|
बंगलोरला येऊन आता तीन वर्षं होतील. चांगला जॉब, ढीगभर मित्र मैत्रिणी, एंजॉय करायला असंख्य पर्याय! आयुष्य मजेत चाललं आहे. त्यातच कधीतरी आई बाबांचा स्वर डोकं वर काढतो... " लग्न कधी करणारेस? " आणि मी नाक मुरडते. बंगलोरला एक फ़्लॅट रेंटवर घेऊन एकत्र राहणार्या आम्ही पाच जणी! थोड्याफ़ार फ़रकाने सध्या प्रत्येकीच्याच घरी हाच प्रश्न विचारला जातोय, पण आश्चर्य असं की अजून एकीनेही लग्न या गोष्टीचा विचार केलेला नाहीये. " लग्न करायचं की नाही? " याबद्दल अजून निर्णय नाही " कधी? " तर फ़ार दूरची गोष्ट झाली. कोणीही असो; उत्तर एकच " I don't know; may be I am not ready yet!!" पाचजणींमध्ये कुणाला बॉयफ़्रेंड्स आहेत कुणाला नाहीत... (तुम्हाला काय वाटलं मी लिहीन कुणाला आहे नि कुणाला नाहीये ते? :-P ) ज्यांना आहेत त्यासुद्धा आता एकदाची!) लग्नगाठ बांधून टाकूयात असा विचार करताना दिसत नाहीत. "hmmm.... Is it that necessary anyway?" अपूर्वा! माझ्याच फ़्रेशर्स बॅचमध्ये कंपनी जॉईन केलेली! दिसायला क्यूट, स्वभावाने गोड!! उणेपुरे सहा महिने जॉब केल्यावर तिने कंपनी सोडत असल्याची घोषणा केली. एका संध्याकाळी तिला भेटलो तेव्हा माफ़क लाजत सांगितलं, " मी लग्न करून US ला जातेय. " " ऑं!!! " मी आणि बरोबरची मैत्रीण कोरसमध्ये किंचाळलो. " कसं काय ठरलं गं लग्न? " आम्ही आमच्या भोचकपणाला जागून चौकशा सुरु केल्या. " अगं आम्ही त्याचा फ़ॅमिलीला ओळखतो. तेव्हा त्यांच्याकडून प्रपोझल आल्यावर हो म्हटले झालं. " एवढ्या उत्तरावर गप्प बसू तर त्या मी आणि माझी मैत्रीण कसल्या? " कधी भेटलीस म्हणे तुझ्या भावी नवर्याला? " " अगं आम्ही फ़क्त ऑनलाईन चॅट केलं एक दोनदा; फ़ायनल हो म्हणण्यापूर्वी! प्रत्यक्ष तर आता लग्नातच भेटू. त्याला त्याआधी येणं शक्य नाहिए नं! " ती कमालीच्या सहजपणे सांगत होती. एक दोनदा चॅट करून निर्णय घेता येतो? प्रत्यक्ष न भेटता?? " अगं पण... लग्नाआधी एकदा भेटायला नको का? " आम्ही नेटाने खिंड लढवली. " अगं नाही; गरज वाटली नाही! " ती टॉपिक conclude करत म्हणाली आणि पत्रिका देऊन निघून गेली. तिने जे केलं ते बरोबर की चूक यावरून आमच्या फ़्लॅटवर नंतर जे arguments झाले, विचारू नका! शेवटी हा वाद "Let her do what she wants; it's her life anyway!" या मुद्द्यावर तुटला. शुक्रवारची लंचनंतरची वेळ! वीकेंडला फ़क्त चार पाच तास उरले असल्याने प्रत्येक जण अतिशय प्रसन्ना मूडमध्ये! तेवढ्यात ग्रुपमधल्या कृष्णाने डेस्कवर डोकं ठेवून रडायला सुरुवात केली. " काय गं काय झालं? " करत प्रत्येक जण तिला विचारू लागली. वास्तविक तिला रडायला येण्यासारखं काही झालं तर नव्हतं. आठवड्याभरात तिची लग्नासाठी घेतलेली लीव्ह सुरु होणार होती, दोन आठवड्यांनी तिचं लग्न होतं, झालंच तर आज शुक्रवार होता आणि कॅंटीनमधलं जेवणही चांगलं होतं. " मला लग्न करायला भीती वाटते. " रडण्याचा पहिला भर ओसरल्यावर ती म्हणाली. " भीती? " " अगं गेले वर्ष दीड वर्ष मी छान एकटी राहतेय. ऑफ़िसमध्ये यायचं, मन मानेल तेव्हा स्वयंपाक करायचा, मित्र मैत्रिणींसोबत मन मानेल तसं भटकायचं.. It's all gonna go now! मी ऍडजस्ट करू शकले नाही तर? भीती वाटते. Am I making a commitment without being prepared for that?" आज कित्येक जणींना हे वाटतं लग्न करण्याआधी, की अजून त्या तयार नाहीयेत लग्नासाठी! काय करतात बहुसंख्य मुली अशावेळी? "Does she decide what she wants as it is her life anyway?" वाणी... हा एक अजून अजब नमुना आहे. हिच्या बॅगा अखंड भरून तयार असतात. आई वडील जरा जास्तच स्थळं वगैरे बघायला लागलेत असं कळलं की ही कुठलीतरी onsite assignment घेऊन US / UK ला पळ काढते. कधी चार तर कधी सहा महिन्यांसाठी! आई वडिलांचा जावई(!) शोध थंडावला की पुन्हा इथे परत.... पुन्हा सुरु झालं की ही पळायला मोकळी. " पण असं का? " एकदा मी न राहवून विचारलं होतं. "It's my color." ती दु : खी स्वरात म्हणाली. अतिशय रेखीव, नाजूक वाणी रंगाने मात्र काळ्यात जमा व्हावी अशी. "I hate it when people reject me 'cos of my skin color. आई बाबांची निराशा पहावत नाही गं. I hate all this arranged marriage business." माझ्याकडे तिला सांगायला आश्वासक शब्द नाहीत. Today, she is not ready to commit because of the past experiences! ... So, let her do what she wants, it is her life anyway! हेच अंतिम सत्य की काय? एक मेमधली टळटळीत दुपार! कधी नव्हे ते मला काम नव्हतं म्हणून मी लवकर घरी जायला निघाले. ऑफ़िसबाहेर एकही रिक्षा नव्हती. चडफ़डत मी तिथेच वाट पाहत उभी राहिले. तेवढ्यात ऑफ़िसच्या गेटमधून एक काळी lancer बाहेर पडली. " चल, तुला सोडते on the way!" गाडीची काच खाली करत विनीता म्हणाली. विनीता! The smartest PL I have ever seen in our office. अतिशय dynamic आणि लोकप्रिय.... ...गाडीमध्ये पिक्चर्स, ऑफ़िस, प्रोजेक्ट्स, पॉलिटिक्स अशा बर्याच विषयांवर गप्पा रंगल्या. नंतर तू कुठे कोणासोबत राहतेस? या टिपिकल प्रश्नांवर गाडी आली. " मी आणि माझ्या मैत्रिणी! तू? " मी विचारलं. " मी आणि माझा बॉयफ़्रेंड... We n one more couple share a two BHK flat. Since five years!" मला अजून details जाणून घ्यायचा जबरदस्त मोह होत होता, परंतु गाडी तिची होती, आत AC होता, बाहेर ऊन होतं आणि रिक्षा नव्हती. गंमतीचा भाग जाऊ दे. पण मी खोलात न जाण्यामागे हीच एक थियरी होती... "Let her do what she wants, it's her life anyway!" तिला या पाच वर्षांमध्ये कधीच " आता लग्न करावं " असं वाटलं असेल का? Nobody knows.... अशी कितीतरी उदाहरणं आहेत. करीयरमध्ये अफ़ाट यशस्वी पण लग्नाबाबत उदासीन सीमा, यशाच्या पायर्या चढताना तिशी ओलांडून गेलेल्या आणि मनासारखे जोडीदार आता मिळणं शक्य नाही असं आढळल्याने लग्नाचा विचार सोडलेल्या शालिनी आणि गीता, लग्न न करताच जास्त enjoy करता येतं यावर विश्वास असलेली आणि एखाद्या कॉलेज तरुणीच्या उत्साहाने boyfriends बदलणारी मानसी.... मुद्दामच बरीच mixed उदाहरणं लिहिली इथे! Just to prove की कोणी लग्न करणं किंवा न करणं ही युनिक केस असते आणि प्रत्येकीच्या निर्णयामागची कारणं देखील युनिक असतात. पण अजूनही It does not matter if the girl thinks she is not ready to commit yet! हे का? लग्न ही महत्वाची बाब अजूनही वय, रुप अशा preliminary गोष्टींतच अडकून पडलीय. " आताच लग्न करून घे, नाहीतर पुढे चांगली स्थळं येणार नाहीत. " हे वाक्य लग्नाला नाही म्हणणार्या कुठल्याही मुलीला ऐकवलं जातंच! " मी काही तिशी पार केल्यानंतरही सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा नवरा expect करत नव्हते. पण फ़क्त मी तिशी पार केलीय म्हणून असली टाकाऊ स्थळं सांगून आली की बस्स! संतापून तो विषयच बंद केला झालं! " गीता सांगत होती. अजूनही आपल्यावर " लग्नाचं वय! " या किंवा तत्सम बाबीचा इतका पगडा का आहे? जर एखादी मुलगी एखाद्या गोष्टीचे pros n cons माहीत करून घेऊन मग ती गोष्ट implement करत असेल तर त्यात नाकारण्यासारखं काय आहे? उदा. live in relationship like Vineeta? किंवा अविवाहित राहायचा गीताने घेतलेला निर्णय? जोपर्यंत मनापासून एखादी गोष्ट करावीशी वाटत नाही तोपर्यंत फ़क्त " लोक काय म्हणतील? " किंवा " आपल्या समाजात असेच रुल्स आहेत! " यामुळे ती गोष्ट करावी का? " आत्ता मारे म्हणते आहेस की अजून लग्नाचा विचार नाही, वेळ निघून गेली की कळेल? " मुळात ही वेळ जिची तिने ठरवायची की इतर सगळ्यांनी! " पुढे तू हताश, निराश होऊ नयेस म्हणून... " हे उत्तर देताना आपण इतका protective attitude का ठेवत आहोत याचा विचार का केला जाऊ नये? I am afraid I am not ready to commit yet! ही true feeling आहे हे बहुतांशी मान्य का केलं जात नाही? माझ्या मते तरी, प्रत्येकानी हा विचार करून पहावा especially लग्नाच्या बाबतीत... "Let her decide and do what she wants, it's her life anyway!"
|
Eliza
| |
| Tuesday, May 10, 2005 - 9:25 am: |
| 
|
EaÊ I couldn't agree more with you. At the same time, I realized that I have a very traditional view on marriage. Aaja ha p`XNa saamaajaIk na rahta vaOya>Ik Jaalaaya. The sooner we realize this, the better . naohmaIp`maaNao Cana ilaihlaya (at vaadca naahI.
|
Yogibear
| |
| Tuesday, May 10, 2005 - 9:26 am: |
| 
|
Shra: Interesting ... ...
|
thought provoking. good one Ea
|
Champak
| |
| Tuesday, May 10, 2005 - 10:12 am: |
| 
|
Agaa pÜrIÊ iklaÜ iklaÜ kaMda pÜho Ka]na pna ihkDo kahI laÜkaMcaI lagnao jamat naahIt Ana tu hI navaIca
Tuma kaZuna ha-yalaI hosa. ihkDo lagna jamavaNyaasaazI laÜk yauQaÊ thÊ laZayaaÊ DavapocaÊ gainamaI kavaoÊ TohLNaI As~aMcaa maara
kÉnahI dmalao Aahot..... Ana tu hI naivanaca Tuma kaZlaI Aahosa. Aata tulaa kaya krayacao to tu zrvaM pNa saÜbatIcyaa caar caÝGaIMnaa trI Asao naadI laa] nakÜsa. %yaaMnaa
kuNaacyaa trI ekacyaa naadI laagau do........ itkDo maulao hvaIt kXyaalaa (a baIbaI var eka baha_ranao ilaihlaya ikÊ jyaaMnaa maulao hÜt naahIt %yaaMnaa
jaa]na ivacaaraÆ On the same line Aata ima mhNau ka ik jyaaMcaI lagnao jamat naahIt ik hÜt naahIt %yaaMnaa jaa]na ivacaar mhNaunaÆ XaovaTI
its their life also... AsaÜ Cana ilaihlaosa Eawa² lagna ha p`%yaokacaa vaOya>Ik ivaYaya Aaho ik tÜ saamaaja vyavasqaocaa ek Baaga Aaho ha vaadacaa mau_a
AahoÊ mhNaunaca jauNao jaaNato laÜk maulaa maulaIMcaI lagnao vaoLovar ca vhavaIt (avar zama Aahot. pNa
hllaI tI vaoL na@kI kÜNatI (avar vaad caalat Aahot²
|
Shraddhak
| |
| Wednesday, May 11, 2005 - 11:27 am: |
| 
|
Moderators maaJao pihlao pÜsT saÜDUna baakIcaI cacaa- [qao hlavata yaola kaÆ Qanyavaad.
|
Mrudu
| |
| Thursday, May 12, 2005 - 10:41 am: |
| 
|
Eawacao mat AgadI pTlao. ijacaa itnao inaNa-ya Gyaavaa. I am not ready yet. hI Baavanaa KrI AsalaI trIÊ palakaMnaa vaoL gamavaayacaI BaItI vaaTto. iXavaaya %yaaMcyaa kaLat Asao
roDI vagaOro Asaayacao f^D navhto AsaohI %yaaMnaa vaaTt AsaNaar. ekMdirt maulaI AaiNa maulaohI iktI zamapNao svatÁcyaa matavar kayama rahtat yaavar kaya hÜNaar ho zrto.
|
EawaÊ tuJaI ilahINyaacaI style sauroK Aaho. prMtu gaaDI itcaI hÜtI... mastca²
|
Ninavi
| |
| Tuesday, May 24, 2005 - 2:30 pm: |
| 
|
t%vatÁ lagna krNyaalaa ivarÜQa nasaola tr baayaÜlaa^ijakla @laa^kcao Baana zovaUna roDI vhavaM AsaM
malaa vaaTtM.
|
|
|