महाराज : कोण आहे रे तिकडे ? सेवक : कुणी नाही महाराज ! महाराज : कुणी नाही ? सेवक : म्हणजे तसे आहेत सगळे. पण असून नसल्यासारखेच ! म्हणजे जसे आमच्या पुण्यनगरीत ट्रॅफिक पोलीस आहेत, सिग्नल आहेत, स्पीड ब्रेकर आहेत, रहदारीचे नियम आहेत, रस्ते आहेत ! सगळं काही आहे, पण असून नसल्यासारखं ! महाराज : काय म्हणतोस काय ? अरेरे ! ज्या पुण्यनगरीत नव्या जुन्याचा इतका संगम असायचा.. सेवक : थांबा महाराज, पुण्यनगरीची जी अवस्था अलीकडे झाली आहे .. महाराज : अलीकडे म्हणजे ? सेवक : महाराज अलीकडे म्हणजे अलीकडे ! पुण्यनगरीत 'अलीकडे' ह्याचा अर्थ बोलणाऱ्याचे वय आणि ऐकणाऱ्याची कल्पनाशक्ती ह्यानुसार बदलत असतो असं अलीकडेच माझ्या लक्षात आलयं ! तर जुन्या नव्याचा संगम ह्याचा अर्थ म्हणजे जुन्या पीमटी तून नवा धूर, जुन्याच दुकानात नवा अपमान, जुन्याच बेशिस्तीची आणि भ्रष्टाचाराची फळं म्हणून त्या फळांचा जागोजागी झालेला नवीन वाहतूक मुरंबा असा झाला आहे ! महाराज : असे संगम होय ? सेवक :शिवाय, 'सौंदर्य नॉनव्हेज' किंवा 'लक्ष्मीविलास मटण शॉप' अशासारख्या अत्यंत असंबंध गोष्टींचा 'अलीकडील' संगमही मन मोहून जातो.. महाराज : छान ! सेवक : इतके वेगवेगळ्या प्रकारचे संगम पुण्यनगरीत घडत असतात की शहराचे नाव संगमनेर किंवा संगमेश्वर आहे की काय अशी बाहेरच्याला शंका यावी ! महाराज : वा वा वा ! सेवक : ह्या शहराचे ढंग वेगळे, रंग वेगळे .. महाराज : असं कोड्यात बोलू नकोस. ही आमची विश्रांतीची वेळ आहे. फार डोक चालवायला लावू नकोस. वेगळे रंग म्हणजे ? सेवक : म्हणजे आता असं पहा महाराज.. एकदाची स्टॉपवर येऊन पीमटी तोंड काळं करुन गेली की थांब्यावर उरलेल्यांचे डोळे पांढरे होतात. महाराज : का ? सेवक : कारण काळवंडलेल्या तोंडाने ते वर बघतात आणि स्टॉपवर 'पीमटी वापरा व प्रदूषण टाळा' अशी निरागस पाटी धूराने राखाडी झालेली त्याना दिसते ! महाराज : अस्स ! सेवक : हे कशाला साधा ट्रॅफिक हवालदारच घ्या ना ! इतकी आकर्षक रंगसंगती कुठे अजून सापडायला ! काळाकुट्ट रेबॅन गॉगल खुंटीला अडकवल्यासारखा घालून गॉगलच्याच रंगाचा हवालदार उभा असतो.. त्याचा पांढराशुभ्र शर्ट, दोन वेगवेगळ्या पदार्थांच्या सेवनामुळे लाल लाल झालेले डोळे आणि तोंड, खिशात नुकतीच सरकवलेली आणखी एक हिरवी नोट, पोटाच्या गुबगुबीत गादीवर लोळत असलेले सोनेरी बक्कल ! वा वा ! अशा आकर्षक वेषात त्याला नवीन बकऱ्याची वाट बघताना बघून मला तर आनंद अनावर होतो. महाराज : काय म्हणतोस ? सेवक : तर काय ? 'इसके दामन पे कुछ दाग कैसे नही ?' असं त्याच्या शर्टाकडे पाहून वाटत ना! अशा भीषण परिस्थितीतही म्हणजे अशा ट्राफिकमधे हा धुतल्या तांदळासारखा कसा असा आपल्याला प्रश्न पडतो ना? ह्याच सोप उत्तर म्हणजे तो ट्राफिकच्या ठिकाणी नसतोच मुळी.. येता जाता म्हणजे ह्या साईडच्या पानवाल्याकडून रस्त्यापलिकडे हाटेलवाल्याकडे जाताना सहज म्हणून तो थांबलेला असतो, त्या काही क्षणांत त्याच दर्शन घ्याव लागतं ! मला तर क्वचितच फुलणाऱ्या शुभ्र ब्रह्मकमळाचीच आठवण येते दर वेळेस ! क्रमश:
|
Champak
| |
| Friday, December 09, 2005 - 2:00 pm: |
| 
|
कोण माॅड आहे रे तिकडे....... हे १८ अन १९ लै च जास्त झालेत इथे??
|
Chinnu
| |
| Friday, December 09, 2005 - 2:06 pm: |
| 
|
.... RP चालु द्या
|
Jo_s
| |
| Friday, December 09, 2005 - 11:29 pm: |
| 
|
छान आहेरे इकडे. . . . पुढच लवकर येउद्या
|
माॅडरेटर, काल रात्री पोस्ट केल्यावर लक्षात आलं नाही की काही काही मजकूर गायब झाला आहे. single quote चा प्राॅब्लेम आहे बहुतेक. ( quote दिसत नाही हा वेगळाच प्राॅब्लेम्) काय करु शकतो ?
|
राहुल, पोस्ट दुरुस्त केलं आहे तुम्ही हे पोस्ट dev2 वापरुन केलं की बरहा वापरुन ? असं दिसलं की तुम्ही dev2 tag मध्ये आधीच युनिकोड मध्ये असलेला मजकूर लिहिला होता. कृपया चेक करा
|
धन्यवाद माॅडरेटर. होय मी बरहा वापरल होतं आणि dev2 टॅगही. MS-Word मधे 'Gargi' font मधे टाईप केलेले dev2 टॅगमधे पेस्ट केले होते. त्या ऐवजी MS-Word मधले पेस्ट करताना डायरेक्ट Devnagari button च्या उजविकडील textbox मधे करुन ( dev2 टॅग न वापरता), preview ला गेलं तर चालेल का ? सगळ्याना ते दिसेल का ? ( काही जणाना dev2 वापरल्याशिवाय दिसतच नव्हते असे मला वाटत होते) तस नसेल चालत तर ह्यापुढे सरळ Devnagari विंडो वापरुन टाईप करत जाईन. फक्त MS-Word मधे मराठी फांॅटमधेच टाईप केल्याने तसेच स्टोअर करणे, वाचणे सोयीचे जाते आहे. कृपया, हा मेसेज नंतर हलवला किंवा घालवला तरी चालेल !
|
मॉडरेटर, माझे शन्कानिरसन झालेले नाही तुम्ही प्रश्न option ला टाकलात का ? ( ह्या नाट्यमय प्रसंगावर ' मला उत्तर हवय ' अस नाट्यमय नाटक होउ शकेल का ? बर दुसर पोस्ट पोस्ट करतोय. चुकल तर सांभाळून घ्या ! धन्यवाद !
|
महाराज : पण काय रे, सारखा आपला जमिनीकडे पाहून बोलतोयस तो ! पुण्यनगरीचा म्हणवतोस आणि एव्हढा नम्रपणा ? सेवक : खाली बघायचीच सवय झाली आहे महाराज ! पुण्यनगरीतल्या सगळ्याना ! महाराज : का बर ? सेवक : त्याला कारण म्हणजे स्पर्धा ! महाराज : होय ! आजचं युग हे स्पर्धेच युग आहे ! ह्या युगात … सेवक : महाराज कोचींग क्लासेस चालवल्यासारखं बोलू नका ! तशी स्पर्धा नाही ! महाराज : मग कशी स्पर्धा ? सेवक : ‘सलग दोन फूट रस्ता दाखवा’ स्पर्धा ! जो कोणी असा रस्ता शोधेल त्याला इनाम जाहीर केल आहे आपण ! प्रजाजन बिचारे खड्ड्या खड्ड्यातून गाडी चालवतात. जर वाटेत रस्त्यासारखं काही लागलं तर गाडी थांबवतात आणि घाईघाईत मोजायला लागतात ! पण अफसोस ! कुणालाच अजून सलग दोन फूट सापडलेला नाही रस्ता ! महाराज : म्हणजे कुणालाच इनाम मिळालेलं नाही ? खरच पण दोन फूट रस्ता शोधायचा सलग म्हणजे अवघडच काम आहे ! सेवक : तस एका इसमाला चक्क तीन फूट रस्ता सापडल्याचा त्याचा दावा होता ! महाराज : काय ? डायरेक्ट तीन फूट ! सेवक : हो ! पण आपल्या पालिकेचे अधिकारी पोचले तेव्हा तो इसम खाली मोठ्या खड्यात उभा राहून बोलत असल्याचे त्यांच्या लक्षात आलं.. तो खड्डा मोठा होत होत त्या खड्यातच एक नवीन रस्ता तयार झाला होता जो तीनेक फूट होता ! पण तो अधिकार्यानी ग्राह्य मानला नाही ! महाराज : का ? सेवक : त्या खड्ड्यातल्या रस्त्याला वरच्या मूळ रस्त्याची कलात्मक उंची कशी गाठता येणार ? शेवटी ओरिजनल ते ओरिजनल नाही का ? महाराज : बरोबर आहे म्हणा ! मग काय झाल ? सेवक : पालिकेच्या अधिकाऱ्यानी मग त्याला रस्ता दाखवला ! महाराज : कुठचा ! सेवक : कुठचा काय ? घरचा रस्ता दाखवला ! महाराज : आणि मग ? त्या खड्ड्याचं काय झाल ? सेवक : काय होणार ? नेहमीचचं ! आयता खड्डा होताच म्हणजे लोकेशन अगदी सही होतं. मग नेहमीप्रमाणे तीन मजूर, एक पिंप, दोन पाईप आणून टाकले त्या जागी ! महाराज : कशाकरता ! सेवक : कशाकरता म्हणजे ? कामाचा सेट लावला ना त्यानी नेहमीप्रमाणे ! महाराज : सेट ? सेवक : कराव लागत महाराज… लोक पालिकेकडून नाही नाही त्या अपेक्षा करतात.. म्हणून हे अस काम केल्यासारखं दाखवाव लागत ! आता पालिका काय ही अशी रस्त्याची काम करण्याकरता वैगैरे असते का काय ? आणि नगरसेवकानी आपल्या वाढदिवसाची पोस्टर्स लावून जन जागृती करायची का खड्ड्यांसारख्या मामुली कामासाठी रक्त आटवायच ? ही असली काम करत बसले तर खड्ड्यात नाही जाणार पालिका ? महाराज : अरे पण सेटचं काय ? सेवक : ते लोकाना दाखवायला म्हणून.. दर ठराविक अंतराने काहितरी काम चालू असल्याचा सेट लावलेला असतो.. सकाळी आणि संध्याकाळी तासभर तिथे मजूराच्या भुमिकेतले दोन तीन अभिनेते बसवतात. बाकिचा वेळ पिंप किंवा पाईप कुणी चोरत नाही ना एव्हढच बघायला कुणीतरी एक स्पॉट बॉय असला तर असतो.. महाराज : अभिनेते ? त्यांच काय काम तिथे ? सेवक : काही विशेष नाही.. खड्ड्याच्या बाजूला मातीच्या ढिगावर बसायचा आणि कुणीतरी खड्ड्यात काम करत उभं असल्यासारख मधे मधे वाकून बघायच.. बिडी काडी ओढून झाली की त्याच खड्ड्यात टाकायची .. बाकी कामाशी त्यांचा काडीचाही संबंध नसतो ! कंत्राटदाराच नाव वगैरे असलेला बोर्ड शक्यतो लावायचाच नाही लावला तरी पब्लिकला शक्यतो काही दिसणार नाही अशा अऍंगल ने मातीच्या ढिगावर टाकायचा. महाराज : म्हणजे जागोजागी हे असं दिसतं तो सेट … सेवक : करेक्ट महाराज. नाउ यू गॉट इट .. तो सेट असतो... फार प्रशिक्षीत अभिनेते लागतात त्यासाठी. काम केल्यासारखं तर दाखवायच पण काम तर करायच नाही अशी तारेवरची कसरत असते ! त्यामुळे तसे अभिनेते तासाच्या वर परवडत नाहीत.. म्हणूनच अशा उकरलेल्या ठिकाणी कुणीही दिसत नाही दिवसातला एखादा तासभर सोडला तर ! क्रमश:
|
Kandapohe
| |
| Monday, December 12, 2005 - 3:42 am: |
| 
|
मजूराच्या भुमिकेतले दोन तीन अभिनेते राहूल सहीच!! 
|
Jo_s
| |
| Monday, December 12, 2005 - 4:49 am: |
| 
|
राहुल सहिच मजूर म्हणून अभिनेते? तरीच टि.व्हि वर अभिनेते मजुरां सारखे का वाटतात ते आता कळलं. आणि सगळिकडे एकाच उंचिचे खड्डे पडले की सपाट रस्ता तयार होईलच ना?
|
Chinnu
| |
| Monday, December 12, 2005 - 2:33 pm: |
| 
|
राहुला LOL! येवु द्या फ़ुडच बिगी बिगी!
|
Ninavi
| |
| Monday, December 12, 2005 - 3:25 pm: |
| 
|
राहुल, कलात्मक उंची.... सहीच!!! 
|
Admin
| |
| Monday, December 12, 2005 - 3:46 pm: |
| 
|
राहुलफाटक गार्गी किंवा कुठलाही युनिकोड फॉंट) वापरला असेल तर कुठलाच टॅग किंवा कुठलेच बटन लागत नाही. जसे रोमन मजकूर copy+paste करू तसे थेट इथल्या input text box मधे चिकटवता येते.
|
राहुल, पहिल्या पोस्टमध्ये विशेष मजा आली नाही पण दुसरे पोस्ट सहीच..
|
Sarang23
| |
| Monday, December 12, 2005 - 11:51 pm: |
| 
|
सही जारेला है खड्डेमे... येवु दे रे अजुन. झकास चालु आहे
|
Atul
| |
| Tuesday, December 13, 2005 - 11:20 am: |
| 
|
राहूल, लगे रहो, मस्तच लिहितोयस! पोलिसाची रन्गसन्गती आवडली 
|
Meggi
| |
| Wednesday, December 14, 2005 - 5:07 am: |
| 
|
>> पुण्यनगरीचा म्हणवतोस आणि एव्हढा नम्रपणा ? AavaDlaM ekdma.. Ja@kasa...
|
Arun
| |
| Wednesday, December 14, 2005 - 6:09 am: |
| 
|
राहुल : फक्त महाराज आणि सेवकच? अजून रिक्षावाल्याची एंट्री कशी झाली नाही अजून?????????? 
|
Pama
| |
| Wednesday, December 14, 2005 - 12:03 pm: |
| 
|
राहूल, कल्पना छान आहे. कामाचा सेट सहीच . पण अजून तुझा punch नाही आला. जरा शालजोडीतले येऊ दे अजून.
|
Moodi
| |
| Wednesday, December 14, 2005 - 12:21 pm: |
| 
|
कोण मॉडरेटर्स आहेत रे तिकडे हा राहुल फारच उत्सुकता वाढवायला लागलाय, जरा पुढचे लिहायला सांगा त्याला.
|
Badbadi
| |
| Wednesday, December 14, 2005 - 10:13 pm: |
| 
|
अरे अरुण, महाराज राज्याचा कारभार बघायला रिक्षेतून च येणार असतील... धीर धरी.. धीर धरी
|
Jo_s
| |
| Thursday, December 15, 2005 - 11:12 pm: |
| 
|
सगळ्या पुणेकरांनी शोध मोहीम काढारे.त्याची पुढची गोष्ट येत नाहीये म्हणजे, कुठल्यातरी खड्ड्यात आडकला असेल राहुल.
|
Jit
| |
| Friday, December 16, 2005 - 12:48 am: |
| 
|
gaolaa vaaTt rahUla 2 ÔuTI rsta XaÜQaayalaa
|
Krishnag
| |
| Friday, December 16, 2005 - 1:17 am: |
| 
|
राहूल झ्याकच!! तुझं खड्ड्यातील रस्त्याचं मोजमाप आटोपलं असेल तर चटकन बाहेर येऊन पुढे चालू कर!!
|
Champak
| |
| Friday, December 16, 2005 - 8:49 am: |
| 
|
राहुल आता पुण्यात हत्तीवरुण फ़ेरी मारतोय असे समजले! का? असे का? काय विचारताय? हत्ती च्या वजनाने सगळे रस्ते हावार ( सपाट ) करुण खड्डे बुजवण्याची अफ़लातुण कल्पना मा. श्री. ह्यांनी दिली आहे ना!
|
Sarang23
| |
| Saturday, December 17, 2005 - 12:14 am: |
| 
|
हा हा हा चंपक तू unstopable आहेस रे बाबा...!!! हात्तीच्या, हत्तीच्या वजनाने सगळे प्रश्न सुटती रे आता. जरा आमच्या घरासमोर पण हत्ती आणा म्हणाव. आणि थेट सुजाता मस्तानी आणि भरत नाट्य मंदिर असा फिरवा...!!!
|
Arun
| |
| Tuesday, December 20, 2005 - 3:50 am: |
| 
|
राहूलबाबा : कुठल्या खड्यात पडला आहेस? तिथून जरा भायेर ये, आणि फुडचं लिव की .......
|
Urmilaq
| |
| Tuesday, December 20, 2005 - 1:41 pm: |
| 
|
राहुलजी, आता काय चुप चुप खडे हो च्या चालिवर छुप छुप खड्डे मे हो अस म्हणायची वेळ येते की काय?
|
सॉरी जनता ! फुटाफुटाने माझी मापं काढू नका रे ! येळ झाला की लिवतोच. तोपर्यत खड्डे मे रहने दो, खड्डा ना ' बुजाओ ' ! !
|
राहुल,लेका लिव की बिगी बिगी.. नाहीतर तोवर तू ज्या खड्ड्यात आहेस त्या रस्त्याचे डांबरीकरण होउन जायचे बघ मनपाकडुन
|
rahula saÝMdya- naa^navaoja gaa^galacyaa rMgaacaaca hvaaladar. AgadI AgadI. ilahI ro baabaa ibagaI ibagaI.
|
Avdhut
| |
| Tuesday, December 27, 2005 - 8:19 am: |
| 
|
कोणी आहे का रे तिकडे? Rahul
|
Pendhya
| |
| Saturday, December 31, 2005 - 11:37 pm: |
| 
|
राहुल, इतके दिवस कुठे गायब होतास रे. तुझे, पुर्वीसारखे, पटापट पोस्टिंग्स येत नाहीत आजकाल.
|
Samuvai
| |
| Monday, January 02, 2006 - 3:57 am: |
| 
|
वा राहुल. सुरेख. सकाळ मधला ब्रिटीश नंदी आठवला. :-)
|
Giriraj
| |
| Monday, January 02, 2006 - 4:56 am: |
| 
|
लिही रे पुढे!नाहीतर रस्ते तयार व्हायची वेळ येऊन ठेपेल!
|
>>>>> रस्ते तयार व्हायची वेळ अन समजा रस्त झालच तयार तर आमी आहोतच ना .. पुन्न्हा रस्ते खन्दायला! DDD}
|