Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 14, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » विनोदी साहित्य » विडंबन » Archive through March 14, 2007 « Previous Next »

Keshavasumaar
Friday, March 09, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची प्रेरणा जयश्री अंबासकर यांची सुंदर गझल "ऋतू येत होते ऋतू जात होते"

तशी रोज मी घेत रात्रीत होते
तरी तर्र मी एक पेल्यात होते

सखा आज येणार माहीत होते
उभी घेउनी झाडु दारात होते

तिन्ही सांज झाली तरी आठवेना
तिची कोणत्या गाठ गुत्त्यात होते

इथे गंध आता बघा रोज येतो
पुन्हा तुंबलेले गटारात होते

कशाला अश्या घालता या विजारी
फजीती कशी चारचौघात होते

म्हणे "केशवा" 'रेव' पार्टीत होता
परी नाव ना सभ्य लोकात होते

केशवसुमार



Chinnu
Friday, March 09, 2007 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, विडंबन म्हणजे हसण्याचा प्रकार हा माझा गैरसमज दूर केलास. तीन दगड आणि पोटात न पडलेले घास करुण करुन झाले रे! तशी पौर्णिमेच मुजोरी आणि कसा गंध दिलासादायक!
विन्या अगदी हहपुवा. नवर्‍याला ऐकवली translate करुन. फार हसलो दोन्ही! भज्यांची आमरसातले चुरे, सुंगधी फ़ोडणी, मसालेदार बटाटे नी चिकनतंदूरीचा मतला वाह अगदी खमंग झालिये गझल! :-)
केशव, सखा आज येणार.. आणि इथे गंध.. बरे आहेत.


Deepstambh
Friday, March 09, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा केश्या.. मित्रा.. तोडलंस रे..!!!

वाटत नाही हा तुझा पहिलाच प्रयत्न आहे (खरं सांग).. अगदी एअर ढक्कन झेप आहे ही.. महाराष्ट्र विद्युत मंडळ नवीन मीटर देणार आहे तरीही तू मीटर छान वापरला आहेस..

इथे गंध आता बघा रोज येतो
पुन्हा तुंबलेले गटारात होते


हे तर अगदी अप्रतीम.. तुझ्या भावना अगदी नाकापर्यंत गेल्या.. तू लगेच पुण्याचे विद्यमान आयुक्त करीर यांचेकडे याबद्दल लेखी तकरीर केली पाहीजे.. आधी खड्डे.. आता तुंबलेली गटारेऽऽऽ???

मक्तासुद्धा छान आहे .. यावरुन स्पष्ट होते की मक्त्यावर कोणाचा मक्ता नाही.. मतल्याने तर एकदम मजला गाठला आहे.. आणि ज़मीनने आसमान.. तरीही गज़ल down to earth झाली आहे..

तशी रोज मी घेत रात्रीत होते
तरी तर्र मी एक पेल्यात होते

सखा आज येणार माहीत होते
उभी घेउनी झाडु दारात होते


पहिल्या शेरात नायीका रोज रात्री घेऊन तर्र होते असा अर्थ ध्वनित होतो.. मग दुसर्‍या शेरात बिचार्‍या सख्याचे झाडुने स्वागत का..?? तो थोडीच तर्र होता..?? ती तर्र होवुन रोज त्याला अशी झोडु लागली तर बिचारा जर्जर होईल..

सखा आज येणार माहीत होते
पडूनी पलंगी मिंट मी खात होते..


सानी मिसरा (दुसरी ओळ) मध्ये असा बदल केल्यास उला मिसरा शी (पहिली ओळ) जास्त कनेक्ट होते का?? इथे मी 'पडुनी' ऐवजी 'पडूनी' घ्यायचे स्वातंत्र्य घेतले आहे.. कारण भारतात लोकशाही आहे आणि भारत माझा देश आहे... सारे भारतीय माझे भाऊ आहेत आणि ते भाऊबंदकी करणार नाहीत.. अर्थात हे सर्व माझा आगाऊपणा..

तसेच 'सखा' या शब्दात 'खा' गुरु आल्याने 'स' वर आघात होतोय.. बिचारा 'स'.. किती आघात सहन करतोय..?? त्याला 'सका' केले तर..?? पण असा काही शब्द आहे का..?? मला तर त्यामुळे स. का. पाटीलच आठवतायत..

चुभूद्याघ्या


Disha013
Friday, March 09, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आईशप्पथ! काय एकेक कसलेले विडंबनकार आहेत
इथे आले आणि हसले नाही, असे कधीच घडले नाही!


Zakasrao
Friday, March 09, 2007 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केशवसुमार तुमच विडंबन अफ़लातुन आहे.
दिप्या sssssssssss तु मोकाट सुटला आहेस. आता तुझ काही खर नाही. तु कोणालाहि सोडल नाहिस.


Milya
Saturday, March 10, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही दिप्या...

ह्याला हस्लाह म्हणावा का?

Rhasva_bee
Monday, March 12, 2007 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर हे विडंबन नाही. मूळ कविताच आहे. पण विषय असा आहे की गझल कार्यशाळेत शोभून दिसणार नाही.
"ऋतू येत होते", हे वाचलं आणि चक्क मला ऋतुंचं, हुतूतूचं आणि प्रेमाचं नातं सापडलं :-)

ऋतू येत होते, ऋतू जात होते
हुतूतू म्हणावे, कि प्रेमात होते?

कधी तालुका तर कधी राज्य स्पर्धा
गुदस्ता प्रमाणेच यंदाही होते

जरी दृष्टिला दृष्टि भिडते जराशी
तरी मूळ आव्हान स्पर्शात होते

हरत्या मनाचा, निश्वास साथी
जिंकायचे मर्म श्वासात होते.


Milya
Monday, March 12, 2007 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक
ऋतू येत होते ऋतू जात होते

मिल्याची माफ़ी मागुन

ऋतू येत होते ऋतू जात होते
तरी तेच ते वाद अमुच्यात होते

नजर खिळविता पूर्ण घायाळ झालो
सखे, सख्य चप्पल नि गालात होते

मुकी राहुनी ही किती बोलली ती
निखारे जणू तप्त डोळ्यात होते

अता सर्वथा नासला जन्म माझा
तिचे मतलबी श्वास श्वासात होते

रुढींची वृथा ना तमा बाळगे ती
मला चोप द्याया तिचे हात होते

तिच्या पासुनी वेगळे मज करावे
असे आमचे अर्ज कोर्टात होते


Psg
Monday, March 12, 2007 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

र्‍हस्व बी, मस्त आहे! तिसरा आणि चौथा शेर खरच छान..

मिल्या.. हा शेर वेगळा (बरा) होऊ शकला असता का?-
नजर खिळविता पूर्ण घायाळ झालो
सखे, सख्य चप्पल नि गालात होते

बाकी, सही.. मक्ता तर LOL ! :-)


Nakul
Monday, March 12, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या जियो सही मक्ता फ़ारच भन्नट

Devdattag
Monday, March 12, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, केशव सुमार, दिप्या..
चिन्नु..:-).. मला पण आधी विडंबन विनोदीच वाटायचं.. पण मी जे लिहिलय त्यामुळे माझ्या या कन्सेप्ट्सचा बोर्या वाजला..:-)
खरंतर कुठे टाकु सुचल नाही म्हणून इथे टाकल..:-)


Keshavasumaar
Monday, March 12, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची प्रेरणा श्यामली यांची गझल

ऋतू येत होते, ऋतू जात होते
कशी नेहमी मीच गोत्यात होते

तुझा खेळ झाला पुन्हा पावसाचा
अता वाहते नीर नाकात होते

उसाच्या रसा काढण्या वेळ झाला
तुला वाटले मी गरे खात होते

इथे कोण माझी न तक्रार करतो
(तसे सर्व साहेब नात्यात होते)

कितीदा रडीने पुन्हा खेळ मोडू?
असे फालतू डाव हातात होते

अता "केशवा" हे उगा दाखले का?
तुझ्या कोठल्या त्राण काव्यात होते?

केशवसुमार


Sanghamitra
Monday, March 12, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केशवसुमार सही
>>> सखा आज येणार माहीत होते
उभी घेउनी झाडु दारात होते

कितीदा रडीने पुन्हा खेळ मोडू?
असे फालतू डाव हातात होते
हहपुवा

आणि दिप्या झाला का सुरू?
मीटर :-)

>> पडूनी पलंगी मिंट मी खात होते..


Rahulphatak
Monday, March 12, 2007 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पडूनी पलंगी मिंट मी खात होते.. >>
दिप्या !!!! चौफेर सुटला आहेस !!!!

मिल्या :-), हा विषय म्हणजे तुझं घरचं कार्य आहे अगदी !!! :-)


Chinnu
Monday, March 12, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या दणदणीत अगदी. फ़क्त ते नासला जन्म कसतरी वाटलं. बाकी सहीच!
दीप्स :-)
केशव, हे विडंबन चांगले आले.


Paragkan
Monday, March 12, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

milya and Ke.su. ... jhakaas re !

Rhasvabee -- good one!

Zakasrao
Monday, March 12, 2007 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या तु आधी विडंबन आणि नंतर गजल लिहली आहेस असेच वाटते आहे. फ़र्मास जमलय.

Keshavasumaar
Tuesday, March 13, 2007 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची प्रेरणा मिलिंद छत्रे ( मिल्या ) यांची गझल ऋतू येत होते ऋतू जात होते


ऋतू येत होते ऋतू जात होते
कुठे आज माधुर्य प्रेमात होते

नजर भिडविता सांग कोठे बघावे
जरा मांडणी दोष डोळ्यात होते

मुकी राहुनीही कशी बोलली ती?
उतरले तिच्या शब्द जोड्यात होते

असा व्यर्थ हा चालला जन्म माझा
तिचे नेहमी ओठ बुर्ख्यात होते

रुढींची जरा तू तमा बाळगावी
मला सांग त्याचे कुठे हात होते ?

तिच्यापासुनी वेगळे मज करा हो
कुठे एवढे धैर्य माझ्यात होते ?

केशवसुमार


Bairagee
Tuesday, March 13, 2007 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केशवा,
नजर भिडविता सांग कोठे बघावे
जरा मांडणीदोष डोळ्यात होते
हाहाहाहाहा.

मिल्या, 'अमुच्यात'पासून 'कोर्टात'पर्यंत अख्खे विडंबन आवडले. झकास, सफाईदार!!!!!:-):-):-)

दीपस्तंभ लई भारी!
"मक्तासुद्धा छान आहे .. यावरुन स्पष्ट होते की मक्त्यावर कोणाचा मक्ता नाही.. मतल्याने तर एकदम मजला गाठला आहे.. आणि ज़मीनने आसमान.. तरीही गज़ल
down to earth झाली आहे.. "

हाहाहाहाहाह :-):-):-)::-)):-)))))):-):-):-)

"तसेच 'सखा' या शब्दात 'खा' गुरु आल्याने 'स' वर आघात होतोय.. बिचारा 'स'.. किती आघात सहन करतोय..?? त्याला 'सका' केले तर..?? पण असा काही शब्द आहे का..?? मला तर त्यामुळे स. का. पाटीलच आठवतायत.. "

हाहाहाहाहा.


Zakasrao
Wednesday, March 14, 2007 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत एकदा गजल कार्यशाळेची कल्पना प्रत्यक्षात आणणार्‍या सर्वाना अभिवादन कारण बिडंबन खुप दिवसांनी बहरलय. केशवा good again




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators