|
Bhagya
| |
| Thursday, November 24, 2005 - 1:10 am: |
| 
|
मंडळी, मी दिवाळी अंकात ' परदेशातील माझे घर ' या विषयावर लिहिणार होते. पण परदेशातील घरे कशी असतात, त्यांच्या आत काय सोयी असतात आणि बाहेर काय असत ते आता सगळ्यांना माहित झालय. शिवाय " आमच्या घरी किनई, " अस पण काही लिहावस वाटत नव्हत. म्हणून थोडस भोवतालच्या परिसरावर लिहिल. पहिलाच प्रयत्न आहे, म्हणून सांभाळून घ्या. बस इंटरचेंजवर उतरल्यावर मी घरची वाट चालू लागते. खर तर बस अगदी घरासमोरच थांबते. पण मला ही पायवाट चालण्याची दहा - पंधरा मिनिटे अगदी हवीहवीशी वाटतात. ' रोज पाहून ती व्यक्ती आवडू लागते ' इथपासून ते ' लग्नानतर काही वर्षानी नवरा-बायको सारखे दिसू लागतात ' इथपर्यत अनेक वाक्ये मी वाचलीत. पण रोज चालून ती पायवाट आवडू लागते अस नक्कीच असणार. पायवाट जिथे सुरू होते, तिथे माळरानासारखी एक जागा आहे. उंच वाढलेल गवत, नजर जाईल तिथे रानफ़ुले फ़ुललेली. इथल्या भाषेत त्यांना bush flowers म्हणतात. मधन मधन नीलगिरीची झाड. संध्याकाळच्या प्रकाशात काहींचा लाल तर काहींचा पांढरा फ़ुलोर पानातून डोकावत असतो. इथे आल्या आल्या हवेत नीलगिरीचा दरवळ जाणवतो. एक पान तोडून, चुरगळून त्याचा वास खोलवर छातीत भरून घेत मी स्पर्शसुगंधाची' तहान भागवते. माळरान संपल, की घरांची वस्ती सुरू होते. सगळी घर एकजात प्रेमळ, बैठी आणि कौलारू. मागे-पुढे मोठाली अंगण. वसंताची नुकतीच चाहूल लागल्याने सगळ्या फ़ुलझाडांना फ़ुलण्याची वेडी भूल पडली आहे. पीच, सफ़रचंद, चेरी आणि इतर अनेक फ़ळझाडे गुलाबी, पांढर्या फ़ुलांनी बहरली आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करणारे गुलाब आणि ट्युलिप्स. जाऊ दे, यांचे हे जीवघेणे बहरणे हा दुसर्या लेखाचा विषय होईल. इथली वस्ती फ़ारच संमिश्र आहे. ऑस्ट्रेलियन, चिनी, जपानी, पाकिस्तानी, बांगलादेशी आणि भारतीय. मागच्या जन्मीच्या कुठल्या ॠणानुबंधानी एकत्र आले आहेत कुणास ठाऊक? या वेळेस सगळ्या घरांतून dinner बनवत असल्याचा वास येऊ लागतो. घरावरच्या चिमण्यातून हलके हलके धूर निघत असतो आता मी वासावरून कुठल घर कोणाच आहे ते सहज सांगू शकते. पहिलंच घर लागत ते पपीहाच. पपिहा बांगलादेशची आहे. स्वभावात आणि बोलण्यात इतकी मिठास आहे, की जणू देशातून येताना सगळी मिठाई खाउन आली की काय असं वाटाव. इतक्या चांगल्या स्वभावाची बाई मुल सांभाळण्याशिवाय दुसर काय काम करणार? नंतरच घर आहे लीच. ली ही अगदी टिपीकल, कुटुंम्बवत्सल गृहिणी आहे. अजूनही घरात जुन्या चिनी प्रथा तशाच्या तशा पाळते. ' कल हो ना हो ' मधल्या दादीप्रमाणेच हिचहि स्वप्न बहुधा ' कॅनबेरा चीनचा एक भाग व्हावा ' , अस असाव हा माझा दाट संशय आहे. तिच्याकडे नुसत हसून बघितल, तरी गप्पा मारायला ती पटकन पायया उतरून खाली येते. एकदा मी सहज "what a lovely lemon tree you have, Lee!" असं बोलले. त्याबरोबर लगोलग आतून पिशवी आणून, बरीचशी लिंब तोडून दिली. वरती " यु इट. गूद फ़ॉर यु, ए ? गूद फ़ॉर यु. " अस प्रेमळपणे चारचारदा मान हलवून हलवून बजावल. त्याची भरपाई करायला म्हणून मी तिला एकदा घरी जेवायला बोलावल, पण तिला बेटीला चिनी जेवणाशिवाय काही चांगल असू शकत हे पटतच नाही. जरा पुढे आल की टोनी आणि आनिकाच घर लागत. समोर सुरेख लव्हेंडर चा ताटवा, डेकवर चहाचे टेबल, खुर्च्या आणि टी कोझी असा सगळा देखणा सरंजाम कायम मांडलेला असतो. पण ती दोघे सहसा घरात सापडत नाहीत. वार्यावर दोन पतंग निरुद्देश भिरभिरावे, तसे हे भाबडे आणि निष्पाप जीव आसपासच्या भागात फ़िरत असतात. त्यांच arranged marriage आहे. होय, दोघंही mentally retarded आहेत. म्हणून आनिकाच्या वडीलांनी तिच्यासाठी हा नवरा शोधला, त्यांना घर घेऊन दिले आणि दोघांच्या लग्नाला बरीच वर्षे झालीत. दैनदिन व्यवहार करायला त्यांना कसलीही अडचण येत नाही, पण नोकरी करून सर्वसामान्य लोकांसारखे ते जगू शकत नाहीत. अशीच काही आकर्षक घरे ओलांडली, की एक फ़िन्निश चर्च लागत. बाहेरून हे चर्च मुळीच चर्च वाटत नाही. कुठल्याही चर्चसारखा त्याचा आकार नाही. लहानपणी नागपूरला सिव्हील लाईन्स या भागात ब्रिटिशांनी बांधलेली चर्चेस बघून माझ्या मनात एक वेगळीच प्रतिमा कोरल्या गेली आहे. वरती मोठा क्रॉस हवाच. रंगीबेरंगी काचेच्या खिडक्या हव्यात आणि बांधणी दगडाची असावी. आणि का ते ठाऊक नाही, पण भोवतालचे वातावरण काहीसे गूढ असावे. पण हे चर्च एखाद्या घरासारखे आहे. लाकडी फ़्रेमच्या दर्शनी खिडक्या - दारे. आत भिंतीवर एक मोठा लाकडी क्रॉस आणि दाराबाहेर लावलेली पाटी या दोनच गोष्टीवरून कळत की हे चर्च आहे. आत लाकूड खूप वापरलेल आहे. चर्चचा मुख्य पाद्री यूका आणि त्याची बायको काय्या. यांच्याइतकी प्रेमळ आणि सेवाभावी लोक मी पाहिली नाहीत. यांच्या घरात पण सगळीकडे खूप लाकूड वापरल आहे. याच कारण मला कळल ते अस Finland मध्ये म्हणे खूप जंगल आहेत आणि बर्याच लोकांचा उपजीविकेचा धंदा लाकूडकाम आहे. finland मध्ये उन्हाळ्यात रात्री दोन वाजेपर्यंत प्रकाश असतो, आणि लोक उशिरापर्यत लाकूड तोडण्याचे काम करतात. सगळीकडे जास्तीत जास्त लाकूड वापरून घर बांधली जातात. इथली फ़िन्निश माणसे पण मुख्यत सुतारकामच करतात. चर्चच्या सरळ रेषेत ममा रोझाच घर दिसत. इटालीची ममा रोझा सोळाव्या वर्षी लग्न करून नवर्याबरोबर ऑस्ट्रेलियाला आली. मूकपणे खाली मान घालून कोणी अश्रू ढाळावेत, तस हे उदास घर रस्त्याच्या टोकाला उभ आहे. तिकडे बघितल, की सार्या अंगावर एक शिरशिरी येऊन जाते. हे घर कुठल्या प्रसंगांच साक्षी आहे, ते सांगायला मला अजून एक लेख लिहावा लागेल. आणि चर्चच्या अगदी समोर माझ घर. थोडंस अस्ताव्यस्त, साधसुधं. अस्ताव्यस्तच, कारण दोन्ही बाजूच्या घरांची समोरची बाग अगदी दृष्ट लागण्याजोगी आहे. नीटनेटक कापलेल लॉन. एका रेषेत लावलेली फ़ुलझाड. मोठी झाड व्यवस्थित trim केलेली. पण आमच्या घरासमोरची मोठी झाड हवी तशी मुक्त वाढलेली आहेत. गुलाब आणि इतर शोभेच्या फ़ुलांबरोबर मुलांना आवडतात म्हणून रानफ़ुल पण तशीच ठेवलेली आहेत. लॉन गालिच्याचा आभास व्हावा, इतपत उंच आहे. अगदी जमिनीलगत कापलेल नाही. किचनच्या खिडकीवर एक पिवळ्या गुलाबाची वेल अगदी लडिवाळपणे झुकली आहे. मागच्या अंगणात उभ राहिल, की समोरची ध्यानस्थ योग्यासारखी उभी असलेली टेकडी दिसते. रात्री दिवे लागले, की त्यावर जणू दिवाळीची आरास सुरू झाली आहे अस वाटत. आणि कुठेही उभ राहिल, तरी कॅनबेराचा guardian angel , म्हणजे telestra tower एखाद्या रत्नजडित जादूच्या कांडीप्रमाणे उभा दिसतो. हे घर कधी उन्हाचे चटके सोसत, तर कधी चांदण्यात नहात. सगळकाही त्याला आवडत. परवाच मला झोपेतून रात्री तीन - साडेतीन वाजता जाग आली. सहज बाहेर डेकवर येऊन बघितल, तर सगळीकडे अगदी तलम धुक पसरलेल होत. मंद वारा वाहत होता आणि नीलगिरीचा वास दरवळत होता. वरती आभाळात असंख्य चांदण्या लखलखत होत्या. समोरच्या टेकडीवरचे दिवे मंदावले होते. एक तृप्तीचा निःश्वास टाकून मी परत झोपायला गेले. कारण रात्र संपत आली होती आणि उद्याचा दिवस लवकरच उजाडणार होता. या निसर्गाच्या मायेचे, शेजार्यांशी असलेल्या ॠणानुबंधाचे आणि असंख्य अव्यक्त भावनांचे धागे विणणार होता. पुन्हा नव्या तर्हेने.... नव्या रीतीने.
|
Bhagya
| |
| Thursday, November 24, 2005 - 1:26 am: |
| 
|
माॅड, माझ्या देवनागरीकरणात न दिसलेल्या चुका इथे का दिसतायत हो?
|
Charu_ag
| |
| Thursday, November 24, 2005 - 1:37 am: |
| 
|
भाग्य, अतिशय सुंदर लिहील आहेस ग. शब्दच नाहीत. तुझी वर्णन करण्याची शैली खुप आवडली. सगळा परिसर डोळ्यासमोर उभा राहतोय. आमच्या साठी असच छान छान लिहीत रहा.
|
Moodi
| |
| Thursday, November 24, 2005 - 4:23 am: |
| 
|
भाग्या अतिशय सुंदर, सहज अन तरल भाषेत लिहिलियस. नवे नवे अनुभव आम्हाला असेच सतत देत जा अन हो ट्रेकची आवड असेल अन कधी वेळ झाला तर तेथिल देखण्या निसर्गाचा अनुभवही घे. 
|
भाग्य, मी शक्य तेवढ्या चुका दुरुस्त केल्या आहेत. अजून काही असतील तर त्या येथे लिहा किंवा मेल करा. सध्या युनिकोड मध्ये काही काही शब्द थोडे वेगळे लिहावे लागत आहेत, पण त्यावर काम चालू आहे.
|
Hawa_hawai
| |
| Thursday, November 24, 2005 - 11:39 am: |
| 
|
मस्त लिहिलं आहेस भाग्यश्री. डोळ्यापुढे उभे राहीले सगळे. दिवाळी अंकात द्यायला हवं होतस.
|
Nalini
| |
| Thursday, November 24, 2005 - 11:43 am: |
| 
|
भाग्य , छान लिहिलेस. असेच छान छान वाचायला मिळु देत.
|
Yog
| |
| Thursday, November 24, 2005 - 4:28 pm: |
| 
|
वाह! किती दिवसांनी एक छान ललित वाचलं..
|
Supermom
| |
| Thursday, November 24, 2005 - 7:10 pm: |
| 
|
भाग्या,किती छान लिहिलस. केव्हा एकदा तुझ्याकडे येते-अन तू वर्णन केलेल सगळ बघते अस झालय आता!
|
Bhagya
| |
| Thursday, November 24, 2005 - 7:36 pm: |
| 
|
माॅड, चुका दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद. पण माझ्या काही शब्दांवरचे अनुस्वार आले नाहीत आणि येत नाहीयेत अजून, जस की राहिलं, केल, पाहिल इ. मधल्या ल वरचे. काही वेगळ्या तर्हेने लिहाव लागेल का? चारु, मूडी,हवाहवाई,योग, नलिनी माझा साधासुधा लेख आवडून घेतल्याबद्दल धन्यवाद. supermom , घर तर तुझच आहे...
|
Amitpen
| |
| Thursday, November 24, 2005 - 8:39 pm: |
| 
|
भाग्या....लेख खरंच अप्रतिम आहे.... असलेलं जाणवायला आणि जाणवलेलं लिहायला प्रतिभा लागते... माझ्या आजूबाजूचा निसर्ग मी पुन्हा नव्याने बघितला....
|
Bee
| |
| Thursday, November 24, 2005 - 9:50 pm: |
| 
|
भाग्य सुरेख! तुला इतके छान लिहिता येते हे माहित नव्हत मला.. चर्चच्या आसपासचे वातावरण खरच फ़ार गुढ वाटतं आणि वसत ऋतूचा बहर जीवघेणा असतो हेही मी अनुभवले आहे. तू त्यावर लिही.. तुला एक दोन लेख सापडले आहे म्हणतेस तर लिही मग..
|
Paragkan
| |
| Thursday, November 24, 2005 - 11:12 pm: |
| 
|
छानच लिहिलं आहे !
|
Bhagya , अनुस्वारांसाठी M वापरावा लागतो. .n नाही चालत आता. जसे कि राहिलं = raahilaM केलं = kelaM इत्यादि
|
Chinnu
| |
| Thursday, November 24, 2005 - 11:24 pm: |
| 
|
फारच छान भाग्या. असच आणखी लिही. अगदी तुझ घर डोळ्यसमोर उभं रहिलं बघ. मस्त वाटलं एकदम
|
Amitpen
| |
| Thursday, November 24, 2005 - 11:42 pm: |
| 
|
मॉडरेटर.... चंद्रकोर कशी काढायची?... CAT लिहीताना कट होतं!!
|
Bhagya
| |
| Friday, November 25, 2005 - 12:12 am: |
| 
|
धन्यवाद mod . तुम्हाला हे अनुस्वार सुधरवता येतील का? नाहीतर पुढच्या वेळेला लक्षात ठेवीन.
|
Gs1
| |
| Friday, November 25, 2005 - 12:48 am: |
| 
|
भाग्यश्री, सहज, साध आणि सुंदर लिहिल आहेस. तुझ्याकडे अजुन बरेच काही लिहिण्यासारखे आसेल यात शंका नाही, तेंव्हा आता लिहित रहा
|
Milindaa
| |
| Friday, November 25, 2005 - 4:55 am: |
| 
|
भाग्य, मॉड 8 , पहिल्याप्रमाणेच .n वापरुन पण अनुस्वार दिसतो, फक्त काळजी घ्यायची की ज्यावर अनुस्वार द्यायचा ते अक्षर त्याच्या नंतरच्या a सकट आले पाहिजे. उदा. राहिलं =\dev2{raahila.n} पण जर शेवटचा a लिहिला नाही तर तो अनुस्वार दिसणार नाही, जसे की राहिल =\dev2{raahil.n} अर्थातच, M पण चालतो.
|
भाग्य, फारच आवडलं तुमचे लेखन. याच लेखात पुढच्या २-३ लेखांचे सुतोवाच आहे. वाट पाहतोय.
|
Ratrani
| |
| Friday, November 25, 2005 - 9:12 am: |
| 
|
भाग्या फ़ार सुन्दर लिहिलयस. अगदी परत परत वाचण्या सारखं. मला पण माझ्या घराच्या भोवतलचा परिसर आता वेगळ्या नजरेने बघायची द्रुष्टी मिळालीय तुझ्या लेखणामुळे.
|
Amitpen
| |
| Saturday, November 26, 2005 - 2:24 am: |
| 
|
मिलिंदा, चंद्रकोर???....का तशी फसिलीटी नाहिये???...
|
Maitreyee
| |
| Saturday, November 26, 2005 - 7:21 am: |
| 
|
कॅट 'kET ' असं लिहा.. भाग्य, छान लिहिलयस.
|
Amitpen
| |
| Saturday, November 26, 2005 - 8:04 am: |
| 
|
अच्छा... असं होय....म्हणजे डायरेक्ट पोस्ट केल्यावर दिसणार.... आधी नाही....थॅंकयू
|
Champak
| |
| Saturday, November 26, 2005 - 8:59 am: |
| 
|
छान-- -- -- --...........
|
Dineshvs
| |
| Saturday, November 26, 2005 - 9:31 am: |
| 
|
भाग्यश्री. तुझ्याबरोबर ती पायवाट आता आम्हीहि चालत असु ईतके गुंतवलेस तु. तुझ्या माहेरसारखाच परिसर लाभला तुला, तिथेहि. पण अश्या अनेक पायवाटा तु अनुभवल्यास, त्यांची ओळख कधी करुन देणार ?
|
Sami
| |
| Sunday, November 27, 2005 - 10:17 pm: |
| 
|
BaagyaEaIÊ KUpca sauMdr² ..
|
Zelam
| |
| Monday, November 28, 2005 - 8:53 am: |
| 
|
भाग्य खूप छान वाटलं वाचून
|
Priya
| |
| Monday, November 28, 2005 - 5:08 pm: |
| 
|
भाग्यश्री, अप्रतिम लेख. ललित या शब्दाचा अर्थ अगदी सुंदरपणे समजून लिहीलेला लेख. मला इंदिरा संतांच्या मृद्गंध मधले लेख आठवले. तसेच तरल लेखन. लिहीत रहा...
|
Divya
| |
| Monday, November 28, 2005 - 5:28 pm: |
| 
|
भाग्यश्री फ़ारच छान लिहीले आहेस. खुप छान वाटल वाचुन. 
|
भाग्य खूपच सुरेख लिहिल आहेस. ललित एकदम अप्रतीम जमल आहे
|
Pama
| |
| Monday, November 28, 2005 - 6:42 pm: |
| 
|
भाग्य, छानच लिहिल आहेस!
|
nice one.. maja ali vachun ani samor asalyasarakha vatala.
|
Ninavi
| |
| Tuesday, November 29, 2005 - 9:19 am: |
| 
|
भाग्य, सहीच! हे अनुभव शेअर' केल्याबद्दल आभार
|
Tanya
| |
| Tuesday, November 29, 2005 - 9:33 am: |
| 
|
भाग्यश्री, खुपच छान लिहील आहेस. नविन लेखांची आम्ही वाट पहात आहोत.
|
|
|