|
जयश्री अम्बासकरान्ची प्रथम परितोषक विजेति प्रतिक्रिया ंP३ सुविधा उपलब्ध नसल्यने ऐकू शकले नाही. आपण कृपया त्याचे शब्द आपल्या सन्केत स्थळावर उपलब्ध करून द्यावेत ही नम्र विनन्ती.
|
Sampadak
| |
| Monday, November 13, 2006 - 10:37 am: |
| 
|
Gondhali, लिंक नीट चालते आहे. आताच चाचणी केली आहे.
|
im gettign the same problem with the corrupted file. if someone is not part of the google group - there might be a problem accessing the file.
|
आदित्य, ही फाईल access करायला google groups चं account असावं लागत नाही, मी स्वतः वेगवेगळ्या लोकांना (ते पण इथले गोरे लोक) ती फाईल download करायला लावली आहे. त्यांना काहीही प्रॉब्लेम आला नाही. तुला नक्की काय एरर येते आहे ती टाकशील का इथे?
|
मिलिंदा, फाईल डाऊनलोड करुन ओपन करताना ही एरर येतेय.. "There was an error opening this document. Could not repair file." वरील लिंक जर ब्राऊजर विंडोमध्ये ओपन केली तर या URL ला जाते आणि ब्राउजर विंडो हॅंग होते. IE मध्ये लिंक उघडली तर ब्राउजर विंडोमध्ये एरर दिसत नाही पण जर FireFox वापरले तर वर दिलेलीच एरर येते.
|
हो, मलादेखील ही फाईल डाउनलोड करून उघडताना " There was an error opening this document. The file is damaged and could not be repaired " अशी एरर येत आहे. माझ्या मशिनवर ऍक्रोबॅट रीडर ५.० हे व्हर्शन आहे.
|
mI tii file download kelI vyavasthit open hote aahe maajhyaa kaDe. FF and acrobat reader version 5.0
|
बहुतेक सगळा अंक वाचुन झाला. खुप आवडला. अत्यंत दर्जेदार दिवळी अंक आहे हा. उत्तम जमलाय आणि संपादक मंडळापासुन सजावटकारापर्यंत प्रत्येकाने घेतलेली जीवापाड मेहनतही पानोपानी दिसतेय. तुम्हा सगळ्यांचे हार्दीक अभिनंदन. समर्पक रेखाटने आणि श्राव्य माध्यमाचा वापर ही एकदम आकर्षक आणि यशस्वी वैशिष्ट्ये आहेत या अंकाची. प्रत्येक वर्षी अंकाची गुणवत्ता वाढत चालली आहे ही खुप कौतुकास्पद गोष्ट आहे. अनेकांनी म्हणल्याप्रमाणे ऋचाचा लेख खुपच अस्वस्थ करुन गेला. चाफा, मिनोती, गिरी, यांचे लेख खुपच छान आहेत. रुपालीची फ़्रान्सवारी एकदम फर्मास. रंगतदार. रुपाली तु समोर बसुन सांगते आहेस असं वाटलं आणि तसं अनुभवलं. १८मृद्गंध १९मधले सगळे लेख वेगवेगळ्या दृष्टीकोनातुन लिहिले गेलेत त्यामुळे त्याचं शीर्षक वेगळं हवं होतं असं मलाही वाटलं पण त्यातले लेख चांगले आहेत. ललिताने आणखी विस्तृत लिहायला हवं होतं. लेख मधेच संपल्यासारखा वाटला. कणेकरांची मुलाखत आवडली. चांगले बोललेत ते. रारने प्रश्नही छान विचारलेत. जयावीचा नवा प्रयोग एकदम मस्त. आवाज खुप गोड आणि त्याला सुरेल चाल आणि थोड्याच संगीताची मस्त जोड मिळाल्यामुळे मजा आली आहे. स्वातीचे मायबोली व्रत पण एकदम खुसखुशीत आहे. तुम्हा दोघींचेही अभिनंदन. श्रध्दा तुझा रहस्यमय गोष्टी लिहिण्यात हात बसलाय अगदी. श्रीनी, मैत्रेयी यांच्या गोष्टी एकदम जमल्यात. सुस्मितमधे काही लेख छान आहेत तर काही बरे वाटले. मिल्या, प्रसाद यांनी खुप करमणुक केली. रांगोळी काही केल्या मला उघडता येत नाही. त्यासाठी काय करू? लालु, गिरी, क्षिप्रा, चाफा, प्रिया, गजानन, महागुरू, मैत्रेयी, नीलु, प्रमोद तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. आणि रुपेश, रचना तुमचे तर विशेष अभिनंदन.
|
माझ्या लेखाला मिळालेल्या संमिश्र प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी मला वैयक्तिक लिहुन प्रतिक्रिया दिल्या त्यांचेही इथे धन्यवाद. अनेकांनी अनेक शंका विचारल्या आहेत. मी आणखीही प्रश्नांची उत्तरे देईन. ज्यांची माहीत नसतील त्यांची आपण मिळुन शोधू. लेख एकांगी वाटल्याचे एकदोघांनी लिहीले आहे, त्याचे कारण त्यात फक्त प्रकल्पग्रस्तांचीच बाजू मांडली आहे. मी लेखात मांडल्याप्रमाणे याला अनेक आणि सारख्याच महत्वाच्या बाजू आहेत. त्यांना जर कंपन्यांची बाजू जाणून घ्यायची असेल तर ती उघडच समजू शकते. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी किती प्रमाणात सवलती दिल्या जाव्यात त्याला आता काहीही मर्यादा नाहीत हे मांडणे हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे. देशाच्या काही भागांचे स्वातंत्र्यच तिथे धोक्यात येतेय, या किंमतीवर होणारा आर्थीक विकास केवढ्याला पडेल? कोट्यवधींचे विस्थापन, करांमार्फत मिळणारा कोट्यवधीचा महसुल बुडणार, त्या क्षेत्रांतली शेती संपणार म्हणजे अन्नधान्याच्या उत्पादनात घट आणि शिवाय बेसुमार बेरोजगार लोक या सगळ्यातुन खरोखरच होईल आर्थिक विकास? जिथे राष्ट्राचे अर्थमंत्रीच चिंताजनक प्रतिक्रिया देतात म्हणजे नक्कीच चिंताजनक परिस्थिती असणार. आता निवृत्तीवेतनाचा बोजा सरकारी तिजोरीला पेलेना, तिथे हे खर्च कसे पेलतील? मुळात एवढं लोणी कशासाठी हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. विशेष म्हणजे या धोरणाबद्दल काहीच सार्वजनिक चर्चा झाली नाही. राज्यसभेतसुध्दा अनेक आक्षेपांकडे फारसे लक्ष न देता एकाच दिवसात हे बील पास केले गेले. गावे स्वयंपुर्ण होण्यासाठी अशा महत्वाकांक्षी योजना का राबवल्या जात नाहीत आपल्याकडे? नवे रोजगार कुठले उलट अस्तित्वात असलेली स्थानिक पातळीवरची उदरनिर्वाहाची साधनेही यामुळे नष्ट होणार आहेत. याच्या एक शतांश प्रोत्साहन आणि पाठबळ जर पोपटराव पवार (हिवरेबाजार) किंवा भीमराव माने (कवठेपिरान) यंच्यासारख्या तरुणांना देऊ केलं तरी चित्र मोठ्या प्रमाणावर आणि तेही अल्पावधीत पालटेल शिवाय विस्थापन, प्रकल्पग्रस्त अशा नव्या डोकेदुख्या निर्माण न होता. आता तर Special Tourism Zones देखील येतायत. म्हणजे पुन्हा नवे गंडांतर. तिथेही 'भावी कॅलिफोर्निया' म्हणुन पुन्हा पहिला कोकणच दावणीला बांधला जाईल. पण देशातला कोणताही प्रदेश असेल तरी अशीच हळहळ होईल. लोकांना न सांगता परस्पर तलाठी कार्यालयातुन त्यांच्या जमीनींचे दाखल्यांवर प्रक्रिया केल्या जाताहेत. ही अतिशयोक्ती वाटेल पण खुद्द नागपुरात नुकतीच एक घटना अशी घडली की निवृत्त न्यायाधीश रहात असलेली एक वसाहत पुर्ण विशेष क्षेत्र म्हणुन घोषित केलेल्या पट्ट्यात आली आहे आणि आज त्या लोकांची झोप नाहीशी झाली आहे. पळता भुई थोडी होण्यासाठीदेखील पायाखाली जमीनच उरली नाही. आज ते लोक म्हणतायत की कालपर्यंत फक्त दुसर्यांचे बघत होतो, आज आम्हीच बेघर झालोय. विचार करा, ही सुशिक्षित लोकांची गोष्ट आहे. या विषयावरच्या माझ्या तांत्रीक आणि आर्थिक अभ्यासाविषयीदेखील प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय मी इतरांच्या मतांवर विश्वास ठेऊन हा लेख लिहिल्याचंही म्हटलं आहे. मुळात इथे लेख लिहिण्यासाठी मी अभ्यास केला नाही, मी अभ्यास करतेच आहे तेव्हा संपादक मंडळाने मागितलं म्हणुन मी त्यातलं थोडं इकडे मांडलं. मी गेली काही वर्षे सातत्याने कोकणाच्या सर्व कानाकोपर्यातुन अगदी दुर्गम, अतीदुर्गम प्रदेशांमधुन मी विविध कारणांसाठी फिरतेय. शिवाय पुणे जिल्ह्यातल्या मुळशी, वेल्हे, बारामती, मावळ हे तालुके, सातारा जिल्यातले फलटण, माण, खंडाळा याही तालुक्यांमधे खेडोपाडी आणि वस्त्यांमधे जिथे खुप सार्य ठिकाणी अजुनही रस्तेसुध्दा धड नाहीत, वाहने जात नाहीत, कामांसाठी सतत जातेय. ग्रामीण क्षेत्रातलं कोणतंही सामाजीक काम एकमेकापासुन वेगळं काढता येत नाही त्यामुळे अप्रत्यक्षपणे माझ्या कामाचा अभ्यास करतानाच तिथल्या सर्वच प्रश्नांचादेखील चहूबाजूंनी अभ्यास केला जातो, किंबहुना तो करावाच लागतो. कोकणाचा उल्लेख आधी केला कारण मोठी आर्थिक क्षेत्रे घोषीत करण्यासाठी कोकणाला जास्त प्राधान्य दिलं जातंय. तिथल्या लोकांना प्रत्यक्ष भेटतेय. त्यात काजू उत्पादक, आंबा उत्पादक, इतर बागायतदार (कोकम, केळी, नारळ, सुपारी करणारे) मासेमार / कोळी (भंडारी समाज), छोटे शेतकरी जे फक्त भात करतात, नोकरदार, छोटे - मोठे व्यावसायिक, मजूर, आदिवासी, कातकरी, मेंढपाळ, धनगर (दिवसभर रानात असणार्या या लोकांमागे फिरत जावं लागतं किंवा सुर्योदयाच्यावेळी नाहीतर सुर्यास्ताच्या वेळीच गाठावं लागतं, त्यासाठी रात्रीबेरात्री प्रवास करुन वाड्यावस्त्यांवर होइल तशा व्यवस्थेत मुक्काम करावे लागतात), अनेक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते अशा कितीतरी प्रकारच्या लोकांशी तिथल्या सामाजीक, आर्थिक प्रश्नांबद्दल नेहमी बोलणे होत असते. या सगळ्याबरोबरच अनेक चर्चासत्रे, प्रकल्पग्रस्तांबरोबरच्या बैठका, विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर मीटिंग्ज असतात तिथे उपस्थित रहाणे आणि जास्तीत जास्त माहिती घेणे हेसुध्दा करतेय. हिंदुपासुन इकॉनॉमिक टाईम्सपर्यंत ते त्या त्या ठिकाणची स्थानिक वृत्तपत्रे इथपर्यंत वर्तमानपत्रात या विषयासंबंधी छापुन येणारे अक्षर न अक्षर डोळ्याखालुन घालावे लागते. त्याशिवाय विषयाचा आवाका आणि सर्व बाजू लक्षात येत नाहीत. शिवाय प्रकल्पग्रस्त आणि कंपन्या या दोन्ही बाजू मांडणारे तज्ज्ञांचे लेखही प्रसिध्द होत असतात, ते वाचले जातात. यावर पर्सिस्टंटचे विवेक साधले आणि इन्फ़ोसिसचे नारायणमुर्ती यांनी लेख लिहीलेत पण तरीही त्यात प्रकल्पग्रस्तांची समाधानकारक व्यवस्था नाहीच. असो. अजुन तरी माझा इतकाच सुक्ष्म अभ्यास आहे या विषयाचा. ईथे या सर्वाचा उल्लेख करणं योग्य नाही पण ते प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी गरजेचे होते. मायबोली हे आता एक मान्यताप्राप्त व्यासपीठ झाले आहे आणि इथे किमान थोड्या अभ्यासाशिवाय काही खरडणे बेजबाबदारपणाचे होईल इतके तारतम्य मला आहे. GS , संगवईंवर विश्वास ठेऊन मी हा लेख लिहीला हा निष्कर्ष तु कसा काढलास हे कळेल का? संगवईंबद्दलची तु सांगितलेली पार्श्वभूमी इथे अनाठायी वाटली. तसे तर मैत्रीपर्वात जे जे पत्रकार पाकिस्तानवारी करुन आले ते सगळेच तुणतुणं वाजवताहेत, त्यामुळे एकट्या त्यांना दोष कशासाठी? पण तो इथला मुद्दा नसल्याने मी त्यावर इथे काही लिहीणे बरोबर नाही. ते काही असो, पण त्यांच्या तुणतुण्याचा आणि या मुद्द्याचा एकत्र संबंध कसा लावलास तोही तर्क समजु शकला नाही. आणि एक महत्वाचा असाही प्रश्न पडला की तु श्रेयनामावली आधी वाचलीस की लेख? कारण मी एखाद्या अक्षराचीदेखील जर कोणाकडुन मदत घेतली तर तसा उल्लेख करत असते. आणि इथे तर संगवईंबरोबर मी इतरही अनेकांचे उल्लेख केलेत. मी ते केले म्हणुनच तु संगवईंबद्दल हे सांगितलंस. अन्यथा तुझी काय प्रतिक्रिया आहे तेही मला ऐकायला आवडेल. (इतरांनी श्रेयनामावली दिली नाही ते एकंदरीत शहाणे म्हणायचे.) आणखी एक मुद्दा म्हणजे कम्युनिस्ट विचारसरणीचा तु उल्लेख केला आहेस. मला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की लिखाणावर प्रभाव जाणवावा इतका कोणत्याही विचारसरणीचा माझा अभ्यास नाही. भाटवडेकर, आपल्या प्रक्षोभक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपणही का नाही असा एखादा प्रयत्न करुन पाहात? रोजच्या वृत्तपत्रांतुन २ - ४ तरी प्रचार पत्रके टपटपत असतातच. त्यामुळे सोपं होईल तुमचं काम. काही मदत लागली तर महाजाल आहेच दिमतीला. 'चिंतन' हे शीर्षक त्या विभागातले लेख वाचुन झाल्यावर वाचकांनी करावं या अपेक्षेनं दिलेलं असेल हे तुम्हाला सुचायला हवं होतं भाटवडेकर.
|
सम्पादक दिवाळी अन्क पीदेईफ़ फ़ईल ओपेन होत नाही.
|
Moderator
| |
| Friday, December 01, 2006 - 12:48 pm: |
| 
|
होतेय की. काय error येतोय, ते सांगाल का?
|
मॉडरेटर, मला "The file is damaged and could not be repaired" असा एरर येतोय. मला वाटते ५.० version मुळे असे होत आहे, कारण माझ्या ऑफिसमध्ये काही अडचण न येता अंक उघडला.
|
|
|