अहा, तर अगदी सांगितल्याप्रमाणे हातात मिळाला दिवाळी अंक! खरंच, संपादक मंडळ, स्वयंसेवक, नेमस्तक.... सगळ्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच! काय देखणा झालाय हा दशकपूर्तीचा अंक! ग्रेट! THREE CHEERS FOR MAAYBOLI! रुपेश, मुखपृष्ठ...... लाजवाब! अंकाची मांडणी अ प्र ति म! अजून फ़क्त वरवर बघणं झालंय. अगदी आधाशासारखं झालं अंक बघितल्यावर स्वाती, "मी आणि मायबोली" स्पर्धेतल्या बक्षिसाबद्दल अभिनंदन तुझ्या लेखातली चित्रं फ़ारच सुरेख आहेत आणि लिखाण तर जबरदस्त! चिन्नु, रचना, स्वाती, सुरभी.... सगळ्यांना मनापासून धन्यवाद
|
जयश्री , तुझा आवाज फ़ारच गोड आहे ग आणि ' तू माझी मायबोली ' लिहिलय पण छान , Compose पण जबरीच केलय !! Btw, तुझा मायबोली ID काय आहे ?
|
maitreyee
| |
| Sunday, October 22, 2006 - 11:53 am: |
| 
|
जयवि! अप्रतिम गं!! किती गोड गायलयस! शब्द, संगीत, आवाज सगळे उच्च! स्वाती ची कहाणी ची आयडिया पण मस्त! फ़ ची चित्रं त्यात एकदम फ़िट्ट बसलईयत! रुपेश चे मुखपृष्ठ पण एकदम सुन्दर! काय जबरदस्त टॅलेन्ट आहे इथे आपल्याकडे! amazing ! बाकी नन्तर आणखी अभिप्राय देईन च..
|
Arch
| |
| Sunday, October 22, 2006 - 12:06 pm: |
| 
|
बघितला ह्यावर्षीचा अंक. मुखपृष्ठच इतक सुंदर आहे की बस. मी आणि मायबोलीचे पारितोषीक विजेते अगदी well deserved . जयु आणि स्वाती फ़ारच सुंदर presentations . जयु, तुझ्या talents च दर्शन अगदी एका मिनिटांत घडल. superb लेखन आणि गोड गळा.
|
md
| |
| Sunday, October 22, 2006 - 12:11 pm: |
| 
|
जयु, अग कित्ती गोड आवाज आहे तुझा. ऐकूनच छान वाटलं. अभिनंदन, स्वाती अन जयु. you guys really really deserved the prizes.
|
अप्रतिम! अ प्र ति म!! अ प्र ति म!!!
|
neelam
| |
| Sunday, October 22, 2006 - 2:31 pm: |
| 
|
अंक सुंदरच!!! जयश्री, स्वाती दोघींचे अभिनंदन. जयश्री तुझी संकल्पनाच मुळात खुप आवडली.. त्यातील तुझा आवाज, काव्य आणि संगीताचा मेळ खरच खुप छान!! स्वाती तुझे व्रतही एकदम आवडले. आम्ही तर आधीच हे व्रत चालु केलय. सर्वांना दिवाळिच्या शुभेच्छा.
|
Hems
| |
| Sunday, October 22, 2006 - 2:33 pm: |
| 
|
अगदी भरगच्च दिसतोय दिवाळी अंक.. मुखपृष्ठ सुरेख ! जयवि आणि स्वाती : अभिनंदन ! छान आहेत तुमच्या कल्पना !
|
seema
| |
| Sunday, October 22, 2006 - 2:57 pm: |
| 
|
Wow मस्तच आहे अंक . स्वाती आणि जयावी तुम्हा दोघीचे अभिनंदन . अगदी अभिनव कल्पना आहेत दोघीच्याही . अतिशय आवडल्या . रुपेश मुखपृष्ठ अप्रतिम DJ तुझा लेख मला फ़ार आवडला . अजुन वाचीन आणि मग लिहीन प्रतिक्रिया .
|
Sampadak
| |
| Sunday, October 22, 2006 - 6:12 pm: |
| 
|
हितगुज दिवाळी अंक २००६ PDF आवृत्ती बद्दल .... दरवर्षीप्रमाणे यंदाही अंकाची PDF आवृत्ती काढायची आहे. या अंकातल्या काही अनवधानाने राहून गेलेल्या आणि जाणवलेल्या (पण अंकाचे प्रकाशन लांबणीवर टाकण्याची गरज नसलेल्या) काही त्रुटी सुधारण्याचे काम थोडे दिवस सुरु राहील. शक्य तितक्या त्रुटी कमी केल्यानंतर PDF आवृत्ती काढण्यात येईल. धन्यवाद. - संपादक मंडळ.
|
Shyamli
| |
| Sunday, October 22, 2006 - 6:26 pm: |
| 
|
अभिनंदन संपादक मडळी...लेखक आणि ज्यांनि अंकाचे काम केल आहे ते सगळेच.... अंक सुरेखच झालाय लिहीणारे सगळे आपलेच आहेत म्हणुन अजुनच छान वाटतोय पण मायबोलीला न ओळ्खणारे सुध्दा दाद देउन गेले बरका, हे आवर्जुन सांगावस वाटल ईथे जयु, अजुन एक मानाचा तुरा.......... अभिनंदन स्वाती........तुस्सी ग्रेट ही हो यार मुखपृष्ठ...लाजवाब, नीलु, सजावट सहीच चित्रे फार छानच सगळीच.... फ, रचना मैत्रेयी....... अग ईथे असे कैक वेडे बघायला मिळतात बघ, एकुणच लिखाणातुन चित्र उभ राहील लगेच डोळ्यापुढे... आवडला लेख श्र, कथा सहिच एका दमात वाचुन काढली... अंक अजुन वाचतिये पुर्ण नाही झाला........... खरच मायबोली वर भयंकर talented लोक आहेत अभिमान वाट्तो मायबोलीबद्दल कोणाला सांगायला एक सुचवायच होतं ही अंकाचि लिंक बाहेर कुठे किंवा मुखपृष्ठावर देता येइल का म्हणजे मायबोलिकर नसलेल्या लोकांना पण सहज सापडेल आणि वाचता येईल
|
जयश्री , तुझे नाव वाचून सर्वात आधी तुमचा कुवेत युध्दाचा अनुभव वाचून काढला .. एकदम अंगावर काटा अणणारा अनुभव आहे , डोळ्यापुढे उभा राहिला !
|
Paragkan
| |
| Sunday, October 22, 2006 - 10:28 pm: |
| 
|
चला एकेका विभागाचा पंचनामा मांडूयात आता सर्वात आधी 'चिंतन' . १. synesthsia ची खूप छान ओळख करुन दिली आहे चाफ्याने. लिखाणाही सरस उतरले आहे. २. दिवाळीपूर्वीच दिवाळी' चा विषय अगदी current आहे. पण लेख फारच लहान होता. बर्याच मुद्द्यांवर अजून थोड सविस्तर विवेचन वाचायला आवडलं असतं. विशेषत: शेवटचे काही मुद्दे हे अगदी 'व्याख्या द्या' सारखे वाटले. ३. 'भारतीय तत्त्वज्ञान ... ' विषयाचा आवाका इतका मोठा आहे की तो एका लेखात कितीही प्रयत्न केला तरी सामावणार नाही. पण लेख आवडला. अशा लेखांची एक मालिकाच लिहायला हवी आशीषने. महिन्याला एक लेख ... what say? ४.'होश्शियार ... ' खूप कळकळीने लिहिला आहेस लेख सई. SEZ बद्दल उत्सुकता आणि काळजी चाळवण्यात लेख यशस्वी होतो. ५. 'एक पणती ... ' अनुभवातून आलेले शब्द किती सच्चे आणि परिणामकारक असतात त्याचं मूर्तीमंत उदाहरण.
|
अप्रतिम...काही कामामुळे मी अमेरिकेच्या दौर्रावर आहे आणि दिवाळी घरी साजरी करता न आल्यामुळे मी काहिसा नाराज होतो. परन्तु हा अन्क वाचल्यावर मला तोच आनन्द होतोय जो मी घरी असताना ज़ाला असता.. धन्यवाद.. प्रसाद भि. देशपांडे पुणे
|
Vikas Sawant, NJ USA
| |
| Monday, October 23, 2006 - 3:09 am: |
| 
|
मला हा अन्क खुप आवदला. सुन्दर. अजुन सर्व वाचत आहे. पहिले दिजाईन पन सुन्दर.मात्र ते चित्र लहान हवे होते.स्क्रोल बार नसते तर पुर्न चित्र एकदम दिसले असते असे वातले. असो. मायबोलि ला धन्यवाद!!
|
Raina R
| |
| Monday, October 23, 2006 - 3:42 am: |
| 
|
संपादक मंडळाचे खूप खूप आभार.. दिवाळी अंक बघून डोळ्याचे पारणे फिटते. चिंतन मधील सर्वच लेख खरोखर विचारप्रवर्तक आहेत.मृदगंध मधील लेख ही फार सुंदर आहेत. स्वाती आणि जयश्री- मी आणि मायबोली- उत्कृष्ट आहे. तुमचे मन:पूर्वक अभिनंदन. सगळा अंकच पुन्हा, पुन्हा वाचण्यासारखा आहे.
|
Bee
| |
| Monday, October 23, 2006 - 4:08 am: |
| 
|
प्रत्येक विभागातलं थोडं थोडं साहित्य वाचून झालं. त्यानुसार मी इथे प्रतिक्रिया देत आहे. सर्वप्रथम, ह्या अंकनिर्मितीसाठी खपणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! १)आकाशकंदील हाती धरुन रान उजळायला निघालेल्या तरुणीचे मुखपृष्ठ उठावदार झाले आहे! २)संपादकीय उदास वाटलं पण खूप छान लिहिलं आहे! ३)श्रीनीचा अनुभव, त्याची लिहिण्याची पद्धत, कथेचा शेवट सर्व काही खूप भावणार आहे. ४)मैत्रेयीचं ललित खूप आवडलं : साधे सरळ सोपे शब्द आणि लिखाणाची आपली अशी तर्हा! ५)गोधडी ह्या पुर्वीच कुठेतरी वाचलेली कथा आहे. नव्यानी वाचतानाही तोच आनंद झाला. ६) आर्चचे एकपानी नेहमीप्रमाणे! चुटकीसरशी वाचून व्हावे इतके छान लिहिले आहेस. ७) एक पणती : अप्रतीम आहे. जी प्रतिक्रिया परागची तीच माझी! ८) 'मी आणि मायबोलि' स्पर्धेत इतके वेगळे साहित्य आले असेल अशी अपेक्षा देखील केली नव्हती. जयवीचा आवाज म्हणजे साक्षात सरस्वती जणू. तिने लिहिलेले भावगीत ऐकायला लागलो तसे एक एक शब्द वातावरणात गोडवा भरत गेले. जयवी तुस्सी ग्रेट हो! स्वाति अंबोळेचे व्रत एकदम छान. पण जिथे हे व्रत संपते तिथे अरे हे इतक्याच संपले काय.. आता कुठेशी सुरवात झाली आहे असे वाटायला लागते. जयवी आणि स्वाती, तुम्हा दोघींचे त्रिवार अभिनंदन! ट्रीट मिळेल का :-) ९)फ आणि रचना ह्या दोघांची चित्रनिर्मीती अगदी बघण्यालायक ठरली आहे. अजून खूप काही वाचायचे शिल्लक आहे. चांगले एक दोन आठवडे तरी पुरणार आहे हा अंक.
|
अंक अप्रतिम झाला आहे ... जयश्री आणि स्वातीचे मनःपूर्वक अभिनंदन
|
Bee
| |
| Monday, October 23, 2006 - 5:59 am: |
| 
|
१०)रचना, शब्दचं नाहीत गं तुझी स्तुती करायला! कारण चित्रांवर समजतील, त्यातील भावना आपल्याकडून उकलतील असे खूपच कमी लेख मी आजवर वाचले आहेत. मला नक्की माहिती नाही पण Holland मधे मी Van Gog च्या संग्रहाला भेट दिली होती. तो चित्रकार हाच असावा का? नावात सारखेपणा दिसतो आहे म्हणून विचारतो आहे. असो.. हा लेख वाचून तुझ्याविषयीचा आधार दुणावला. ह्या चित्रकाराची तू आम्हाला सरळ साध्या शब्दात ओळख करुन दिलीस. त्याच्या चित्राचे सोप्या पद्धतीने रसग्रहण करुन सांगितले त्याबद्दल शतशः तुझे आभार. तू निवडलेले चित्र एकटक बघत बसावे इतके सुंदर आहेत! ११) आठवणीतल्या फ़ॅशन्सवर खूप छान लिहिले आहे दीपांजली! तो काळ मलाही आठवला वाचताना. १२) कराडकर, तुला इतकं काहीकाही येत हे माहिती नव्हतं. पणत्यांचे छायाचित्र जरुर टाकायचे असते. झाल्या असतील करुन तर आत्ता बघायला दे आम्हाला.
|
वा!!! अंक फ़क्त चाळुन झालाय पण मस्त दिसत आहे सर्व संपादक मंडळाचे आणि त्यांना मदत करणार्यांचे उत्तम अंक सादर केल्याबद्दल हर्दिक अभिनंदन रुपेशचे मुखपृष्ठ सुरेखच... जयावी आणि स्वाती तुमचे पण खूप खूप अभिनंदन... जयावी तुझी mp3 अजुन ऐकायची आहे.... स्वाती कहाणी मस्त जमली आहे... आणि त्याबरोबरची फ ची चित्रे पण झकासच... संपदक मंडळ : mp3 download करायची काहि सोय करता येइल का? नेट्चा स्पीड कमी असल्याने mp3 ऐकायला जमत नाहिये
|