|
Meenu
| |
| Monday, March 12, 2007 - 6:15 am: |
| 
|
नीलकांती नक्की काय प्रश्न पडलाय ..? कळला नाही ..
|
Manogat
| |
| Monday, March 12, 2007 - 9:55 am: |
| 
|
आठवणिंच्या गावाभोवति, काळाच रान आहे, हरवलेली वाट शोधत, भाबडे मन हैरान आहे. असता भुतकाल हा, वाटे वर्तमान आहे, बितुन गेलेल्या वाटेची, शोधते मी पाउलवाट आहे. बोचते वाटे तिल काटे, वेदनांनच ठाव नाही, वेड्या मना कसे सांगु, इथे अस्तित्वाशि नात नही. समजाउ कसे मना, नाही सरणार ही रात, काळाच्या आंधारात हरवलेली, नाहि गवसणार आठवाच्या गावचि ति वाट.
|
मनोगत कविता अजुन चांगली होऊ शकते. शब्द योजनेमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. पहिलं कडवं ठिक. दुस-या कडव्यात 'बितुन गेलेल्या वाटेची, शोधते मी पाउलवाट आहे' इथे 'वाट' हा उल्लेख दोनदा(पहिला आणि पाऊलवाट) कशाला?हे पूर्ण कडवं बदलता आलं तर बघा.'बितुन' हे मराठीत चालते का? तिस-या कडव्यात्-- 'वेड्या मना कसे सांगु, तुझ्या अस्तित्वाचे नाव नाही!' हे कसं वाटेल? शेवटच्या कडव्यात जरा गडबड झाली आहे. 'काळाच्या अंधारात' असं लांबलचक लिहिण्यापेक्षा 'काळोखात' असं लिहून पटकन मोकळं होणं चांगलं. असं केलं तर कसं वाटेल्-- 'नाही सरणार रात ही कसे समजाऊ मनाला? काळोखात हरवत जाते ही वाट क्षणाक्षणाला!' चू.भू.दे.घे. शूभेच्छा!
|
Chinnu
| |
| Monday, March 12, 2007 - 10:55 am: |
| 
|
माणिक, जीवनाशी लढू शकलो पण तुझ्या आठवांशी लढू शकत नाही, हे छान. ओळी मध्येच तोडू नकोस मित्रा. चार ओळींपेक्षा दोन ओळीत लिहिले तर बरे. शिल्पा तुझा प्रयत्न चांगला आहे. पण शुद्ध लिहीणेदेखिल महत्वाचे ग. बितुन गेलेली वाट म्हणजे काय? नीलुताई, इथे जे काही पोस्ट होईल, ते किमान तरी चांगले आहे का, हा विचार करुन प्रत्येकाने पोस्ट केले पाहिजे. इथे उत्तम प्रतीचे साहित्य सतत वाचायला मिळावे, हाच एक सद्-हेतु या मागे आहे. काही लोक इथे पोस्ट करतांना हे विचारात घेत नाहीत, बस, अजून काही नाही.
|
माणिक.. ओळी का तोडतोस हे खरेच समजत नाही रे. चिन्नू... पण पोस्ट केल्या शिवाय कसे समजणार जे लिहिलं ते उत्तम की चांगले की बरे की सुमार... पहिल्याच झटक्यात प्रतिभेचा साक्षात्कार होण्यास वाल्मीकीचा जन्म घ्यावा लागेल.
|
Chinnu
| |
| Monday, March 12, 2007 - 11:35 am: |
| 
|
मयुर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मी किमान निकष लावून पहा, असे म्हटले ना. आपण लिहिलेले निदान आपल्याला आवडले आहे का, एवढे जाणून घेवुन पोस्टले तरी चालेल. मागे कुणी तरी म्हटले होते. मायबोली कुणाची रफ़ वही नाही म्हणुन. असो चांगले लिहीत जावे आणि चांगले वाचत जावे, इतकेच म्हणणे. परत वाद नको बाबा.
|
खरे ग खरे! अगदी खरे! समोर नदी वहाते आहे.. म्हणून 'अलिकडून पलिकडे जायचे'.. असं म्हणायचं.. पण नदीच नसेल तर... अलिकडे पलिकडे एकच नाही का..? दुःखाच्या पलिकडे एक सुख असतं... आणि सुखाच्या पलिकडे सुखातलं एक सुख असतं... आणि त्याची मला ओढ लागलीय... हे आणि असेच शब्द जवळिक साधतात... जे गवसलं ते 'अनुभव' म्हणून भूतकाळात जमा करता येत नाही... आणि 'गंगाजळी' म्हणून भविष्याची तरतूद करता येत नाही... उरतो तो फक्त 'वर्तमान'... कारण तो तोच असतो... आणि ते भावल्यावर सगळच संपतं... किंवा मग 'सगळंच असतं'... का... कसे... कुठे... कधी... प्रश्नचिन्हातले फक्त पूर्णविराम उरतात.... सगळंच शांत शांत असतं... पंचेंद्रियांच्या जाणिवांनी कितीही अनाकलनीय कोडी घातली... तरी त्याना साधं सरळ सोपं रूप देऊन अंतिम उत्तर शोधून काढणारं एक सहावं इंद्रिय कार्यान्वित असंतं.... समुद्रमंथनातून काय मिळालं... विष आणि अमृत... तर प्रलयानंतरच्या या शांतपणातून काय निघालं.... एक मोकळं हास्य.... कि जे माझ्यातून बाहेर पडतंय कि मी त्याच्यातून... इतके एकजीव... 'मी' हासुद्धा खूप उपरा वाटतो... शब्द खूपच गोंधळ करतात... वापरल्यावर जे म्हणायचं आहे... त्यातंच विरून जातात....
|
तिला स्वप्न पडलं होतं.... अथांग पसरलेल्या समुद्राचं... डोळे काठोकाठ भरून गेले होते... स्वप्नातल्या समुद्रानं.... पाऊस पडत होता भिरभिर... त्या अथांग जलाशयात कणाकणानी भर टाकताना... केविलवाणा... बापुडवाणा....
|
नीलू ताई किती सहजपणे बोलुन जाता... त्याची कविता होते...
|
Naveen
| |
| Tuesday, March 13, 2007 - 12:16 am: |
| 
|
नीलकांती केवळ अप्रतिम कविता आहेत. नवीन
|
Manogat
| |
| Tuesday, March 13, 2007 - 1:29 am: |
| 
|
मयुर, Thanks for guidence and commments definitely I'll take care of this things next time. चिनु, मला तुझ म्हणण पटत, but I am very new to this feild and I thought "चुका आणि शिका" will be best, but definitely next time I'll take care while posting. The things I have to post is up to the mark. Thanks all
|
ती... अस्वस्थ... एकटी... कंटाळलेली... मन विवस्त्र करता करताच... थकून गेलेली....
|
प्रत्येक गोष्टीचंच होणं.... न होणं.... असणं... न असणं ...(नासणं...?)... प्रथम सोयीमुळे.... नंतर सवयीमुळे...
|
नीलू ताई , छान कविता!
|
Jayavi
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:30 am: |
| 
|
नीलुताई..... तुमचे शब्द अगदी आतपर्यंत पोचतात हो..... फ़ार फ़ार सुरेख लिहिता तुम्ही
|
Mankya
| |
| Tuesday, March 13, 2007 - 5:05 am: |
| 
|
नीलकांती ... बरसलीयेस की अन तेही सुरेख ... अगदि आर पार हो ! धन्यवाद ... मयुरा आणि चिन्नू .. आता हे बघा बरं ! जाणता अजाणता सरला किती काल हरवली गवसली लय अन कळतोय ताल शहारती अंग सुरासंगे नकळत अश्रू संततधार तुझ्या सहवासात आळवला सिद्ध झाला मल्हार मिळून सारु सखे कटू आठवणींना दूर राग उभा करण्यासाठी जसे वर्ज्य काहि सूर साकार आरोह अवरोह सवे तुझ्या गीता एश्वर्य सूर ताल जीवना तुझा सहभाग, सहभोग, सहचर्य ! माणिक !
|
Sumedhap
| |
| Tuesday, March 13, 2007 - 5:18 am: |
| 
|
निलकांती.......फ़ार सुरेख कविता आहे....शब्दरचना तर खुप आवडली.. वापरल्यावर जे म्हणायचे आहे त्यातच विरुन जातात.....खुपच छान!!!!!!!!
|
नाती... नाती...म्हणजे काय...ग.. न अति ती नाती... नेमकंच असं काहीच नसावं... पण नेमकं सगळं काही असावं... तळ्यातून मळ्यात पाया लागे... चिखल... चिखल... मळ्यातून तळ्यात... नाते विहरे... नितळ... नितळ...
|
जाणता अजाणता सरला किती काल हरवली गवसली लय अन कळतोय ताल वाटलं असं असावं... 'जाणता अजाणता कधी सरला ग काल... हरवली सय... गवसेना लय... ताल बेताल बेताल...
|
एक आप है जो ख़यालोमें भी खफ़ा होते हैं हमसे.. एक हम है जो ख़फ़ाओंके ख़यालातमें डूबा करते हैं तनहा...
|
|
|