|
Dineshvs
| |
| Tuesday, January 10, 2006 - 12:02 pm: |
| 
|
ट्रायल बॅलन्स टॅलि झाला, प्रोव्हिजन एन्ट्रिज करुन झाल्या, कि पुढची पायरी असते ती फ़ायनल अकाऊंट्सची. आपण बघितलेच कि ट्रायल बॅलन्स मधे फ़क्त दोन प्रकारचे बॅलन्स असु शकतात, एक तर क्रेडिट किंवा डेबिट. आणि अर्थातच शुन्य. पण शुन्य बॅलन्स असलेले अकाऊंट्स ट्रायल बॅलन्स मधे घ्यायचे काहि कारणच नसते. आता आपल्याला जी मुख्य दोन फ़ायनल अकाऊंट्स तयार करायची आहेत, त्यांची ओळख करुन घेऊ. पहिले असते ते प्रॉफ़िट आॅंड लॉस अकाऊंट. नावाप्रमाणेच यात एका ठराविक काळात झालेला नफ़ा वा तोटा पाहता येतो, आणि दुसरे असते बॅलन्स शीट, यात एका ठरविक दिवशी, ऊद्योगाची एकुण मालमत्ता आणि ऊद्योगाची देणी, यांचा ताळेबंद मांडलेला असतो. मी मागे लिहिले होते कि कुठल्याहि क्षणी, ऊद्योगाची मालमत्ता आणि तिची देणी हे समान असतात. साध्या समीकरणाने हे पडताळुन बहु. आपल्या ट्रायल बॅलन्सची जी डेबिट बाजु आहे तिची टोटल क्रेडिट बाजुईतकीच असणार हे आपल्याला माहित आहेच. तर या डेबिट बाजुला असणार काहि खर्च आणि बाकिच्या मालमत्ता. ( म्हणजेच असेट्स ) तसेच क्रेडिट बाजुला असणार काहि मिळकती आणि काहि दायित्व म्हणजेच देणी. ( म्हणजेच लायबिलिटिज ) हेच सुत्ररुपाने मांडताना Let E denote Expenses, let I denote incomes. Let A denote Assets and L denote Liabilities. Now E + A = Debit side of Trial Balance similarly I + L = Credit side of Trial Balance Therefore E + A = I + L Now we will be taking E and I, that is expenses and incomes to Profit & Loss account, and I-E will denote profit or Loss. Profit if positive and Loss if negative. and naturally A = L + ( I – E ) simple, Isn’t it ? तर अश्या रितीने आपण, यातले गणित समजावुन घेतले. हे लक्षात घ्यायचे कि प्रॉफ़िट आॅंड लॉस अकाऊंट हे एक खाते म्हणजेच अकाऊंट आहे तर बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. म्हणजेच ते खाते नाही. एका ठराविक काळातले ( भारताच्या संदर्भात एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंतचा काळातले ) खर्च आणि मिळकती यांचा लेखा जोखा घेतला कि ती सगळी पाटी कोरी होते. यातला फ़रक, म्हणजे नफ़ा किंवा तोटा, ऊद्योगाच्या मालकाच्या हाती दिला जातो किंवा कपाळी मारला जातो. नव्या वर्षी नवी विटी नवे राज्य. बिझिनेसला नव्याने सुरुवात करायची. पण मालमत्ता आणि दायित्वे मात्र मागच्या पानावरुन पुढे चालु ठेवायची असतात. या नफ़ा तोटा खात्याचे आणखी दोन भाग केलेले असतात. पहिल्या भागाला म्हणतात, ट्रेडिंग अकाऊंट आणि दुसरा प्रॉफ़िट अऽॅन्ड लॉस अकाऊंट. यातला फरक जरा सुक्ष्म आहे. ट्रेडिंग अकाऊंट मधे निव्वळ व्यापाराचे व्यवहार दाखवले जातात. निव्वळ व्यापार म्हणजे, विक्री, खरेदी आणि स्टॉक च्या एन्ट्रीज ईथे असतात. हि अशी विभागणी करण्याचे कारण, म्हणजे असे केल्याने केवळ विक्रीतुन होणारा नफा कळतो. यालाच ग्रॉस प्रॉफ़िट असे म्हणतात. आपल्या अगदी पहिल्या ऊदाहरणातली साडी जर आपण घेतली. तर ४५० रुपयांची साडी जेंव्हा आपण ५०० रुपयांआ विकली तेंव्हा या व्यवहारात आपल्याला ५० रुपये नफ़ा, प्रत्येक साडीमागे झाला. जरी मी वर निव्वळ खरेदी असे लिहिले असले तरि, विकत घेतलेला माल, तुमच्या दारापर्यंत येईपर्यंत जो खर्श झालेला असतो, तो खरेदीचाच भाग मानला जातो. वरील ऊदाहरणातल्या साड्या आपण कलकत्त्याहुन आणुन विकल्या. तर या साड्या कलकत्त्याहुन आणण्यासाठी जो खर्च झाला, जर त्यावर काहि ऑक्ट्रॉय भरला असेल, जर त्याचा विमा ऊतरवला असेल तर हे खर्च खरेदी खर्चाच भाग धरला जातात. हा व्यवहार तुम्ही जेंव्हा वैयक्तिक पातळीवर केला, म्हणजे तुम्ही तुमच्या सामानाबरोबर या साड्या आणल्या, तेंव्हा असे खर्च झालेहि नसतील, पण जेंव्हा एखाद्या ऊद्योगासाठी असा माल आणला जातो, तेंव्हा प्रत्येकवेळी ते पर्सनल बॅगेज म्हणुन आणले जात नाही, आणि हे असे खर्च अपरिहार्यच ठरतात. बिझिनेसमधले कुठलेहि निर्णय घेताना, या खर्चाचा विचार करावाच लागतो. वर्षाच्या सुरवातीला तुमच्याकडे असणारा माल, वर्षभरात तुम्ही केलेली खरेदी, त्या खरेदीवरील वरीप्रमाणे झालेले खर्च, ज्याला डायरेक्ट एक्स्पेन्सेस असे म्हणतात ते यांच्या बेरजेतुन तुमच्याकडे वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेल्या मालाची किम्मत कमी केली, कि तुम्हाला तुम्ही वर्षभरात विकलेल्या मालाची किम्मत मिळते. प्रत्यक्ष विक्रीतुन मिळालेल्या उत्पन्नामधुन ही बेरिज वजा केली कि तुम्हाला तुमचा ग्रॉस प्रॉफ़िट कळतो. या ग्रॉस प्रॉफ़िटचे विक्रीशी जे गुणोत्तर असते त्याला ग्रॉस प्रॉफ़िट रेशो. एखाद्या ऊद्योगातला हा रेशो सहसा ठरलेला असतो आणि तुमची क्षमता यावरुनच जोखली जाते. पण हे तर तुम्हाला माहित आहेच कि निव्वळ मालाच्या खरेदिपेक्षा, ईतर अनेक खर्च केले जातात. केले जातात म्हणण्यापेक्षा करावे लागतात, असे म्हणायला पाहिजे, आणि हे सगळे प्रॉफ़िट आॅंड लॉस अकाऊंटला घेतले जातात. सोयीच्या दृष्तीने म्हणा किंवा समजायला सोपे जावे म्हणुन म्हणा, याचे काहि विभाग पाडले जातात, जसे पर्सोनेल, आॅड्मिनिSत्रेतिव्ह, सेलिंग एक्स्पेन्सेस वैगरे. हे खर्च तसे ढोबळमानाने सर्व ऊद्योगासाठी केलेले असतात. पण त्याचा खरेदी विक्रीशी थेट संबंध असतोच असे नाही. पण हेहि तितकेच खरे कि या बाबींवर खर्च केला नसता, तर बिझिनेस करणे अशक्य झाले असते. जसे मूळ ऊद्योगाशी थेट संबंध नसलेले खर्च असु शकतात तसेच असे काहिसे हटके असलेल्या मिळकती सुद्धा असु शकता. स्क्रॅप विकुन आलेला पैसा, एखाद्याकडुन मिळलेले भाडे, नुकसानभरपाई सारख्या मिळकती, मिसलेनियस ईनकम म्हणुन दाखवल्या जातात. ग्रॉस प्रॉफ़िटमधे हे मिसलेनियस ईनकम मिळवले आणि त्यातुस सगळे खर्च वजा केले कि मिळतो नेट प्रॉफ़िट. म्हणजेच निव्वळ नफा. कराची आकारणी या नेट प्रॉफ़िटवर अवलंबुन असल्याने यालाच करपुर्व नफा असेहि म्हणतात. या नेट प्रॉफ़िटचे सेल्सशी असणारे गुणोत्तर हे नेट प्रॉफ़िट रेशो म्हणुन ओळखले जाते. पिंडे पिंडे मतभिन्नता या न्यायाने, एकाच ऊद्योगातील वेगवेगळ्या युनिट्स मधे हा रेशो, वरखाली होवु शकतो. साध्या गणिताने तुमच्या लक्षात येईलच, कि जर खर्चावर योग्य ते नियंत्रण ठेवले, म्हणजेच जर ते योग्य त्या पातळीवर, ज्याला आम्ही एकनॉमिक लेव्हल किंवा ऑप्टिमम लेव्हल म्हणतो, तर हा नेट प्रॉफ़िट वाढवता येतो. खर्च कमीत कमी करावे, असा शब्दप्रयोग मी मुद्दामच वापरला नाही, कारण विम्यासारखे काहि खर्च अत्यावश्यक असतात. या प्रॉफ़िट आॅंड लॉस अकाऊंटचा तसा काहि नियोजित फ़ॉर्म नाहि. पण काहि परंपरा पाळल्या जातात. नाहि म्हणायला याचे दोन फ़ॉर्म वापरात आहेत. एक आहे तो पारंपारिक म्हणजेच अकाऊंटसारखा, तर दुसरा आहे व्हर्टिकल. जुना फ़ॉर्म आम्हाला समजायला सोपा होता तर नवीन फ़ॉर्म, सर्वसाधारण लोकाना कळायला सोपा आहे. आणि प्रॉफ़िट आॅंड लॉस अकाऊंटमधल्या माहितीची मागील वर्षाशी तुलना करणे, व्हर्टिकल फ़ॉर्म मधे जास्त सोयीस्कर ठरते. तसेच या फ़ॉर्ममधे टक्केवारी देता येते. त्यामुळे गेल्या काहि वर्षातील प्रगती एका ठिकाणी बघता व अभ्यासता येते. सोयीसाठी यातील खर्चांचे काहि ढोबळ वर्गीकरण केलेले असते. त्रयस्थ माणसाला त्यातल्या डिटेल्सची गरज नसते. ऊदाहरणार्थ तुम्ही सेल्स डिपार्टमेंटमधल्या माणसाना नेमका किती पगार दिला, किंवा कॅंटीनचे वर्षाचे बिल किती झाले, हे बघण्यापेक्षा एकंदर कर्माचार्यांवर ऊद्योगाने किती खर्च केला, आणि तो विक्रीच्या तुलनेत किती टक्के होता, हे जाणुन घ्यायला त्रयस्थ माणसाला आवडेल नाही का ? या दोन्ही प्रकारच्या अकाऊंट्सचे नमुने सोदत देतोय. दुसर्या पद्धतीच्या स्टेटमेंटमधे, मुद्दाम टक्केवारी दिलीय. अगदी कुणालाहि या दोन वर्षात नेमकि काय प्रगती झाली. कुठल्या क्षेत्रात प्लॅनींग चांगले झाले. अशी तुलना आपण एकाच बिझिनेसच्या दोन कालावधिसाठी केली. तशीच ती एकाच ऊद्योगातल्या दोन बिझिनेसच्या रिझल्ट्सबद्दलहि करता येईल. आणि हेच आमच्या क्षेत्राचे साध्य आहे. आता पुढच्या भागात बॅलन्स शीट बघु.
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 10, 2006 - 12:06 pm: |
| 
|
हे आहे जुने नफा तोटा खाते
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 10, 2006 - 12:07 pm: |
| 
|
आता वरिल माहितीच, व्हर्टिकल फ़ॉर्म मधे दिली आहे.
|
Dhumketu
| |
| Tuesday, January 10, 2006 - 1:23 pm: |
| 
|
दिनेश हे वाचा तुम्हाला प्रत्येक भागाच्या वरती किंवा शेवटी मागच्या भागाच्या लिंक्स टाकता येतील का?
|
Dhumketu
| |
| Tuesday, January 10, 2006 - 1:33 pm: |
| 
|
भाग पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग चौथा भाग पाचवा भाग सहावा भाग सातवा
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 10, 2006 - 8:30 pm: |
| 
|
धुमकेतु, नेकि और पुछपुछ. हे सगळे लिहुन झाले, कि कुणाला हवे असेल त्याला एकत्र ऊपलब्ध करुन देणार आहे मी.
|
दिनेश,गुड वर्क.. तीच मागणी करणार होतो मी.. सगळे लिहुन झाले की मला एकत्र पाठव रे सगळं
|
Dhumketu
| |
| Wednesday, January 18, 2006 - 4:35 pm: |
| 
|
१. आडवा फ़ॉर्म काही समजला नाही. पण तो आत वापरात नसल्यामुळे जास्ती खोलात गेलो नाही. पण दुसर्या उभ्या फ़ॉर्ममध्ये वजा टक्के का दाखवले आहेत? ते खर्च म्हणून दाखवले असतील असे वाटते. पण कुठल्याही बलन्स शिटमधे वजा टक्केवारी असते का? २. पाचव्या भागात असे लिहीले होते की ----------- ट्रायल बलन्स या यादीत नोंदवलेले बलन्स हे एकतर डेबीट असतील किंवा केडिट तरी........ आता जे डेबीट बलन्स आहेत ते एकतर खर्च...... ( पुर्ण परिच्छेद ) ---------- हा भाग समजला नाही. परत समजाउन सांगता का? मी खर्च मांडला तेव्हा तो क्रेडिटला गेला डेबीट म्हणजे जे आत येते ते (what goes in) आणी क्रेडीट म्हणजे जे बाहेर जाते ते (what goes out) समजा धंद्या साठी मालकाने रोखीने पैसे देऊन १० किलो सोने घेतले. तर त्याची नोंद तो पर्चेस आणी कश बुक मध्ये करेल. पर्चेस मधे ती रक्कम तो डेबीट ला दाखवेल आणी कशबुक मधे क्रेडिटला. आता जर कशबुक बलन्स मधे घेतले तर खर्च केलेली रक्कम क्रेडिटच्या बाजूला येते आहे. काही bmw ( बेसीक मधे वांधा ) आहे का? ३. ----- वर्षाच्या सुरवातीला तुमच्याकडे असणारा माल, वर्षभरात तुम्ही केलेली खरेदी, त्या खरेदीवरील वरीप्रमाणे झालेले खर्च, ज्याला डायरेक्ट एक्स्पेन्सेस असे म्हणतात ते यांच्या बेरजेतुन तुमच्याकडे वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेल्या मालाची किम्मत कमी केली ......................... ....................................................... ---- आता यात वर्षाच्या सुरुवातीला असलेला माल हा एक्स्पेन्स म्हणून का धरला जातो?
|
Dineshvs
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:53 am: |
| 
|
१.वजा रकमा शक्यतो कंसात दाखवल्या जातात. आपण अजुन बॅलन्स शीट कडे आलेलो नाहीत. एक्सेल मधे वजा रकमा लाल रंगात दाखवायची सोय असते. पुर्वी वजा रकमा वजा या चिन्हाने दाखवत असत, पण छपाई किंवा फ़ॅक्स करताना ते चिन्ह गायब झाले तर घोटाळा व्हायचा म्हणुन हि सोय. कंसात दाखवल्या म्हणजे नीट दिसते. २. ट्रायल बॅलन्स म्हणजे प्रत्येक खात्यातल्या फ़रकांची म्हणजेच बॅलन्सची यादी. ती एकतर अधिक असेल किंवा वजा तरी. म्हणजेच डेबिट तरी किंवा क्रेडिट तरी. तिसरा पर्याय नाहीच. आता मुळ सहा नियमाप्रमाणे खर्च आणि मालमत्ताच फ़क्त डेबिट असणार आणि मिळकत आणि दायित्वच क्रेडिट असणार. पुढच्या प्रश्णाच्या उत्तरात हे आणखी स्पष्ट होईल. १० किलो सोन्याचे उदाहरण अगदी बरोबर आहे. पर्चेस खात्यात अशी भर फ़क्त डेबिट बाजुला पडणार. मग त्यांची बेरीज केल्यावर आपल्याला एकुण पर्चेस कळणार तेहि अर्थात डेबिट असणार. कॅशमधे हि रक्कम योग्य तर्हेने क्रेडिटला गेलीय. कॅश येणार आणि जाणारहि. अश्या येण्याजाण्यानंतर शिल्लक राहिलेली जी रक्कम असेल तीच आपण घेणार ट्रायल बॅलन्स मधे. फ़क्त तीच एक रक्कम नाही. आणि खिश्यात पैसे नसतील तर खर्च कुठुन करणार. ( हे ICICI वाल्या क्रेडिट कार्डवाल्या मुलीला विचारुन बघा. तिच्याकडे उत्तर आहे ) म्हणुन कॅश हि नेहमी श्री शिल्लक म्हणजेच डेबिटच असणार. ईथे पर्चेस हा खर्च आणि कॅश हि मालमत्ता आहे. ३. मागच्या वर्षी आपण जो माल खरेदी केला तो सगळा पर्चेस मधे होता. त्यातला जो माल तुमच्याकडे शिल्लक राहिला, तो आपण गेल्या वर्षी स्टॉक म्हणुन बाजुला काढला. म्हणजेच गेल्या वर्षीच्या खर्चातुन तो वजा वा कमी केला, ( कारण सोपे आहे, सेल्स मधे तो नव्हता, त्यामुळे त्याच्या समोर सगळा खर्च दाखवणे योग्य नव्हतेच ) पण तो मागच्या वर्षीचा माल तुम्ही या वर्षी विकला, तो या वर्षीचा सेल्स मधे आलाय पण पर्चेस मधे नाही. म्हणुन तो खर्च धरायचा. हि स्टॉक घेण्याची प्रक्रिया, प्रत्येक वर्षी करायची. प्रॉफ़िट & लॉस अकाऊंट मधे आपण फ़क्त खर्च आणि मिळकती घेतल्या. मालमत्ता आणि दायित्वे, बॅलन्स शीटमधे बघणार आहोतच. आणखी खुलासा हवाय का ? निसंकोच विचारा.
|
Dhumketu
| |
| Thursday, January 19, 2006 - 1:51 pm: |
| 
|
जराजरासे समझते आहे... पण पूर्ण समजत नाहिये असेही वाटत आहे..त्यासाठी परीक्षाच पाहीजे.... तुम्हाला काही तसे करता येईल का? असो.. समझा एका बिझनेसने कर्ज घेतले तर ती रक्कम लोन ह्या अकाउंट मधे असे अकाउंट असते का?) क्रेडीट होईल आणी बक वा कश मधे डेबीट करेन. आता मी क्रेडीट का करायचे ह्याबद्दल असा विचार करतो की कर्ज हे अकाउंट खरे म्हणजे जो कर्ज देतो त्यासाठी ( त्याचे ) आहे. त्याच्याकडे बक्कळ पैसा आहे कुबेरच). त्यातले काही पैसे काढले जातात ( काढणे म्हणजे क्रेडिट ) आणी कश्/बक मधे घातले जातात ( घालणे म्हणजे डेबीट ) . आता मी असा विचार करुन क्रेडिट का डेबीट ठरवतो आहे हे बरोबर आहे का? ही thought process भविष्यात त्रासदायक ठरेल का?
|
Dineshvs
| |
| Friday, January 20, 2006 - 11:00 am: |
| 
|
ज्याना रस आहे त्यांचे समाधान होईपर्यंत जर मला शंकानिरसन करता आले, तर ती माझीच परिक्षा. हो ना ? कर्जाची रक्कम अमुक तमुक लोन अकाऊंटमधे क्रेडिट आणि कॅश किंवा बॅंक मधे डेबिट होणार. हे अगदी बरोबर. प्रत्येकाच्या नावाने लोन अकाऊंट ऊघडायला काहिच हरकत नाही. आता आपण करायचा तो फ़क्त आपला विचार. तो सुद्धा आपल्या नजरेतुन. त्याचे तो बघुन घेईल. त्यामुळे आपल्याकडे काय आले तर पैसा, त्यामुळे तो डेबिट, आणि तो कोणी दिला तर अमुक तमुक ने म्हणुन त्याला क्रेडिट. आता फ़क्त याच घटनेनंतर जर आपण ट्रायल बॅलन्स काढला तर कॅश वा बॅंक अकाऊंट डेबिट बॅलन्स दाखवेल आणि त्याचे अकाऊंट क्रेडिट बॅलन्स दाखवेल. यात कॅश हि झाली आपली मालमत्ता आणि त्याचे कर्ज हे झाले दायित्व. ते कधी ना कधी परत करायचे आहेच. याच व्यवहाराचा त्याच्या पुस्तकातील देखावा वेगळा असेल. त्याच्याकडचे पैसे बाहेर गेले म्हणुन ते क्रेडिट आणि त्याने तुम्हाला दिले म्हणुन तुम्हाला डेबिट. त्याच्या नजरेतुन. तुमचे अकाऊंट ही मालमत्ता. आणि कॅशमधली तुम्हाला देऊन ऊरलेली रक्कम हि देखील मालमत्ताच. अजुन काहि ? सगळ्यांच्या शंका येऊ द्यात.
|
|
|