Pama
| |
| Thursday, January 05, 2006 - 11:09 am: |
| 
|
कशासाठी आता अस, मन मारून जगायच? सोसाट्याच्या वार्याने का, झुळकेसारख वागायच?
|
Shyamli
| |
| Thursday, January 05, 2006 - 11:50 am: |
| 
|
झुळुकेनि तरि का वार्यासारखे वागायचे नाही? जन्मा आलि झुळुक म्हणुन वारा का व्हायच नाहि जन्म असला झुळुकिचा तरी मन अस मारायच नाहि अगदि सोसाट्याचा नाहि पण झुळुक होउन जगायच नाहि वार्यानि झुळुक व्हायच नाहि अन झुळुकीलापण अडवायच नाहि जन्मा आलि झुळुक म्हणुन वारा का व्हायच नाहि
|
जास्वंद मुग्धा फारच छान आहेत सर्व चारोळ्या... श्यामलि पमा वा वा
|
वारा वाहतो झुळुक होऊन वादळातूनही वाराच स्वभावाचे अनेक पैलू कधाचित म्हणतात यालाच
|
कधी झुळुक होऊन येते येते कधी वादळ होऊन झुळुकीने हळवा होतो वादळात निघतो न्हाऊन
|
सोसाट्याच्या वार्यालाही झुळूक व्हावं लागतं फुलांना भेटण्यासाठी हळूहळू जावं लागतं
|
Pendhya
| |
| Thursday, January 05, 2006 - 5:29 pm: |
| 
|
वा वा वा, अप्रतिम. अगदी मस्त वारे वाहतायत. पमा, श्यामली, तुशार, मस्त.
|
Shyamli
| |
| Friday, January 06, 2006 - 2:46 am: |
| 
|
पमा कुठे गेलिस तुझ्या चारोळ्यान्नि मला स्फुरण चढतय, बघ मी एकटीच नाहि तुशारने पण तीच झुळुक पुढे आणलिये, अजुन काहि येउदे
|
Jaaaswand
| |
| Friday, January 06, 2006 - 3:02 am: |
| 
|
व्वा मित्रांनो...एकदम झकास चाललय अगदी... गाडीचा रस्ता थोडा बदलतो...आपली माफ़ी मागून तू काहीही उत्तरलीस तरी माझी ऐकायची आहे तयारी तुझ्या अस्फ़ुट हुंदक्यांवरही आता लिहायची आहे शायरी जास्वन्द...
|
आपल्या संभाषणात शब्दांना मज्जाव आहे बोलक्या शांततेचा दोघांनाही सराव आहे
|
हातात हात येता एकरूप झाल्या रेषा नजरेस नजर भिडता समजून आली भाषा
|
कशाला कागदी दागिने कशाला बेगडी अलंकार एक एक स्पर्श लेवुनी सखे घडू देत सोळा श्रुंगार
|
ठायी ठायी भास का जाणवे तो श्वास का? दूर ती आहे तरी नित्य हा सहवास का?
|
Shyamli
| |
| Friday, January 06, 2006 - 3:32 am: |
| 
|
अरेचा आज अस कस झाल? साध अक्शर माझ कविता होउन आल
|
फ़ुलुनी कोमेजायचा निरंतर हा ध्यास का? आसवांना कालच्या मोगर्याचा वास का?
|
बिलगली नाही तरी ओढ ही हृदयास का? ताल तो भिनल्याविनाच रंगते ही रास का?
|
मानसी त्या चाहूलीची जागलेली आस का श्वास येतो श्वास जातो तो तिचा पदन्यास का?
|
Devdattag
| |
| Friday, January 06, 2006 - 3:46 am: |
| 
|
सय येता तिची अडकतो हा श्वास का? न येणार्याच्या येण्याचा हा उगी अदमास का?
|
टाळणे भेटायचे हा लाघवी अट्टहास का प्राक्तनांची भेट होइल हा मला विश्वास का?
|
जाऊ दे तिजला स्मरुनी काळजाला त्रास का दोस्त हो येतो आता मी आज इतुके बास का?
|
Devdattag
| |
| Friday, January 06, 2006 - 4:01 am: |
| 
|
पौर्णिमेच्या चांदण्याची चांदण्यांना आस का? कमलदल मिटण्याचा हट्ट त्या भ्रमरास का?
|
Devdattag
| |
| Friday, January 06, 2006 - 4:07 am: |
| 
|
वैभव.. सरस्वतीने तूजसाठी ही ठेवलेली शब्दरास का? लावून शब्दगांडीव केले आम्हा खल्लास का?
|
Jaaaswand
| |
| Friday, January 06, 2006 - 4:32 am: |
| 
|
वैभवा....फ़ुल्ल फ़िदा बर का रे... पमा श्यामली तुषार देवदत्त अफ़ाट... तुम्हाला सलाम.... कधी फ़ुलेल कधी कोमेजेल असा आमचा जास्वन्द आहे मोगरे गुलाब तुम्ही आहात तुमच्या हाती सुगंध आहे जास्वन्द...
|
Jaaaswand
| |
| Friday, January 06, 2006 - 5:48 am: |
| 
|
तिच्या प्रत्येक जाण्याला कळ्यांचेच अस्तर आहे बोचले असतील काटे तरी फ़ुलांचेच उत्तर आहे जास्वन्द...
|
Sarang23
| |
| Friday, January 06, 2006 - 6:10 am: |
| 
|
इथे फुलं हेच उत्तर आहे अस छान वाटेल...
|
Shyamli
| |
| Friday, January 06, 2006 - 6:24 am: |
| 
|
न येणार्याच्या येण्याचा हा उगी अदमास का? वा वा खुपच सुन्दर
|
जास्वन्द, उन्मत्त केवडा.. खूप छान वाटली. आगे बढो. बापू,
|
Jaaaswand
| |
| Friday, January 06, 2006 - 10:52 am: |
| 
|
मनातली पायवाट आज भलतीकडे वळली आहे ओठांचे गाव सोडून अलगद डोळ्यांकडे निघाली आहे जास्वन्द...
|
Pama
| |
| Friday, January 06, 2006 - 11:22 am: |
| 
|
तुषार,जास्वंद, श्यामली.. छानच लिहिलय वैभव.. बरेच दिवसानी झुळकेवर आलास आणि अगदी ताजीतवानी करून टाकलीस. देवदत्त.. अजून येऊ दे. एकदाच तू मला दिसावी नित्य असे मज ध्यास का? हाय! तुझे हे लुब्ध हासणे सत्य असे की भास हा?
|
Jaaaswand
| |
| Friday, January 06, 2006 - 11:52 am: |
| 
|
एकदा तू भेटल्यावर सत्य काय उमगत नाही पराकाष्ठा करून मी स्वप्ने जास्त जागवत नाही जास्वन्द...
|
सत्य स्वप्न वाटता रातभर झुरायचे स्वप्न सत्य व्हावया उजाडता पहायचे
|
तू तिथे जरा जरा हवेस श्वास द्यायचे मी इथे पुन्हा जरा ठरवतो जगायचे
|
Pama
| |
| Friday, January 06, 2006 - 2:23 pm: |
| 
|
दोन धृवावर दोघे आपण भेट घडे मग सांग कशी? स्वप्न तुझे सत्यात नसे.. कधी न यावी जाग अशी.
|
" हंगाम टिकत नसतो " म्हणायचीस तू हंगामीच प्रेम होतं? खरंच बदललीस तू ...
|
हाय पमा ! अभ्यास कर . निघतोय मी . चारोळ्या बेष्ट आहेत आजच्या तुझ्या ... आणि कविता पण ... बाय ...
|