|
महाराज : कोण आहे रे तिकडे ! सेवक : महाराज ! मघापासन मी इथच आहे ! अस काय करताय .. मै हू ना ! महाराज : तोतरं बोलू नकोस रे ! पण खरच, तू आहेस की रे ! सेवक : मग ओरडलात कशाला असे ? एव्हढा मोठा खड्डा पडला पोटात की मला स्वतःलाच पुण्यातला एखादा रस्ता असल्यासारख वाटल ! महाराज : अरे बराच वेळ झाला ना म्हणून मी स्वप्न तर बघत नाही ना ही खात्री केली ! सेवक : स्वप्न ? महाराज अहो झोपताय काय ? काय भुगोलाचा तास वाटला का इकॉनॉमिक्स चा ? पालिकेला गाढ झोप लागली असली किंवा तिने झोपेचं सोंग घेतलेलं असल तरी तुम्ही झोपू नका ! पुण्यात वाहतूक, प्रदूषण, वीजटंचाई हे महत्वाचे विषय आहेत ! तुमचा डोळा लागला तर पालिका नि सरकार अजूनच कानाडोळा करेल ना ! महाराज : खरय तुझ ! आत्तापर्यंत पुण्यनगरीचा इतिहास महत्वाचा होता! आता भुगोलही महत्वाचा झालाय !.. पण आता हळूहळू वाटतय की ह्यामागच इकॉनॉमिक्सच सगळ्यात महत्वाच आहे ! सेवक : किती विषयांतर करताय ! मला तर हा नागरिकशास्त्राचा विषय वाटला होता! छे छे ! इतके विषय आहेत ह्यामधे की मला दहावीला बसल्यासारख वाटतय पुन्हा ! महाराज : आत्तापर्यत पालिका पाचवीला पुजली होती आता दहावीच काय काढलस ! पण सगळे विषय आहेत म्हणालास ते कसे काय ? सेवक : आता पहिल्यांदा गणिताचं पाहूयात. महाराज : नको रे ! अजून पेपराच्या आठवणी येतात ! सेवक : अहो महाराज ताटातला नावडता पदार्थ आधी संपवावा मग शेवट गोड होतोय ! आता बघा, ह्यात नगरसेवक, कॊंट्रॅक्टर आणि महापालिका अस त्रैराशिक असतं ! महाराज : काय असत ? सेवक : त्रैराशिक ! हे असे प्रश्न विचारता मधेच ! तरी तुम्हाला मराठी मिडियम मधे घाला अस मी थोरल्या महाराजांच्या मागे लागलो होतो ! तर काय आहे की ह्या लोकांची समीकरणं अगदी फिट्ट झालेली आहेत. म्हणजे परीक्षेआधीच ह्यांची ‘टक्केवारी’ ठरलेली असते ! महाराज : काय म्हणतोस ? सेवक : मग काय ? सगळे गुण्यागोविंदाने एकत्र टेंडरचा पेपर सोडवतात ना ! आधी इथे बेरजेच राजकारण होत मग वजाबाकी ! महाराज : कुणाची वजाबाकी ? सेवक : अहो असतात काही प्रामाणिक अधिकारी ! छान चाललेलं असत सगळं.. हे अधिकारी मधेच मिसप्रिंट असल्यासारखे येतात.. माग त्याना वजा करुन बाकी जे उरत ना त्यात हे सगळे लोक आपापली उत्तरं शोधतात ! महाराज : छे छे ! हे तर भलतच अवघड गणित आहे ! सेवक : आता भूमिती तर ह्याहून अवघड आहे महाराज ! अस बघा, जनतेला सोयीची सरकारी वाहतूक नाही, दरडोई वहानान्ची सन्ख्या, वाहतूक खोळन्बे असा त्रिकोण आहे ! रस्ते उकरण्यात पाणी, वीज, दुरध्वनी या सर्व विभागाचे अधिकारी समान्तर धावतात ! फक्त सुरळित वाहतुकीला ते छेद देतात ! हे सगळे विभाग एकमेकाना काटकोनात बघतात ! फक्त लाच घेण्यात समभुज असतात ! ह्यान्च्या कार्यक्षेत्रातला सगळा परीघ उकरुन ठेवतात, पण कामाची त्रिज्या मात्र सन्कुचित असते एका वेळी ! महाराज : अरे थांब थांब ! हे भयंकर कठीण आहे पण काय रे हे तू मला एकदा सांगितले आहेस असे वाटतय ! सेवक : होय महाराज, ह्या वेळी ऑडियन्स जास्त आहे म्हणून पुनःप्रक्षेपित केल एव्हढच ! महाराज : आमचे प्रधानजी कसे आले नाहीत अजून ? सेवक : ते पुण्यनगरीचाच दौरा करायला गेले होते ना ते परत आलेत ! तेव्ह्यापासून त्यांच काही खर नाही ! महाराज : का रे ? सेवक : काय सांगायच ! ते हिंदी शिकताहेत ! त्यामुळे त्यांच्याशी बोलताना झी मराठी बघत असताना मधेच नॅशनल चॅनेल लागल्यासारख वाटत ! महाराज : पण हिंदी का एकदम ! सेवक : अहो परवा टिव्हीवर मुलाखत दिली हिंदीतून. त्यांच हिंदी ऐकून त्याना सचिवानी घाबरत घाबरत सुचवल की अस हिंदी लोकाना कळणार नाही ! विशेषतः हिंदी भाषिक लोकाना ! त्यामुळे त्यानी रीतसर हिंदी शिकावं ! महाराज : अस काय म्हणाले प्रधानजी ? सेवक : ते बोलत होते त्यांच्या पुण्यनगरीच्या दौऱ्याविषयी.. तर म्हणाले “पालिकेको जो लोगोने तक्रारे की है उस वजह से मेरेकु ये दौरा पडा है ! लास्ट टाईमके वखतमे बहुत बुरा समय था ! ठंडी के मोसम मे मुझे ‘सर्दी’ हुई थी ! लेकीन मै जब पुण्यनगरी गया था तो वहासे निकलनेका मेरा मन नही कर रहा था.. एकदम पैर भारी हो गये थे ! और फिर .. “ महाराज : बास बास ! अरे मला गरगरायला लागल आहे ! सेवक : मग काय सांगतोय का महाराज ! तर मुद्दा काय ? तर प्रधानजीचं अस झाल आहे आजकाल ! शिवाय ते त्याच प्रदेशाचे आहेत त्यामुळे सर्व काही आलबेल आहे असच भासवतील ते तेव्हा सावध रहा ! ते पहा आलेच ते ! प्रधानजी : भाषिक बनाया … भाषिक बनाया … हिंदी ! भाषिक बनाया आपने ! महाराज : प्रधानजी ! प्रधानजी : जी सरजी ! महाराज : अहो काय हे ! कुठली भाषा बोलताय ? प्रधानजी : सरजी आय मीन महाराज ! महाराजांचा विजय असो ! महाराज : हा आत्ता कसे बोललात ! तुम्ही म्हणे पुण्यनगरीचा दौरा करुन येताय ? प्रधानजी : जी जनाब ! महाराज : अहो काय हे ! मराठीत बोला बघू ! बर मला दौऱ्याचा वृतांत हवाय ! प्रधानजी : ओह आखो देखा हाल ! सांगतो ना ! अहाहा ! महाराज : प्रधानजी ! फालतू बडबड नकोय .. आम्हाला लोकांच्या तक्रारी येताहेत अजून ! प्रधानजी : अहो महाराज कसल्या तक्रारी ? सांगा पाहू ! मला तर पुण्यनगरीच्या रम्य आठवणीने अजून गदगदल्यासारख होतय ! सेवक : खड्ड्यामुळे बसलेले धक्के अजून आठवत असतील ! प्रधानजी : नाही रे ! महाराज : बर प्रधानजी, तुम्ही वृतांत द्या बघू ! प्रधानजी : महाराज ! पुण्यनगरीची अवस्था बेकार आहे हे तितल्या हवेइतकीच शुद्ध अफवा आहे ! अफवांवर विश्वास ठेवू नका.. पालिकेने मोठ्या मुश्किलिने खड्ड्यामधून मधे मधे रस्ते बांधलेले आहेत ! खरतर ह्या खड्ड्यांच्या माध्यमातून केवढ मौलिक तत्वद्न्यान पालिका लोकाना देत असते ! ‘जीवनात कसेही उतार चढाव येत असतात त्याला तोंड द्यायला शिकल पाहिजे’ हेच ते तत्वद्न्यान ! भारतीय संस्कृतीच्या ह्याच उदात्त तत्वद्न्यानामुळे मोक्ष मिळतो महाराज ! महाराज : अहो पण तुमच्या खडड्यांच्या तत्वद्न्यावरुन गाडी चालवताना पडून मोक्षाऐवजी कपाळमोक्ष होतो आणि त्या खड्डयाना लोकाना शब्दशः तोंड द्यावे लागते त्याच काय ? प्रधानजी : अहो आपला महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे ! वाळूचे कण रगडून तेल काढणारे आपण.. आता हे दगड,गोटे आणि वाळू रस्त्यावर असायचेच ! एखाद्या दगडावरून गेले चाक तर जातो तोल ! त्यामुळे आपोआप हेल्मेटचे महत्व चालकाला कळते महाराज ! हिंदीमधे म्हण आहेच सिर सलामत तो पगडी पचास ! आता पुण्यनगरीत तरी पगडीचे महत्व लोकाना माहितच आहे पण सिर चे महत्व आता कळायला लागलय ! महाराज : अस्स ! प्रधानजी : आता पुढचा मुद्दा लोड शेडींग चा महाराज : हो ! तुम्ही वीजकपात वाढवत नेणार म्हणून लोक नाराज आहेत ! प्रधानजी : महाराज हे आपल उगाचच कपातल म्हणजे आपल ते .. पेल्यातल वादळ आहे बर का ! आता मला सांगा व्यसन म्हणजे काय ? महाराज : काय ? प्रधानजी : काय ? महाराज : मला काय विचारताय सारख ? प्रधानजी : नाही सहज समोर होतात म्हणून विचारल .. नथींग पर्सनल ! मी सांगतो ! व्यसन म्हणजे एखादी गोष्ट वारंवार लागण, तिच्यावर अवलंबून असण, ती मिळाली नाही तर अस्वस्थ होण प्रसंगी हिंस्त्र होण वगैरे… आता मला सांगा ह्या पुण्यातल्या लोकाना लागलय व्यसन वीजेच ! ! लोड शेडींग म्हणजे व्यसनमुक्तीचाच एक प्रकार आहे ! महाराज : काय ? प्रधानजी : मग काय ? वीज २४ तास पाहिजेच, ती नसली तर निराश होणं , अस्वस्थ होण प्रसंगी विदुयत मंडळाच्या कार्यालयावर हल्ला करण्याएव्हढ हिंस्र होणं हीच व्यसनाची लक्षण आहेत ! तेव्हा हळूहळू वीजेचा डोस कमी करण्याच विद्युत मंडळाने ठरवल आहे ! महाराज : अहो पण मागच्या वर्षी लोक वैतागून विदुयत मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा घेउन गेले तेव्हा तिथे कर्मचारी लोक पत्ते खेळत असताना आढळले.. आजकाल लोक विद्युत मंडळाला द्यूत मंडळ म्हणतात ! प्रधानजी : लोकाना फुकट तक्रारी करायची सवयच झालेली आहे ! अहो माझ्या पुढ्यच्या दौर्यात मी खेडोपाडी गेलो होतो.. पुण्यनगरीत ‘वीज जाते’, ‘वीज जाते’ म्हणून लोकं बोंब मारतात महाराष्ट्रात अनेक खेडयात वीज कधीकधी येते !! त्यापेक्षा पुण्यनगरी किती तरी बरी ! महाराज : वाहतूकीच काय ? प्रधानजी : ह्या बाबतीत मात्र पुण्यनगरीतले लोक सेल्फ़ मोटीवेटेड वाटले.. अजीबात सरकारवर अवलंबून नाहीत.. मला तर अमेरिकेचा दौरा केला होता त्यापेक्षाही भारी वाटले लोक ! महाराज : म्हणजे ? प्रधानजी : म्हणजे अमेरिकेत ‘ड्रायविंग इज अ प्रिविलेज, वॉकींग इज अ राईट’ अस समजतात.. पण पुण्यनगरीतल्या लोकाना ते केव्हाच समजलय.. मागून ट्रक जरी आला तरी वळून न बघता शांतपणे क्रॉस करताना ते आपली मनःशांती न ढळू देता आपला हक्क बजावतात ! त्यानी कितिही कानाशी येउनही हॉर्न वाजवला तरी ढूंकूनही पहात नाहीत ! चालकवर्ग ही प्रगतीत मागे नाही ! लेनची शिस्त वगैरे असामाजिक विचार पुण्यनगरीत कधी रुजलेच नाहीत पण आजकाल सिग्नलसारख्या जुनाट चालीरितीनाही पूर्णपणे फाटा देण्यात येतो.. लोकशाहीतल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अविष्कार बघायचा असेल तर दुसरी जागा शोधून सापडणार नाही ! इतके जागरूक नागरिक असल्यावर वाहतूक पोलीस कधीमधी संकष्टीला वगैरे चौकात उभे असतात तेही बंद करायला हवे.. नुसते कटाउट ठेवा हव तर पोलीसांचे ! महाराज : बर प्रदूषणाच काय ? लोक खोकली तरी आजकाल तोंडातून धूर बाहेर पडतो आहे म्हणतात.. नको त्या वयात दम्याचा त्रास वाढतो आहे ! प्रधानजी : दमाने घ्या महाराज ! प्रदूषण अतिधोकादायक पातळी ओलांडून राहिले आहे असे ऐकून होतो.. म्हणून म्हटल बघावे तरी कसे आहे ते.. ह्याविषयी तर मी स्वतः जाउन निरीक्षण केल .. पौड रोडच्या पुलावर गाडी थांबवून प्रदूषण शोधायचा आटोकाट प्रयत्नही केला पण धूर आणि धूळ इतकी होती की समोरचेच नीट दिसत नव्हते त्यात प्रदूषण वगैरे कसे दिसणार ? ह्या लोकाना कसे काय दिसते कुणास ठाउक ! महाराज : वा ! वा ! एकंदर सर्व काही आलबेल आहे तर पुण्यनगरीत ! प्रधानजी : जी जनाब ! सब कुशल मंगल ! मंगल मंगल मंगल मंगल मंगल मंगल हो ! छाटली झाडे ही, कापल्या टेकड्याही ! वाढल्या गाड्याही हो ! खोकतो चिंटुही, चिंटूचे बाबाही, चिंटूची आईही हो ! मूड असेल तसे सिग्नल तोडावे पाहीजे तेव्हा कधीही वळावे, मनात आले की क्रॉस करावे संगणकावर मेणबत्ती लावू रे ! आयटी शहराचे स्वप्न पुरे होत जाय ! मंगल मंगल मंगल मंगल मंगल मंगल हो ! (समाप्त)
|
Gandhar
| |
| Tuesday, January 10, 2006 - 1:45 am: |
| 
|
जय हो.... मंगलमय हो!!!! सही रे राहुल!!
|
Kandapohe
| |
| Tuesday, January 10, 2006 - 1:54 am: |
| 
|
एकमेकाना काटकोनात बघतात ! फक्त लाच घेण्यात समभुज असतात ! ह्यान्च्या कार्यक्षेत्रातला सगळा परीघ ह्या वेळी ऑडियन्स जास्त आहे म्हणून पुनःप्रक्षेपित केल एव्हढच ! >>> एकदम पैर भारी हो गये थे >>> राहूल!! गडावर शंतता असली की तिथे बसुन तुला असे सुचत असेल तर शांतीच बरी आहे. विद्युत मंडळाला द्यूत मंडळ >> तुला दीप्याचा कोटीभास्कर खिताब बक्षिस!!
|
Krishnag
| |
| Tuesday, January 10, 2006 - 4:16 am: |
| 
|
राहूल, झक्कास!!! मध्ये बरेच बरेच दिवस टाकला नाही पुढचा भाग, म्हटलं राहूलनं क्रमशः ची हूल दिली काय?? 
|
Psg
| |
| Tuesday, January 10, 2006 - 4:20 am: |
| 
|
अस्सल पुणेकर शोभतोस राहुल! पुण्याच सध्याच तंतोतंत वर्णन केलं आहेस. ते मनपा च्या अधिकार्यान्च्या मोटारींबद्दल ही लिही काहीतरी गंधार, सारेगम follow करतोस का? छान चालू आहे.
|
Hemantp
| |
| Tuesday, January 10, 2006 - 4:52 am: |
| 
|
राहुल, मस्त लिहीले आहेस. आता पु म्हणाली तसे मनपा च्या मोटारींवर लिही. किंवा वाढते गुन्हे, घरांच्या वाढत्या किंमती या वर लिही.
|
Chinnu
| |
| Tuesday, January 10, 2006 - 7:18 am: |
| 
|
राहुला रे, excellent! , पुण्यनगरीचे दर्शन बसल्या बसल्या घडविल्याबद्दल खुपशे अभार!
|
Milya
| |
| Tuesday, January 10, 2006 - 7:52 am: |
| 
|
ही ही ही ही..... राहुल सहीच रे अगदी मार्मिक टोले हाणले आहेस... भुमिती जबरा आणि द्युत मंडळ
|
Avdhut
| |
| Tuesday, January 10, 2006 - 8:42 am: |
| 
|
Rahul बहुत अच्छे. मजा आ गया. डोक भारी सुपिक आहे तुझे, पुण्याची जमीन आहे कारे?
|
Chafa
| |
| Tuesday, January 10, 2006 - 1:34 pm: |
| 
|
राहुल मस्त लिहीलंयस. 'शब्दशः तोंड द्यावे लागते' अरे आणि हे सगळं ' सकाळ' मधे पण का नाही पाठवत? लोकं त्या ब्रिटीश नंदीला विसरुन तुला डोक्यावर घेतील.
|
Badbadi
| |
| Tuesday, January 10, 2006 - 5:09 pm: |
| 
|
राहुल, नेहमीप्रमाणे जबरी आहे इकडे आल्यवर पहिल्यांदाच इतकि हसले रे
|
Rajkumar
| |
| Tuesday, January 10, 2006 - 11:44 pm: |
| 
|
राहुल्या... सहीच. .. .. ..
|
Daizy
| |
| Wednesday, January 11, 2006 - 3:18 am: |
| 
|
राहुल राव लईच भारी फार वैतागलास वाटत पुण्याला... मंगल मंगल जमले रे. !
|
Atul
| |
| Wednesday, January 11, 2006 - 3:07 pm: |
| 
|
रहूल, सहीच मजा आली वाचायला
|
Prajaktad
| |
| Wednesday, January 11, 2006 - 3:35 pm: |
| 
|
राहुल! " देर आये पर मस्त जबरदस्त आये "
|
Abhay
| |
| Wednesday, January 11, 2006 - 4:37 pm: |
| 
|
Rahul: mastach, kotya tar agdi sahi... maharaj/savek, hyavarun purvichya 'Manohar' ankanchi aathvan zhali......
|
Paragkan
| |
| Wednesday, January 11, 2006 - 4:58 pm: |
| 
|
too good re ! 
|
Zakki
| |
| Wednesday, January 11, 2006 - 6:20 pm: |
| 
|
बर झाल तूच लिहिलेस राहूल. मागे मी असेच काही बाही लिहिले तर मला केव्हढ्या टीकेला तोंड द्यावे लागले. बहुधा, धोंडोपंत इ. लोक रजेवर असावेत. आता एक काम कर. पुण्यातले पुणेकर या BB वर हेच लिहून टाक. जाम धमाल येईल बघ. नि तुला, पुण्यातील लोकांच्या स्वभावावर, त्यांच्या सवयींवर लिहायला भरपूर मजकूर मिळेल. आता पु. लं, इ. लोकांनी असे लिहिले तर लोक एकदम श्रेष्ठ विनोदी साहित्य म्हणतात, मला तरी पु. लं इतके चांगले जमणार नाही, पण प्रयत्न केलास तर तुला नक्कीच जमेल. आणि हो, पुण्यावरच फक्त लिही. चांगला, वाईट प्रतिसाद फक्त तिथेच मिळतो. नागपूरकर जाम संथ नि मुंबईकर सर्वांना आधीच तुच्छ मानत असतात, ते काही लक्ष देणार नाहीत.
|
Ninavi
| |
| Thursday, January 12, 2006 - 9:53 am: |
| 
|
राहुल, सहीच!!(नेहेमीप्रमाणेच!) झक्कीकाका.... पण मुंबईकर इतरांना तुच्छ मानतात हे मात्र खरं नाही. त्यांना बिचार्यांना वेळच नसतो.(मी आता मुंबईत नसल्यामुळे मला आहे.. म्हणून उत्तर दिलं.)
|
Zakki
| |
| Thursday, January 12, 2006 - 10:42 am: |
| 
|
बर बाई, चुकलो, त्यांना वेळच नसतो! झाले समाधान?
|
Zakki
| |
| Thursday, January 12, 2006 - 10:43 am: |
| 
|
बर बाई, चुकलो, त्यांना वेळच नसतो! झाले समाधान?
|
Storvi
| |
| Thursday, January 12, 2006 - 12:15 pm: |
| 
|
राहुल as usual, too good. झक्की मी नाहीये रजेवर, तेंव्हा काळजी नसावी 
|
Ninavi
| |
| Thursday, January 12, 2006 - 12:37 pm: |
| 
|
आता इतकं दोन दोन वेळा'चुकलो' म्हटल्यावरसुद्धा समाधान न व्हायला मी काय पुणेकर आहे? झालं झालं!!
|
Zakki
| |
| Thursday, January 12, 2006 - 3:49 pm: |
| 
|
अग निनावि, हे काय भलतेच बोलणे! आता तुझी धडगत नाही. तुला चांगला पुणेकरी हिसका बसणार. कारण कुणि नुसते पुणे म्हंटले कि त्यांना एकदम चेव चढतो नि ते भांडायला च उठतात. नि तू तर काय एकदम हल्लाच केलास. आता सैन्य जमव. मी तयार आहे तुझ्या मदतीला. मला पुढे करून तू लढ. मी बरेच हल्ले पचवले आहेत. पण बाकीचे कुणी येणार नाहीत, कदाचित शहाणे किंवा भित्रे असतील! puNaokraMnaÜÊ 
|
Yog
| |
| Thursday, January 12, 2006 - 4:15 pm: |
| 
|
राहुल, तेच तेच वाटतय रे फ़ार.. (पुणेकरांगत) लेखणी मन्दावली का.? 
|
Ninavi
| |
| Thursday, January 12, 2006 - 4:21 pm: |
| 
|
वरची पुणेकरांबद्दल असहिष्णू उद्गार काढणारी चुकून माझ्या नावाने पडलेली पोस्ट खरंतर झक्कीकाकांची आहे. (तुम्हीच म्हणालात ना, माझ्या मागे लप म्हणून?)
|
Storvi
| |
| Thursday, January 12, 2006 - 6:35 pm: |
| 
|
निनावी जियो. झक्की पाहिलत कशी हुश्शार आहे ही मुलगी... असो पण निनावी तू घाबरू नकोस.. हे झक्की काहीही सांगतात कधी कधी... अस्सं आजपर्यंत कध्धी घडलच नाहिये. होकिनई ग ह. ह.? 
|
Kandapohe
| |
| Thursday, January 12, 2006 - 8:51 pm: |
| 
|
मंडळी विषयाला धरून बोला. नाहीतर इथे हैदोस होइल. पुणेकर असहिष्णू उद्गार मोहीम असा नविन बीबी काढा. इथे फक्त झोपलेले शासन, खड्ड्यातले पुणे ( पुणेकर नाही ) याविषई चर्चा आणि राहूलचा लेखाला दाद एवढेच करणे अपेक्षीत आहे. 
|
कान्द्या, तुला लौकरच माॅडपदावर बढती मिळणार बहुतेक! की तू रान्गेतच हेस?
|
धन्यवाद KP . मित्रहो, आत्तापर्यंतच्या सर्व प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक आभार !
|
|
|