|
Divya D
| |
| Tuesday, October 24, 2006 - 2:22 pm: |
| 
|
दिवाळी अंक छान सजलाय. जयश्री अंबस्करच्या गोड आवाजाने तर अजुनच गोडवा आणला आहे. अंक सगळा वाचुन झाला नाही तरी चिंतन सगळ्यांचेच छान त्यातही माझी एक पणती खुपच स्तुत्य आहे. प्रेमाचा रिंगटोनही मस्तच. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणी विजेत्यांचे आणी संपादक मंडळाचे अंकासाठी अभिनंदन.
|
madhura
| |
| Tuesday, October 24, 2006 - 4:17 pm: |
| 
|
काय सुरेख अंक आहे या वर्षीचा. रुपेश मुखप्रुष्ठ फ़ारच सुंदर. जयवी आणि स्वाती अभिनंदन. फार छान सादर केलय. rajeshad यांचा लेख खुमासदार आहे. राजामणी कथा पण आवडली. बाकी अंक आता निवांत वाचेन. हे सगळे घरबसल्या वाचायला मिळतेय मायबोली मुळेच.
|
अप्रतिम! दिवाळी अंक अतिशय छान झाला आहे.
|
वा.. पहाताक्षणीच प्रेमात पडलो.. खूप दिवसांनी मायबोलीवर टिचकी मारायला वेळ मिळाला आणि थेट गेलो दिवाळी अंकावर.. अजुन अंक वाचलेलाही नाही पण मुखपृष्ठ पाहताक्षणीच दाद द्यावीशी वाटली.. रुपेश अभिनंदन.. आणि अजुन एक मोठठठठे सरप्राईज दिले जयावी ने.. सुंदर कल्पना गोड आवाज.. मग स्वातीचा खुमासदार अनुभवही वाचुन काढला.. आता भावी संपादक मंडळींना सुचना न देऊन कसं चालेल?? जयावी चा आवाज ऐकुन असं वाटलं की यापुढे दिवाळी अंक नुसता वाचनीयच नाही तर संपुर्ण अंक 'श्रवणीय' करायला हवा.. अंक online असण्याचा पुरेपुर फायदा घेता येईल.. तसेच साहित्याच्या दुनियेत हा पहिलाच प्रयत्न असेल (तो ही मराठीतुन).. धमाल येईल.. एक ह्युमन टच का काय म्हणतात ते होईल.. पण....... audio सोबत त्याची transcript ही द्यावी.. मी तर म्हणतो की जयावीच्या पानावर आताच तिच्या मनोगताचे शब्दरुपही द्यावे.. ज्यांना MP3 ऐकण्याची सोय नसेल त्यांची पंचाईत होईल.. असे आधीच केले असल्यास क्षमस्व.. मी त्या पानावर next आणि back arrows click केले पण मला तिथे काहीच दिसले नाही.. रुपेशची कलाकृती अप्रतीम.. पण ती wide screen laptop users ना target धरुन केली आहे असे वाटले.. आमच्या सारख्या 1024*768 monitor resolution वापारणार्यांची त्यामुळे horizontal scroll ची नको ती अडचण होते.. एकाच दृष्टीक्षेपात संपूर्ण चित्र पाहता येत नाही.. त्याच्या HTML च्या BODY tag मध्ये marginwidth, marginheight वगैरे शून्य केल्यास scroll थोडा कमी होईल.. भावशिल्प वगैरे लिंक्स वर mouse rollover केल्यावर तिथे alt text देता येईल का? फ, रचना, प्रमोद आणि निलूने साजवटीसाठी खरेच खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या चित्रांखाली त्यांची नावे देता आली तर छान होईल. -- दीपस्तंभ
|
Paragkan
| |
| Tuesday, October 24, 2006 - 7:49 pm: |
| 
|
आज 'अलगुज' ची पाळी - १. 'देहमेणा' - कवितेपेक्षा सोबतच्या चित्रावरच मी फिदा आहे. 'फ' ला सलाम! २. 'अशा सांजवेळी', 'गिफ़्ट', 'होतो तसाच आहे', 'आभास', 'वाट', 'तमसो मा ..', ... या सर्व कविता 'ठीकठाक'! ३. 'अमृतशिम्पण' .. शेवटच्या दोन ओळी कहर आहेत. ४. 'न तू आज येथे' .. गीत छानच! ५. 'लखलखता पाऊस' .. बर्याच दिवसांनी सत्याभायची कविता वाचायला मिळाली .. पण निराशा झाली ६. 'रान' .. short and sweet! ७. 'तुला पाहता..', 'पाऊस फिरकला नाही', 'पुण्य', .. सफ़ाईदार आहेत. आवडल्या. ८. 'वाटचाल' .. दमदार सुरुवात .. पण पुढे काय झालं कुणास टाऊक? ९. 'ग्रहण' आवडली. पण शेवटी गडबडलेली वाटली. प्रवाह कायम राहिला नाही असं वाटलं. १०. 'वेड लावी जीवाला ऐसी तारुण्याची सम' ... आय हाय ! .. माझ्यापुरती ही एक ओळ हीच कविता! 'अगतिक तरी श्वासांची असोशीने कात झडे' ........... वाह क्या बात है! ११. 'नीळभुली' .. ग्रेसच्या कवितेची आठवण झाली .. अर्थात तशी दुर्बोध नाहिये. आवडली! पुन्हा एकदा सोबतचं चित्र केवळ अप्रतीम!
|
मस्तं आहे या वेळचा दिवाळी अंक. मला स्वातीचं मायबोली आणि मी खूपच आवडलं.
|
Yog
| |
| Wednesday, October 25, 2006 - 1:29 am: |
| 
|
अन्कातील सर्व सहभागीदारान्चे व सम्पादक मन्डळाचे अभिनन्दन! अन्काचा दर्जा (सजावट, मान्डणी, सुबकता, ई) मागील सर्व अन्कान्पेक्षा खूपच वरचढ. कन्टेन्ट च्या बाबतीत मात्र तसे म्हणता येत नाही. दिवाळीपूर्वीच दिवाळी, होशियार यासारखे "सकस" लेख अजून हवे होते. शिरीष कणेकर खमन्ग "लिहीतात" मुलाखत मात्र अळणी वाटली. सम्पादकीय की "प्रस्तावना"? रुपेश, अप्रतिम मुखपृष्ट. जयश्री, mp3 मागचे प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहेत. फ़क्त हरकत नसेल तर एकच सुचवू इच्छीतो की निवेदन किव्वा स्वगत आणि गीत यात break येतो व एकसन्धता हरवून जाते. कदाचित गीतातील मूड किव्वा सन्गीतही जर निवेदनासाठी background music म्हणून वापरले असते तर अधिक एकसन्धता व सहजपणा अनुभवास येईल. slide show साठी कदाचित असा break अधिक योग्य वाटेल? असो. you have left a mark for sure ! पेशवा आणि कम्पनी, रान्गोळी - कल्पना आवडली. "दर्जा" हा कदाचित subjective असू शकेल पण सर्वानी घेतलेले कष्ट अन दिलेला वेळ स्पृहणीय आहे. तेव्हा मला वाटतं या दिवाळी अन्कात सहभागी झालेले सर्वच "विजेते" आहेत..
|
Sampadak
| |
| Wednesday, October 25, 2006 - 3:17 am: |
| 
|
MP3 Download करण्याची सोय केली आहे. मुखपृष्ठाचा आकारही कमी केला आहे. -संपादक.
|
Bee
| |
| Wednesday, October 25, 2006 - 4:18 am: |
| 
|
अलगुजची सुरवात पीकेनी केली म्हणून आधी अभिप्राय त्याच्याच कवितेला.. १)निळी वेलांटी -- पीके, कविता रचली छान. इंदिरा संताच्या काही कविता जशा चित्रमय भासतात तशी वाटली. आशयला जरी सुमार असली तरी 'निळ्या वेलांटीची' कल्पना खूप आवडली! २)देहमेणा - कविता छान आहे पण खूप उदास झाली. cheer up Sarang ह्या कवितेवरचे चित्र खूपच विनोदी वाटले मला :-) ३)उकल - कविता लिहिली छान आहे पण आशय जेमतेम झाला. ४)अशा सांजवेळी - ही कविता मला खूप प्रामाणिक वाटली. मुक्तछंदाने कवीच्या मनाची ओढ छान पकडली आहे. ह्या कवितेला एक चांगल चित्र देता आलं असतं.. पण जाऊ दे.. ५)अमृतशिंपण - ठिक आहे कविता. नाविन्य म्हणून काही वाटतं नाही. त्यामुळे अशा कविता कितीही लिहिल्या तरी त्या तोचतोचपणा आणतात. ६)गिफ़्ट - कविता हीच भेट म्हणून कल्पना आवडली. पण वैभय ह्यांच्या कवितेत विषय विविधता नसते. प्रेयसी प्रियकर तोच तोच विषय इतका रटाळवाना झाला आहे की ह्याच विषयावर एखादी चांगली कविता जरी लिहिली गेली तरी ती दुर्लक्षित होईल असे झाले आहे. वैभव, खरच हे प्रियकर प्रेयशी प्रकरण सोडून अजून दुसरे काही सुचते का पहा बघू आणि तुझी शब्दसंपदा अगदी सुमार आहे ती वाढव.. :-) ७)होतो तसाच आहे मी - ही कविता 'देहमेणाला' समांतर जाते. प्रतिक्रियाही तिच आहे. ८)न तू आज येथे - ही कविता म्हणजे नववराची नववधु माहेरी गेली आहे आणि तो तिला मिस करतो तशा थाटातली आहे. श्रीराम, अजून हमीमून मूडमध्येच आहेस का :-) कविता छान 'लिहिली' आहे. ९)बहुदा -- ही क्षिप्रामाता मायबोलिवर आल्यापासून प्रेमकविता लिहिते आणि प्रियकरासोबत काय काय घडतं आहे हे नेहमी आपल्या कवितेतून छान सांगते :-) जाउ दे मी काहीबाही बोलत नाही.. :-) १०)खरच का अश्विनी. मला तरी तू छान स्वच्छंदी वाटतेस नेहमी.. :-) की माझा हा आभास आहे. ११)रान - मीनाक्षीची ही एक गोड कविता! १२)तुला पाहता.. गझल -- बघा मी म्हंटलय ना वर.. वैभव जोशी फ़क्त सखी प्रेयसी ह्यांच्यावरच जास्त लिहितात.. इथेही तेच!!!!! १३)वाट -- कविता छान आहे अश्विनी.. पण कवितेचे नाव वेगळे हवे होते.. १४)लखलखता पाऊस - छान आहे कविता.. पण एका तरुण युवकाने अशी कविता लिहावी म्हणजे नवल! १५)कशाला हवी - मनिषा कविता ठिक आहे. पण मला वाटतं तू ह्याहीपेक्षा चांगल्या कविता करणारी आहेस. १६)सारंग -- देहमेणापेक्षा ही ग्रहणाची कविता अधिक आवडली पण ही कविता देखील उदास जगणे नको असलेली आहे. तू योगा कर बघू. प्राणायाम केला तर तुला आपोआपच ह्या प्रश्नाचे उत्तर गावेल. १७)पुण्य - बघ मनिषा मी वर म्हंटलय ना की तू खूप छान कविता करू शकतेस. पुण्य खरच अप्रतिम आणि वेगळ्या विषयावरची कविता आहे. 'अलगुज' मधली सर्वाच छान कविता वाटली. १८)सम - हेम्स तुझ्या ह्या 'सम'चा अर्थ काय घ्यावा? सोबत असा घ्यावा का? कविता खूप खूप आवडली!!!! उत्तर द्यायला विसरू नकोस. मेल कर हवी तर.. १९)तमसो मा.. - स्वाती सुंदर आहे कविता.. दोनच कडवे पण अर्थपुर्ण वाटले. great!!!! २०)तरी.. - हेम्स ही कविता देखील छान आहे. एखाद्या अभंगासारखी! २१) नीळभुली - ह्या निळाईवरच कविवर्य बोरकरांची अशीच एक कविता आहे. त्या कवितेची आठवण झाली मला.. २२) पाऊस फ़िरकला नाही.. ही कविता मला हल्ली आत्महत्या करणार्या एखाद्या शेतकर्यावरची वाटली.. खूप छान! हुश्श!!!! संपल्या एकदाच्या कविता वाचून. सर्वात आवडलेली कविता पुण्य आणि तमसो मा.. ललिताताई, एकदम short & sweet झाल आहे तुझं पान.. पण खूप लवकर आटोपतं घेतल...
|
Poonam
| |
| Wednesday, October 25, 2006 - 6:52 am: |
| 
|
देखणा दिवाळी अंक! रूपेशच्या मुखपृष्ठामुळे अजूनच आकर्षक झाला आहे.. सजावट, लेखन, साहित्य सर्वच आवडले.. जयवि, गोड आवाज आहे तुझा.. आणि घेतलेली मेहनतही जाणवली.. खूप गोड झालय तुझं 'मी आणि मायबोली'. स्वाती फची चित्र तुझा 'वसा' स्पष्ट करून दाखवतात! सर्व कथा वाचल्या.. मैत्रेयी, फ़ारच छान लिहिलं आहेस. (काल्पनिक की खरं?) शोनूची राजामणी वेगळी आणि त्यामुळेच आवडली. सुमती, rga वा! श्रिनि, झकास कथा. प्रसाद, मकरंदचे 'टीपीकल" विचार छान मांडलेस.. श्र, रहस्यकथा तुझा हातखंडा.. वातावरण निर्मिती मस्त!
|
durgaprasad bhatavadekar
| |
| Wednesday, October 25, 2006 - 7:30 am: |
| 
|
The GOOD (१) या वर्षी पहिल्यांदाच मुखपृष्ठ खूप आवडले. (२) काही काही चित्रपण मस्त आहेत. (३) भावशिल्प - राजामणी आणि दैव जाणिले कुणी या गोष्टी छान आहेत. (४) अनुभुती - रचनाचा लेख छान आहे, ऋषीदा पण बरा आहे. (५)अलगुज - अमृतशिंपण नीळभुली वा वा. (६)चिंतन - चाफा, एक पणती माझी, दिवाळीपुर्वीची दिवाळी चांगले वाटले. The BAD जे वर पण नाही आणी खाली पण नाही ते सगळे याट धरा. बॅड म्हणजे ऍव्हरेज असाS अर्थ आहे, एकदम टाकाऊ नाही. The UGLY (१) संपादन - गेल्या वर्षीसारखे या वर्षी पण संपादकीय एकदम भिकार आणि रटाळ. संपादनात किती चुका ? ललित लेख कथा म्हणून घुसडले आहेत. जे येईल ते सगळे घेतले की काय इतके काही साहित्य भिकार. (२) चिंतन - आशिष आनि सईचे लेख म्हनजे इकदोन पुस्तक, प्रचारपत्रक वाचा आनि जशीच्या तशी ओका अशे लिहिलेले लेख आहेत. एक वाक्यही ओरिजिनल नाही. याला चिंतन म्हणतात ? (३)भावशिल्प - आधार गोश्टीतली जमीन नाहीशी होण्Yआची कल्पना आधी एका प्रसिद्ध गोष्टीत वाचली आहे. कथानक मात्र वेगळे आहे, ते उचललेले नाही पावा, गोधडी, हैदियाल या कथा आहेत ? (४)अलगुज - बी ची कविता केवळ तो कटकट करेल म्हणून घेतली आहे का ? फालतू कविता. वैभव जोशींचे प्रेमाचे चर्हाट नकोसे झाले आता. क्षिप्राला विवाहबाह्य संबंध, चोरट्या प्रणयाहून वेगळे काही काधी सुचणार ? कंटाळा आला. बाकी ठीक. सर्वांचे अभिनंदन.
|
Mayuresh
| |
| Wednesday, October 25, 2006 - 11:17 am: |
| 
|
नुकताच कथाविभाग वाचुन संपवलाय... श्रध्दाची कथा मस्तच.. रहस्यकथेची वातावरण निर्मिती छान.. शेवट फ़ार धक्कादायक वाटला नाही पण एकुण मांडणीमुळे कथा आवडली. शोनुची राजामणी मनाला खुपच भावली.. शेवट मन अस्वस्थ करून गेला. मैत्रेयीची हैदियाल पण छान.. पण हे लिखाण कथा या सदरात येणार नाही असे माझे मत अहे. यावेळी या विभागात राहुल फ़ाटक आणि GS1 च्या कथांची उणीव भासली
|
एक पणती माझीही ख़ूप अस्वस्थ करुन गेली.
|
vikas sawant nj
| |
| Wednesday, October 25, 2006 - 1:02 pm: |
| 
|
वा सुचनेची दखल घेवुन मुख्य चित्राचा आकार लहान केल्यामुळे आता अजुन सुन्दर दिसत आहे! धन्यवाद सम्पादक!
|
|
|