Manogat
| |
| Tuesday, March 13, 2007 - 5:33 am: |
| 
|
असे तर मनात बरेच विचार गोंधळ घालतात पण कागदावर उतरवतांना नेहमिच विस्कळतात. या विचारांना एकजुट करुन बनत ते या मनाच मनोगत. शब्दात विचारांना खेळवतांना भावनांनचा गुंथा होतो मग हेच मनोगत या गुंथ्याच प्रेक्षक बनत. कधितरि वाटत नुस्त अस लिहितच बसाव आपल्या मध्ये स्वता:ला अस नुस्त हरवुन आपल्याच विश्वात रममाण व्हाव. विचारात रममाण होतांना मन शब्दांनि बेभान व्हाव आणि शब्दा मागुन शब्द अस नुस्त कागदावर त्यान उतरवत जाव. किति सरस अस हे "शब्द " कितिहि छोटी किंवा मोठी असो याची जडन घडन पण याच्या प्रत्येक घडनेत आहे गहरा अर्थ.या अर्थानिच तर बनतात या जीवनाचि वाक्य. विचारांच रुपांतर वाक्यात होत अणि वाक्यच शब्दात अणि त्याच्या अर्थात.प्रत्येक अर्थाची शब्दाशी पक्कि दोस्ति आहे अणि म्हणुन नेहमिच वाक्याचि त्यांच्या जवळ उधारि आहे. वक्यान ला नेहमिच गरज पडते शब्दांचि, अर्थांशि नात तोडल तर निरर्थक म्हणुन अवहेलना होते त्यांचि. म्हणुन वाक्यांनी नेहमिच त्रिकुट बनवुन चालल तर बनत संपुर्ण वाक्य वाक्यान ना बोलक करतात शब्द पण शब्दांना बोलक करतात अर्थ वक्या असो प्रेमाचि कि रागाचि शब्दां शिवाय कधिच मिळत नाहि त्यांना पुंजि अर्थाचि. रागातल्या प्रत्येक शब्दाला बरीच गोंधळलेले अर्थ असतात पण प्रेमातल्या प्रत्येक शब्दाल प्रेम हाच एक अर्थ ठाउक असतो म्हणुन अर्थाला प्रेमाच्या गावि कमि वाव असतो शब्द अणि अर्थ यांची जर सांगड अचुक असेल तर यातुन घडणा-या प्रत्येक वाक्याला श्रावणातील बहर असेल म्हण्जेच जसे ति हिरविगार बहर मन मोहुन घेते तसेच ते वाक्य ऐकुन मन बहरुन जाइल.
|