Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
पांढरी जादु

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » ललित » पांढरी जादु « Previous Next »

Sas
Thursday, December 15, 2005 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यु. स. ए. ला येवुन मला १० महीने झालेत.This is my first Snow Season.यु.स.ए. च्या Fall Season व Snow Fall चा, निसर्गाच्या प्रेमात पाडणारा अनुभव मायबोलीकरां सोबत share करावासा वाटला म्हणुन लिहिण्याचा प्रयत्न केलाय.चुका etc. बाबीत मायबोलिकरांनि संभाळुन घ्याव हि विनंती व आभार.


थंडीचा वेग वाढु लागतो आणि निसर्गाची काया पालटु लागते. "Fall" चा Season माणसाला निसर्गाच्या चक्क प्रेमात पाडतो.

झाडांची पानं गळण (Fall) हे खुपच साधारण आहे पण झाडांची पान गळ्ण्या अगोदर त्यांचा हिरवा रंग पिवळ्या, लाल, तांबडया,अबोली किंवा चक्क निळसर रंगात बदलण म्हणजे जादुच वाटते.

निसर्गाची काया पालटु लागते,काल परवा पर्यंत हिरवी असलेली झाड कही लाल,काही अबोली, कही नीळी होतात.काही झाडांवर पानांच्या पोपटी-हिरव्या रंगावर पिवळा ,लाल,केशरी,निळा रंग चढु लागतो व पानं रंगांच्या विविध छटा परिधान करतात.

हिरवी-पिवळी, पिवळी-गुलबी,केशरी-पोपटी निळसर, रंग-बेरंगी पान मन मोहुन घेतात आणी नकळतच मनाला आणी नजरांना निसर्गाचा वेध लागतो.

चित्रमय झालेल्या झाडांची रंग बेरंगी पान थंड वाहणारा वारा अलगद उडवुन नेतो,खाली पाडतो, चोहो दिशांना उडवतो व जमिनीवर पानांची चादर पसरवितो.रंगांनि सजलेला निसर्ग, वारा-पान यांच्या सळसळाटातुन नाचु गाऊ लागतो.

वार्‍याचा पानांना झोका देण्याचा खेळ सुरुच रहातो नी झाड हळुहळु रीकामी होऊ लागतात.निसर्गाच रंगानी नटलेल सळसळत रुप लुप्त होऊ लागत.

वाढणारी थंडी, पानांच रंग बदलण , वार्‍यामुळे पान गळण ही जादु सुरुच आसते नि अचानक सर्वत्र पांढरी जादु पसरते.आकाशातुन जणु तार्‍यांचा वर्षाव होतो,हिम वर्षेने आकाश, धरतीला आच्छादुन आपल्या मीठीत घेत.रंगीत झाड,पान शुभ्र होतात.

'Fall' चा Season संपुन 'SnowFall' सुरु होतो. निसर्गाची पांढरी जादु!!
निसर्गाच रंगीत-सळ्सळणार रुप शुभ्र-शांत होत! नि मन नीसर्गाच्या अधीकच प्रेमात पडत.

जणु काही आकाशाच मन जींकण्यासठी धरती रंगात रंगते-सजते, पानांच्या सळसळाटातुन आकाशाला साद घालते. आकाशाची साद न मिळाल्याने धरतीच मोहक रुप लुप्त होउ लागत. पान वाळु लागतात ,गळु लागतात, वार्‍यासोबत धरती सळसळाटाच विरहाच तांडव करते,आकाशाला आवाज देते, विरह दु:खात जळु लागते.धरतीच प्रेम आकाशाच्या मनात प्रेमाच चांदण खुलवत नी हीम रुपातुन अनेक चांदण्यांचा वर्षाव करुन आकाश धरतीची मिलन आग शांत करत नि धरती शुभ्र शांत होते.


Sas
Thursday, December 15, 2005 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear Modrators

This is my final post of "Pandharee Jadu"
Pls. keep it n delete my 14th Dec. 05 Post.

Sorry for trouble.

Thanks

Moodi
Friday, December 16, 2005 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अचुक अन सुंदर शब्दात मांडलयस. निसर्गाची किमया सतत बदलते अन वेगवेगळे रंग दाखवते. रंगवणारा दिसत नाही. आमच्या इथे हेच चालु आहे थोड्या फार फरकाने. पाने पुर्ण गळत आलीत, पण छोटुकल्या खारींची अन्न साठवुन ठेवण्याची चललेली धडपड मला पहायला आवडते.
camera त बंद कर हे क्षण, पहिलेच आहेत ना?

मला खार मात्र टिपता आलेली नाही फोटोत.


Sas
Saturday, December 17, 2005 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear Moodi

Thanks a lot
मी camera त बरच कही बंद केल नी मग मला जाणवल
निर्सगाची ही मोहक, अर्वणनिय सुंदरता डोळ्यांनीच मनात
वसवायला हवी म्हणजे पहीजे तेव्हा नी तिथे डोळे बंद करताच निर्सगाच चिंतन करता येEल.

खारुतांईं सोबतच गोजिरवाणे ससे सुधा आहेत ईथे.
कधी कधी हरीण हि दिसतात Highway वरुन जतांना.
निर्सागाच रुप व निर्माण नजरांना,मनाला एक वेगळीच शांती व आनंद देत.






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators