.

आता जे काही अपूर्ण लिहिले आहेस त्याला पूर्ण कर. दिवाळीपर्यंत वाट बघायची म्हणजे कठिण आहे..

अजय तुझे व्यंगचित्रही छान आहेत. ह्यावर प्रतिक्रिया राहीलच होती..


Rahul Phatak
Friday, November 25, 2005 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'खंडणी' व 'पाहता पाहता पुरेवाट' ला दिलेल्या सर्व प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार !

Milind Agarkar
Friday, November 25, 2005 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, तो शब्द दिसतो आहे तसाच बरोबर आहे, असं मला वाटतं
तुझ्या प्रतिक्रिया वाचून पहिलं डोक्यात आलं ते म्हणजे ' अज्जुका बोलली...'
:-)

Neeraja
Friday, November 25, 2005 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मिलिंदा,
तो शब्द मला इथे clich आणि e च्या जागी एक चौकोन असा दिसतोय. ते निश्चितच बरोबर नाही.


Moderator
Saturday, November 26, 2005 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, दुरुस्ती केली आहे.

Neeraja
Monday, November 28, 2005 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मॉड्स, त्यासंदर्भातले इथले मेसेजेस काढून टाकले तर प्रतिक्रियांमधे रसभंग होणार नाही.


Neeraja
Monday, November 28, 2005 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवणी
जेलची हवा – सुरूवातीपासून शेवटापर्यंत खास!.. कुठेही कंटाळा आला नाही. एका वेगळ्याच विश्वाचे आणि वेगळ्या प्रकारच्या बालपणाचे दर्शन! आणि लिखाणातही इतकं सच्चेपण.. क्या बात है!!
तीर्थरूप बाबा – लिखाण प्रवाही असले तरी नको इतका भाबडेपणा आहे. (बी, तू न चिडता हे घेशील या अपेक्षेने हे लिहित आहे.) व्यक्तिचित्र लिहिताना त्या व्यक्तीचे गुणगान करायचे, असलेले दोषही गूण असल्यासारखे भासावायचे अशी काहीशी धारणा असते तीच इथेही जाणवते. पण ' अशी महान होती ती व्यक्ती' हा सूर लावण्यापेक्षा आपल्याशी असलेले त्या व्यक्तीचे नाते उलगडून दाखवता आले तर जास्त प्रामाणिक होईल असे मला अनेकदा वाटते. बाकी याबद्दल मला अजून जे म्हणायचे आहे ते तुला email मधे कळवते.


Neeraja
Monday, November 28, 2005 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इंद्रधनू
१. आपले विश्व आणि आपण – चांगले आहे. शेवटचे ३ हेतू उत्तमच. खूप अभ्यासपूर्ण माहिती पण लेखाचा focus clear झाला नाही असे झाले.
२. पालकनीती परिवाराचे खेळघर – फारच मस्त. लिखाणाच्या शैलीबद्दल बोलावेसे वाटत नाहीये इतके मस्त काम करताय तुम्ही लोक. मुले नीट घडली तर आणि तरच भविष्यात काही अर्थ असू शकतो हे किती परफेक्ट ओळखलेत तुम्ही. देणगी देणे शक्य नाहीये पण उपक्रम गेले कित्येक दिवस डोक्यात घाटतोय तो तुमच्याशी share करायला आवडेल.
३. आत्मचरीत्रांच्या गोष्टी – speedy overview of autobiographies . खूप नाव येऊन गेली. नंतर नंतर तर सगळी नावे उल्लेखापुरतीच आली. पण निदान एक यादी तरी चांगली मिळाली. साधना आमट्यांचं समिधा यादीतून राहून गेलंय. अप्रतिम आहे. सुमा करंदीकरांचे रास मला खुपच सामान्य वाटले. बालकांड must read आहे. कुठेही गवगवा नाही आणि ओघवती भाषा शैली त्यामुळे छान वाटते बालकांड.
४. ही गाथा यत्नांची – चांगले प्रयत्न आहेत आणि त्यांचा आढावाही. पण nothing special about the subject and article as well असे वाटले.
५. परिचय्: The bridges of Madison county – पुस्तकाच परिचय म्हणजे गोष्ट नव्हे. त्यात लेखकाची शैली, लेखनाची रचना, लेखकाचे statement या व इतर अनेक गोष्टींना स्पर्श करायला हवा. सध्या तरी आहे ती गोष्ट वाचून हे पुस्तक Mills & Boons च्या पेक्षा फार वरचे असेल असे वाटत नाही. त्यामुळे अर्थातच वाचावे असेही वाटत नाही.


Neeraja
Monday, November 28, 2005 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनातले
१. भय इथले संपत नाही – ओके आहे. ज्वलंत विषय घेऊन त्यावर काहीतरी लिहिण्याचा सोस आणि खरंतर त्या विषयाशी आपल काहीच नातं नसण त्यामुळे लेखनामधे येणारा कत्रिमपणा इथेही दिसून येतो.
२. मनातली दिवाळी – साधं, सोपं, खरं. छान.
३. आग्रह – ए आर्च, विषयच मस्त घेतलायस. आणि त्यावरची तुझी मतेही मस्तच. मला आवडला लेख.
४. २६ जुलै २००५ पॅरीस – छान रे. एकदम नाट्यमय आढावा. छान प्रवाहीपण लिखाणाला. कुठलाही आव नाही. मुळातला थोडासा तिरकेपणा. य सगळ्यामुळे लेख मस्त झालाय
५. ग्रॅंडकॅन्यन्: प्रवासवर्णन – सरळ प्रवासवर्णन. घटनाक्रम. पण तरी, रुसलेल्या बहिणीला समजवायची सल्लामसलत करणार्‍या दोन बहिणी या व अश्या बारीक बारीक टिप्पणींनी छान वाटले





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators