|
Anilbhai
| |
| Saturday, October 21, 2006 - 8:00 pm: |
| 
|
ऍडमिन, संपादक मंडळ, स्वयंसेवक, व सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन 
|
sirimalli
| |
| Saturday, October 21, 2006 - 8:18 pm: |
| 
|
स्वाती, मायबोली देवीचे व्रत फार फार चांगले आहे ग! मज्जा आली वाचुन. जयश्री, अभिनव प्रयोग mp3 आवडला. ए तुझा आवाज छान आहे ग! अजुन बरच वाचायचे आहे, पण वेळीच अंक उपलब्ध करुन दिल्याबद्दल संपादकांचे आणि इतकी सुंदर सजावट आणि चित्रांबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार! शुभ दिपावली! मला HDA च्या रुपात पावली!! -आ. चिन्नु
|
नुसता चाळताना सुद्धा मजा आली
|
Medha Pai
| |
| Saturday, October 21, 2006 - 8:31 pm: |
| 
|
आता संध्याकाळी लक्ष्मी पूजन करू की मायबोली व्रतानुसार मनोभावे नवा अंक वाचू? सम्पादक मन्डळाला श्रमपरिहार्थ one round of drinks on me किती परिश्रम घेतलेत याची साक्ष म्हणजे हा सुंदर अंक! शुभ दीपावली!
|
Paragkan
| |
| Saturday, October 21, 2006 - 8:53 pm: |
| 
|
धन्दडान तत्ताडान धन्दडान तत्ताडान आला रे आला! मुखपृष्ठ अप्रतीम .... रुपेशला सलाम!
|
मी दिलेला लेख छापल्याबद्दल धन्यवाद! पण तो दुसय्राच्या नावाने प्रसिद्ध झाला आहे. क्रुपया अंक दुरुस्त कराल का? माझं नावच खूप common असल्याने हा गोंधळ झाला असावा.
|
Sampadak
| |
| Saturday, October 21, 2006 - 9:11 pm: |
| 
|
राजेश, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. index मध्ये तुमच्या ID ची लिन्क rajeshad ऐवजी चुकून rajeshd झाली आहे. लिन्क दुरुस्त करत आहोत. चुकीबद्दल दिलगीर आहोत. -संपादक
|
"प्रेमाचा रिंगटोन खूपच छान!!, ग्रेट!!" बाकी गोष्टी चाळणं चालू आहे अजून.
|
काळजी नसावी ("नो वरिज!" )
|
संपादक , अभिनंदन !! रुपेश चे मुखपृष्ठ अप्रतिम !!
|
मायबोलि दशकपुर्तीचा दिवाळी अंक आलाय,वाचायची उत्सुकत्ता आहे. रुपेशचे मुखप्रुश्ठ उत्तम आहे...पुजेची धामधुम संपली कि ठिय्या देवुन वाचेन.. सपांदकाचे आभार,सर्वांना दिवाळिच्या शुभेच्छा.
|
Upas
| |
| Saturday, October 21, 2006 - 10:10 pm: |
| 
|
य्यस्स्स्स.. खूप आवडला.. केवळ अप्रतिम..! आत्ता एक बैठकीत पूर्ण अंक वाचून काढला.. अंकातील सगळेच लिखाण, रेखाटने, मुखपृष्ठ, बांधणी अतिशय वरच्या दर्जाची.. स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन..!! आणि हो श्राव्य माध्यमचा उपयोगही अति उत्तम. लिहिणार्यांचे, संपादक मंडळाचे इतक्या सुंदर प्रस्तुती बद्दल खूप खूप आभार! आता दिवाळी जाणवतेय! 
|
wow कसला मस्त दिसतो आहे अंक.. संपादक मंडळी अभिनंदन.. रुपेशच मुखपृष्ठ तर अप्रतिम दिसतय.. प्रेमाचा रिंगटोन मस्त आहे. आणि जयश्री तु माझी मायबोलि खूप छान. मस्त आवाज आहे तुझा इतकच सध्या
|
अंक एकदम झकास दिसतो आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन!!
|
वाह! काय सुरेख मुखपृष्ठ आहे!! अंकाची मांडणी व सजावट फारच चांगली आहे. अंक नुसताच चाळला आहे. जसजसा वाचेन तसतशी प्रतिक्रीया देईनच. संपादक मंडळ व सर्वांचे अभिनंदन व अनेक आभार!
|
लै भारी. एकदम बेष्ट.
|
काल रात्री खुप जागुन दिवाळी अंक कधी प्रकाशित होतोय याची वाट बघत बसलो. मग आत्ता पहाटेच उठुन सगळा अंक वाचुन काढला. गेल्या वर्षीपासुन मुखपृष्ठ देखणे होत चालले आहे. यावेळी, " हम दिल दे चुके सनम " मधल्या ऐश्वर्याची आठवण झाली, पण त्या सीनमधे तळे नव्हते. सर्वच लेख फार सुंदर आहेत. वैयक्तिक आवडीमुळे मला देशांतर, चिंतन, संवाद या विभागातले लेख जास्त आवडले. आमच्या ॠचाताईला लिहायला लावले, याबद्दल खास आनंद झाला, हि केवळ सुरवात असावी. स्वानुभवातुन आलेले सर्वच लेखन, असे दर्जेदार असतेच. बाकि सगळे मित्रच आहेत. वेगळे कौतुक ते काय करायचे ? तरिही सगळ्या मित्रमंडळीना वैयक्तिक रित्या लिहावावेसे वाटतेय. लिहिनहि. संतोषने सादर केलेला प्रकार अनोखाच आहे. त्याचे जास्त नमुने असायला हवे होते. दोन तक्रारी, खुपशी चित्रे हि मायबोलिच्या नेहमीच्या दर्ज्यापेक्षा खालची आहेत. काहि चित्रात काळ्या रंगाचा अति वापर झालाय. आणि काहि लेखात, खास करुन प्रसादच्या एकांकिकेत, फ़ॉन्ट्सच्या अनेक ढोबळ चुका झाल्यात. ईतरहि लेखात काहि ठिकाणी आहेत त्या. वेळेवर अंक प्रकाशित करायचा, म्हणुन खुप घाई झाली असेल, तरी पी डी एफ़, फ़ाईल करायच्या आधी या दुरुस्त कराव्यात, अशी नम्र विनंति. सर्व लेखकांचे, कविंचे आणि संपादक मंडळींचे अभिनंदन.
|
अंक फार देखणा, वाचनीय आणि श्रवणीयसुद्धा झाला आहे. आत्ता नुसता चाळला, पण मजा आली. ऍडमिन, संपादक मंडळ आणि स्वयंसेवकांचं हार्दिक अभिनंदन. जयश्री, ' मी आणि मायबोली' स्पर्धेतील प्रथम पारितोषिकाबद्दल अभिनंदन. आवाज छान आहे गं तुझा. माझ्या ' मायबोलीच्या कहाणी'सोबत जी चित्रं आहेत ती फारच सुंदर आहेत. अप्रतीम. फ आणि रचना, धन्यवाद.
|
जयश्री, "तू माझी मायबोली" खरंच अगदी CLASSIC!... PRIZE WINNING!... SUPERB!!! " स्वाती, मनापासून अभिप्राय हं!" मायबोलीची कहाणी" ' SIMPLY SUPERB"!!! बाकी अंक पण चाळल्यावर मस्तच वाटतोय. अभिप्राय वाचल्यावर देता येईल! ईतका सुन्दर अंक झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन!!!
|
sarang
| |
| Sunday, October 22, 2006 - 7:14 am: |
| 
|
केवळ सुंदर!!! अंकासाठी हातभार लागलेल्या सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन! बाकी अभिप्राय सवडीने टाकेन
|
|
|