|
Bhagya
| |
| Friday, January 06, 2006 - 12:38 am: |
| 
|
वा:! अप्रतिम!! वैभव, तुला कांगारू बक्षिस रे! ही अजून एक साधी कविता मित्रमैत्रिणींनो तुम्हाला..... जुनीच तुझी मैफ़िल अन जुनीच ही विराणी हृदयात सलणारी जखम अजुनी आर्त ओली जुनेच तुझे बेबंद श्वास जुनेच माझे घायाळ नि:श्वास त्याच स्वप्नांच्या जगातून पुन्हा तोच नवा प्रवास जुनाच हा जुईचा गजरा क्वचित मोहून तू दिलेला गंध माझ्या मनात ताजा पण तुझ्या नजरेत कोमेजला जुनीच ही भेटीची जागा तोच पारवा अन तोच चांदवा तुला मी नको तरीही मला का तू हवा हवा?
|
Milya
| |
| Friday, January 06, 2006 - 1:24 am: |
| 
|
वा गूज, काठ, सरडा सार्या एकदम अप्रतिम पण सारंग, काठ थोडी झेपली नाही भाग्य : तुझी पण कविता छान आहे
|
Pama
| |
| Friday, January 06, 2006 - 1:40 am: |
| 
|
भाग्या, चांगल लिहितेस आणि हे दिग्गज वगैरे वैभवला ठीक आहे.. मला आपल साधच राहू दे, अजून मी त्या विशेषणात मोडत नाही. काहीबाही लिहिण्याचा प्रयत्न करते,बस! मागे कधीतरी लिहिली होती ती एक कविता सापडली आज.. कुणाकुणाच आकाश... कुणाकुणाच आकाश, टिचभर असत, गजागजाच्या खिडकीतून, बंदिस्त वाटत. कणाकणान साठवलेला, चंद्र कधी दिसतो, मनामनांच अलगूज, तो एकणार असतो. कुणाकुणाच आकाश, मोकळच असत, कशाकशान भरूनही, एकटच भासत. घरादारातून त्याला कुणी, बघणार नसत, जराजराशा कारणान, ते बरसणार असत. कुणाकुणाचे आकाश, स्वच्छंदी असते, फुलाफुलांचे वेल, त्याच्या अंगणातही हसते. ढगाढगांनी ते, कधी दाटणार असत, थेंबाथेंबानी परसात, साठणार असत. कुणाकुणाच आकाश, आकाशच नसत, मणामणाच्या ओझ्याखाली, दबलेले असत. क्षणाक्षणाला ते, कुठे फाटतच असत, ठिगळ ठिगळ लावल तरी, आटतच असत.
|
Devdattag
| |
| Friday, January 06, 2006 - 2:18 am: |
| 
|
वैभव, पमा बरीच वाट पहायला लावलीत..पण इंतजार का फल मिठा हैं ..बापू कुठे आहात?
|
Milya
| |
| Friday, January 06, 2006 - 4:14 am: |
| 
|
पमा : खासच गं छान जमलीय
|
Sarang23
| |
| Friday, January 06, 2006 - 6:43 am: |
| 
|
चुकले माझे स्वप्न पहाया विसरुन गेलो... चुकले माझे झोप घ्यावया विसरुन गेलो... चुकले माझे 'घराभोवती कुंपण घालीन...' म्हटले होते घर बांधाया विसरुन गेलो... चुकले माझे दूर का असे लोटून देता परका समजुन त्रास द्यावया विसरुन गेलो... चुकले माझे हसतानाही रडणे तूजला जमते न्यारे रडत हसाया विसरुन गेलो... चुकले माझे तुला आठवण माझी नाही... जाणून आहे दूर जावया विसरुन गेलो... चुकले माझे अलगद जेंव्हा काळिज माझे घेऊन गेली थांब म्हणाया विसरुन गेलो... चुकले माझे वेडा म्हणुनी हिणवत गेले वेडे सगळे मौन धराया विसरुन गेलो... चुकले माझे लादत गेले गुन्हे जे कधी माझे नव्हते 'झुट' म्हणाया विसरुन गेलो... चुकले माझे फसवत गेले क्षणोक्षणी ते जवळी येवुनी 'पुरे' म्हणाया विसरुन गेलो... चुकले माझे माझी कविता ऐकवलीस तू अपुली म्हणुनी दाद घ्यावया विसरुन गेलो... चुकले माझे इच्छा नसतानाही आला समोर मृत्यूच श्वास घ्यावया विसरुन गेलो... चुकले माझे सारंग
|
सारंग .... अतिशय सुरेख .... १) ' घराभोवती ' .... २) ' तुला आठवण ' .... ३)शेवटचा ... ( एक शंका ... इथे शेवटी मृत्यू ' च ' योग्य की मृत्यू?) हे तीन शेर म्हणजे ... छे !!! नकोच बोलायला काही ...
|
Devdattag
| |
| Friday, January 06, 2006 - 7:06 am: |
| 
|
सारंग काय लिहायच आता..
|
Sarang23
| |
| Friday, January 06, 2006 - 7:09 am: |
| 
|
वैभवा, देवदत्त धन्यवाद रे...
|
Milya
| |
| Friday, January 06, 2006 - 7:18 am: |
| 
|
वा सारंग वा मजा आली. सहीच
|
Giriraj
| |
| Friday, January 06, 2006 - 7:24 am: |
| 
|
क्या बात है सारंगराव!
|
Jaaaswand
| |
| Friday, January 06, 2006 - 7:30 am: |
| 
|
सारगा... ......................... ........................ .........शब्द नाहीत रे.....
|
Sarang23
| |
| Friday, January 06, 2006 - 7:39 am: |
| 
|
मिल्या, गिरी, जास्वंद धन्यवाद. वैभव, तिथे तो बदल मुद्दाम केला. त्या च मुळे एक जाणवणारा बदल होतो. कवितेतील चुकलेला जो कोणी आहे तो मृत्यू पासुन पळतोय हे एक प्रकारे जाहिर होत. नुस्त मृत्यू असेल तरी फरक काहीच पडत नाही(गझलेच्या व्याकरणात... म्हणुन पाहिलस तर कळेल लगेच्) पण मृत्यूच ने एक वेगळा अर्थही येतो...! बरोबर ना?
|
वाह सारंग... छान जमलिये... चुकले का हो ? ची आठवण झाली
|
वा! सारन्ग, नव्या वर्षात प्रतिभेला छान नवे धुमारे फुटलेत. पमा,भाग्य.. सुरेख कविता आहेत. वैभवला शाबासकी द्यायला नव्याने विशषणे शोधायला हवीत.गेले दोन आठवडे प्रवासात होतो. गुलमोहरची उणीव सतत भासली. आता खर्या अर्थाने घरी आल्यासारखे वाटतेय. बापू.
|
निगरगट्ट सावली विस्मरणाच्या खाइत विसर्जित केलेली एकेका आठवणीची एकेक लोचट सावली दूर लोटली, बळेच ढकलली,हाकलली तरी तिची निगरगट्ट सवय नाही सुटली एखाद्या कोपर्यावर परिचित ऊपटतेच अनाहूत अवचित एखद्या गाफील वळणावर बसते दबा धरून आणि गोचिडासारखी चिकटतेच पुन्हा पुन्हा येउन... शेवटी सावलीच ती, तिचे काय चुकले? प्रसन्गावधान तीला कधी कुणी शिकवले? रोमान्च किम्वा हुरहूर, तीला काय माहीत, कसे व्हावे तीने, व्याकूळ किम्वा पुलकीत? बापू.
|
Devdattag
| |
| Friday, January 06, 2006 - 9:12 am: |
| 
|
महाराष्ट्र माझा!!! दगडांमधल्या चीरा सांगती पराक्रमाची गाथा पायख़ुणांचा मुकूट मिरवितो उघडा डोंगरमाथा साक्ष देतसे ही धैर्याची तळपती तलवार सांगे जातकूळी मर्दमराठी शूर अन झुंजार इथेच जन्मले तुकोबा अन ज्ञानोबा माउली शांत करीतसे ह्या जीवाला संतांची सावली इथेच असती क्रूष्ण कोयना इथेच गोदावरी फळाफूलांची बाग फ़ूलतसे हरएक किनार्यावरी कोकण माझा विदर्भ माझा मराठवाडा ह्याचा त्याचा ह्या शब्दांनी तुटेल कधीना महाराष्ट्र माझा
|
Dineshvs
| |
| Friday, January 06, 2006 - 12:10 pm: |
| 
|
सारंग, पमा माझ्यासारख्या दगडोबाला पण कळल्या कि कविता तुमच्या. छानच आहेत
|
Pama
| |
| Friday, January 06, 2006 - 7:21 pm: |
| 
|
धन्यवाद मित्रांनो. सारंग, फारच छान जमलीय.' अलगद जेव्हा काळीज माझे...' या ओळी फारच आवडल्या आणि शेवटपण सहीच!! बापू, आवडली कविता. देवदत्त, चांगला प्रयत्न आहे.
|
Pama
| |
| Friday, January 06, 2006 - 7:35 pm: |
| 
|
एक प्रयत्न करतेय.. असे मजकडे, किती विषयसुख, नको मोजणे, दिसे अधिक मज, क्षणी झडकरी, हवे वाटणे. असे गणित मी, नसे वावगे जरी मांडले, तरी कितिक ते, अनावधाने कसे सांडले? सदैव चिंता, मनी दाटते, उद्या दिनीची, मलाच का रे, असेल वक्री दशा शनीची. निभाव माझा, कसा टिकावा जगात मोठ्या, करेन मी ही कुणाकुणाच्या स्तुत्याच खोट्या. दिसे रम्य ती, असे सुरसही, अभा घननिळी, कळे नच मला, अरूंद कोठे, कडा निसरडी. वृथा फिरतसे, मति कुंठुनी वनी बापुडा, खरी श्वापदे, उभी लावुनी, कुठे सापळा. नको अंतरू, तुझाच धावा अता या क्षणी, कलंक माझा, तुला कळुनही, भिजे पापणी. करास धरुनि तू, निघे संगती, पल्ल्याड जाया, विरे काजळी, उरे अंतरी, तुझीच काया.
|
Sarang23
| |
| Saturday, January 07, 2006 - 12:01 am: |
| 
|
बापु, सुरेख... सावली फक्त तुम्हीच लिहावी आणि आम्ही पहावी!!! पमा छान कविता पण एक खटकतय कडा निसरडी कस असेल फक्त ई कारान्त जमाव म्हणुन हा अट्टाहास असेल तर तस करु नको. कडा हा नेहमी निसरडा असतो... अस मला वाटत. निभव, कलक या बहुदा टायपींगच्या चुका असाव्यात. बरोबर ना? बाकी अभ्यास कसा चालु आहे? best of luck...
|
सारन्ग, धन्यवाद. अशाने माझ्या सावल्यान्चा साठा सम्पून जाइल ना? तरीही तुझ्यासाठी आणखी एक सावली बन्दा रुपाया ऊन्च टाचान्चे बूट घातलेली ऊन्च बाई हातात जडसर ब्यागा घेऊन दोन, लगबगीने रस्ता ओलान्डत निघालेली. कडेला बसलेला मळकट भिकारी काटकुळा घामट बरगड्या बडवून म्हणतो, 'गरीबाला पैसा'... दुर्लक्ष करुन त्याच्याकडे, बाई चालू लागते तशी तिच्या सावलीला अचानक, होतात डझनावारी पिल्ले. कर्कश किन्चाळत, नाचू लागतात फेर धरून, तिच्या भोवती. भिकार्याच्या ताटलीत कोणीसे येऊन भिरकावतो एक बन्दा रुपाया. दातपडक्या बोळक्यातून त्याच्या, ओशाळवाणे हासू फिदफिदते. बाईकडे बघून तो पिचके डोळे मिचकावतो तर त्यातून आणखी सावल्या साण्डतात. ब्यागा सावरत, सावल्यान्ना हुसकावताना बाईची होते पुरेवाट. बाई भेलकान्डते, कडमडते. तिच्या बूटान्च्या टाचा आकाशाकडे लावतात डोळे. तीची निष्फळ झटापट बघून, कोपर्यावरच्या पोलिसाची डुलकी भन्गते. काहीतरी करायला हवे म्हणून तो फराफर शिट्टीच फुन्कत सुटतो, अगदी तोण्डाला फेस येईपर्यन्त. शिट्टीचा आवज विरत, विझत, थिजतो त्याचीही होते एक सुरेख सावली. . . 'घे बाबा तुला रुपाया भाऊ माझा शिपाया'. बापू
|
Sarang23
| |
| Sunday, January 08, 2006 - 5:13 am: |
| 
|
वा बापु वा!!! खुप चिंतनातुन आलेली कलाकृती बहुदा अशी असावी... मान गये!!!
|
Devdattag
| |
| Sunday, January 08, 2006 - 5:49 am: |
| 
|
बापू.. मस्तच सारंग..पमा.. छान वाटलं
|
सारन्ग, देवदत्त, धन्यवाद. गुलमोहरमधे इतक्या छान छान कविता लिहिता तुम्ही सारेजण! शब्दसॉऊष्ठव, ताज्यातवान्या प्रतिमा, सहज ओघ, लय, कलात्मक सूचकता सगळे गुण ओसन्डून वहातात तुमच्या कवितामधून.कुणा एकाची निवड करायची झाली तर मी वैभवला पसन्ती दे इन पण खरेच निवड सोपी नही. इतरान्च्याही कितीतरी कविता मला मनापासून आवडल्या आहेत. प्रेम आणि निसर्ग हे सम्पणारे विषय नाहीत पण मला राहून राहून वाटते की मराठी कवितेत फिलोसॉफिकल थॉट म्हणता येइल अशी कविता फार थोडी दिसते. तुम्हाला काय वाटते? बापू.
|
Pendhya
| |
| Sunday, January 08, 2006 - 10:46 pm: |
| 
|
आजचीच बातमी असल्याने, ईथे पोस्ट करावीशी वाटली. http://www.esakal.com/20060109/home13.html
|
धन्यवाद दोस्त्स ... बापू सावली वर इतक काही लिहीता येतं हे नव्यानेच कळतंय ... देवदत्त , पमा , छान आहेत कविता
|
तसेच होते ... तसेच आहे ... तुझ्या स्मृतींचे विमल चांदणे तसेच होते तसेच आहे नभात माझ्या तुझे उमलणे तसेच होते तसेच आहे किनारयावरी मी स्तब्ध आणि विसावलेले प्रवाह सारे जलाशयावर तरंग उठणे तसेच होते तसेच आहे दुखावलेल्या उदास रात्री कुणी छेडतो पुन्हा विराणी अवेळी हळवे मेघ बरसणे तसेच होते तसेच आहे पुन्हा व्यर्थ ते प्रयास सारे स्मृतीतारंकास गाठण्याचे तुझे अजूनी क्षितिज बदलणे तसेच होते तसेच आहे पहाट होता विरून जाती तुझ्या भेटीची ती अवघी स्वप्ने तरी निशेला साद घालणे तसेच होते तसेच आहे स्वीकारले ना तुझ्या मनाने कधीच मजला मनोमनी मनाने परि तुझे राहणे तसेच होते तसेच आहे वैभव !!!
|
Milya
| |
| Monday, January 09, 2006 - 2:57 am: |
| 
|
वा बापु, देव, पमा सहीच वैभव परत एकदा खास तुझा touch सुंदर
|
Devdattag
| |
| Monday, January 09, 2006 - 3:08 am: |
| 
|
वैभव.. तुझे काव्यवैभव.. तसेच होते.. तसेच.. आहे.. पुन्हा व्यर्थ.. छान.. शेवटच्या कडव्यात..शेवटची ओळ मला खटकली.. चु. भू. द्या. घ्या. मला बहुतेक कळले नसेल तुला काय म्हणायचे आहे If you explain it why is it so, will be great
|
Sarang23
| |
| Monday, January 09, 2006 - 5:05 am: |
| 
|
वैभव, शेवटच्या दोन ओळी छान आहेत...
|
'अंगारबीजं आणि दोलनवेला' ह्या कवितासंग्रहातली ही आणखी एक कविता... वारा वार्याने जेव्हा माझे छप्पर उडविले होते तेव्हापासूनच वार्याशी माझे जडले नाते मी क्षणभर का होईना काळीज सशाचे झालो ओघळत्या पानझडीने आभाळ वेदना ल्यालो लपेटून चांदणे निजलो मी सावलीत सुर्याच्या मोकळ्या जाहल्या वाटा अन काटेरी शब्दांच्या अंगणाने सोडले अंग भिंतीने न दिला थारा ओलांडून गावशिवेला मी होऊन गेलो वारा
|
Sarang23
| |
| Monday, January 09, 2006 - 6:02 am: |
| 
|
सुरेख! देवदत्त... दुसर्या ओळीमध्ये ते मन लिहिणार्याच आहे हे अभिप्रेत आहे अस वाटत. तस नसेल तर गल्लत होईल... बाकी वैभव सांगेल नक्की काय ते...
|
Sarang23
| |
| Monday, January 09, 2006 - 10:42 pm: |
| 
|
पिकल पान अवघडुन बसतो कोन्यामध्ये जीर्ण त्वचेचा कोणी धुरका मेंदु पुन्हा आठवे गतकाळाची गाणी गुढग्यामध्ये मान खुपसुनी स्मरती स्त्राव क्रमाने सुरकुतल्या गालाची थरथर थोपवतो थोर श्रमाने डोळे सुन्न दिशाहिनसे उगाच भिरभिर करती करडे डोळे तारुण्यातील नजर विखारी भरती आणखीच मग अगतीक होतो काकुळलेला काळा गहिवर भींत पकडुनी बळेच उठतो नजर छताला, धपापला उर उत्तर शोधुन दमून पडला श्रांत भास क्षितीजावर गेला उजेडीच उडलेली खळबळ म्हणे कुणी विष प्राषुन मेला सारंग
|
वैभवा, सही रे मित्रा... तुझ्या काव्यवैभवा माझी दाद अशीच होती अशीच आहे मिल्या,आज काल कवितेच्या बीबीवर जरा जास्तच भटकायला लागला आहेस विड.म्बनासाठीचे सावज शोधतो आहेस का? सारंग, पिकलं पान सुरेख रे..
|
|
|