|
मी आज पुन्हा एकदा तसाच विचारमग्न होऊन बसलो आहे. तसं म्हटलं तर आयुष्य निवांत चाललं आहे. इथे नैनितालमध्ये माझ्या फ़ारश्या ओळखीचंही कोणी नाही. आयुष्यातल्या सगळ्या जबाबदार्या संपल्या की कुठल्यातरी शांत ठिकाणी जाऊन राहायचं हे मी आधीच ठरवलं होतं. सावनीचं आमच्या एकुलत्या एका लेकीचं लग्न झालं तसे आम्ही इथे नैनितालमध्ये राहायला आलो. दिल्लीचा चकाचक, sophisticated , मुख्य म्हणजे मित्र मैत्रिणींनी भरलेला माहौल सोडताना राधाने थोडी कुरकुर केली खरी पण झाली शेवटी तयार ती माझ्यासोबत यायला! सावनीनेही तसं नाक मुरडलं पण ऐकलं शेवटी... कारणही भलतंच झकास... international airport नाहीये म्हणे तिथे! तिचा घरी पोचायचा वेळ वाढेल म्हणे त्यामुळे!!! hmmm .. लग्न होऊन सहा वर्षं झाली की! तरी सुद्धा अजून लहान मुलीसारखा वेडेपणा करते ही! ... आज नेहमीप्रमाणे माल रोडवरून पायी भटकत निघालो होतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत हे! सगळीकडे ट्रिपला आलेल्या लोकांची वर्दळ! नुकतीच लग्न झालेली आणि आपसात मग्न होऊन चाललेली नवपरिणीत जोडपी, अनेक कुटुंबं आणि मजेने हुंदडणारी मुलं... नैनी झीलवर नेहमीप्रमाणे झालेली बोटिंगसाठीची दाटी!!! मला अजूनही आठवतेय पहिल्यांदा आम्ही इथे आलो होतो ती ट्रिप! सावनी आठ वर्षांची चिमुरडी होती तेव्हा! तिने प्रत्येक गोष्ट हवीये म्हणून हट्ट करायचा आणि आम्ही तो लाडाची लेक म्हणून पुरवायचा असंच चाललं होतं सदैव.. " बाबा, आपण इथेच घर घेतलं आणि राहिलो तर काय मज्जा येईल नाही? " तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर योगायोगाने झालं होकारार्थी आणि आम्ही senior citizens इथे राहायला आलो पण सावनीशिवाय! ...... "Uncle, could you please tell me where this hotel Manu Maharani is?" अचानक या प्रश्नाने माझी तंद्री मोडली. एक सहा फ़ुटी, गोरापान, हॅंडसम मुलगा माझ्या शेजारी उभा राहून विचारत होता. त्याच्याकडे पाहिलं आणि मी दचकलो.... .... संयम मेहरा! नाही नाही.. He is not Sanyam meharaa definitely! त्याचे केस छान सरळ होते आणि गालावर खळ्या पडायच्या त्याच्या! हा कोणीतरी वेगळाच आहे पण बराचसा संयम सारखा! हसण्याची लकब अगदी त्याच्यासारखी! म्हणून की काय आठवण झाली एकदम संयमची. "Young man! You need to walk a bit further on the mall road! on the right hand side you could see Manu Maharani then!" ' थॅंक्स अंकल! ' म्हणून तो निघून गेला. मी त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे एकटक बघत होतो, तो गर्दीत दिसेनासा होईपर्यंत... संयमच्या आठवणींचा तळ ढवळला गेला की मला खरंच काही सुचत नाही. माझं तेव्हा खरंच काही चुकलं का? मी सावनीसोबत त्याचा शोध घ्यायला हवा होता का? मी घाई कशासाठी केली? की मला तो सावनीच्या आयुष्यात आलेला नको होता? प्रश्न, प्रश्न आणि त्यांची न सापडणारी उत्तरं... .. पण थांबा.... तुम्हाला हे सर्व पहिल्यापासूनच सांगायला हवं! थोडं विचित्र आहे खरं पण सत्य आहे.
|
Zashi
| |
| Monday, March 07, 2005 - 8:33 am: |
| 
|
far thambau nakos...surwat atishay sundar zali ahe ...
|
Swabhi
| |
| Monday, March 07, 2005 - 3:52 pm: |
| 
|
lavakr ilahI gaÊ tovaZa saMyama naahI Aaho
|
Apurv
| |
| Monday, March 07, 2005 - 4:34 pm: |
| 
|
lavakr lavakr ilahIÊ Asaa saMyamaacaa AMt baGaU nakÜsa
|
mast Jaalaaya first episode ² lavakr ilahIÊ AaiNa %yaa saha fUT KL\yaa pDNaaáyaa saMyama cao Ajauna vaNa-na yao} do
|
Sayonara
| |
| Tuesday, March 08, 2005 - 2:26 am: |
| 
|
wow Ê caaMgalaI interesting vaaTtoya gaÜYT. lavakr ilahUna Tak.
|
Tulip
| |
| Tuesday, March 08, 2005 - 6:08 am: |
| 
|
saMyama AaiNa saavanaI hmm naavaM Cana Aahot. pNa saavanaI ca lagna dusaáyaaXaIca JaalayakaÆ taTatUT punha . puZcaI gaÜYT vaacaayacyaa AaQaI maaJaa saÝmya inaYaoQa
|
सावनी, राधा आणि मी! आमचं तिघांचं एक छोटसं कुटुंब... माझे वडील कधीतरी महाराष्ट्र सोडून इथं दिल्लीला येऊन स्थायिक झाले त्यामुळे तसा महाराष्ट्रियन असलो तरी मनाने मी दिल्लीकरच! बाबांनी इथे सुरु केलेला छोटासा business त्यांच्या मेहनतीमुळे बराच वाढला तसं मोठा झाल्यावर मलाही त्यातच लक्ष घालावं लागलं. मी त्या बाबतीत सेटल झाल्यावर आई बाबांनी माझ्या लग्नाचा घाट घातला. महाराष्ट्रापासून किमान तीस वर्षं दूर काढलेल्या माझ्या आई बाबांनी सून मात्र महाराष्ट्रियनच असणं पसंत केलं आणि राधाचा माझ्या आयुष्यात प्रवेश झाला. लग्नानंतर जवळ जवळ पाच वर्षांनी सावनीचा जन्म झाला. तिच्या नंतर राधाला मूल होण्याची शक्यता नसल्याचं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. आमची त्यावर काही तक्रार नव्हती... आमची सावनी आम्हाला मिळाली यात आम्ही भरून पावलो होतो. .....एकुलती एक असल्यामुळे सावनी अतिशय लाडात वाढली. तिने हट्ट केला कुठल्या गोष्टीचा आणि आम्ही तो पुरवला नाही असं कधीच झालं नाही. सावनी.... आमची राजकन्या... आज लग्न होऊन ती आमच्यापासून दूर गेली असली तरी घरात सगळीकडे तिचं अस्तित्व जाणवतं. तिचे शाळेतले फोटो, तिची खेळणी, तिचे लहानपणापासूनचे ड्रेसेस... सगळं काही जपून ठेवलंय मी आणि राधाने.... तसं सावनीला भेटलेल्या प्रत्येकाने तिला आठवणींमध्ये जपून ठेवलंय म्हणा.... तिचे DPS, R K Puram मधले शिक्षक - शिक्षिका, तिचे लहानपणापासूनचे मित्र मैत्रिणी, तिचा हंसराजमधला ग्रुप, माझं आणि राधाचं friends circle ... अजूनही कधी मधी दिल्लीला गेलोच तर जाईन तिथे " सावी " च्या आठवणी निघतात. आणि इतक्या फ़ेमस मुलीचे आपण बाप आहोत म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून येतो. ... सावनीचं विश्व खरंच सोनेरी होतं. सदैव मित्र मैत्रिणींनी गजबजलेलं, तिच्या स्पर्धा, हॉबीज, निरनिराळे उपक्रम याला वेळ न पुरणारं... तिची आई तिला म्हणायची तसं ' सदैव घोड्यावर असलेलं ' .... ... मात्र एक विचित्र आवड सोडून! तिला सिनेमे प्रचंड आवडायचे. आता तुम्ही म्हणाल यात काय विचित्र आहे? ते तर कुणालाही आवडतात की! तसं नाहीये सावनीला " पुनर्जन्म " या एकाच थीमवरच्या सिनेमांचं प्रचंड आकर्षण होतं. बाकीचे सिनेमे केवळ पाहायचे म्हणून पाहणारी सावी या थीमवरचा कुठलाही सिनेमा पापणी न लववता बघत असे. मग तो सिनेमा कितीही टुकार असो. बर्याच वेळा मी तिच्याशी गमतीने या विषयावर वाद घातला होता. " हे हो काय बाबा? " सावनी तिच्या स्टाईलने गाल फ़ुगवून म्हणायची.... आणि मग राधाही मला रागवायची खोटं खोटं... ... सगळं कसं दृष्ट लागेलसं छान चाललं होतं....
|
मला आठवतंय, तो सावनीचा अठरावा वाढदिवस होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही घरात पार्टी असल्याने राधा आणि मी पार्टीच्या तयारीत बुडून गेलो होतो. सावनीला इतर दिवशीही कोणी कामाला हात लावू देत नसे आजचा तर प्रश्नच नव्हता. रात्री बारापासून येणार्या birthday कॉल्सना attend करून थकलेली सावनी तिच्या बेडरुममध्ये गाढ झोपली होती. ... दुपारी मी घरी आलो तेव्हा बाईसाहेब उठल्या होत्या आणि TV बघत होत्या. ती ज्या प्रकारे तो सिनेमा पाहण्यात रमून गेली होती त्या अर्थी नक्कीच पुनर्जन्मावरचा कुठलातरी सिनेमा असावा. " काय सावी, हा कुठला? " मी तिच्या डोक्यावर टप्पल मारत विचारलं. " बरं ते या जन्मामध्ये भेटलेत की भेटायचेत अजून? " " अब के बरस.... " एवढंच त्रोटक उत्तर देऊन सावी पुन्हा सिनेमामध्ये रंगून गेली. मला बरीच कामं उरकायची होती संध्याकाळच्या पार्टीआधी म्हणून मी तिथून काढता पाय घेतला. संध्याकाळची पार्टी नेहमीप्रमाणे मजेत चालली होती. यावेळेस राधाने सावनीसाठी वाढदिवसाचा पेहराव म्हणून चक्क साडी निवडली होती आणि ती ब्लॅक साडी नेसून वावरणारी माझी राजकन्या दृष्ट लागेलशी सुंदर दिसत होती. पार्टी रात्री जवळ जवळ एक दीड पर्यंत चालली. सगळे guests निघून गेल्यावर मी, राधा आणि सावनी नेहमीप्रमाणे लॉनवर कॉफ़ी घेत गप्पा मारत बसलो होतो. " अभय, सावनीची दृष्ट काढायला हवी नाही? कसली गोड दिसतेय! " राधा कौतुकाने आपल्या लेकीकडे बघत म्हणाली. " आणि अठरावा वाढदिवस म्हणजे कायद्याने सज्ञान झाली की आपली राजकन्या! काही वर्षांनी जावयाचा शोध सुरू करायला लागेल आपल्याला! " मी हसत हसत गमतीने म्हणालो. " तो शोध तुम्हाला करावा लागणार नाही बाबा! " इतका वेळ गप्प बसून कॉफ़ी पीत असलेली सावनी अचानक म्हणाली. " छान! म्हणजे बापाचे कष्ट वाचावेत म्हणून तू आधीच कुणी पसंत केला आहेस की काय? भेटव तरी आम्हाला... " मी अजूनही गंमतीच्या मूडमध्ये होतो. " मी कोणीही मुलगा शोधला नाहीये बाबा! पण तो आहे आणि तो मला शोधत येईल एक दिवस... त्याचं आणि माझं नातं आमच्या पूर्वजन्मातलं आहे बाबा... " " सावी अगं दुपारचा सिनेमा गेला नाही का डोक्यातून.... " मी बोलता बोलता सावनीकडे बघितलं आणि माझं वाक्य अर्धवटच राहिलं. सावनीच्या चेहर्यावर पार हरवलेले भाव होते. हातात कॉफ़ीचा कप तसाच ठेवून ती कुठेतरी शून्यात बघत बसली होती. " राधा, सावी दमलीय वाटतं आज खूप.... तिला आत घेऊन जा आणि झोपव! " मी खरं तर सावीचा चेहरा पाहून tense झालो होतो पण ' खूप दमल्यामुळे होतं असं कधी कधी ' म्हणून मी स्वत : ची आणि राधाची समजूत घातली.
|
Nalini
| |
| Tuesday, March 08, 2005 - 8:18 am: |
| 
|
mastcaM ... ... ]%saukta vaaZto Aaho.
|
दुसर्या दिवशी सावनी उठली तेव्हाही ती अतिशय मलूल दिसत होती. " सावी बेटा बरं वाटत नाहीये का तुला? " मी तिला विचारलं. " बाबा, माझ्या कालच्या बोलण्याने तुम्ही आणि आई खूप अस्वस्थ झाला असाल ना? " मला खरं तर तो विषय ती उठल्या उठल्या यायला नको होता. पण सावनीने सरळ ही पृcछा केल्यावर मला तो टाळता येईना. " अगं दुपारी पाहिलेल्या सिनेमाचं काहीतरी असेल तुझ्या डोक्यात! म्हणून काल असं काहीतरी बोलून गेली असशील बेटा तू! " मी आवाजात शक्य तेवढा गंमतीचा टोन ठेवत म्हणालो. " नाही बाबा... मी काल जे काही म्हणाले तो त्या सिनेमाचा परिणाम नक्कीच नव्हता. मला पक्कं माहीतेय्; तो आहे.. माझा पूर्वजन्मीचा प्रियकर! त्याचं नाव संयम मेहरा... हे नाव माझ्या कुठल्याही मित्राचं नाही. इतकंच काय या नावाच्या कुठल्याही मुलाला मी ओळखत नाही. एक दिवस अचानक हे नाव माझ्या डोक्यात आलं... कोणीतरी जणू मला सांगितलं की, तो आहे आणि तुला शोधत तो एक दिवस नक्कीच येईल. आणि त्याचं नाव संयम मेहरा... " सावनी न थांबता भराभर बोलत होती. " बेटा तू आधी नाश्ता कर पाहू... आणि आधी थोडी झोप काढून छान फ़्रेश हो. मग बोलू आपण यावर सावी... " राधाच्याही डोळ्यांमध्ये असंख्य प्रश्न दाटलेले मला दिसत होते. पण तिने शांतपणे सावनीला नाश्ता करवला आणि तिला तिच्या बेडरुममध्ये झोपवून आली. राधा माझ्यासमोर पुन्हा येऊन बसली तेव्हा ती खूप अस्वस्थ दिसत होती. " अभय, हे काय खूळ काढलंय सावनीने? संयम मेहरा!!! कोण आहे देव जाणे? तिच्या हंसराजच्या अख्ख्या ग्रुपला मी ओळखते पण या नावाचा त्यात कुणीही नाही. अभय सावनीचं कुणाशी अफ़ेअर..... " राधा बोलता बोलता गप्प झाली. " राधा, इतकी excite होऊ नकोस. सावनीने आजपर्यंत आपल्यापासून काहीही लपवून ठेवलंय का? आणि आज तिने इतकी विचित्र गोष्ट सांगितलीय त्याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. थोडा वेळ जाऊ दे. ती आपणहूनच सांगेल खरं काय ते..... काळजी करू नकोस आणि शांत रहा. " राधाच्या चेहर्यावरचं चिंतेचं सावट अजिबात कमी झालं नाही, अन दुसर्या दिवशी सकाळी झालेल्या प्रसंगामुळे ते अजूनच गडद झालं. इतकंच काय मी ही त्या दिवशी सैरभैर होऊन गेलो. ....सकाळी सावनी उठली तीच रडत रडत! " बाबा, आई.... संयम! संयमला काहीतरी झालं बाबा... तो... त्याला माझी गरज आहे बाबा... " सावनी असंबद्ध बडबडत होती. राधाने सावनीला कुशीत घेतलं आणि सावनी हमसून हमसून रडायला लागली. मी काही न सुचून त्या दोघींकडे नुसता बघत होतो. ..... माझ्या राजकन्येला खरंच कुणाcईतरी नजर लागली होती.
|
Jayavi
| |
| Tuesday, March 08, 2005 - 10:25 am: |
| 
|
EawaÊ vaa ²² mast jamalaIyao Ba+I.... KUp ]%saukta vaaTtoya
|
Maitri
| |
| Tuesday, March 08, 2005 - 12:09 pm: |
| 
|
shraddha, khup chhan chalalay pravas. pudhachi utsukata lagaliy. lavkar tak ga pudhacah post.
|
EaQdaÊ mast ilaihtoyaosaÊ intersting vaaTtÜya ivaYaya ....keep it up ²²
|
साडे दहाला मोहनचा फोन आला तेव्हाही मी घरी सुन्^न होऊनच बसलो होतो. सावनीचा तो केविलवाणा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून काही केल्या हलत नव्हता. मोहन माझा जिवलग मित्र... लहानपणापासून एकत्रच वाढलो होतो आम्ही! त्याने विचारल्यावर मी त्याला अथपासून इतिपर्यंत सगळंच सांगून टाकलं. " अभी रिलॅक्स.. मी समजू शकतो तुझं अस्वस्थ होणं.. पण मे बी सावनीला संयमबद्दल तुमच्यापाशी काही कारणाने मन मोकळं करता येत नाहीये. तो तिचा बॉयफ़्रेंडही असेल किंवा कुणी एखादा मुलगा जो तिला emotionally blackmail करतोय. आपण कौन्सिलरची मदत घेतली तर? " ... आपली गोड मुलगी कुठल्याश्या कारणाने कोणत्यातरी मानसिक रोगाची रुग्ण तर नाही ना झाली? माझ्या मनाला एक वाईट शंका चाटून गेली. " अभय इनफ़... वाटेल त्या शंका काढून तुझं आणि राधाचं मन्स्वास्थ्य बिघडवून ठेवू नकोस तू.... सावनीला काहीही गंभीर मानसिक आजार झालेला नाहीये. आणि कौन्सिलरच्या मदतीने होईल सगळं ठीक! " मोहनने लगेच त्याच्या ओळखीच्या एका कौन्सिलरचा नंबर देऊ केला. ..... कौन्सिलरसोबतच्या सेशन्समधूनही फ़ारसं काही पदरी पडलं नाही. सावनीने तीच कहाणी कानामात्राही न बदलता त्यांनाही सांगितली. " मि. अभय, मी सावनीशी वेगवेगळ्या प्रकारे बोलून या संयम मेहरा संदर्भात अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला पण तिचं उत्तर बदललेलं नाही. तो तिचा पूर्वजन्मीचा प्रियकर आहे ह्यावर तिचा विश्वास आहे. तो कुठे राहतो, काय करतो काहीही तिला खरंच माहीत नाही पण एक दिवस तो तिला शोधत येईल यावर तिचा ठाम विश्वास आहे. तुम्ही म्हणता तसं हा परिणाम ते movies पाहून तिच्यावर झालेला असेलही कदाचित... पण मी एकच निष्कर्ष काढू शकलो आहे आतापर्यंत. सावनी खोटं बोलत नाहीये. And she is not hiding anything! " ..... संध्याकाळी सावनी लॉनमध्ये पुस्तक वाचत बसली होती. मी तिच्या शेजारी जा^ऊन बसलो. गेल्या काही दिवसांमध्ये किती वेगळी दिसत होती माझी लेक.... तिचा तो निस्तेज चेहरा पाहून मला कसंतरीच झालं... मी हलकेच तिच्या डोक्यावरून हात फ़िरवला. " बेटा.... " " बाबा, संयम ठीक असेल ना हो आता? " मी शहारलो. तिच्या ध्यानी मनी त्या एका नावाशिवाय दुसरं काहीच नव्हतं तर! कोण होता हा संयम मेहरा आणि कुठल्या चुकीची शिक्षा माझी फ़ुलासारखी पोर भोगत होती? " बेटा... तुझा जीव आहे ना त्याच्यावर? मग त्याला काहीही होणार नाही. " स्वत्ला शक्य तितका शांत ठेवत मी तिला म्हणालो. तेवढ्या माझ्या वाक्यानेही ती निर्धास्त झाल्यासारखी हसली. संयमची अजून माहिती काढण्याच्या उद्देशाने मी तिला विचारलं... " सावी, संयम दिसायला कसा आहे? " " बाबा, गेल्या जन्मी तो खूप देखणा होता दिसायला... मदनाचा पुतळा हा शब्द कमी वाटावा इतका देखणा... गोरापान, उंच, छानसे सरळ ब्रा^ऊन केस असलेला आणि त्याच्या केसांचाच एक्झॅक्ट रंग असलेले त्याचे ते डोळे... हसला की त्याच्या दोन्ही गालांवर खळ्या पडायच्या! मला खात्री आहे तो याही जन्मी तसाच दिसत असणार... नाहीतर माझ्या संयमला कशी ओळखेन मी? तो तसाच आहे बाबा... मला त्याला ओळखायला त्रास होऊ नये म्हणून याही जन्मी त्याचं नाव तेच आहे... संयम... संयम मेहरा... " सावनी पुन्हा संयमच्या विचारात हरवली होती.
|
रात्र झाली तसे आम्ही घरात आलो. सहज चाळा म्हणून सावनीने TV लावला. पडद्यावर श्रीदेवी गात होती...... " तेरी बंजारन रस्ता देखे... कब आयेगा मेरे बंजारे...... " हा सिनेमा मला सावनीकडूनच कळला होता. तीच ती पुनर्जन्माची कहाणी! माझ्या डोक्यात एकदम संतापाची तिडीक गेली. " सावनी आधी तो TV बंद कर! आणि खबरदार पुन्हा हे असले सिनेमे पाहिलेस तर! आई वडिलांच्या मन : स्थितीचा काही विचार आहे की नाही तुला? असलं काही तरी फ़ालतू पाहायचं आणि काय वाटेल ते विचार करायचे! आधीच त्या तुझ्या संयम मेहराने सगळ्यांना पुरेसा त्रास दिला आहे.... " माझा असा आवाज सावनीसाठीच काय माझ्यासाठीही नवा होता. राधा लगबगीने आतून धावत आली. " अभय, केवढ्यांदी ओरडतो आहेस तिच्यावर! " सावनीला मिठीत घेत ती पुटपुटली. आजपर्यंत आई वडिलांकडून कधीही ओरडा न खाल्लेली सावनी भेदरून माझ्याकडे पाहत होती. ... तिचा तो कसनुसा चेहरा पाहून मला स्वत : चीच लाज वाटली. अठरा वर्षांत ज्या पोरीला मी चढ्या आवाजात हाकसुद्धा मारली नव्हती तिला आज मी असा कसा चिडून बोललो? पुढचा अर्धा तास माझ्या कुशीत शिरून सावनी गदगदून रडत होती. माझ्या डोळ्यांतही पाणी आलं... " बेटा शांत हो... संयम मेहरा कुठे राहतो ते तरी सांग आम्हाला.. मी तुला प्रॉमिस करतो की मी त्याला स्वत : जाऊन भेटेन. " " मला नाही माहीत बाबा.. मला खरंच नाही माहीत! " " सावी, तूच सांग मी तरी काय करू आता? जग इतकं अफ़ाट आहे बेटा की त्याला शोधायचं म्हटलं तर माझं आयुष्य पुरणार नाही.... " ........मनाशी काहीतरी विचार करून मी सावीला नैनितालला घेऊन जायचं ठरवलं. तिला तिथे राहायला आवडायचं. तिथे जाऊनतरी सावीची मन : स्थिती ठीक होऊ दे, अशी मी आणि राधा देवाकडे प्रार्थना करत होतो. .... ठरल्याप्रमाणे दोनच दिवसांत आम्ही नैनितालला येऊन दाखल झालो. सावनी बर्यापैकी शांत झाली होती. ...संयमचा विषय एकदाही न निघता किंवा सावनीला कसलाही त्रास न होता ती ट्रिप पार पडली. आम्ही थोडेफ़ार निर्धास्त झालो होतो. दिल्लीला परत आलो तेव्हा सावनीचं कॉलेज सुरू झालं होतं. नेहमीसारखी ती तिच्या ग्रुपमध्ये, तिच्या उपक्रमांमध्ये गुंतून गेली. पुन्हा पहिल्यासारखी हसरी, टवटवीत झाली. सुट्टीमध्ये जे काही घडलं होतं ते एक दु : स्वप्न वाटावं इतका बदल तिच्यात झाला होता. .....मी आणि राधाने सुटकेचा नि्श्वास टाकला.
|
Cana ilaihlaI Aahosa. ekdma vaogaLa ivaXaya AaiNa vaacakaMca AToMXana QaÉna zovaola Asaa. pNa evhZ\yaat saMplaI ka Æ Ôar ~ÜTk vaaTlaI..
|
saMplaI kuzo Ajauna.....Æ puZcaM ilahIt Asaola tI..... lavakr ilahI Ea² KrMca ]%saukta vaaZt caalalaI Aaho...
|
Shraddhak
| |
| Wednesday, March 09, 2005 - 5:00 am: |
| 
|
puNya AgaM saMplaI naahIyao AjaUna.... saMplaI kI samaaPt ilahIna maI² 
|
Aj_onnet
| |
| Wednesday, March 09, 2005 - 6:00 am: |
| 
|
EawaÊ Canaca ilahItoyasa. ekdma ]%kMzavaQa-k ..
|
Asa ka.. saÜ^rI ga... ilahI puZo pTapT 
|
Shriramb
| |
| Wednesday, March 09, 2005 - 9:51 am: |
| 
|
EaQdaÊ Cana ilaihilayasa.. Aata itcao Aa[ baabaa itcyaasaazI ek maulagaa pahNaar AaiNa %yaacaM naava saMyama maohra Aaho AsaM saaMgaNaar
kaÆ ³Aagaa]pNaaba_la xamasva²´
|
Shraddhak
| |
| Wednesday, March 09, 2005 - 10:31 am: |
| 
|
वर्षांमागून वर्षं निघून गेली. संयम मेहराचा विषय पुन्हा कधीही घरात निघाला नाही. आणि पुन्हा आयुष्य सुरळीत सुरु झाल्यावर आम्ही घडलेलं सगळं पूर्णपणे विसरून गेलो... मी आणि राधा! सावनी विसरली होती का? माहीत नाही, पण तिच्या वागण्यावरून आम्हाला कधीही ती संयमची वाट पाहत असेल असं वाटलं नाही. .... तिच्या चोविसाव्या वाढदिवसाला अजून एक आनंदाची गोष्ट घडली. मूळचा दिल्लीकर पण सध्या लंडनमध्ये स्थायिक असलेला माझा मित्र अशोक सोनी मला खास भेटायला म्हणून भारतात आला आणि त्याने त्याच्या मुलासाठी, ध्रुवसाठी सावनीला मागणी घातली. राधा आणि मी खूप खूश झालो. ध्रुव आणि सावनीची लहानपणापासूनची मैत्री! एकाच शाळेत होते ते दोघं... देखण्या, सुस्वभावी ध्रुवमध्ये नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. ... वाढदिवसाची गडबड संपली की सावनीशी या विषयावर बोलायचं, असं मी आणि राधाने ठरवून टाकलं. मी फ़ार खूश होतो. रात्री पार्टी संपल्यावर हॉलमध्ये एकटाच स्वत : शीच काहीतरी गुणगुणत बसलो होतो. सावनी आणि राधा आतमध्ये काहीतरी बोलत बसल्या होत्या. तेवढ्यात कुणीतरी TV लावला... " बरसों बीत गये हमको मिले बिछडे... " ते गाणं ऐकलं आणि मनाच्या तळाशी कुठेतरी असलेली संयम मेहराची आठवण उसळून वर आली. मी जबरदस्त दचकलो. सावनीकडे ध्रुवच्या प्रपोजलचा विषय काढणं मला एकाएकी कठीण वाटायला लागलं. सावनी अजूनही संयमची वाट पाहत असेल का? की तिनेही तो विषय मनातून काढून टाकला असेल? मला काही अंदाज बांधता येईना... शेवटी बराच विचार करून मी तिला पत्र लिहायचं ठरवलं... ती लहान असताना तिने मला घरातल्या घरात अशी कित्येक पत्रं लिहिली होती. मी तेव्हा बराच कामात बुडालेला असायचो. रात्री उशीर तर नेहमीचाच... मी घरी येईपर्यंत माझी सावी गाढ झोपलेली असायची... पण माझ्या स्टडीमध्ये टेबलवर तिचं पत्र माझी वाट पाहत असायचं... ' बाबा, माझी सायकल नीट चालत नाही. ती दुरुस्त करता येते का? नाहीतर आपण नवीन आणूया? ' ' आज आईने मला दुसरं आईस्क्रीम खाऊ दिलं नाही... समरमध्ये चालतं की नाही हो बाबा? आईला रागवा! ' ... मला ती पत्रं आठवून आत्तादेखील हसू येतं. राधाने आमचा हा पत्रव्यवहार अगदी नीट जपून ठेवलाय. वेळ जात नसला, सावीची आठवण आली की आम्ही दोघंही ती पत्रं काढून वाचत बसतो. ... विचार केला तसा कागद पेन पुढ्यात घेऊन मी तिला पत्र लिहायला बसलो खरा पण काय लिहावं ते मला खरंच सुचेना.... ' प्रिय सावी, आजचं पत्र पाहून नवल वाटेल नाही तुला? एकमेकांना असं घरातल्या घरात पत्रं लिहिणं आपण बरंच मागे बंद केलं नाही का गं? पण आज लिहितोय त्याला कारण ही तसंच आहे. सोनी अंकल तुझ्या वाढदिवसाला कशाला आले होते माहीतेय? त्यांना तू ध्रुवशी लग्न करावंस असं वाटतंय. ध्रुव एक छान मुलगा आहे आणि मला, राधालाही तो फ़ार आवडेल जावई म्हणून! बेटा, आजपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय तुझ्या मनाविरुद्ध घेतलेला नाही, म्हणून मी खरं तर या विषयावर तुझ्याशी प्रत्यक्ष बोलणार होतो... पण... एकदम तो तुझ्या अठराव्या वाढदिवसाचा प्रसंग आठवला गं! संयम मेहरा या मुलामुळे जे काही घडलं आणि तुला जो काही त्रास झाला त्याने मी पार हादरून गेलो होतो. बेटा माझा तुझ्यावर फ़ार जीव आहे. तुला परत मन : स्ताप होईल म्हणून तो विषय मी काढू इcछित नव्हतो पण वाटलं ' कदाचित तू संयमची अजूनही वाट पाहत असशील तर? ' म्हणून हा पत्रप्रपंच! ... बेटा तुझ्या मनात जे काही असेल ते मला निस्संकोचपणे सांग. काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझा, बाबा ' ..... धडधडत्या अंत : करणाने मी ते पत्र सावनीच्या रुममध्ये तिच्या टेबलवर ठेवून आलो. रात्रभर मी दुसर्या दिवशी घडणार्या कुठल्याही अनपेक्षित प्रसंगाला तोंड द्यायची तयारी करत होतो. रात्रभर माझा डोळ्याला डोळा लागला नाही. दुसर्या दिवशी सावनी नेहमीसारखी प्रसन्^न दिसत असलेली पाहून मला हायसं वाटलं. " बाबा तुमच्या पत्राचं उत्तर नेहमीच्या जागी ठेवलं आहे मी! " ती म्हणाली आणि तिला मैत्रिणींकडे जायचं होतं म्हणून घाई घाईने नाश्ता करून निघून गेली. राधाने माझ्याकडे पाहून " काय? " या अर्थी भुवया उंचावल्या पण तिला " सांगतो नंतर.. " एवढंच त्रोटक उत्तर देऊन मी लगबगीने सावनीचं पत्र वाचायला गेलो. सावनीने लिहिलं होतं... ' प्रिय बाबा, किती काळजी घेता तुम्ही माझी! मला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही किती जपता बाबा! I love you, Dad! बाबा, मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही. आपण नैनितालहून परत आलो तेव्हाही माझा विश्वास होता की संयम मला एक दिवस नक्की भेटेल. मी तुम्हाला न कळू देता त्याला शोधायचं ठरवलं. पण माझ्या शोधाची व्याप्ती बरीच मर्यादित होती. friends circle त्यांच्या ओळखीचे, त्यांचे नातेवाईक अश्या पद्धतीने मी संयमचा शोध घेऊन पाहिला. तुम्हाला हे कळू नये म्हणून मी जपत होते. नाहीतर तुम्ही आणि आई पुन्हा अस्वस्थ झाला असतात. माझ्या शोधाचं उत्तर शेवटी मला नकारार्थीच मिळालं तेव्हा मात्र मी थांबायचं ठरवलं. माझ्या भविष्याची तुम्हाला किती काळजी आहे ते मला माहीतेय. ध्रुव खूप चांगला आहे आणि तो मला खूप सुखात ठेवेल यावर माझा विश्वास आहे. माझी लग्नाला काहीही हरकत नाही बाबा! संयम कदाचित माझी फ़क्त एक कल्पना होती असंही तुम्हाला वाटेल कदाचित बाबा पण तो आहे यावर माझा आजही विश्वास आहे. पण त्यासाठी आयुष्यभर वाट बघून तुम्हाला दु : ख देण्याची माझी इcछा नाही. तुम्हाला माहीत नसेल कदाचित पण सोनी अंकल तुमच्याकडे हा रिश्ता घेऊन येणार हे मला ध्रुवने काही महिने आधीच सांगितलं होतं. त्याला माझं खरं मत जाणून घ्यायचं होतं. त्याच्याशी मी या दिवसांमध्ये जितकं मनमोकळेपणाने बोलले आणि त्याने मला जसं समजून घेतलं त्यावरून तो मला आवडायला लागला आहे बाबा! मी त्याच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला आहे. त्यात आता बदल होणार नाही. अगदी संयम मेहरा आला तरी! तुमची लाडकी, सावी .... सावीचं पत्र वाचून माझ्या डोळ्यांत पाणी आलं. आपली अल्लड चिमुरडी इतकी mature झाल्याचं पाहून मला खूप अभिमान वाटला! आता कसलाच प्रश्न नव्हता. सावीने स्वत : लग्नाला परवानगी दिली होती. .... जराही वेळ न दवडता मी आणि राधा लग्नाच्या तयारीला लागलो. दोन महिन्यांमध्ये सावनीचं ध्रुवसोबत लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडलं. राधाच्या आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. आयुष्यातली शेवटची मोठी जबाबदारी संपली होती. .... आज सावी लंडनला जायला निघणार होती. आदल्या दिवसापासून घरात नुसती धांदल चालली होती. माझे आणि राधाचे डोळे सारखे भरून येत होते. ... एअरपोर्टवर आम्हाला बिलगून रडणार्या सावनीचा हात मी ध्रुवच्या हाती दिला आणि अश्रूभरल्या डोळ्यांनी सावनीची पाठवणी केली. ... जड अंत : करणाने घरी परतलो. काहीच करायची इcछा होत नव्हती. तेवढ्यात विनोदने निरोप आणला. "There's somebody waiting to see you, sir!" का कोण जाणे पण काळजाचा एक ठोका चुकला. मला वाटून गेलं I know who is waiting! मी visitors' room मध्ये गेलो. एक देखणा मुलगा सोफ़्यावर बसून माझी वाट पाहत होता... मी आत गेलो तसा तो चटकन उभा राहिला आणि छानसं हसला... त्याच्या दोन्ही गालांवर खळ्या पडल्या..... " हॅलो अंकल.... मी संयम मेहरा...... " सांगायची गरज उरली नव्हती खरं तर... मी अंगातलं सगळं त्राण गेल्यासारखा खुर्चीचा आधार घेत खाली बसलो.
|
Santoshi
| |
| Wednesday, March 09, 2005 - 11:20 am: |
| 
|
Eawa kqaa AgadI mastca jamalaI Aaho. evaZ\yaa p`itxaonanaMtr saMyama maohra Aalaaya maa~ vaacakaMcaa saMyama
saMplaaya ... puZIla Baaga lavakr yaovaU do.
|
vaah vaah ² AgadI ihMdI isanaomaa sTala caalala Aaho ² lavakr ilahI puZca ² mast ilaihto Aahosa.. 
|
Jit
| |
| Wednesday, March 09, 2005 - 11:30 am: |
| 
|
come on Shra, we are waiting
|
Cana caalau Aaho ga EaQda ....
|
Shraddhak
| |
| Wednesday, March 09, 2005 - 11:33 am: |
| 
|
हे काहीतरी विचित्र घडत होतं. ती पूर्वजन्म, पुनर्जन्माची थियरी खरी असू शकते यावर माझा विश्वास कधीच बसला नसता, अजूनही बसत नव्हता. पण माझ्या अविश्वासाला आव्हान म्हणून संयम मेहरा माझ्यासमोर उभा राहिला होता. सावनीने एकदा वर्णन केलं होतं हुबेहूब तसाच होता तो... पण माझं मन या विचित्र थियरीला मानायला तयार नव्हतं. " अंकल, हे सगळं विचित्र आहे हे मलाही माहीतेय.. माझ्या घरच्यांचा सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसलेला नाहीय. पण फ़क्त सावनीच्या ओढीने मी US हून तिला शोधत आलो आहे. " " तू खोटं बोलतो आहेस! तू सावनीच्या मागे लागला असावास आणि तिला त्रास देण्यासाठी आज मुद्दाम इथे आला असावास! मी ह्या पुनर्जन्म वगैरे भाकड कथांना मानत नाही. " मी उसनं अवसान आणून त्याला म्हणालो. " अंकल, मला माहीत होतं तुम्ही या गोष्टीला मानायला नकार द्याल ते! मी जन्मलो आणि वाढलो अमेरिकेत... आज मी पहिल्यांदाच भारतात येतो आहे तेही फ़क्त सावनीसाठी! आणि मी आवश्यक ते कागदपत्रं सोबत घेऊन आलो आहे, मीच संयम मेहरा हे पटवण्यासाठी. अजून एक विचारतो, सावनीला तिच्या अठराव्या वाढदिवसाच्या आसपास पुष्कळ मानसिक त्रास झाला होता का? " .... सहा वर्षांपूर्वीचे ते दिवस मला लख्ख आठवले. ' संयमला काहीतरी झालं ' म्हणून रडत उठलेली माझी सावी! " मला बाईक अतिशय रॅश चालवायची सवय होती तेव्हा. एकदा असाच मित्रांबरोबर पार्टीहून परत येत असताना मला ऍक्सिडेंट झाला. तेव्हा अर्धवट बेशुद्धावस्थेतदेखील का कोण जाणे मी फ़क्त सावनीचंच नाव घेत होतो. " तो शांतपणे बोलत होता. त्या साक्षीपुराव्यांची खरंतर गरज नव्हती. तो मुलगा खोटं सांगत नाहीये ह्याची मला खात्री होती. " सावनी कुठे आहे अंकल? " त्याने विचारलेल्या प्रश्नानी मी भानावर आलो. त्याला काय उत्तर द्यावं हा माझ्यापुढे यक्षप्रश्न होता. शेवटी सगळा धीर एकवटून मी त्याला खरं काय ते सांगितलं... "Oh my god! का केलंत तुम्ही असं? का केलीत इतकी घाई, अंकल? " त्याचा गोरापान चेहरा लाल झाला होता. त्याच्या मनात केवढी खळबळ माजली असेल याची मला कल्पना येत होती. " बेटा मी तुम्हा दोघांचा अपराधी आहे असं समज हवं तर पण ही चूक सुधारणं मला आता शक्य नाही. सावनीचं लग्न झालं बेटा.... आणि आता तिला तुझ्याबद्दल सांगून तिच्या नुकत्याच सुरु झालेल्या संसारात वादळ निर्माण करायची माझी इcछा नाही. ........आणि जमलं तर तूही माझ्यावर एक एहसान कर... तू सुद्धा तिला कधीही कॉंटॅक्ट करू नकोस. " त्याची नजर चुकवत मी कसाबसा बोललो. ... तो कितीतरी वेळ सुन्^नपणे तसाच बसून राहिला.... " अंकल, मी प्रॉमिस करतो की सावनीला मी कधीही कॉंटॅक्ट करणार नाही. येतो मी... " तो निघून गेल्याचंही मला कळलं नाही. सगळ्या संवेदना जणू बधीर झाल्या होत्या. ..... संयमने दिलेला शब्द पाळला. माझं मन त्यानंतर कित्येक महिने धास्तावलेलं होतं. संयमने सावनीला contact करायचा प्रयत्न केला तर? सावनीशी फ़ोनवर बोलताना मला प्रचंड ताण येई. पण त्याने कधीही तिला फोन करायचा, भेटायचा प्रयत्न केला नाही. तो खरोखर आमच्या विश्वातून कायमचा निघून गेला. ... आज खूप काळ लोटला आहे. संयमची आठवण बरीच मागे पडली आहे. राधालादेखील तो भेटल्याचं मी अजून सांगू शकलेलो नाही, सावनीला सांगणं तर दूरच! पण हे ओझं ज्या दिवशी असह्य होईल त्या दिवशी दोघींनाही सांगेन. वाटल्यास सावीची क्षमा मागेन. किमान मरणाआधी एवढं धैर्य मला यावं अशी इcछा आहे. ... पण आजच्या माल रोडवरच्या प्रसंगासारखं काही घडलं की संयमची आठवण येते, त्याचं ते लाघवी हसू आठवतं.... आणि त्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो... " हॅलो अंकल, मी संयम मेहरा.... " ...समाप्त
|
Prajaktad
| |
| Wednesday, March 09, 2005 - 12:02 pm: |
| 
|
shardha! sundar aahe katha!
|
%yaa saMyama ca lagna Jaala kaÆ mhNajao dusayaa- kuNaa maulaIXaI Æ naahItr eKad dÜna maayabaÜlaIkrINaI
Aahot tyaar ² ³maI nhvao.. AaiQaca @laIAr krto ²´ idvaa Gyaa gaÜYT Cana jamalaI ga
|
Arch
| |
| Wednesday, March 09, 2005 - 12:31 pm: |
| 
|
EaQdaÊ Canaca ilahIlaI Aahosa hM. AjaUna vaacat rhavaI Asa vaaTt Asatanaaca saMpvalaIsa. Asa ilaihNaM
AvaGaD Asat. manaapasaUna saaMgatoÊ pTkqaa ilahayalaa hrkt naahI tulaa. 
|
Maitri
| |
| Wednesday, March 09, 2005 - 12:36 pm: |
| 
|
shraddha, surekhacha jamaliya ga goshta. Avadali far.
|
puNyaÊ Aata saavanaI ha ID jaI Gaola itcaM lagna EaQda k$na dola saMyamaXaI.. EaÊ gaÜYT AavaDlaI
|
EaQdaÊ Cana hÜtI kqaaÊ saMyama caa episode qaÜDa maÜza Gaotlaa Asata Ar Ajauna Cana vaaTlao Asato
|
Gandhar
| |
| Wednesday, March 09, 2005 - 1:12 pm: |
| 
|
Eawo gaÜYT Ja@kasa jamalaIya... KrMca kqaotIla pa~ ijavaMt hÜ}na DÜL\yaasamaÜr yaot hÜtI gaÜYT vaacatanaa.. sahI..
|
|
|