|
Cool
| |
| Tuesday, November 22, 2005 - 11:47 pm: |
| 
|
अर्धविराम १. " हॅलो निखिल स्पीकींग " " निखिल मी स्वाती बोलतेय, आज संध्याकाळी काय करतोयस. मला जरा भेटायला येउ शकशील. संध्याकाळी सहा वाजता बागेत भेटु " ... निखिलाच्या होकार नकाराची वाट सुद्धा न पहाता स्वातीने फोन ठेवुन दिला.. निखिल आणि स्वाती, दोघेही सॉप्टवेअर इंजिनियर, एकाच कंपनीत. एकच वर्षापुर्वी दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात कधी झालं दोघांनाही कळलं नाही. निखिल मुळचा मुंबईचा, मात्र त्याचे बाबा तीन वर्षापुर्वी अमेरिकेतल्या एका कंपनीत कन्सलटंट म्हणून रुजु झाले होते. त्यामुळे आई बाबा दोघेही अमेरिकेलाच होते, अर्थात निखिल एकटाच रहात होता. निखिल शिकला पुण्यातच आणि नोकरीला लागला तो सुद्धा पुण्यातच. स्वाती मुळची कोल्हापुरची, इंजिनियरींगच्या कॅम्पस मधेच तिला नोकरी लागली आणि मग ती पुण्यातच राहु लागली. एकाच वर्षात तिची ताई, प्रिती, तीला सुद्धा पुण्यातच एका कंपनीत नोकरी लागली आणि दोघीही बरोबरच राहु लागल्या. स्वाती आणि निखिल यांची कंपनीतच ओळख झाली. दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करत होते. प्रोजेक्टवर काम करण्यासाठी इतर बहुतेक लोक अ - मराठी असल्यामुळे साहजिकच दोघे एकमेकांच्या जास्तच जवळ आले. निखिलचा शांत आणि सोज्वळ स्वभाव स्वातीला आवडला होता. होताच तसा तो, त्याच्या जवळ येणारी प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे आकर्षीत होत असे. त्याच्या याच स्वभावामुळे तो ऑफिस मधे लोकप्रिय होता. अशा निखिल कडे स्वाती आकर्षीत झाली नसती तरच नवल. जस जसे दिवस पुढे सरकत होते तसतसे दोघे जवळ येत गेले पण स्वातीला हे ठरवताच येत नव्हते की निखिल बद्दल आपल्या मनात ज्या भावना आहेत त्यालाच प्रेम म्हणतात काय? की ते केवळ एक आकर्षण असेल?.. आणि जर ते प्रेम असेल तर ते निखिल कडे व्यक्त कसे करणार? त्याला सुद्धा माझ्याबद्दल प्रेम वाटत असेल काय? निखिलच्या स्वभावाकडे नजर टाकल्यास निखिल स्वतःहुन " माझं तुझ्यावर प्रेम आहे " असं म्हणणं केवळ अशक्य होतं.. पण तरीही स्वाती धाडस करु इcछीत नव्हती, त्याचं माझ्यावर प्रेम नसेल तर, आमच्या मैत्रीत तर बाधा येणार नाही ना, त्याला काय वाटेल माझ्या बद्दल, तो रागावणार तर नाही ना.. एक ना दोन अशा अनेक शंकानी तिच मन पोखरुन निघालं होतं निखिल तिला नेहमी श्रावणातल्या पावसा सारख वाटायcआ, आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्यावर पाउस पडावा असे वाटत असते पण तो कधी पडतो तर कधी पडत सुद्धा नाही,.. पण जेंव्हा पडतो तेंव्हा तो एक चिंब करुन टाकणारा अनुभव असतो.. मग शेवटी स्वातीनेच एका रविवारी निखिलला बागेत भेटायला बोलावलं..... संध्याकाळची वेळ... बागेतली गजबज, पण आपल्या बाजुला एवढी गर्दी आहे याचा थांगपत्ता सुद्धा नसलेली मंडळी आपल्याच नादात धुंद होती, आजुबाजुच्या जगाचा जणु सर्वांना विसर पडला होता. कुणी रुसलय, तर कुणी समजुत काढतय! काही ठिकाणी केवळ निशब्द संवाद, सर्वत्र केवळ प्रेम आणि प्रेमच, अशा अद्भुत वातावरणाला साक्षी ठेवुन स्वातीने निखिल समोर आपलं मन मोकळ केलं.. " काय ग, आज असं अचानक बागेत भेटायला का बोलावलस? काही विशेष.. " " हो विशेषच., निखिल मला तुला काहीतरी सांगायचय.. नाही मला तुला काहीतरी विचारायचय " अगं असं कोड्यात काय बोलतेस, सांग ना " वास्तविक असे प्रसंग तिने अनेक वेळा चित्रपटातुन पाहिले होते. त्यावेळी तिला हसु येत असे, एवढ काय आहे त्यात विशेष, झटकन सांगायचं माझं तुझ्यावर प्रेम आहे की झालं, अशी तीची त्या प्रसंगावर प्रतिक्रीया असायची. पण आज मात्र शब्द ओठात येउन थांबत होते, अंगावर रोमांच उभे रहात होते. बोलतांना जीभ अडखळत होती, काय सांगावे कुठून सुरुवात करावी काही कळत नव्हते.. ह्रदयातली धडधड तिला स्पष्ट पणे ऐकु येत होती.. मन घट्ट करुन सांगायला सुरुवात करायला जाताच त्याच्या डोळ्यात नजर जात असे आणि दुसर्याच क्षणी नजर खाली झुकत असे. लज्ज, भय, संकोच सगळ्या अगदी सगळ्या भावनांनी गर्दी केली होती तिच्या मनात. " कसं सांगु, ... निखिल Actually मी म्हणजे माझं.. .. निखिल तुला.. निखिल I Love You !!!!!!!!!!!!!!! " शेवटी स्वातीने निखिलच्या हातावर हात ठेवुन आणि जमिनीकडे नजर लाउन आपल्या प्रेमाला बोलकं केलं... " ..... " आता निशब्द होण्याची वेळ निखिलची होती " काय झालं निखिल तु बोलत का नाहियेस " " काय बोलणार, सुदैव शब्दाचा खरा अर्थ मला आज कळतोय. " " म्हणजे " " खरं सांगु स्वाती मला सुद्धा तू खुप आवडतेस, आता याला प्रेम म्हणतात की नाही ठावुक नाही. पण तु बोलत असतांना सदैव ऐकत रहावं असं वाटतं. एकांताच्या क्षणी अचानक कुठून तरी तू आलीस की काय असा भास होतो. काम करता करता मी अचानक कुणास ठावुक कुठे हरवतो. .. " निखिल आता मोकळे पणाने बोलू लागला होता आणि निखिल एवढ काही बोलू शकतो याच्यावर स्वातीचा विश्वासच बसत नव्हता. " अरे पण सुदैवाबद्दल काही तरी सांगत होता " " हो. अगं गंमत बघ ना.. आता मला हाच प्रश्न पडला होता की मी माझ्या या सगळ्या भावना तुझ्यापर्यंत कशा पोचवाव्यात.. आणि सुदैवाने तूच तो प्रश्न सोडवलास.. " दोघेही शांत अशा आनंद समुद्रात बुडत होते. जगाचा विसर पडत चालला होता आणि दोघे एकमेकांमधे हरवुन गेले होते आणि हरखुन सुद्धा.. प्रेमाचा साक्षात्कार हा केवळ कथा कादंबरी आणि चित्रपटात बघितलेला अनुभव आज ते दोघे जगत होते.. त्या दिवशीचा सुर्य सुद्धा काही क्षण रेंगाळला, उत्कट प्रेमात रमलेलं आणखी एक जोडप बघण्याचा मोह त्याला आवरत नव्हता.. चंद्राचा आणि प्रेमाचा काय संबध हा त्याला पडलेला प्रश्न सुटला होता..आणि चंद्राच्या नशिबाचा हेवा करत तो निघुन गेला. क्रमशः
|
Cool
| |
| Tuesday, November 22, 2005 - 11:56 pm: |
| 
|
२. स्वाती आणि निखिल आता एका नव्या विश्वात वावरत होते. दोघांनाही एकमेकांवाचुन एक क्षण सुद्धा सोडुन रहावत नव्हते. एकमेकांच्या आवडी निवडी जपत, एकमेकांना आनंद देत दिवस पुढे जात होते. स्वातीच्या वागण्यातला हा सकारात्मक बदल प्रितीच्या नजरेतुन सुटल्याशिवाय राहिला नाही. न रहावुन तिने एक दिवस स्वातीला विचारलेच... " स्वाती आजकाल तू एकदम विचित्रच वागतेयस, मला याचा अर्थ कळु शकेल. " " काय बोलतेयस तू ताई असं काही सुद्धा नाहिये.. " स्वाती नजर चुकवित बोलली. " हे बघ, आई बाबांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवलीय, आणि मला तुझ्याबद्दल खुप काळजी वाटतेय. आणि हे विसरु नकोस की मी तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे, त्यामूळे तुझ्या जीवनात काय चाललेय हे तुझ्या वागण्यावरुन मी ओळखु शकते. आणि वेडे लहानपणापासुन आपण मैत्रिणि प्रमाणे वागत आलोय, तुझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट तू मला सांगितलीयस, म्हणुन मी केंव्हाच ओळखलय की या वेडुबाईकडे मला सांगण्यसासारख नक्की काहीतरी आहे. " प्रितीच्या या उद्गारांनी स्वातीला शरमिंदा झाल्यासारख वाटलं आणि तिने अगदी निखिलच्या भेटीपासुन त्याच्या बरोबर बागेत घडलेल्या प्रसंगापर्यंत सारं काही सांगितलं.. सगळ काही ऐकुन घेतल्यावर प्रितीने निखिलला एक दिवस घरी बोलावुन घे असं स्वातीला सांगितल. प्रितीच्या या आमंत्रणामुळे स्वाती उत्साहीत झाली. लगेच तिने ऑफिस मधे गेल्यावर निखिलला पुढच्या शनिवारी घरी ये असं बजावलं. आणि असा ये, हा ड्रेस घाल, तो ड्रेस घालु नकोस, अशा अनेक सुचना केल्या. शनिवारी ठरल्याप्रमाणे निखिल त्यांच्या घरी पोहोचला. गेला आठवडाभर स्वातीकडुन ताई तो असा आहे, त्याला हे आवडतं, त्याला हे आजिबात आवडत नाही, तो असं म्हणतो, अशा अनेक प्रकारे निखिलचं गुणगाण ऐकल्यामुळे प्रितिला त्याला बघण्याची उत्सुकता लागली होती. निखिल त्याच्या लौकिकाला साजेसा असल्याचं त्याला भेटल्याक्षणी प्रितीला जाणवलं. त्याचा मधाळ आवाज, सुंदर चेहरा, नम्र स्वभाव, प्रत्येक गुणात तो साजरा असल्याचं तिला आढळलं. आणि निखिल निघुन गेल्यावर स्वातीचा चॉईस एकदम परफेक्ट असल्याचं सर्टिफिकेट तिने देउन टाकलं. " आजच मी आई बाबांशी फोन वरुन बोलते आणि त्यांना सुद्धा मुलगा बघण्यासाठी बोलावते. " " ताई काय बोलतेयस तु हे. अगं तुला त्यांचा स्वभावाचा अंदाज नाहीये का? " " म्हणजे, तुला काय वाटलं ते नकार देतील म्हणुन अगं निखिल एक चांगला मुलगा आहे. तो एका चांगल्या कुटूंबातला सुद्धा आहे. मग ते नकार देतीलच कसा " " अगं मला त्याबद्दल नाही काही शंका पण तू माझ्या पेक्षा मोठी, मग तुझ्या अगोदर माझ्या लग्नाला कशी परवानगी देतील ते. ? " " म्हणुन काय झाल?, मोठ्याच मुलीचं अगोदर लग्न व्हावं असं कुठे लिहुन ठेवलाय काय?.. आणि समज माझं लग्न झालंच नाही तर मग तू पण काय लग्न करणारच नाही स काय " " ते मला काही माहीती नाही पण अजुन थोडे दिवस तरी तू घरी सांगू नकोस " स्वातीने तो विषय तेवढ्या पुरता संपवला. ................................................... ३. " निखिल आपण आज एका जोतिष्याकडे जाउयात. तो जन्मकुंडली बघुन लग्नानंतरच्या जीवनाबद्दल सांगतो असं मी ऐकल होतं तर त्याने मला या मुलाशी लग्न करु नको असं सांगितलय. जरा त्याला भेटुन येउ आणि खुलासा करुन घेउयात म्हणते मी. " " स्वाती, तू खरचं एक सॉप्ट्वेअर इंजिनियर आहेस ना! अग कुठे तू या बाबावर अवलंबुन बसलियस. तुझ्या ताईने मला रिजेक्ट केलं वाटतं, म्हणुन ही पळवाट शोधतेयस तू. " " गप रे!.. उलट ताईला तू पसंत आहेस, आणि तुला यायचं नसेल तर तसं सांग मी आपली जाईन एकटी.. " " मस्करी केली गं मी तुझी. पण आज नको, आज माझं खुप डोकं दुखतय. " " काय हे निखिल, तू मला आत्ता सांगतोयस, ते काही नाही मागच्या वेळी सुद्धा तुझं डोकं दुखतं होत पण तू माझं ऐकलं नाहीस, दवाखान्यात गेला नाहीस, आता मी तुझं काही एक ऐकणार नाही. तुला माझ्या बरोबर यावचं लागेल डॉक्टरांकडे " " जाउ दे गं, एवढ्या तेवढ्या साठी कशाला जायचं डॉक्टरांकडे, एक डिस्परीन घेतली की होतं ते बरं " " मग चल मी तुझ्या बरोबर घरीच येते " आणि निखिलला काही सुद्धा न बोलु देता स्वाती त्याला ओढत घरी घेउन गेली. त्याला टॅह्बलेटस देउन तिने त्याला झोपवले. का कुणास ठावुन पण त्याचे डोळे तिला जास्तच निस्त्तेज वाटत होते. " निखिल अरे ऐक ना माझं, चल ना रे हॉस्पीटलला. मला खुप भिती वाटते रे. " " अरे वा तू तर लग्नाच्या अगोदरच माझी बायको झालीस.. पण मॅडम, मी एकदम व्यवस्थीत आहे आपण काळजी करु नये. " " तुला तर प्रत्येक गोष्टीत थट्टाच सुचते.. ऐक आता मी जातेय, पण रात्री कधीही प्रॉब्लेम आला तर लगेच मला कॉल कर " स्वाती त्याचा निरोप घेउन निघाली. रात्रभर तिचा डोळ्याला डोळा लागला नाही. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ना तसं, मनात अनेक विचार येतच होते. कधी एकदा आपण निखिलला बघतोय असं झालं होतं तिला. सकाळी ऑफिस मधे पोहोचल्या बरोबर ती त्याच्या केबीनकडे आली. तर तो प्रेझेंटेशन साठी गेल्याचं कळलं. तिला हायसं वाटलं पण तरी त्याला बघितल्या शिवाय तिचा दिवस सुरु होणं शक्य नव्हतं म्हणुन मग ती प्रेझेंटेशन रुम कडे निघाली. काचेतुन आतमधे निखिल प्रेझेंटेशन देतांना दिसला मग तिची कळी खुलली आणि ती आपल्या कामाला गेली. दोघेही नेहमी एकत्रच लंच घेत असतं. नेहमीप्रमाणे ती कॅन्टीनमधे पोहोचली तर निखिलचा तिकडे पत्त नव्हता. वास्तविक निखिल नेहमी अगोदर हजर असायचा. पुन्हा तिच्या काळजाचा ठोका चुकला. धावतच ती निखिलच्या केबीन मधे आली तर निखिल अचानक डोकं दुखायला सुरुवात झाली म्हणुन घरी गेल्याचं कळलं. आता मात्र तीचा धीर सुटत चालला होता. ती सुद्धा निखिलच्या घरी निघाली. संपुर्ण रस्ता तिने कसा पार केला तिचं तिलाच ठावुक. कशीबशी ती निखिलच्या घरी पोहोचली. अनेक अशुभ शंकांनी तिचं मन भरुन जात होतं निखिलनेच घराचा दरवाजा उघडला आणि इतका वेळ रोखुन धरलेला भावनांचा बांध फुटला. तिने निखिलला घट्ट मिठी मारली आणि त्या खांद्यावर डोकं ठेवुन ती रडु लागली. पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरले कारण निखिल आजारी होता आणि आता तर त्याच्या कडे बघवत सुद्धा नव्हते. आता मात्र निखिलच्या विरोधाला न जुमानता स्वाती त्याला हॉस्पीटल मधे घेउन गेली. डॉक्टरांनी प्राथमिक चाचणी नंतर केवळ एक इंजेक्शन दिले. त्यासाठी निखिल वेगळ्या रुममधे गेला असतांना डॉक्टरांनी स्वातीला विचारलं " आपण यांच्या कोण " " माझं नावं स्वाती. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत " " मिस स्वाती मला वाटतं की आपण त्यांच्या अजुन एक दोन टेस्ट्स कराव्यात. त्यांच्या घरातलं कुणी येउ शकेल काय. " " नाही डॉक्टर, पण तुम्ही पाहिजे त्या टेस्ट्स करा माझ्या जबाबदारी वर. Anything serious Doctor " " Well, I can come to a conclusion only after the tests " डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट्स केल्यानंतर निखिलला हॉस्पीटल मधुन घरी जाण्याची परवानगी दिली. स्वाती निखिलला घरी घेउन गेली. त्याच्यासाठी जेवण बनवुन त्याला झोपवलं आणि मग तिने प्रितीला फोन केला. " ताई.. !! " स्वातीच्या तोडुन हुंदका बाहेर पडला. " काय गं काय झालं? काही प्रॉब्लेम आहे काय " " अगं निखिल खुप आजारी आहे " स्वातीने तिला निखिलच्या आजारपणाबद्दल सर्व काही सांगितल. " एक काम कर, तु तिकडेच थांब, मी ऑफिस सुटल्यावर मी सुद्धा येते तिकडे, आणि येतांना मी डॉक्टरांना सुद्धा भेटुन येते " क्रमशः
|
Cool
| |
| Tuesday, November 22, 2005 - 11:59 pm: |
| 
|
संध्याकाळ च्या वेळेला कातरवेळ का म्हणतात हे प्रथमच कळत होत स्वातीला. प्रिती तिकडे पोहोचे पर्यंत स्वातीच्या जीवात जीव नव्हता. निखिलच्या बाजुला बसुन ती शुन्यात हरवुन बसली होती. प्रिती निखिलच्या घरी पोहोचली. निखिल शांतपणे झोपला होता. आणि स्वाती त्याच्या उशाशी. प्रितीला बघुन स्वातीने अधीर पणे विचारल " काय ग काय म्हणाले डॉक्टर.. " .. " काही नाही गं, बस नॉर्मलच आहे रिपोर्ट. " " Thank God तरी माझं मन मला सांगतच होतं.. " प्रितीने लगेच घरी जाण्यासाठी निघाली सुद्धा.. " ताई, आपण जरा वेळ थांबुयात का इकडे. नाही म्हणजे, अजुन निखिल झोपलेलाच आहे आणि त्याच्या जेवणासाठी सुद्धा काहीतरी बघावं लागेल ना.. " " ठिक आहे, तु एक काम कर तू त्याच्याजवळ थांब मी बघते किचन मधे काय आहे ते आणि आपल्या सर्वांचा स्वयपाक बनवते. " जेवण करुन आणि निखिलला झोपवुन त्या दोघी घरी गेल्या.. स्वातीची अवस्था आदल्या रात्रीपेक्षा वेगळी नव्हती. मनात निखिलच आणि डोळ्यात सुद्धा.. कसल्याशा विचित्र अवस्थेत पडल्यासारखं वाटतं होतं तिला.. पण नेमक काय वाटतय ते मात्र कळुन येत नव्हतं, असाच पहाटे केंव्हातरी तिचा डोळा लागला.. सकाळी उठल्याबरोबर पुन्हा निखिलच्या आठवणीने ती व्याकूळ झाली, त्याला फोन करावा का, नको तो कदाचीत झोपला असेल अजुन,.. अशा बेचैनीतच ती ऑफिस ला येउन पोहोचली तर आश्चर्य म्हणजे तीच्या स्वागताला स्वतः निखिलच उभा. मग मात्र तिला स्वतःला सावरता आले नाही आणि ती निखिलच्या मिठित विसावली. शांत झाल्यावर निखिल बोलु लागला. " तुम्ही दोघींनी काल जी काही सेवा केली माझी त्याबद्दल तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही मला. " " हे काय निखिल, असा अनोळखी व्यक्ती सारखा का वागतोस. अरे आम्ही काय परक्या आहोत काय. पुन्हा असे शब्द काढलेस ना तर लक्षात ठेव. " निखिल आणि स्वाती आपापल्या कामाला निघुन गेले. क्रमशः
|
Cool
| |
| Wednesday, November 23, 2005 - 12:29 am: |
| 
|
४. थोड्या दिवसानंतर... " Excuse me अहो प्रिती मॅडम कुठे हरवलात... ? " य उद्गाराने प्रिती भानावर आली " Oh! I am sorry आदित्य, बोलं ना काय काम आहे. " " काम तसं विशेष नाही, पण एक विचारु आजकाल तु एकदम हरवल्यासारखी रहातेस. नाही म्हणजे आम्हाला सांगायचं नसेल तर काही हरकत नाही " ' तुला न सांगण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहि रे, मी तर माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुलाच सांगु इcछीते प्रितीने मनात विचार केला.. आदित्य, प्रितीच्या ऑफिस मधे काम करतो, लहरी स्वभावामुळे प्रसिद्ध असलेला आदित्य होता मात्र हुषार, पण एकद्म वेगळ्याच स्वभावाचा, म्हणजे एखाद्या गोष्टिचा त्याला राग येई तर दुसर्या वेळी त्याच गोष्टीबद्द्ल त्याचं वेगळचं मत असे आणि त्याचमुळे सगळेजण त्याच्याशी फक्त कामापुरताच सबध ठेवुन होते. पण प्रितीला मात्र तो खुप आवडायचा, पण त्याच्याशी बोलतांना आपली नजर वारंवार का झुकली जाते हे तिला कळत नसायचं. आपलं त्याच्यावर प्रेम जडलय हे तिला कळु लागलं होत पण त्याच्या आणि आपल्या आवडी निवडी आजिबात जुळत नाही हे सुद्धा तिला पक्क ठावुक होतं शिवाय त्याला आपल्या बद्दल काय वाटतं हे सुद्धा अजुन ती ठरवु शकली नव्हती. आणि म्हणुनच अनेकदा ठरवुन सुद्ध ती त्याच्य मनात शिरु शकली नव्हती. पण आज मात्र आपल्या परिस्थीतीतुन बाहेर येण्यासाठी आदित्यच आपल्याला सल्ला देऊ शकेल असं तिला वाटलं आणि तिने आदित्यला सगळ काही सांगायला सुरुवात केली. स्वाती, निखिल, त्या दोघांचं प्रेम, आणि त्या दिवशीचा हॉस्पीटला प्रसंग सारं काही सांगितलं. Wow किती प्रेम आहे प्रेम आणि प्रेमच.. तुला अभिमान वाटला पाहीजे की आपल्या प्रियकरावर जीवापाड प्रेम करणारी मुलगी तुझी बहीण आहे.. " हेच हेच जिवापाड प्रेमच तर मोठा प्रश्नचिन्ह घेउन बसलय माझ्या समोर. " प्रिती " काय बोलतेस तु हे " " तुला मी सांगितलं ना की निखिल आजारी होता त्या दिवशी मी स्वातीला निखिलचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचं सांगितलं होतं, पण.. पण निखिल नॉर्मल नाही. त्याला ब्रेन कॅन्सर आहे आणि तो काही दिवसातच हे जग सोडुन जाणार आहे " प्रितीला बोलवत सुद्धा नव्हतं.. " Oh my God !!! प्रेम हे सहज साध्य नसावं असा नियम का असतो नियतीचा कुणास ठावुक, " " पण तु हे सांगितलस का स्वातीला " " नाही रे आणि तोच मोठा प्रॉब्लेम आहे.. मी कसं काय सांगणार तिला की ज्याच्यावर तू एवढं प्रेम करते, आणि ज्याला सोडुन तू काही क्षण सुद्धा राहू शकणार नाही तो कायमचा हे जग सोडुन जाणार आहे.. कसं सांगु अरे माझी बहीण आहे ती, तिच्या डोळ्यात दोन क्षण सुद्धा अश्रू बघुन शकत नाही मी आणि तिला मी असं काही सांगण छे कल्पनाच नाही करवत.. " " पण तुला हे सर्व तिला सांगावच लागेल कारण अशा वेळी पुर्वकल्पना दिली तरच ती हा धक्का सहन करु शकेल. .. तू एक काम कर एकदा तिला इकडे घेउन ये, मी बोलेन तिच्याशी आणि वेळ बघुन मी प्रयत्न करेन तिला सांगण्याचा. " आदित्यच्या या उद्गारांनी प्रितीला थोडासा धीर आला. ........................ " स्वाती, आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर जरा माझ्या ऑफिस कडे येशील का, एक छोटीशी पार्टी आहे. " " आले असते गं, पण आज माझा उपवास आहे " " काय उपवास आणि तू. हे काय नवीन.. " " अगं त्या दिवशी निखिल आजारी होता ना त्या दिवशी मी म्हणुन गेले की तो चटकन बरा झाला की मी उपवास करेन म्हणुन तुला तर माहीती आहे ना की मला किती तिटकारा आहे या सगळ्या गोष्टींचा पण जेंव्हा आपल्या जवळच्या माणसाबद्धल काहीतरी वाटतं तेंव्हा मन बरोबर कमजोर होतं.. " " तरी पण तू ये थोडी उशीरा आलीस ना तरी चालेल. " प्रितीने तिला हे सांगितलं खरं पण आता स्वातीला सत्यपरिस्थीती लवकरच सांगायला पाहिजे हे तिला पटु लागलं कारण स्वाती निखिल मधे जेवढी अजुन गुंतत जाईल तेवढा जास्त वेळ लागेल तिला बाहेर येण्यासाठी.. संध्याकाळी स्वाती ऑफिस मधे पोहोचल्या बरोबर प्रितीने आदित्य बरोबर स्वातीची ओळख करुन दिली. तिघे मिळुन गप्पा मारत असतांना प्रिती काहीतरी काम काढुन तिकडुन निघुन गेली. तासाभराने परत आल्यानंतर तिला कळुन चुकले की आदित्य तिला काहीही सांगु शकला नाही कारण स्वाती एकदम मजेत दिसत होती. त्या दोघी घरी जाण्यासाठी निघाल्या तेंव्हा स्वाती पुढे गेल्याचं बघुन प्रितीने आदित्य ला विचारले. " काय झाले आदित्य " " Unbelievable प्रिती, प्रेमाची ही stage खुप दुर्मीळ असते, ऋषीमुनींना जेंव्हा साधकावस्थेत साक्षात्कार होतो ती ही अवस्था, आणि स्वाती त्याच अवस्थेत आहे. जीवापाड प्रेम हा शब्द तीच्याबाबतीत तंतोतत लागु होतो. मी तिला सांगण्याची हिंमत सुद्धा नाही करु शकलो.. " आदित्य भारावुन बोलत होता. ...... प्रिती अजुनही स्वातीला एक शब्द सांगु शकली नव्हती आणि तिकडे निखिल आणि स्वाती लग्नाच्या तयारीला सुद्धा लागले होते. एक दिवस मात्र हिंमत करुन प्रिती स्वातीच्या रुम मधे गेली आणि.......... ....... आज वीस दिवस झाले, स्वाती ऑफिसमधे सुद्धा गेली नव्हती, निखिल मात्र न चुकता रोज तिला भेटुन जात होता, आणि निखिल घरात असतांना उसन आणलेला उत्साह तो जाताच मावळत होता. एकटक स्वाती भिंतीकडे बघत होती, जणु रडुन रडुन तिचे अश्रूच संपले होते. प्रितीला तिची अवस्था समजत होती म्हणुन प्रितीने तिला समजावण्याचा अजुन प्रयत्न केलाच नव्हता पण तिला या अवस्थेत जास्त दिवस राहु देणे ठिक नव्हते तोच प्रयत्न गेली वीस दिवस आदित्य रोज करत होता. आपल्या परीने तो स्वाती आधार देण्याचा त्याने प्रयत्न सुरु ठेवला होता. " स्वाती उठ, चल जेवण करुन घे, " प्रितीने हाक मारली " ..... " स्वाती शब्दांची भाषाच समजण्याच्या पलिकडे होती. " स्वाती अगं परिस्थीतीला स्विकार आणि हळुहळु विसरण्याचा प्रयत्न कर निखिलला. अगं मी समजु शकते पण नियतीने आपल्या पदरात टाकलेलं हे दान स्विकारायलाच हवं. त्याला काही सुद्धा पर्याय नाही. तुला आता नव्याने जीवनाची सुरुवात करावी लागेल आणि मला विश्वास आहे की तू नक्की या परिस्थीतीतुन बाहेर येशील " " ताई, मी निखिलशी लग्न करणार आहे.. " " काय.. अगं वेडी झालीस का तु. अगं मी काय सांगितलं तुला कळल नाही वाटतं, निखिल अपंग वैगरे नाही होणार, तो हे जग सोडुन जाणार आहे आणि असं असुनही तु त्याच्याशी लग्न करायचं म्हणतेयस. थोडा Practical विचार कर " " ताई तु म्हणतेस की तो हे जग सोडुन जाणार म्हणुन मी आता माझ्या जीवनाचा विचार करावा. असा स्वार्थी पणा नाही करु शकत मी, माझं प्रेम आहे निखिलवर, आणि केवळ तो हे जग सोडुन जातोय म्हणुन मी त्याला देणार असलेलं सुख मी हिरावुन घेउ इcछीत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याच्या बरोबर होते म्हणुन त्याला मिळणारं समाधान मला माझ्या त्रासापेक्षा श्रेष्ठ वाटतं. आणि त्याचं आयुष्य अल्प होतं म्हणुन पर्यायानं माझं आयुष्य सुद्धा तेवढंच कारण तो निघुन गेल्यावर उरणारं माझ आयुष्य निरर्थकच नाही का. दुर्दैवान मी स्वतः माझं जीवन संपवु शकत नाही कारण माझ्या सर्वस्वावर केवळ त्याचाच अधिकार आहे. आता मी त्याच्या जीवनातुन त्याला एकटं सोडुन मागं फिरण शक्य नाही " स्वातीचे हे उद्गार ऐकुन प्रिती चमकली " स्वाती, खरं खरं सांग त्याने तुझ्या अंगाला स्पर्श तर नाही केला ना. " " हं. .. स्पर्श हो ताई त्याने स्पर्श केला, त्याने तर माझ्या अंतर आत्म्यालाच स्पर्श केलाय आणि त्या स्पर्शापुढे इतर सर्व स्पर्श न्युन ठरले... " आपली चिमुरडी स्वाती एवढ्या उन्मनी अवस्थेला पोहोचली याचं कौतुक वाटतय की भिती हेच प्रिती ठरवु शकत नव्हती... स्वाती निखिल.... स्वाती निखिल.... स्वाती निखिल.... स्वाती निखिल.... प्रितीच्या मनात विचारचक्र सुरुच होते आणि अचानक एक नवीन नाव त्या चक्रात दाखल झाले. स्वाती निखिल.... आदित्य... स्वाती निखिल.... आदित्य... .. कसल्याश्या निश्चयाने प्रिती उठली, आणि तिने आदित्यला फोन लावला. जी राजा राणीची गोष्ट ती आजवर आदित्य ला सांगु इछीत होती तीच तिने त्याला सांगायला सुरुवात केली. फरक एवढाच की राणीच्या जागी स्वतःच्या नावाऐवजी स्वातीचे नाव तिने जोडले होते..... ........................ आदित्यशी बोलून झाल्याबरोबर तिला आपल्या डोक्यावरील भार हलका झाल्यासारखं वाटत होत. आदित्य स्वातीला स्विकारायला तयार होता. विशेष म्हणजे ते सुद्धा निखिलशी तिचे लग्न लावुन देण्याच्य अटीवर. पण स्वाती तिचे काय. ती स्विकारेल आदित्यला, निखिलच्या मृत्युनंतर.. काळ, प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतो तो काळच आणि याच काळाच्या बरोबर जात असतांना निखिल ला मनात ठेवुन सुद्धा स्वाती आदित्य ला स्विकारु शकत होती, आणि आदित्य सुद्धा ते मंजुर होतेच... प्रितीचा प्रश्न सुटला होता., पण शेवटी पुर्णविराम मात्र देउ शकत नव्हती ती, आपलं प्रेम त्याचं काय, स्वाती तरी एकवेळ निखिल ला विसरु शकेल कारण निदान तो तिच्या समोर नसेल पन आपलं काय आदित्य समोर दिसत असतांना आपण त्याच्यावरचं प्रेम विसरु शकु.. म्हणूनच अर्धविरामावर तिने समाधान मानलं.. स्वातीच्या जीवनात निखिल बरोबर लग्नपर्यंतचा प्रवास अर्धविराम ; प्रितीच्या जीवनात आदित्य स्वातीच्या लग्नापर्यंत अर्धविराम ; आणि पुढे केवळ एक प्रश्नचिन्ह ............................... प्रितीचे डोळे भरुन आले होते, भरल्या डोळ्यापुढे होती पुन्हा सावरतत असलेली स्वाती आणि तिला आधार देणार आदित्य... याच क्षणाची ती वाट पहात होती, तिने आपले डोळे मिटुन घेतले आणि अश्रूंना मोकळी वाट करुन दिली... ;;;; समाप्त सुभाष डिके Cool
|
Karadkar
| |
| Wednesday, November 23, 2005 - 1:24 am: |
| 
|
कुल अत्ताच वाचली. कथा चांगली आहे पण कुठेतरी काही तरी missing आहे असे वाटतेय. उद्या परत एकदा वाचेन मग कदाचित लक्शात येईल. honest opinion देतेय राग मानु नये.
|
Yog
| |
| Thursday, November 24, 2005 - 1:21 am: |
| 
|
कथा-कल्पना चान्गली होती पण खूपच fast track वाटली.. ³yaa kqaabaIjaavar AaplyaakDo ek vaXa-Bar caalaNaarI maailaka banavatIla baGa´
|
Charu_ag
| |
| Thursday, November 24, 2005 - 1:43 am: |
| 
|
सुभाष, कथा चांगली लिहीली आहे. थोडी फास्ट वाटली. विशेषत शेवट.
|
Cool
| |
| Thursday, November 24, 2005 - 1:45 am: |
| 
|
योग .. वास्तवीक मला तर कथा खुप मोठी झाली आहे असं उगीचच वाटल होतं.. म्हणुन शेवट Fast Forward केला
|
Nalini
| |
| Thursday, November 24, 2005 - 11:47 am: |
| 
|
सुभाष, कथा छान आहे. मलाही कथेचा शेवट फारच धावता वाटला.
|
Naarad
| |
| Friday, November 25, 2005 - 2:37 am: |
| 
|
sauBaaYaÊ mast jamalaI.. puNa- kqaa ekdaca post kolyaanao vaacaayalaa Cana vaaTlao..
|
कथा अप्रतिम पण शेवट फ़ारच धावता आहे.
|
Champak
| |
| Friday, November 25, 2005 - 2:58 pm: |
| 
|
एकदम कुल हे कथा
|
Dineshvs
| |
| Saturday, November 26, 2005 - 9:25 am: |
| 
|
सुभाष छान लिहिले आहेस. तुला सविस्तर ईमेल केलीय.
|
Megha16
| |
| Monday, November 28, 2005 - 10:01 am: |
| 
|
सुभाष छान आहे कथा. सगळे जस म्हटले,शेवट जरा धावता वाटला.
|
Pama
| |
| Monday, November 28, 2005 - 10:49 am: |
| 
|
कूल, कथाबीज छान आहे. पण वर सर्वा.ंनी म्हटल्याप्रमाणे fast track मधे आहे.
|
|
|