Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 02, 2005

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » कार्तिक » काव्यधारा » kivata » Archive through December 02, 2005 « Previous Next »

Devdattag
Friday, November 25, 2005 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hya shubhra phulanchya jwalela
Aahe andharachi bhitee,
Paushi petavato vanawa
hya shushka sagarawarati

hee imarat lal kaulanchi
paayaat kon misalale,
kaule khari an dagadanchi
ghar yethech kosalale

paus panvathayawarati
kshitijawar bairagi phirato,
pratyek ghatawarati
akheris kawala urato


Vaibhav_joshi
Friday, November 25, 2005 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाहवा देवदत्त एकदम आवडली... देवनागरी मध्ये वाचायला आवडेल...

सारंग कर्पे... मस्त..


Devdattag
Friday, November 25, 2005 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mee officemadhye basun post kartoy.. tyamule devnagari font madhye lihu shakat nahi. :-(

Sarang23
Friday, November 25, 2005 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good one devadatta. Yes you can, only quote your text by \ and dev{} like this! Just remove that and and don't keep any space in between...

वैभव, यार किमान दोन वेगवेगळ्या नावांमध्ये अल्पविराम दे ना!
:-) गम्मत रे...


Devdattag
Friday, November 25, 2005 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सारन्ग..
देवनागरीतुन

ह्या शुभ्र फुलान्च्या ज्वालेला
आहे अन्धाराचि भिती,
पाऊसहि पेटवतो वणवा
ह्या शुष्क सागरावरति

ही इमारत लाल कौलान्चि
पायात कोण मिसळले,
कौले खारी अन दगडान्चि
घर येथेच कोसळले

पाऊस पाणवठयावरति
क्षितिजावर बैरागि फिरतो,
प्रत्येक घाटावरति
अखेरीस कावळा उरतो


Mmkarpe
Sunday, November 27, 2005 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरेश.... सारंग......वैभव धन्यवाद
देवदत्त एकदम सुरेख.......


Sarang23
Monday, November 28, 2005 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझी शप्पथ

तू मजला आवडते हे
मी कसे तुला कळवावे
जीव तुझ्यावर जडला
मन कैसे मी वळवावे

डोळ्यांत तुझ्या हे रंग
ओल्याने कालवलेले
अन गर्द छटांच्या पाशी
संजीवन पालवलेले

मी गहिवर टाळुन येथे
उभा मुक्याने शुभ्र
तू समजुन घे मजला अन
कर दुर नव्याने अभ्र

वाटले असे तुज पाहुन
हिरवळी धुके पसरावे
मोगरा पसरता गाली
मी शब्द मुके विसरावे

वाटते असेही आणिक
घेशील समजुन मजला
नव्हे व्यर्थ ही भाषा
मज प्रेमाचा अर्थ समजला

कुठे नव्याने तुजला
मी आता विसरुन जावे
का स्वप्नांच्या पलिकडले
मज गाव पारखे व्हावे

आपला दुरावा येथे
अंतर ना देवो प्रेमा
मी उधाण सागर झालो
तू किनार बनुनी सीमा

ना आकर्षण हे व्यर्थ
मज ना असला हव्यास
स्वप्नातल्या प्रियेला बघण्या
तू वास्तव अट्टाहास

ना मते चुकीची आता
तू माझ्याविषयी करावी
मी तुजलाही विसरायाची
एक शपथ तुला पुरावी

अन नसेल हेही पटले
तर विसर सखे हे सारे
प्रेमात तुझ्या मी थोडे
झुरण्याचे दुःखही न्यारे!

सारंग


Devdattag
Monday, November 28, 2005 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाहवा.. एक प्रसिद्ध शेर आठवला

इब्तेदा-ऐ इश्क है रोता है क्या
आगे आगे देख होता है क्या
सब्ज होती ही नही ये सरजमिन
तुख्म्-ऐ-ख्वाइश दिल मे बोता है क्या


Vaibhav_joshi
Monday, November 28, 2005 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय महाराष्ट्र...

अजुनी आन्धळे प्रेम अजूनी विफ़ल अंध धृतराष्ट्र
दोन बाजूला दोन बंधू अन विकल मध्ये महाराष्ट्र
पुत्रप्रेमचि श्रेष्ठ म्हणोनी संभ्रम टाळुनी द्यावा?
'राज'कर्मचि धर्म मानुनी न्यायनिवाडा व्हावा?
आजकाल हा संजय' करतो दिशाभूल सारखा
जरि मनोहर' शिष्टाई परि कृष्ण भासतो परका
द्रोण विदुर नि भीष्म पितामह सारी रुपे माझी
आज कोणते रूप घेवु मी मती कुन्ठली माझी
असे कसे मज समजत नाही नक्की अर्जुन कोण?
दुर्योधन कोणता असे अन शकुनी आहे कोण
किती किती मी तयार केले महाप्रतापी राणे
किती किती खोटेच निघाले माझे हरेक नाणे
सेना हतबल आणिक हतबल माझी सारी स्वप्ने
अंध लोचनी फ़ुललेली ती मदान्ध सत्ता स्वप्ने
नको अता हे सिन्हासन अन नको लालसा मला
भगवी वस्त्रे आणिक केवळ हाती रुद्रा माला
अटळ अता हे महायुद्ध रणशिन्ग फ़ुन्कले गेले
मिटल्या डोळ्याआड स्वत:ला ध्वस्त पाहणे आले..

वैभव


Prasadmokashi
Monday, November 28, 2005 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह वैभव, जवाब नही

Sarang23
Monday, November 28, 2005 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहोत बढिया वैभव.. सहीच

Ninavi
Monday, November 28, 2005 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaOBavaÊ sahIca ²² Ap`itma ²² ... ...

Mmkarpe
Monday, November 28, 2005 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.... केवळ अप्रतिम! दुसरे विशेषणच नाही.

Pama
Monday, November 28, 2005 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सार.ंअ मस्तच आहे कविता.. आवडली
वैभव, एकदम सहीच मातोश्री वर पाठवून दे, new year gift म्हणून!!!


Nilyakulkarni
Monday, November 28, 2005 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा ....सहीच ....
आता विषेशनांची साइट शोधावी लागेन नक्कीच ...

निलेश.....

Amitpen
Monday, November 28, 2005 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरे वैभव....सॉलिड....!! अशक्य लिहिलीयेस...तोडच नाही!!

Sarang23
Monday, November 28, 2005 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा आणि देवदत्त धन्यवाद...

Kalpak
Monday, November 28, 2005 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

VAIBHAV
masatach, keval aprateem
Sudhir

Sarang23
Tuesday, November 29, 2005 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


त्याच्या गावात शिक्षणासाठी आलेल्या मुलीवर त्याच प्रेम जमत.
नंतर मग त्यांची प्रेमकहाणी सुरळीत चालु होते.
आज तीच त्याच्यावर आणि त्याच तिच्यावर नितांत प्रेम आहे.
पण आता ती ते गाव सोडुन तिच्या घरी जात आहे कायमची...
आणि पुढे ही कविता उरलेल सगळ सांगेल अशी आशा आहे...

कथा: तिची नि त्याची

ती:
निरोपाच्या वेळी तिच्या डोळ्यांमध्ये पुर
काळजाचा चुके ठोका आणि हुरहुर

डोळा पाणी सावरता पुन्हा ये दाटुन
एकदाच ये रे सख्या माघारी फ़िरुन

क्षण ओला दुर गेला गाडी पुढे गेली
हात तीचा हलताना झाडी पुढे आली

तिचा गहिवर थोडा ओसरुन जाता
पुन्हा त्याची आठवण पुन्हा श्वास रिता

स्वगत ती बोलताना: नाहीच तू आला
शेवटची भेटही तू घेऊन न गेला

काय करु सांग तुझी होऊ न शकेल
तुझी होता माहेरच पारखे होईल

कशी समजावु मना तुझीच रे ओढ
पण सख्या तूही आता नवी नाती जोड

गालांवर ओघळत मोती काली आले
पापण्यांचे शिंपले ना बंद काही झाले

तो:

त्याने तिला पाहीलेले हृदय भरुन
आस तिला बघण्याची डोळ्यात उरुन

धीर झाला नाही त्याच सामोरा जाण्याचा
नेम नाही डोळ्यांतील अधीर पाण्याचा

पुन्हा नको तेच शब्द श्वासात रुतुन
जा रे सख्या कायमचा मला विसरुन

उगी नको मनातले द्वंद्व ओठांवर
बोलण्याआधीच ओठी उभा गहीवर

कुणालाही कळणार नाही त्यांची व्यथा
अशी होती त्याची आणि तिची एक कथा


सारंग




Devdattag
Tuesday, November 29, 2005 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

द्रौपदीचा क्रुष्ण आता
मयसभेच्या पाण्यात राहतो
इथे प्रत्येक पंचाक्षरी
रुद्राक्षाचं प्रेत वाहतो

जाते धरणी दुभंगून
आणि शरयुचा प्रवाह थाम्बतो
इथे प्रत्येक पंचाक्षरी
रुद्राक्षाचं प्रेत वाहतो

द्रौपदीच्या हाती आता
रामाचा भाता येतो
इथे प्रत्येक पंचाक्षरी
रुद्राक्षाचं प्रेत वाहतो

रामाची जन्मभुमी आता
क्रुष्णाचा वंश दाहतो
इथे प्रत्येक पंचाक्षरी
रुद्राक्षाचं प्रेत वाहतो


Vaibhav_joshi
Wednesday, November 30, 2005 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सुधीर,अमित,निलेश,पमा, कर्पे,सारंग,प्रसाद, निनावि....



Pama
Wednesday, November 30, 2005 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त.. प्रामाणिकपणे सांगतेय.. कविता नो झेप्स... please समजावून सांग.. दोन दिवस विचार करतेय त्यावर पण नीट नाही कळत. पहिल कडव कळल अस वाटतय,तिसर आणि चौथ नाहीच कळत. नीट समजावून सांगितलीस तर बर होईल.

Me_anand
Wednesday, November 30, 2005 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mitranno.. ek chotasa prayatna..

Avadala nahi tar shivya ghala pan kavitetun :-)

Pure Jhale.. Dahashatishi yuddha he ata pure
Satat khauni mar jhalo amhi nilajare
Shivashivanari magnate hi thanda ata jahali
Ahimsechya bandhanat jakhadun aahet ghetali

Karu jay-jaykar amhi ahimsa an shantatecha
To karatahi khau mar sukhe shejaryancha
Khaunahi mar itaka dukkha amha nahi bare
Halakatasathi Maran Gheti.. Techi Sujan Jana Khare

Eka gali tyanni marata dusara tohi pudhe karava
Tethehi baisata fataka, deh to onava karava
Duniya mhano amhas bhyad, shandha wa nilajare
He amhich janato.. Shantateche amhi pujari aaho khare


Suvarnamayee
Wednesday, November 30, 2005 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaOBavaÊ dovad<aÊ saarnga kivata AavaDlyaa

Sarang23
Wednesday, November 30, 2005 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त, सुवर्णमयी धन्यवाद... देवदत्त कविता मलाही झेपली नाही :-(

Devdattag
Thursday, December 01, 2005 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सुवर्णमयी..
वैभव ज़य महाराष्ट्र' चपखल.. ह्या सारखे दुसरे होणे नाही.. एक नम्बर..

पमा आणि सारन्ग.. माझ्या कवितेचा अर्थ..

प्रथम प्रत्येक कडव्यात येणार्‍या दोन ओळी

इथे प्रत्येक पंचाक्षरी
रुद्राक्षाचं प्रेत वाहतो

पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक हे शन्कराला फार मानतात म्हणुनच ते रुद्राक्षाची माळ वापरतात त्यान्चे साहित्य म्हणुन. बर्‍याचदा माणुस कुठली गोष्ट नीट घडत नसेल तर मांत्रिकाकडे जातो. पण मांत्रिकाचे साहित्य निर्जीव झाल्याने तो काहीच करु शकत नाही.

कविता सध्याच्या परीस्थितीवर आहे
आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्याच्यावर विश्वास ठेवावा तोच विश्वासघात करतो आणि कोणीच काही करु शकत नाही हीच शोकान्तिका आहे.

द्रौपदीचा क्रुष्ण आता
मयसभेच्या पाण्यात राहतो

द्रौपदीचा क्रुष्ण ज्याने तिचे लज्जारक्षण केले तोच आता तिच्या शीलहरणास कारणीभूत ठरतो आहे.

जाते धरणी दुभंगून
आणि शरयुचा प्रवाह थाम्बतो

सितेने केलेल्या त्यागाचे रामासही आता काही वाटत नाही. धरणी जरी दुभन्गून त्यात सिता सामावली गेली तरी शरयुच्या प्रवाहात वाहुन जाणारा राम राहिला नाही.

द्रौपदीच्या हाती आता
रामाचा भाता येतो

द्रौपदीची थाळी आणि रामाचा भाता आपल्या कधीही रीत्या न होण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. पण आज द्रौपदी जी अन्नपुर्णा होती, तीच लोकांचे शरसंधान करायला पुढे सरसावली आहे.

शेवटच्या कडव्यात गर्भित असे काहीच नाही

रामाची जन्मभुमी आता
क्रुष्णाचा वंश दाहतो

अर्थ १
क्रुष्णाचे वन्शज म्हणजेच यादव यांनी राम जन्मभूमि विवादा वेळेस कारसेवन्कावर जो हल्ला लाठिचार्ज्) केला होता त्यावेळी सांडलेल्या रक्ताने निश्चितच रामजन्मभुमी दाहली होती.

अर्थ २
अयोध्या विवादाचा जो प्रत्येक पक्षातर्फे उपयोग केला जातोय त्याबद्दलही आपण काहिच करु शकत नहि.

कारण
इथे प्रत्येक पंचाक्षरी
रुद्राक्षाचं प्रेत वाहतो


धन्यवाद


Shubhashish_h
Thursday, December 01, 2005 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाहि हि कविता नीट समजली नव्हती. पण आता छान समजली. देवदत्त छान अर्थपुर्ण आहे कविता....
ह्या शुभ्र फुलाच्या ज्वालेला........पण छान आहे, मला ह्या कवितेचा शेवट खुप आवडला.

Shubhashish_h
Thursday, December 01, 2005 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाहि हि कविता नीट समजली नव्हती. पण आता छान समजली. देवदत्त छान अर्थपुर्ण आहे कविता....
ह्या शुभ्र फुलाच्या ज्वालेला........पण छान आहे, मला ह्या कवितेचा शेवट खुप आवडला. keep it up

Ramachandrac
Thursday, December 01, 2005 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त, कल्पना खुप छान आहे.
वैभव, तुझ्या काव्य प्रतिभेला सलाम.


Pama
Thursday, December 01, 2005 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त, कवितेचा अर्थ समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. खरच आता किती छान वाटली वाचायला. मी इतका खोलात जाऊन विचार नव्हता केला. सध्य परिस्थेतीवर छान सदर्भ दिलेत. आता कळतय बरोबर.

Menikhil
Thursday, December 01, 2005 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त कविता खुप छान आहे. आमच्या सारख्या आन्ग्लभाशेत शिकलेल्या पामरान्ना समजावल्याबद्दल धन्यवाद! जरा सोप्याभाशेत लिहीली असती तर अजुन लवकर समजले असती

Kandapohe
Friday, December 02, 2005 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त छान कविता आणि अर्थ सुद्धा.

वैभव क्या बात है. जय महाराष्ट्र!!
:-)

Devdattag
Friday, December 02, 2005 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद लोक्स

गौर नार देखणि
उभी करुनी श्रुन्गार
हाय घरि ना
तिचा अजुनि भर्तार

नजर तिचि स्थिर
नयन पाणिदार
उडे ध्यानी ना
पदर तिचा हिरवागार

कातरवेळ जाहली
सय एकमेव साथिदार
दाटे कंठ कधिचा
नयनि अश्रु अनिवार

रण सम्पले कधिचे
इकडुन वेळ जाहली फ़ार
कुजबुजती कानी कोणी
होता शूर फ़ार सरदार


Sarang23
Friday, December 02, 2005 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Simply great Devadatta. पण पहिल्या कडव्यात
हाय घरि ना परतला किंवा परतुन आला अस असाव का?
बाकी शेवटच कडव खासच. अगदी कुसुमाग्रज स्टाइल मध्ये शेवट...


Mmkarpe
Friday, December 02, 2005 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिसभर शिणलेला देह
खोपटात शिरला
छपरातल्या छिद्रातुन
चंद्र आत डोकावला

पोपडे ऊडालेल्या भिंती
लिपता- लिपता
हात तिचा
चिखलात माखलेला

सख्याच्या भेटिसाठी
जीव आतुरलेला
मिलनाच्या घडिसाठी
देह आसुसलेला

कोनाड्यातला दिवा
मंद तेवलेला
देह्भान हरपून
श्रुंगार बहरलेला

दोन जिवांच्या आसक्तीला
चंद्रही लाजलेला
घेउन चांदण्या सार्‍या
आकाशी शांत निजलेला.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators