Paragkan
| |
| Tuesday, January 10, 2006 - 12:23 am: |
| 
|
Good one Sarang! सुमती, कविता चांगल्या आहेत. पण त्या इथल्यापेक्षा 'Culture- साहित्य - इतर साहित्य - इतर काही कविता ' मध्ये टाकणं अधिक योग्य होईल.
|
Devdattag
| |
| Tuesday, January 10, 2006 - 12:48 am: |
| 
|
सारंग सुरेखच रे!!! सुमति.. उत्तम
|
सारंग .... मस्तच .... सुमती ... नेहेमीप्रमाणेच सुंदर ...
|
Giriraj
| |
| Tuesday, January 10, 2006 - 1:20 am: |
| 
|
अहो परागमिया,माझ्या माहीतीप्रमाणे हे काव्यसंग्रह सुमति यांचेच आहेत!(बरोबर ना सुमति) सारंगा,भारी रे! कविता आवडली!
|
नाही... माझ्या भावाच्या संजय इन्गळे तिगावकर ह्याच्या कवितासंग्रहातल्या ह्या कविता आहेत.. आभारी आहे पराग.... पुढल्या वेळी मी काळजी घेईन.
|
Sarang23
| |
| Tuesday, January 10, 2006 - 4:36 am: |
| 
|
मयुरेश, पीके, देवदत्त, वैभव आणि गिरिराज धन्यवाद... गिर्या सुमतीने पहिली कविता टाकतानाच सांगितले होते त्या कविता संग्राबद्दल. इथे सुमती, हा कविता संग्रह कुठे मिळु शकेल ते सांगता का?
|
फ़िरकी .... अशीच एकदा मी फ़िरकी घेतली मनाची म्हणालो " अरे जरा तरी लाज बाळग जनाची ना तरी मनाची हा तुझा फाफटपसारा आवर ... विचारांची खेळणी सदैव पसरलेली घरभर आलंच कुणी भेटावयाला ... तर किती नावं ठेवतील असं गबाळं मन बघून मनातल्या मनात हसतील " अत्यंत बेफ़िकिरीने , खांदे उचकुन माझं मन म्हणालं " मालक तुमच हे मन आळसाला उगाच सोकलेलं नाहिये कितीतरी भेटून गेले " देहाच्या दरवाज्यात " ... पण आजवर कुणीही " आत " डोकावलेल नाहिये ... वैभव !!!
|
Sarang23
| |
| Tuesday, January 10, 2006 - 7:07 am: |
| 
|
आईशप्पथ....!!! लारा क्या है मारा!!!
|
Urmila
| |
| Tuesday, January 10, 2006 - 7:10 am: |
| 
|
सोनकळी तेजोमय सोनकळी ही सुन्दर छुम छुम वाजती तिचे पैन्जण विसरे दुःखही माझे क्षणभर एका मागुन एक येती संकटे नच डगमगली कधीही पळभर त्यानाच वाटली लाज क्षणभर आता नको परीक्षा पाहणे प्राजक्ताचा सडा पाडणे स्वप्नासारखे वाटे मजला मागे वळूनी पाहू कूठवर आई, हाक ऐकली अन सुगंध वारा सुटला क्षणभर सुमन
|
Shyamli
| |
| Tuesday, January 10, 2006 - 7:56 am: |
| 
|
व्वा काय मस्त च लिहिलय फिरकी वीचारान्चि खेळ्णी आणि गबाळ मन सहिये एकदम
|
Chanakya
| |
| Tuesday, January 10, 2006 - 8:26 am: |
| 
|
' स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'................ कित्येकदा ही ओळ भाषेच्या पुस्तकात वाचली होती कितितरी वेळा निबंधातही घातली होती पण कधी भिडलाच नाही मनाला ह्या ओळीचा अर्थ तिच्यामागे दडला होता केवळ मार्कांचा स्वार्थ कोरड्या शाईने कोर्या कागदावर लिहिण्या इतकी खरेच ही ओळ एवढी स्वस्त होती? का माझ्या अंगात भिनलेली ती एक मस्ती होती? कधी जाणवलीच नाही मला ह्या ओळीची लांबी रुंदी खोली कधी झालीच नाहित लिहिताना डोळ्यांची खापर ओली कारण कधी अनुभवलेच नाही रिकामेपण माझ्या झोळीने कधी लागलेच नाही अनुभवायला भिखार्याचे जिणे भरभरुन कायमच देत होते देणारीचे हजारो हात आणि झोळी होती कायमच...... ओसंडून वहात पण आज मी झोळी घेउन दूर दूर भटकतो आहे आज ही झोळी भरली आहे पण तरी काहितरी हुडकतो आहे आज झोळीत सर्व काही आहे पण तरिही ती रिकामी लागतीय देणारी अजुन देतच आहे पण झोळीच माझी फ़टकुन वागतीय देणारी काहीच म्हणत नाही ती अजुन देतच आहे फ़क्त मला देण्यासाठीच ती अजुन जगत आहे वेळीच सावर नाहीतर भिकारी होशील मी झोळीला बजावतो एकदा फ़क्त बाजु पसर मी झोळीला विनवितो देणारीचे काहीच मागणे नाही फ़क्त तिची ठेव जाण आयुष्यभर घेतलेल्या दानाची आईशप्पथ तुला आण
|
Shyamli
| |
| Tuesday, January 10, 2006 - 9:36 am: |
| 
|
खरच खुप छान आहे वेळीच सावर नाहितर भीकारि होशिल आजच्या तमाम तरुण वर्गालामाझ अस सान्गण आहे कि खरच बाबान्नो वेळिच सावरा नन्तर कितिहि डोळे गाळ ले तरीहि आई नाहि हो परत मिळत सावरायच म्हणुन म्हणल तरि वेळ नका घालवु लगेचच सावरा. धन्यावाद चाणक्य खुप खुप धन्यवाद बरेच दिवसन्पासुन हा विशय होता मनात पण शब्द देत न्हवते साथ
|
Moodi
| |
| Tuesday, January 10, 2006 - 9:39 am: |
| 
|
फारच छान लिहीलत चाण्यक, डोळ्यात टचकन पाणी आणलत.
|
Ninavi
| |
| Tuesday, January 10, 2006 - 10:56 am: |
| 
|
ती हवीच... ती हवीच... प्रत्येक परीक्षेच्या आधी 'भिती वाटत्ये गं..' म्हणून कुशीत शिरायला.. आणि जगातल्या कुठल्याही धीराच्या शब्दांना लाजवेल असा तिचा हात पाठीवरून फिरायला.. ती हवीच.. तिच्या घासातला अर्धा घास हट्टाने मागायला.. हक्काने वाटेल तेव्हा वाटेल तसं वागायला.. आपली दुखणी खुपणी काढत उशाशी जागायला... ती हवीच... ओले हात हळूच तिच्या पदराला पुसायला.. तिला ते दिसूनदेखील न दिसायला.. चुकलं की फटकारायला.. आणि'शहाण्यासारखं' वागलं की डोळ्यांतून हसायला.. ती हवीच.. आपल्या पोराची तक्रार सांगितली, की 'तू लहानपणी कमी नव्हतीस..' हे ऐकवायला.. आणि तरी त्यालाही चार गोष्टी शिकवायला.. ती हवीच... तिच्यासाठी काही करायचं म्हटलं की 'माहित्ये, फार शहाणी आहेस!' म्हणून खुंटीला टांगायला.. आणि मी केलेल्या कणाचं मणभर कौतूक गावभर सांगायला.. ती हवीच... कोण जाणे मला असं होता येईल का.. माझ्या पिलासाठी... पण.. पण कसं असायला हवं ते कळायला तरी... ती हवीच... ती हवीच... नाही का?
|
हो अगदीच हवी... वंडरफ़ूल निनावी... ह्या सगळ्या कविता प्रेमास्वरूप आई सारख्या गाण्यात बसवायला हव्यात!
|
Chinnu
| |
| Tuesday, January 10, 2006 - 8:02 pm: |
| 
|
Ninavi! I'm overwhelmed by ur poem! नितांत सुंदर कविता आहे ही!
|
Kandapohe
| |
| Tuesday, January 10, 2006 - 9:02 pm: |
| 
|
चाणक्या, निनावी सुंदर!! शब्दच नाहीत.
|
सारन्ग, वैभव,चाणक्य, निनवि अगदी हृदयस्पर्शी कविता.. सुन्दर. बापू.
|
Sarang23
| |
| Tuesday, January 10, 2006 - 10:35 pm: |
| 
|
निनावी छान कविता! सुमन, चाणक्य छान... लिहीत रहा
|
मस्तच ... सारंग ... सर्वात प्रथम तुझे आभार कारण तू प्रतिक्रियेमध्ये " आई '' शब्दाचा वापर केलास. तिथून जी सुरुवात झाली आहे , उर्मिला , चाणक्य , आणि बरयाच दिवसांनी आलेल्या निनावी ... सर्वांच्याच कविता सुंदर आहेत. निनावी शेवटचा पंच खास आहे बापू ... श्यामली ... धन्यवाद
|
रेशीम फास ... माझ्या मनासभोती रेशीम फास आहे मारेकरी तसा तो भलताच खास आहे नाहीच आणलेले काही हत्यार त्याने हातास जीवघेणा चंदन सुवास आहे आवाज काळजाचा चुकवीत जाई ठोका रक्तात उतरणारी अस्सल मिठास आहे डोळ्यांत वेड घेवून करण्यास वार येइ काजळ किनार हळवी , वेडेपणास आहे वाटे मला तरिही होणार घात नाही राखून ठेवलेले पण मोगरयास आहे आता खरेच नाही आशा मुळीच उरली झाला फ़ितूर आता माझाच श्वास आहे कोणीच वाचवाया येवू नयेसे वाटे येथे जगावयाची पर्वा कुणास आहे भिरकावले कफन मी बेरंग जीवनाचे रेशीम पांघरूनी मरणे झकास आहे वैभव !!!
|
Sarang23
| |
| Tuesday, January 10, 2006 - 11:55 pm: |
| 
|
वरची गझल वाचुन नकळत एका महाकविचे शब्द आठवले... त्या कवितेचा इथे संबंध काय तर दाद म्हणुन... नसे रोष काही, तुझा दोष नाही असे सक्त ही प्राक्तनाची तर्हा मला तोडताना तुला त्रास झाला नसे जाण याचीच का अंतरा
|
Urmila
| |
| Wednesday, January 11, 2006 - 12:27 am: |
| 
|
सुगंध जाई मोगरा बहरुन आला, सुगंध त्याचा सर्वत्र दरवळला त्यास बघूनी हास्य उमटे, हासत रहावे दुसर्यास आनंदी करावे निसर्ग ही सगळ्यास हसवितो, निरनिराळे रंग उधळतो, आकाशात रंग पसरवतो थकवा सगळा निघून जातो, उल्हासित मन हे आपले करतो सुमन
|
Urmila
| |
| Wednesday, January 11, 2006 - 12:52 am: |
| 
|
जगण्याचा अर्थ दु:खा मागून दु:ख झेलले आशेमागे पळत राहिले स्वार्थी जग हे मला न समजले गोड गोड बोलूनी मला रिझविले त्याच्यावरी संकटे येता धावून गेले काळ कितीतरी उलटून गेला दु:ख मजवरी येता सारे क्षणात निघून गेले आणि जगण्याचा अर्थ गवसला स्वत:स साम्भाळूनी, दुसर्यास हात द्यावा सुमन
|
Devdattag
| |
| Wednesday, January 11, 2006 - 1:31 am: |
| 
|
गुलमोहराला रोज असाच बहर येऊ देत, हीच इच्छा.
|
Milya
| |
| Wednesday, January 11, 2006 - 1:53 am: |
| 
|
वैभव : फ़िरकी एकदम सहीच... रेशिमफ़ास पण खुप सुंदर निनावी : मस्तच गं छानच मांडल्यास भावना
|
Psg
| |
| Wednesday, January 11, 2006 - 4:17 am: |
| 
|
आज गुलमोहोराला बहर आलेला दिसतोय! वैभव, निनावी, चाणक्य छानच आहेत कविता.
|
Ninavi
| |
| Wednesday, January 11, 2006 - 9:09 am: |
| 
|
धन्यवाद, दोस्त्स. वैभव, फिरकी आणि रेशीमफास.. दोन्ही(नेहेमीप्रमाणेच्) अप्रतीम! मला रोज तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला नवीन शब्द कुठून आणायचे ते खरंच कळत नाही. आणि मजा म्हणजे हे वाक्यही इथे खूप जणांनी म्हणून झालंय. आता एखादा fan club वगैरे सुरू करावा की काय! चाणक्य, तुमची कविता आवडली.
|
Ninavi
| |
| Wednesday, January 11, 2006 - 10:34 am: |
| 
|
एकटा... तसा नसे मी इथे एकटा किती सखे सोयरे किती तरी कोठली उरी पोकळी खोल खोल घालते भिती असा भोवती सदा गराडा, सदा मैफ़िली जमलेल्या कसा जुळेना सूर कुठेही किती साज आवाज किती रोज आसवे पिऊनदेखिल नशा कशी ना चढे मला किती झोकती, किती झिंगती, तरी त्यात रंगती किती! उरी झेलतो घाव, घडवितो नवीन शब्दांची शिल्पे आणि आंधळे चोर तयांना बघून माना डोलविती सूख जाहले बटिक तयांची, जखमा माझ्या पतिव्रता सगळ्या माझ्या कवनांमध्ये दरवळते त्यांची प्रीती...
|
Giriraj
| |
| Wednesday, January 11, 2006 - 1:11 pm: |
| 
|
वैभव,महिना संपला की मग एकत्रच दाद देईन म्हनतो!
|
Anilbhai
| |
| Wednesday, January 11, 2006 - 2:08 pm: |
| 
|
अरे तो शेवटचा न नलातला नाही रे बानातला न काढ 
|
Sarang23
| |
| Wednesday, January 11, 2006 - 10:29 pm: |
| 
|
हे हे हे भाई
|
निनावी, एकटा.. मस्त जमलीय बापू.
|
Sarang23
| |
| Thursday, January 12, 2006 - 4:38 am: |
| 
|
एक वेगळी गझल... निर्बोध प्याला... निघा बापड्यांनो, चला वेळ झाली इथे का कुणी थांबतो आसर्याला? घड्याळास बांधील प्रत्येक प्राणी मरे रोज थोडा सरे दीन आला कशाला हवा पोकळा थाट मोठा पचेना अश्या मारता का बढाया? इथे सुर्य येवूनही रात होते उजाडेल का पाहता काजव्याला? कुणीही हसावे उपेक्षा कराया असा मुर्ख तो वाटतो का तुम्हाला? असे वेड लागून येते अकस्मात सामर्थ्य हातात जिंकावयाला! इथे फोडलेल्या घरांची कवाडे करी शोक दारात अंधारलेल्या अवेळी कसा घात झाला कळेना कधीचा नव्हे गारदी आज भ्याला किती संत आले किती संत गेले तरी सांगता तत्व आता पुन्हा का? अरे बुद्ध, श्रीकृष्ण, रामास सुद्धा मिळाला कुठे एक निर्बोध प्याला? सारंग
|
Jaaaswand
| |
| Thursday, January 12, 2006 - 5:40 am: |
| 
|
व्वा सारंगा व्वा.... सामर्थ्य हातात....मस्त आहे एकदम
|