|
vikas sawant NJ
| |
| Wednesday, October 25, 2006 - 1:12 pm: |
| 
|
पुन्हा लिहायच कारण म्हनजे वरती एक दोन नकारत्मक मेसेज दिसले. सम्पदकानी साहित्य घेतल नाही तर त्यना तो अधिकार च आहे. मी स्वत: नवी मुम्बै मधे एका बर्यापैकी नावाजलेल्या नियतकालिकात काम केले आहे. असे कोणते साहित्य जर परत पाथवले तर सम्पादक कारण द्यायला बान्धिल नसतात. लेखकाने समजले पाहिजे की साहित्य परत आले म्हणजे पसन्त पडले नाही त्यात कसले स्पश्टिकरण पुन्हा!
|
बी आणि श्री. दुर्गाप्रसाद भाटवडेकर, माझ्या कविता वाचल्याबद्दल आभारी आहे. दिवाळीच्या ( उशीराने) शुभेच्छा!
बी, तुम्हाला पुढील काव्यलेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!
|
प्रथम कहाणीच्या कौतुकाबद्दल सर्वांचेच मनापासून आभार. यंदाच्या दिवाळी अंकात इतकं दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण साहित्य आहे, की सगळा वाचून झाल्यावर एकदम प्रतिक्रिया द्यायची म्हटली (जसा आधी विचार होता,) तर फारच उशीर होईल असं वाटलं. तेव्हा जसजसा वाचून होईल तसतसं लिहीत जाऊ असं ठरवून इथे आले. तर इथे भलतीच चर्चा रंग घेताना दिसत्ये. बी, तू काय बोलतोस हे तुझं तुलातरी कळतं की नाही अशी मला यापूर्वी शंकाच होती, आता कळत नाही याची जवळपास खात्रीच झाली. तरीही एकदा शेवटचा प्रयत्न करून पहाते तुझं म्हणणं समजावून घ्यायचा. १. आशय : कवितेचा आशय सुमार किंवा जेमतेम म्हणजे नक्की काय? तुला अशी शक्यता कधी वाटली आहे का, की सखोल आशय असेल, पण तुला समजला नसेल? एखादी कविता ' मला आवडली नाही' म्हणणं वेगळं आणि तिच्या आशयाबाबत अशी बेजबाबदार विधानं करणं वेगळं. बाकी, ' होतो तसाच आहे मी' जर ' देहमेणा'ला समांतर जाते असं तुला वाटलं असेल, तर तुला कुठल्या कवितेचा काय आशय आणि अन्वय समजत असेल हा एक प्रश्नच आहे. २. तोचतोचपणा : निसर्ग, प्रेम / भक्ती, विरह, वंचना आणि वैराग्य हे समस्त मानवजातीच्या जिव्हाळ्याचे विषय होते, आहेत आणि रहातील. तुला माहीत आहे का, ११ सप्टेंबरच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी मरण्यापूर्वी ज्यांना आपल्या माणसांशी संपर्क साधणं शक्य झालं, त्यातले शंभर टक्के निरोप हे 'xxx ला सांगा, माझं तिच्यावर / त्याच्यावर फार प्रेम आहे..' असे होते? जे काळजाला भिडतं, त्यावरच उत्तम कविता होतात. ( अर्थ स्पष्ट आहे.. जे न भिडता अट्टाहासाने लिहीलं जातं, ती एकतर कविता नसते किंवा उत्तम नसते.) आता कुणाला काय भिडावं हे ठरवण्याचा तुला अधिकार आहे असं तुला खरंच वाटतं का? मोजक्या, नेमक्या आणि सुंदर शब्दात भावना व्यक्त करते ती चांगली कविता. प्रेमात पडलेल्या दर १००० लोकांमधले किती जण आपल्या भावना अश्या पद्धतीने व्यक्त करू शकतात? तेव्हा जे ते करू शकतात, त्यांची कदर आपल्याला करता आलीच पाहिजे. जाता जाता, वैभव यांच्या कवितेत वैविध्य नसते आणि त्याची शब्दसंपदा सुमार आहे हे दोन निष्कर्ष तू नक्की कश्यावरून काढलेस ते आकडेवारी देऊन सांगशील का? माझं मत याच्या नेमकं उलट आहे म्हणून विचारत्ये.
|
वैभव , सहीच ! तो पुष्पगुछ पाहून एकदम मुन्ना भाय ने लकी सिंग ला पाठवलेली flowers आठवली ..
|
दीप्स, मलापण! पण मी अजून ' गांधीगिरी' सुरू केली नाही. असो. आता दिवाळी अंकातलं मला काय काय आवडलं ते सांगते. १. संपादकीय : विचारप्रवर्तक. सणवार ( किंवा खरंतर काहीही) गतानुगतिकपणे करत रहायचे की त्याचा काही अर्थ समजून घेऊन आपल्या जीवनाला त्याची जोड द्यायची ही खरोखरच विचार करण्याजोगी बाब आहे. २. भावशिल्प ( इथे कथाच आहेत असं कुठे म्हटलंय?) राजामणी ( शोनू) : मला या सदराततलं सर्वात आवडलेलं लिखाण. साधीशीच गोष्ट, पण छान चित्रित केली आहे. वाचताना नकळत त्या पात्रांत कधी गुंतायला झालं कळलंच नाही. हैदियाल ( मैत्रेयी) : सहजसुंदर शैली. उत्कृष्ट व्यक्तीचित्रण. विचारप्रवर्तक लिखाण. गोधडी (RGA) : पुन्हा एकदा सुरेख व्यक्तिचित्रण. आजी तिच्या बालपणच्या कश्याबश्या जपलेल्या आठवणी नतीच्या गोधडीत शिवून देते.. ते ह्रद्य आहे. ३. अनुभूती व्हिन्सेन्ट व्हॅन गॉ ( रचना) : मला भलताच आवडला हा लेख. माझा या सदरातला favourite . मला चित्रकलेतलं ओ म्हणता ठो कळत नाही. त्यातही गोष्टी आहेत तश्या चित्रात दिसल्या तर छान वाटतं, एरवी ही expressionist / impressionist भानगड अजिबातच कळत नाही. पण हा लेख वाचल्यावर अश्या चित्रांकडे बघायची नवीन दृष्टी मिळाली असं वाटलं. आता मी निदान ती समजून घ्यायचा प्रयत्न तरी करेन, आणि कधीकाळी कदाचित ती माझ्याशी काही बोलतीलही. धन्यवाद, रचना. फिरत्या चाकावरती.. ( मिनोती) : आणखी एका कलेचा छान परिचय. आणि त्यात रंगलेल्या कलाकाराचाही. बदल ( उपास) आणि चुटकीसरशी ( आर्च) : छोटेखानी पण विचारप्रवर्तक. ( माझा ' जीवेत..' बहुधा या category त यावा.) बाळपणीच्या फॅशन्स ( दीप्स) आणि कोकणातल्या गणपतीच्या आठवणी : nostalgia. पण दोन्हींची शैली छान आहे. आणि मी त्या अनुभवांशी relate करू शकले म्हणून आवडलं. शिरीष कणेकर मुलाखत ( रार) आणि ह्रषिदा ( गिरीराज) : माहितीपूर्ण आणि आवडीचे विषय म्हणून आवडलं वाचायला. क्रमशः...
|
Jaya
| |
| Wednesday, October 25, 2006 - 8:51 pm: |
| 
|
1. देहमेणा : उरे अंतरात | सांजपणा. हा सांजपणा पोचला नाही. वाचुन असे वाटले 'शेवटचे देवा | ऐक रडगाणे | नको येणे - जाणे | इथे पुन्हा | | ' 2. उकल: शेवतचे कडवे एक स्वतंत्र कविता आहे. पहिलई अनेक कडवी नमनाला घडाभर झाले. शेवतच्या पासुन कविता सुरु केलिस तर काय लिहिशील हा विचार मनात आला.. 3. अशा सांजवेळी: 'जाताना तू काही सुधा नेल नाहीस' आणि तरीही 'कालपर्यंत माझ जग होत त्यातला काही सुधा राहिल नाही' हा सुंदर भावनावेग शब्दात कुथेतरी पुर्ण हरवून गेला 4. अमृतशिंपण: मला भावले ते वेगवेगळ्या बोलिभशेतिल शब्दांचा समन्वय 5. गिफ़्ट : तुमची नेहमिची सफ़ाई नाही शेवटी गड्बड झाली का? होतो तसाच : बीशी सहमत. हे झाड भवसागरात 'रडल' नाही इतकच :-) 6. न तु आज येथे : हे रामा विरह पोचला! 7. बहुदा: क्षिप्रामाते तुझ्या 'प्रेम म्हणजे काय' ह्या विषयीच्या समद्या कविता एकत्रित वाचण्याचा इरादा हे. ही अधीच्या काही इतकी झकास नाही. 8. आभास का? : अश्विनी फ़ार का? का? झालेत कवितेत. रसभंग होतो 9. रान: चांगली आहे. एक template ठेवल्याने एक वेगळाच मुड तयार होतो 10. तुला पाहता: शेवटचा शेर झकास ! बाकी पिके म्हणतात तसे ठाकठीक... 11. वाट्चाल: 'आरपार अंतरंगातून प्रांजळ अस्तित्व फक्त मागे ठेवणार्या ' त्यातल्या त्यात काही वाहून नेणारी ओळ. बाकी शब्दांची जाळी... 12. वाट: अश्विनी ह्यातला आकांत विलक्शण आहे पण half cooked झालीये कविता त्यामुळे त्याची झळ बसत नाहीये 13. लखलखता पाऊस: तिरकस बोलगाण + काहीच्या काही एक वेगळि मजा आली वाचताना 14. कशाला हवी : पहिल कडव सुरेख ! नन्त्र फ़रफ़ट्ली 15. ग्रहण: विटाळलेल्या मनाच काय? हाच एक्मेव प्रश्ण मलाही पडला . जर अंगुली निर्देश करायचा असेल तर तो पोचला नाही. 16. पुण्य: सुरेख 17. सम: चांगली पण मला कही शब्द जड वाटले एकंदरीत कवितेच्या मूड्च्या द्रुष्टीने 18. तमसो: सरावाने आलेली (ज्याला पाटि टाकली असेही म्हणता येईल) 19. तरी: आवडली, तिरळ्यांची याद आली 20. निळीवेलांटी: निळी वेलांटी माझ्यासाठी ठेवऊन गेले' मस्त पण अजुन घास थोडी मला तुला आपेक्षित असलेली अनपेक्षितता व त्यामुळची येणारी विस्मयचकितता पोचली पण घसलीस तर ती जाणवेलही 21. निळीभुल: ग्रेस चा प्रभाव? सगळ निळ निळ झालय ह्यतली 'भूल' (हिंदी मधील) वाटावी इतक! 22. पाऊस फिरकला ...: चित्रावरून कविता केली का? प्रसाद तुमचा नेहमिचा flow नाही ह्यात बीस: तुझा अलगुज वरचा फीड्ब्याक वाचला. तुला जे वाटते ते स्पष्ट लिहिण्याइतकि तुझी प्रगती खरच कौतुकास्पद आहे. ते चुक आहे का बरोबर हा मुद्द वेगळा. पण केवळ ह्यासाटि तुझे अभिनन्दन
|
Medha Pai
| |
| Wednesday, October 25, 2006 - 8:54 pm: |
| 
|
मन्डळी: राजामणी बद्दल प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद. खरे तर माझ्या मनातले सगळेच विचार लिहिले तर ती एक कादम्बरीच झाली असती. वेळ कमी आणि लिहायचा आळस यामुळे मी अगदी थोडक्यात लिहिलं होतं सर्व काही. कदाचित म्हणूनच चांगली वाटत असेल गोष्ट :-) पुनश्च धन्यवाद.
|
४. मृद्गंध ( हे सदर अजून वाचलं नाही. वाचलं की अभिप्राय लिहीन.) ५. अलगुज हा माझा जिव्हाळ्याचा विभाग. पुण्य ( सायली) : या सदरातल्या मला सर्वांत आवडलेल्या कवितांपैकी. वाचून सुन्न व्हायला झालं. सद्यस्थितीवर आणि गतानुगतिकतेवर कमीत कमी शब्दांत अतीशय परिणामकारक भाष्य. गिफ्ट ( वैभव) : सुंदर. प्रेयसीला भेट कविता, प्रेयसी हीच कविता, की कलाकार आणि रसिक यांच्यातली भेट..?? हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं वाचकासाठी सोडली आहेत. एका कवितेत कितीतरी अर्थ दडलेले असतात.. ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे ते त्याला त्याला गवसतात. सहसा ज्या कलाकृतीत वाचकाला कुठेतरी त्याचं प्रतिबिंब दिसतं, ती त्याला भावते. पण कवीला जे अभिप्रेत होतं, ते नेमकं आणि पूर्णपणे ज्याच्यापर्यंत पोचलं असा रसिक त्याला भेटला तर त्यांची भेट अशीच असेल का? कवीला त्याच्या कवितेचं त्या रसिकाच्या जाणीवेत पडलेलं प्रतिबिंब पाहिल्यावर त्याचीच कविता नव्याने भेटल्यासारखी वाटत असेल का? सुरेख. One of the toppers . क्रमशः..
|
तुला पाहता ( वैभव) : वैभवकडून आणखी एक सुंदर गज़ल. जणू लाजणेही निमंत्रण ठरावे, नभाने जसे चांदणे पांघरावे.. मला मान्य प्रत्येक श्वासात लाटा.. सगळ्याच कल्पना सुरेख. मक्त्यातील क्षणांनी भरणारे आणि युगानुयुगे झरत रहाणारे सुखाचे कलश हा तर खरच कळस. ग्रहण ( सारंग) : विटाळलेल्या मनाला काहीच उपाय नाही.. सुंदर शब्दचित्रण आणि एकूण वातावरणनिर्मिती. ' थरथरत्या कंदिलाच्या काचेवरच्या काजळीला साक्ष ठेवून फकीराच्या पायावर डोकं ठेवावंसं वाटतं..' व्वा!! आता काजळी हीच ज्योतीची साक्ष.. आणि त्याच्या पश्चात्तापाचीही.. सुंदर! पाऊस फिरकला नाही ( प्रसाद) : छान गज़ल. विशेषतः ' दाटुन आले तेव्हा मी रोवून पाय बसलोही, देहात जरा रुजण्याचे आभास थरारुन गेले..' हा शेर खास. क्रमशः
|
अंक खूप छान आहे. जसा वाचतोय तशी प्रतिक्रिया कळवतो. rar कणेकरांची मुलाखत चांगली जमली आहे. मी फक्त 'फटकेबाजी' बघितलेली आहे, आता ती इतर पुस्तके वाचायची उत्सुकता आहे. काही काही खोदून विचारलेल्या प्रश्नांना त्यांची उत्तरे मनापासून दिलेली वाटली. उदा: क्रिकेट वर आलेले लेख बघून हे आपणही लिहू शकतो असे वाटणे हे आपल्यापैकी बहुतेकांना कधीतरी जाणवले असेल, पण त्यानंतर ३०-४० वर्षे तसेच चांगले लिहिणार्या लेखकाची ही सुरुवात तिथुनच झाली हे आश्चर्य आहे. आजच cricinfo वर आलेली राहुल द्रविड ची मुलाखत वाचली की मुलाखतकाराने खोदून प्रश्न विचारले नाहीत की मुलाखत कशी सपक होते ते कळते, यात तसे होते नाही, त्यामुळे रंगली आहे.
|
swatee ambole कहाणी आवडली. त्यातील त्या कार्टून वरून पूर्वी अत्रे आणि रवीकिरण मंडळ यातील वाद (नंतर वाचलेले) ते किंवा 'शराबी' मधे अमिताभ शेर म्हणायला सुरूवात करतानाच आजूबाजूचे ऐकणारे दाद देतात तो शॉट आठवला
|
Radhika
| |
| Thursday, October 26, 2006 - 2:00 am: |
| 
|
मी हा पहिलाच हितगुज चा दिवाळी अंक पाहिला. आणि खूपच आवडून गेला. अजून सगळा वाचला नाही पण आत्ताच 'हैदीयाल' हा 'मैत्रेयी' चा लेख वाचला आणि मनात खूप दिवसांपासून असलेली खंत लिहाविशी वाटू लागली. कोणालाही पहिल्यांदा हैदी आडमुठी वाटू शकते पण ज्यासाठी ती हे सगले करते आहे, ते खरच कौतुकास्पद आहे. आपल्यासरख्या लोकांना विचार करायला लावणारे आहे. आपण किति सहजपणे दुसर्या संस्कृतीत मिसळून जातो,दुसर्यांच्या रिति रिवाजांना आपलेसे करतो, 'मराठी माणसे एकदम adjustable असतात' असे मिरवतो.पण यात आपण आपली ओळख मिटवून टाकतो हे मात्र तितक्याच सहजपणे विसरतो परदेशात राहतो म्हणून ' आजकाल ना मराठी बोलायचि सवयच नाहि राहीली हो!' हे वाक्य प्रौढीने बोलतो. अहो हेच काय, महाराष्ट्रात पण बाहेर college ,office मधे मराठी बोलणे म्हणजे ' अरे याला english येत नाही वाटते' असा समजलं जातं. आणि परत वर मराठी कशी मागे पडत आहे यावर आपण english मधेच बोलतो. याउलट south indian लोक आपली भाषा आपली संस्कृती याला कसे घट्ट चिकटून असतात.कधि कधी आपण चिडतो कि 'काय होतं यांना हिंदी किंवा english बोलयला?'. पण खरेतर त्यामुळेच ते त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत. मी चेन्नई मधे राहीले आहे त्यामुळे मला कधी त्यांचा राग पण यायचा तर कधी कौतुक वाटायचे. आपण मराठी मात्र कधीही आपल्या कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नाही( कित्ती चांगले ना आम्ही!!) .सहजपणे दुसर्यात मिसळतो. आपलीच मुंबई असून पण तिथल्या लोकांशी हिंदीत बोलतो, दिवाळी मोठा सण आहे म्हणून करतो पण बाकिचे सण किति उत्साहाने करतो?आपल्या मुलांना english आले पाहिजे म्हणून त्यांच्याशी मराठीत बोलायचे टाळतो. कितितरी अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपण आपल्याच अस्तित्वावर घाला घालतो. कदाचित माझे हे बोलणे टोकाचे असेल आणि महत्वाचे म्हणजे या bb शी संबधित पण नसेल... (नक्कीच नाहीये) पण 'हैदी' चि कथा वाचल्यावर जे मनात आले ते लेहिले आहे.कृपया कोणीही काहिही गैरसमज करून घेऊ नयेत. हे कोणा एकाला उद्देशून लिहिलेले नाहिये. एक सुंदर कथा वाचयला दिल्याबद्दल मैत्रेयी चे आभार.
|
Ashwini
| |
| Thursday, October 26, 2006 - 2:54 am: |
| 
|
अंक वाचून झाल्याशिवाय प्रतिक्रिया लिहायचा विचार नव्हता. पण आता राहावत नाही म्हणून. फारच कौतुकास्पद काम केलं आहे. प्रशंसा करावी तितकी थोडी आहे. जयवी आणि स्वातीची ' मी आणि मायबोली ' , यापूर्वी सर्वांनी केलेल्या स्तुतीला अतिशय पात्र आहेत. स्वातीची शैली नेहमीप्रमाणेच खुमासदार. जयवीचे अत्यंत गोड शब्द सतत ओठांवर येताहेत. अंकाचा दर्जा उत्तम आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन. अजून फारसा वाचून झाला नाही. राजामणि वाचली. फार अस्वस्थ केलं राजामणिने. हैदीयाल वाचली. छान जमली आहे. बाकी वाचतेय.
|
Kshipra
| |
| Thursday, October 26, 2006 - 3:45 am: |
| 
|
भाटवडेकर, रंगीबेरंगी ह्या विभागात माझ्या एकूण ११ कविता आहेत. त्यातील खालील कविता ' प्रेम ' ह्या विषयाशी संबंधीत आहेत. १. वाढत्या वयाबरोबर २. एका रुसुरुसु फुलासाठी ३. शब्दाची नशा ४. सावळा मोह ५. एक जीव म्हणजे हे प्रमाण ४५% झाले. आता ८ / २००५ ते १० / २००६ मध्ये माझ्या गुलमोहोर ह्या विभागात ११ कविता आहेत. त्यातील खालील कविता ह्या वरील विषयाशी संभंधीत आहेत. १. नात्याचे गाणे २. जरा उराशी ३. निखळ नात ४. शुध्द सारंग ५. कुरीयर म्हणजे हे प्रमाण अंदाजे ४५% झाले. तुमचे म्हणणे असे आहे कि माझ्या कवितांचे विषय विबाहबाह्य संबंध आणि चोरटा प्रणय असे असतात. वरील कवितात तुम्हाला कुठे विवाहबाह्य संबंध आढळले जरा मला सांगाल का? आणि प्रणय ही प्रेमाची एक छटा आहे हे विधान तुम्हांला मान्य आहे का? फक्त ' लोक काहीबाही बोलतात ' ह्या एका वाक्यावरुन असे विधान करणे हे कितपत योग्य वाटते तुम्हांला ? लेबलींग करण्यापूर्वी एकदा शहानिशा केली असतीत तर आपल्या विधानातील फोलपणा कळला असता. लग्न न झालेल्यांबद्दल सुध्दा लोक काहीबाही बोलतच असतात. बी, तुलाही मला हेच सांगायचे आहे.
|
अर्रे.. अजून अज्जुकाताईंनी का नाही लिहिलं बर! या वर्षीच्या प्रतिक्रिया खरच कहीतरी सांगून जातात... फ़क्त छान म्हणण्यापेक्षा छान काय आणि वाईट काय हे नीटपणे सांगणार्या प्रतिक्रिया खरच मौल्यवान आहेत!
|
meenakshi
| |
| Thursday, October 26, 2006 - 7:22 am: |
| 
|
माझ्या रान या कवितेला दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ...... आत्ताच जयश्री तुझं "तु माझी मायबोली" ऐकलं .... सुंदरच .... शब्द आणी अविष्कार दोन्ही स्वाती मायबोलीचं व्रत छानच .... विशेषतः लेखामधील चित्र अप्रतीम कुणी काढली ती ....? एकंदरीत परीणाम खुपच छान. रचना तु विन्संट गॉ बद्दल लिहीलेला लेख फारच सुंदर माहीतीपुर्ण .... चित्रकला या कलेबद्दल बरच काही बोलुन गेला
|
Neeraja
| |
| Thursday, October 26, 2006 - 7:54 am: |
| 
|
वरची युद्धे वाचून मी गेल्या वर्षी सैतानाला आमंत्रण दिलं की काय अस वाटलं. आता मीच गोंधळात पडलेय... गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी वेळेची मर्यादा पाळता आली नाही मला आणि लिखाण झाले नाही पण परत समीक्षा लिहावी की नाही हा गोंधळ अजून उलगलेला नाही मला.. असो.. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षीचा अंकात साहित्य कमी आहे निदान गोष्टींच्या विभागात तरी. मी याही विभागावर वरवर नजर फिरवली आहे पण ते बघता एक नक्की की निवड करणार्यांनी काटेकोरपणाचा अवलंब केला आहे. आणि याचे स्वागत नक्की आहे.
|
Mayuresh
| |
| Thursday, October 26, 2006 - 8:27 am: |
| 
|
अनुभुती संपलय वाचुन... विन्संट वॅन गॉ बद्दलचा लेख सुरेख.. मनाला चटका लावुन गेला.. रचना,धन्यवाद या महान पण दुर्लक्षित राहिलेल्या कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल संवादमधील rar ने घेतलेली कणेकरांची मुलाखत छान रंगली आहे.कणेकरांचे जाज्वल्य क्रिकेट आणि चित्रपटप्रेम पदोपदी जाणवतेय. फ़िरत्या चाकावरती.. मध्ये एका नविन कलेची चांगली माहिती दिली अहे... त्यातील फोटोही आवडले... डिजे,तुझी फ़ॅशनबाबतीतल्या आवडीची आणि स्मरणशक्तीचीही दाद द्यावीशी वाटतेय अगदी बारीकसारीक गोष्टीही लक्षात आहेत तुझ्या. बाकी लेखही चांगले आहेत.
|
सर्व participants ज्यांचे लेख, कविता select झाले, नाही झाले. सर्वांच अभिनंदन. वर काही कथांवरचा अभिप्राय मी दिलाच आहे. राजामणी मला ख़ूप आवडली. सुरेख व्यक्तिचित्रण केल आहे. श्रध्हा ची दैव जाणीले कुणी पण छान भट्टी जमलिय. आजकालच्या CID मालिकाना तोंडात मारेल अशी जमलीय. हैदियाल पण सुरेख आहे पण ते कथेत नको होतं असं वाटतय. तरी एकून हैदीची मनस्थिती ख़ूप सुरेख मांडलिय. निरभ्र ही एकांकिका स्पष्टच सांगायचं तर कळलीच नाही. नक्की काय msg convey करायचा होता? फ़क्त असं घडु शकत असं सांगायच होतं का? मला असं वाटत की मध्ये मध्ये जर स्वगत टाकलं असत दोघांच, स्वगत म्हणजे तिच्या एख़ाद्या वक्यावरून त्याला काय वाटले किंवा त्याच्या संशय घेण्यावरून तिला काय वाटल असा. तर वाचनीय झाली असती. दोघांच्याही भावना पुर्णपणे उलगडून दाख़वल्या नाहीयेत. शेवत ओढून ताणून गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. एक पणती माझी बद्दल वर लिहीलच आहे मी. पण हा लेख डोक्यातून जात नव्हता. फ़िरत्या चाकावरती पण उत्तम.... तुझ्या ६ plates सारख्या जमू देत या वेळी आणि मग आमंत्रण द्यायच विसरू नकोस रांगोळी मला दिसलीच नाही मुखपृष्ठ सुरेख. मायबोलीच व्रत छान... ख़रच आपण सगळेच हे किती मनापासून पाळतो ना?? जयश्रीच तू माझी मायबोली पण सुरेख़. बाकीच जसं वाचेल आणि सुचेल तस लिहीनच. कविता मला कविता विशेष कळत नाहीत. पण most of the कविता नक्की का लिहिल्या गेल्या आहेत असा प्रश्न पडला. पण तरिही त्याबद्दल मी जास्त लिहित नाही. संपादक मंडळाच अभिनंदन
|
|
|