|
meenakshi
| |
| Monday, October 30, 2006 - 4:32 am: |
| 
|
सारंग प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद .......... शेवटच्या कडव्यात शब्द माझ्याच असाच आहे ..... माझीयाच ही प्रकाशन करताना झालेली चुक आहे. काही उपमा असंबद्ध... जसे माधुरी पानात... >>>> ही उपमा असंबद्ध का वाटली ते नाही कळलं हं ... रानात बासरी म्हणुन त्या सुरांचा गोडवा म्हणजेच माधुरी पानापानात असा अर्थ अभिप्रेत होता ... सारखं सारखं रानात, पानात आणि मनात काय आहे ते पहावं लागतं>>> खरय पण ते template च तसं आहे ना ....?
|
Bee
| |
| Monday, October 30, 2006 - 5:06 am: |
| 
|
शोनूची राजामनी आज निवांत वाचून काढली. शोने, खूपच वेगळी कथा. वातावरण निर्मिती अशक्य केली आहेस..
|
meenu, प्रकाशन करताना चूक झाली असेल तर तुम्ही तसे संपादकांना कळवलं आहे का? मला वाटतं येथे वर इतरांनी चुकांबद्दल लिहीलं आहे, आणि त्या दुरुस्त ही झाल्या आहेत
|
इतका सुरेख दिवाळीअंक काढाल्याबद्दल मी सर्व मायबोलीकारान्चे मनापासून अभिनंदन करतो.. --तात्या अभ्यंकर.
|
मुखपृष्ट, जयावी-स्वाती ह्यांच्या कला सुरेखच. बाकी पण सर्व काही आवडले. वर काहीजणांनी कवितांबद्दल छान प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या माझ्या सारख्या कविता विशेष न समजणार्यांसाठी उपयोगी आहेत. म्हणुन चालु द्या. आणि आधार छान होती पण मलाही शेवट नीट कळला नाही. श्रिनी आता जमीन एकसंध झाली असेल तर परत ये आणि सांग की please . बाकी पणति, राजामणि, श्रद्धा मस्त. छे, कायकाय लिहायचं, सगळा अंक छान.
|
या वेळचा दिवाळी अन्क बोलता झाला हे! पुढच्या बारीला हालता चालता पण होवुदे! जयश्री आणि प्रसाद दोघान्च्या क्लिप्स थोड्याच ऐकु शकलो! पण मस्त वाटल! गम्मत पण वाटली! ऑडिओचा सुरेख वापर करणारे अन त्यान्ना अन्कात समाविष्ट करणारे, दोघेही जण अभिनन्दनास पात्र! या अन्काचा सन्दर्भ देशातील वृत्तपत्रे तसेच साहित्य सन्स्थान्ना देण्यासाठी कुणी ज्येष्ठाने पुढाकार घ्यावा! मी आणि मायबोली-विजेत्या तसेच सहभागी (कोण कोण?) स्पर्धकान्चे व स्पर्धेच्या रोख पुरस्काराच्या प्रायोजकान्चे अभिनन्दन! फची दोन्ही चित्रे सुरेख, भरपुर आशय सम्पन्न! बाकी अन्क अजुन वाचायला घेतलाच नाही पुढील महिनादीड महिना पुरेल येवढा मालमसाला हे! सर्व सहभागी लेखक, गायक, कलावन्त मायबोलीकर तसेच सम्पादक, मॉड्स आणि श्री. व सौ. आॅडमिन यान्चे हार्दीक अभिनन्दन मुखपृष्ठाने बहार आली!
|
मी आणि मायबोली या स्पर्धेतील दोन्ही विजेत्यांनी (जयश्री आणि स्वाती) त्यांना मिळालेल्या बक्षिसाची रक्कम मायबोलीलाच देऊ केली आहे. मायबोली या दोघांचीही ऋणी आहे.
|
sarang
| |
| Tuesday, October 31, 2006 - 9:08 am: |
| 
|
वा! आता तर मी या दोघींचाही जबरदस्त fan झालो आहे... तुमच्या कलाकृतींइतक्याच तुमच्या कृती बोलक्या आहेत...
|
तू माझी मायबोली.... जयू, 'तू माझी मायबोली' हे गाणं मी डाऊनलोड करून घेतलं आहे. 'केवळ सुरेख' एवढेच शब्द मला हे गाणं ऐकून सुचतात! फरच सुंदर म्हटलं आहेस. चाल अत्यंत साधीच आहे पण मराठी मातीतली आहे, हृदयाला हात घालणारी आहे. (हे माझं सांगितिक मत!) चाल कुणी लावली आहे? वादक कोण आहेत? हे गाणं कुणी गायलं आहे? तूच ना? छानच आहे तुझा आवाज. मधलं मधलं तुझं बोलणंही छान आहे. एखादा कार्यक्रम डोळ्यासमोर सुरू आहे असं वाटलं! बोलायच्या आवाजाची टोनल क्वालिटीदेखील सुरेख आहे. एकंदरीत 'तू माझी मायबोली' या गाण्यातली प्रत्येक गोष्ट मला आवडली. तुझं मनापासून अभिनंदन.. संगीतक्षेत्रात, काव्यक्षेत्रात, काव्यवाचन क्षेत्रात, निवेदनशैली सुरेख असल्यामुळे त्याही क्षेत्रात तुला खूप खूप यश मिळो हीच या तात्याची शुभकामना... तात्या.
|
नुकत्याच दोन्ही MP3 ऐकल्या. दोन्हीही केवळ अप्रतीम आहेत. फारच आवडल्या, सर्व संबंधीताचे अभिनंदन.. बाकी वाचन झाल्यावर..
|
दिवाळी अंक खुपच छान आहे जयश्री माझी मायबोली एकदम अप्रतिम.. श्रध्दा कथा सुरेख.. ऍडमिन, संपादक मंडळ, स्वयंसेवक, व सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन 
|
Jhuluuk B
| |
| Thursday, November 02, 2006 - 7:52 am: |
| 
|
आत्ताच उरलेला अंक वाचला.. चिंतन हा विभाग खुप छान वाटला.. मला वाटते की प्रत्येक माणसामध्ये "Synesthesia" चे थोडेफार गुण असतील. मी लहानपणापासुन वर्षाचे "calender" 3D मध्ये पहाते. .. आणि ऋचा चे विशेष कौतुक करावेसे वाटते. ४ महिने सुद्धा भरपुर आहेत असे धाडस दाखवायला.. अडचणी समजुन घ्यायला... तिचा लेखातील काही प्रसंग वाचताना पोटात गोळा आला....
|
RGA
| |
| Thursday, November 02, 2006 - 4:56 pm: |
| 
|
लेखाच्या प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे आभार . लेख योग्य त्या formatting मध्ये पाठवु शकले नाही त्यामुळे मला खात्री आहे संपादक मंडळाला बराच त्रास झालेला असणार , त्याबद्दल मनापासुन दिलगीरी . इतक्या देखण्या अंकाबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन . अमाप कष्ट घेतलेत तुम्ही लोकानी .
|
Medha Pai
| |
| Friday, November 03, 2006 - 3:19 am: |
| 
|
एकदा अधाशासारखा वाचला होता. आता परत निवांतपणे ( रवंथ कोण म्हणतंय ते?) वाचला. माझ्या गोष्टीबरोबर चित्र काढून दिल्याबद्दल धन्यवाद. आता मला खरोखर ' published writer असल्यागत वाटू लागलंय. कराडकरचा लेख आणि तिने केलेली भांडी अगदी सुरेख. पुढच्या दिवाळी पर्यंत हितगुजवर पणत्या विकायला लावायल्या हव्यात. मोठेपणी असले छंद जोपासणे आणि सर्व प्रॉजेक्ट तडीस नेणे याला फार चिकाटी लागते. कंपनी सरकार बद्दलचा लेख माहिती पूर्ण, पण तरिही एकांगी वाटला. दोन्ही बाजूंचे मुद्दे मांडायला हवे होते असं वाटलं. आशिष च्या लेखात माहितीचं संकलन उत्कृष्ट आहे. पण त्यांनि थोडसं स्वत:चं विवेचन लिहायला हवं होतं. तरिही सर्व साधारण वाचकाला समजेल अशा भाषेत बरीच माहिती संकलित करून लिहिल्याबद्दल धन्यवाद. इथेच न थांबता आता रंगी बेरंगीच्या पानावर पुढचे चॅप्टर लवकर लवकर वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे. मृद्गंध मधे अजून बर्याच लोकांनी लिहायला हवं होतं, ज्यांनी लिहिलंय त्यांनी सुद्धा आणखीन लिहायला हवं होतं. जयावी चा आवाज आणि गाणं दोन्ही सुरेखच. रेकॉर्डिंग पण माझ्या मते अगदी प्रोफ़ेशनल दर्जाचं आहे. मायबोलीची कहाणि एकदम मनात घर करून गेली. चित्र सुद्धा अगदी पोथीतल्या सारखी वाटतात. लिम्बूटिम्बू- लेख जमला नाही. कदाचित आता मायबोलीवर खड्ड्यांविषयी भरपूर विनोदी मजकूर वाचून झाला म्हणून असेल. पण त्यांच्या इतर पोस्टिंग्च्या तुलनेत हा लेख फिका ( पाडलेला) वाटला. मला याच्या शतांशाने सुद्धा जमला नसता हे एकदम मान्य आहे. श्रीनी ची गोष्ट- शेवट घाई घाईत केल्यासारखा वाटला. पण वर्णन एकदम छान. दिनेश, आज्जुका, हवा हवाई यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. इतर सुद्धा V&C वर लिहिणार्या मंडळींनी हजेरी लावायला हवी होती. पुढच्या वर्षी एक रेसीपी स्पर्धा पण घ्यायला हवी. पदार्थ करून किंवा चाखून पाह्यची वेळ येणार नसेल तर मी पारितोषिक sponsor करायला तयार आहे!
|
Minoti
| |
| Friday, November 03, 2006 - 11:18 pm: |
| 
|
संपादक मंडळी अंक सुरेख झालाय. आपापल्याकामातुन सवड काढुन एवढे कष्ट घेउन अंक काढल्याबद्दल तुमचे करावे तितके कौतुक कमी आहे. माझा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे लेख छान झालेत. अंक अजुनही पूर्ण वाचलेला नाहीये. शोनू ची राजामणी सुंदर आहे. RGA तुझ्या लेखाने मला माझी आजी आठवली. सई चा लेख, चाफ़्याचा लेख पण सुंदर. रचना, DJ , गिरी लेख छान. स्वाती आणि जया तुमचे दोघींचे मी आणि मायबोली खुप छान. कवीतांमधे मला काहीही कळत नाही त्यामुळे प्रतिक्रिया देणार नाहिये.
|
Jayant
| |
| Saturday, November 04, 2006 - 11:37 am: |
| 
|
कराडकर, तुमचा पॉटरीवरचा लेख वाचला, छान लिहिला आणि फोटोंमुळे खुलला आहे हा लेख वाचला आणि कोणे एके काळी सलग काही वर्षे सिरॅमिकवर केलेली उपजिविका आठवली आम्ही चाकावरची भांडी फार क्वचित बनवायचो, जास्त करून कॉईल पॉटरी, किन्वा मातीच्या स्लॅब वापरुन केलेली पॉटरी, कॅसल, म्युरल्स, तसेच स्लीप कास्टिन्ग, राकू असे बरेच काही करायचो. बरच काही सांगण्यासारख आहे ते विसरुन जायच्या आत कुठेतरी लिहुन ठेवल पाहीजे बाकी दिवाळी अंक मुखप्रुष्ठ अनुक्रमणिका आणि मजकुरासहीत अप्रतिम, एकेक वेळ मिळेल तसे वाचित आहे धन्यवाद
|
Diwali anka chan zala ahe.Mukhaprushtha surekh.Ani "maaybolichi kahani"tar "keval" "jawab nahi""apratim".....! Kharach katecha ha form far netakya padhatine vaparala ahe.Agadi chapakhal!Awadala!!
|
Shravan
| |
| Sunday, November 05, 2006 - 11:22 am: |
| 
|
खुपच सुंदर अंक.. अंकासाठी घेतलेले कष्ट जाणवतात त्याचा देखनेपणा पाहताना. अंकासाठी लेख लिहिणारांचे, चित्र काढणारांचे, संपादक मंडळाचे अभिनंदन.. खरेच फारच सुरेख जमलाय हा अंक..
|
Sampadak
| |
| Thursday, November 09, 2006 - 3:26 pm: |
| 
|
हितगुज दिवाळी अंक २००६ दिवाळी अंक PDF मध्ये खालील लिन्क वर उपलब्ध आहे. हितगुज दिवाळी अंक २००६ (PDF)
|
gondhali
| |
| Saturday, November 11, 2006 - 7:19 pm: |
| 
|
संपादक, PDF ची लिंक corrupt आहे.. जरा तपासा.
|
|
|