सुरवातच जयाच्या अतीसुंदर गाण्याने झालिये.., स्वातीचे तीच्या खास शैलीतले खुस खुशीत लिखाण एकदम अप्रतीम.. सुंदर..!अंक!!! (बाकीचा अंक वाचायचाय..)
|
प्रतिक्षा संपली अंक आला. फारच छान. जयु मावशी आता तुझा भाचा सारख " तु माझी मायबोली" च गातोय आणी तुला call कर म्हण्तोय. फारच गोड आवाज आहे ग तुझा-अगदी तुझ्या कवितांसारखा. स्वाती मायबोली व्रत....त्याचीच तर ही गोड फळं. त्याची संकल्पना छानच आणि आगळी-वेगळी.आणि त्यातली चित्रही अगदी फिट्ट बसणारी, सही है! जया स्वाती मला वाटलं होत की असतील निबंध शाळेतल्या सारखे पण तुम्ही तर सॉलिड........ वैभव कुमार गंधरवांच्या आवाजात मी imagine करुन पाहिल,छान! अजुन बराच अंक वाचायचाय. निलु सजावटीचीची पावती मुलुंडवर! छानच सजलाय अंक! 'एक पणती माझी'......काटा उभा राहिला
|
मुखप्रुष्ट एकदम झकास आहे, मी आणि मायबोली विजेत्यान्चे अभीनन्दन. स्वाती लेख आणि चित्रे एकदम खास. बाकीचा अंक अजून वाचायचा आहे.
|
Mayuresh
| |
| Monday, October 23, 2006 - 10:02 am: |
| 
|
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.. अगदी ठरवल्याप्रमाणे वेळेवर अंक प्रकाशित केल्याबद्दल संपादक मंडळाचे त्रिवार अभिनंदन अंक चाळुन झालाय नुसता.. खुप वैविध्यपुर्ण वाटतोय पहिल्याच नजरेत.. निवांत चवीने वाचीन नंतर. रुपेश,तुस्सी ग्रेट हो... मुखपृष्ठ अप्रतिम रे... जयावी,निनावी हार्दिक अभिनंदन.. जयावीच्या mp3 बाबतीत मलाही मिल्यासारखाच problem येतोय.. तेव्हा ती download करण्याची सुविधा असल्यास उत्तम. स्वाती, तुझे मायबोली व्रत झक्कास आणि फ़ची चित्रेही अगदी समर्पक... आत्तापर्यंत एवढेच वाचुन झाले आहे.. सर्व लिखाण वाचुन झाल्यावर पुन्हा अभिप्राय देईनच. मायबोलीच्या दशकपुर्ती वर्षातला हा दिवाळी अंक म्हणजे आपल्या लाडक्या मायबोलीला मायबोलीकरांनी दिलेली प्रेमाची एक भेट आहे. पुन्हा एकदा संपादक मंडळ,सर्व लेखक आणि कवी मंडळी आणि ह्या अंकाच्या यशात जे जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन (तळ टिप:- संपादक मंडळी pdf ची वाट पहात आहे)
|
Bee
| |
| Monday, October 23, 2006 - 10:12 am: |
| 
|
रचना, मी आत्ताच हाऑलंडच्या वेबसाईटवर चेक केले. मी बघितलेले संग्रहालय वंन गॉगचे होते. म्हणूनच मला पहिले सुर्यफ़ुलाचे चित्र एकदम परिचित वाटले.. ईश्वर करो तुला हे VAN GOGH Museum एकदा तरी भेट द्यायला मिळो. ही लिंक बघ.. http://www3.vangoghmuseum.nl/vgm/index.jsp?lang=nl
|
Neeraja
| |
| Monday, October 23, 2006 - 10:38 am: |
| 
|
अंक प्रथमदर्शनी मस्त आहे.. पण मलाही तू माझी मायबोलि आणि पेशवे दांपत्याची रांगोळी पहाताना मिल्यासारखाच प्रॉब्लेम येतोय. ५ फ्रेम्स पुढे गेल्या की पॉज मग परत प्ले तरी करा किंवा थांबून रहा. ह्याचे काय करायचे?
|
मला रांगोळी पाहताना ही अडचण आली होती. पण एकदा तसेच पूर्ण प्ले केल्यानंतर रिप्ले केल्यावर सुरळीत चालले. Cache मध्ये आल्यामुळे दुसर्यांदा चालले असावे.
|
मला सोनचाफ़ा ह्या लेखिकेने लिहिलेला ये काहा आ गये हम व पत्नि प्रसन्न व्रत हे दोन लेख आवड्ले फार सुन्दर आहेत लेख
|
Himanshu Kulkarni
| |
| Monday, October 23, 2006 - 11:41 am: |
| 
|
प्रथम संपादक मंडळाचे अभिनंदन.... रुपेश, चित्र सुरेख आले आहे... श्रद्धा, कथा चांगली जमली आहे पण त्याच्या आधीची प्रस्तावना नसती तरी चालली असती.. जसा जसा अंक वाचून होईल तश्या तश्या प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो आहे
|
saii फार मस्त माहीती दिलीस SEZ बद्दल. ऋचा तुझे काम खरच चांगले आहे. hats off to you आशीष नक्कीच. आढावा मस्त. बरिच माहीती मिळाली.
|
हितगुज २००६ चा दिवाळी अंक चाळला . वाचायला सुरुवात केली . जयश्रीबाईंचा " माझी मायबोली " छानच, स्वातीचं " मायबोलीचं व्रत " पण छान . आता लेख , काव्य वाचायला सुरु करेन . उत्कृष्ट मेळ जमला आहे . .
|
Arch
| |
| Monday, October 23, 2006 - 5:29 pm: |
| 
|
जयुच्या " मी आणि मायबोलीला " खरी थाप म्हणजे, मी काल दोन तिनदा तिची mp3 ऐकली speaker वर. त्याच music , चाल आणि जयुने गायलेल इतक भुरळ टाकणार आहे की कालपासून माझा North Indian नवरापण " तू माझी मायबोली " येता जाता गुणगुणत असतो. आता अजून काय पाहिजे? 
|
सेम गोज हिअर. माझी बायको सहसा मायबोलीवर येत नसते. पण जयवि ची माझी मायबोली ऐकल्यावर शनिवार रात्री पासुन तेच चालु आहे. जयवि खरच काय कल्पनाशक्ती आहे तुझी. स्वाती तुझा ( आय मिन मायबोलीचा) वसा घ्यायला सांगीतला आहे माझ्या बायकोला बघु आता काय करते ती. सही लिहिले आहेस.
|
ह्या दिवाळी अंकासाठी अतोनात श्रम घेतलेल्या सार्यांचे मनापासून आभार!! खरोखर सर्वांगसुंदर झाला आहे अंक. अधाशासारखा नुसताच चाळलाय... स्वस्थपणे मांडी ठोकून कधी एकदा पूर्ण वाचेन असं झालंय. pdf format मध्ये अंक उपलब्ध होण्याची वाट पहाते आहे.
|
Sameer
| |
| Tuesday, October 24, 2006 - 4:07 am: |
| 
|
दिवाळी अंक भलताच श्रवणीय झाला आहे! जयश्री, सलाम! काव्यरचना, निवेदन, संगीत सगळी भट्टी एकदम जमली आहे! प्रसाद चा रिंगटोन पण एकदम मस्त! (यातील संगीत कोणाचं आहे?) सर्व संपादक, स्वयंसेवकांचे अभिनंदन व आभार! रुपेश चे मुखपृष्ठ छान! चाफ़ा चा लेख आवडला. श्रीनि च्या कथेची मांडणी आवडली. स्वातीचे व्रत आवडले. बाकी वाचुन होतेय.
|
sushruta
| |
| Tuesday, October 24, 2006 - 5:01 am: |
| 
|
जयश्रीताई, गाणे,संगीत,आवाज,गीत सर्वच सुरेख!! हार्दिक अभिनंदन!! पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते! अजुनही काही विशेष असेल तर ऐकायला आवडेल!! खास एवढ्यासाठीच दिवाळी अंक आवडला.
|
वा वा... अतीशय सुरेख अंक! सर्व संपादक मंडळाचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन!! जयश्री.... 'तू माझी मायबोली' अप्रतीम... शब्दच नाहीत वर्णन करायला... सुरेख कल्पना, साजेसं संगीत आणि अतीशय गोड आवाज! फार म्हणजे फारच छान!! सुस्मित मधील सर्वच आविष्कार सुरेख... मिल्या आणि वैभव ची विडंबने (नेहमीप्रमाणेच) सुंदर... रार नी घेतलेली कणेकरांची मुलाखत छानच झाली आहे... मुखपृष्ट आणि सजावट अतीशय सुरेख.... एकूणातच एक अप्रतीम आविष्कार!! (जेवढा वाचला तेवढा सर्वच अंक आवडला... अजून सर्व अंक वाचून ऐकून झाला नाही)
|
प्रेमाचा रिंगटोन चं संगीत माझी पत्नी अल्पना हिचं आहे... आणि इथे प्रकाशित केलेल्या गाण्यातील आवाज प्रसाद रानडे यांचा आहे... (गाणं online नीट ऐकू येत नसेल तर ते download करण्याची सुविधा admin करत आहेत...) तसंच 'निरभ्र' मधे दिसत असलेल्या जोडाक्षरांच्या ज्या चुका आहेत त्यात संपादक मंडळींचा काहीही हात नाही! एका युनिकोड मराठी अक्षरसंचातून दुसरीकडे छापताना झालेल्या चुका आहेत... काही अक्षरसंचांना मराठीतला अर्धा र ( र् ) कळतो काहींना नीट कळत नाही... ज्यांना कुठे सादरीकरणासाठी ही एकांकिका हवी असेल त्यांना मी मूळ PDF पाठवू शकेन...
|
नमस्कार.. दिवाळी अंक चाळलजुन पाहीला.. या अंकाचे फर्स्ट इंप्रेशन म्हणाल तर १०० पैंकी २०० गुण द्यायला हवेत.. फरच सुंदर नि छान.. मुखपृष्टासाठी तर शब्दच नाहीत.... रुपेशा hats off.. सजावट नि संपादन.. १दम सही है.. हे तर वरच्या साहित्य पेटीबद्दल.. आता फक्त पेटीतील खजिना लुटायचा बाकी आहे.. नि तो मी लुटणारच.. bole to ye hit hai..
|
Bee
| |
| Tuesday, October 24, 2006 - 9:54 am: |
| 
|
आशिष, खूपच सुंदर माहिती दिली. समजेल अशा शब्दात. पण मला असे वाटते आहे की ३ रा भाग राहून गेला आहे. म्हणजे सद्यस्थिती व त्यावरील तुमचे मत हा भाग तुम्ही लिहिला का नाही? दुसरे असे की, योगाचे ८ अंग आहेत. ह्या अष्टांगयोगात, शेवटचे अंग आहे समाधी. समाधी अवस्थेला जे पोचतात त्यांना मोक्षप्राप्ती मिळते. मग तुम्ही खालील वाक्य का लिहिले? योगसामर्थ्याद्वारे अलौकिक शक्ती प्राप्त होऊ शकतात. त्या मिळवणे म्हणजे मुक्तीच्या मार्गात अडथळा आणणे. जरा समजून सांगाल का ह्या अलौकिक शक्ती कशा काय मुक्तीच्या मार्गात अडथडा आणतात? धन्यवाद आशिष! चाफ़ा, लेख वाचला. पण पुन्हा वाचावा लागेल इतका जड विषय वाटला मला.. केदार.. :-) काय हो साहेब.. इथेही कमाईवरच लेख लिहिला :-) छान लिहिला अन लवकर सम्पला :-)
|