|
Psg
| |
| Thursday, March 08, 2007 - 6:26 am: |
| 
|
जागतिक महिला दिन आज १ मार्च. पूनमनी दिनदर्शिकेचं पान उलटलं. या महिन्यात काय काय कधीकधी आहे बरं? अरे होळी परवाच.. गूळ आहे का घरात? जाऊदे या वेळी पोळ्या विकतच आणू.. म्हणजे रंगपंचमी आलीच. देवा! छोट्याच्या शाळेत, घरी सगळीकडे रंगणार हा. सर्दीचे औषध आहे का? हो, corex आहे. पुढे.. हे काय आहे ८ मार्चला? अगबाई 'जागतिक महिला दिन'? हे आणि काय नवीन? हंहं International Women's Day नाही का? Pond's ची जाहिरात नाही का लागत? करायचा का या वेळी महिला दिन celebrate? पूनमच्या डोक्यात एखादी आयडीया आली की तिला स्वस्थ बसवत नसे. सकाळची कामं आवरत आवरत तिने मनातच celebration ची रूपरेषा तयार केली आणि उत्साहात ऑफ़िसला पोचली. रूटीन काम संपवलं आणि उचललाच फोन. सगळ्या मैत्रिणी आत्तापर्यंत त्यांच्या त्यांच्या ऑफ़िसला पोचल्या होत्याच. श्रद्धा, मीनु, डीमडू, स्वाती, लालू, डीजे, मृण्मयी.. कोरम फ़ुल्ल. सगळ्यांनीच उत्साहानी होकार दिला. तिचीच आयडीया होती ना, त्यामुळे हिट असणारच ती अश्या गोड गैरसमजात तरंगायला लागली ती. तर प्लॅन असा होता.. महिला दिन गुरुवारी होता, पण सगळ्यांच्या सोयीचा म्हणून शुक्रवारी संध्याकाळी भेटायचे. ऑफ़िस सुटले की थेट पूनमकडेच यायचे. मुलं, नवरा यांची काळजी करायची नाही. त्यांचं ते बघतील एक दिवस. बायको/ आई नसली कीच त्यांची किम्मत समजते नाहीतरी.. सो, अश्या सगळ्या जमल्या की पोट भरेस्तोवर गप्पा, बाहेरूनच खाणे (पीणे ऐच्छिक, तयारी होती!) मागवायचे, स्वयंपाकघरात म्हणून शिरायचे नाही, सिनेमा पहायचा आणि गप्पा, कुचाळक्या, गॉसिप.. वा वा वा.. नुसत्या आयडीयाच्या कल्पनेनीच सगळ्या उल्हसित वगैरे झाल्या होत्या.. पूनम तर तरंगतच होती.. एका झटक्यात सगळ्यांनी ऐकलं तिचं.. हे कसं काय? खरं तर तिला आश्चर्यच वाटत होतं, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.. तिने नवर्याला फोन लावला आणि प्लॅन सांगितला.. अरे वा वगैरे म्हणला तो, त्यानेही चक्क काहीच शंका काढल्या नाहित. उलट म्हणला बरं झालं. त्यांचाही 'बुधवार' राहिला होताच, तो करू कोणाकडेतरी.. छोट्याला आईकडे पाठवता आलं असतं.. नाहीतरी आजोळी जायला कुठे मिळतय नातवंडांना नाही का? नंतर अखंड चार दिवस या बायका सतत म्हणजे सतत एकमेकींशी बोलत होत्या, मेल करत होत्या, ऑरकूटावर तर इतक्या की बाकी लोकांनी यांना स्क्रॅप करणेच सोडून दिले! कितीऽऽऽऽऽ चर्चा.. अगदी काय खायचं, कोणी काय आणायचं, सिनेमा कोणता, कोणाच्या नवर्याचं काय म्हणणं होतं, कोणाची सासू कशी टोमणे मारत होती, कोणी मुलांची सोय कुठे केली, कोणी कसे 'त्या दिवशी अडायला नको घरच्यांचं' म्हणून पुष्कळ खाऊ करून ठेवला होता... एक ना अनेक. बडबड.. अखंड न संपणारी बडबड नुसती! मग हळुहळू बाँब पडायला सुरुवात झाली.. तारिख ८ मार्च सकाळ.. वेळ १०.३०. श्रद्धाचा पूनमला फोन "अगं उद्याच रंगपंचमी.. माझ्या लक्षातच नाही.. अगं ही आमची पहिलीच रंगपंचमी ना.. आईने बोलावलय गं उद्या.. आणि 'हा' पण म्हणाला.. 'पहिल्याच रंगपंचमीला मला सोडून मैत्रिणींकडे जाणार तू?'" "अरे देवा! मग गं?" "हो ना गं.. मी असं येणं, त्याचं मन मोडून येणं नको वाटतं ना.. एक वेळ मी आईला सांगीन, पण 'याला'.. त्याचं पण बरोबरच आहे ना.. पहिलीच रंगपंचमी ना.." "अगं पण येवढं काय?" "नको गं, मला नाही जमणार गं यायला उद्या.. सॉरी.." यानंतर पूनमची प्रचंड सरबत्ती सुरू होईल हे श्रद्धाला माहित होतेच, म्हणून तिने पटकन फोन ठेवून दिला! पूनमची चिडचिड झाली होतीच. पण म्हणली ठीक आहे. नवीन लग्न झालेले आहे. साहजिक आहे. आमचं बघा.. एक दिवस बायको नसली तर आनंदच होतो यांना.. तिने मेलबॉक्स उघडला.. मीनूची मेल.. ती कविता बिविता पानपानभर करायची बरका, पण मेल म्हणजे अगदी to the point! .. "मला गावाला जावं लागतय.. उद्याचे जमायचे नाही! btw, happy women's day! " दोन मोहरे गळाले! कसाबसा लंच पर्यंतचा वेळ गेला.. मग पुढचा बाँब आला.. डीजेचा फोन.. "अगं आत्ताच एक client आला.. रविवारी लग्न आहे. bridal मेंदी आहे. ती उद्याच काढायला लागेल ना.. मेंदीला perfect रंग दोन दिवस आधी काढली कीच येतो माहिते ना.. मग, मला नाही गं जमणार.. पण बाकीच्या आहेत ना.. you enjoy मी next time असेन ना, तेव्हा तर मेंदी प्रोग्रामच ठेवू, चालेल? बाय.." पूनमचा मूड आता गेलाच होता.. कोण राहिलं होतं.. स्वाती, डीमडू, मृण्मयी, लालू.. ठीके, या आल्या तरी नॉट बॅड.. पण छे! डीमडूचा फोन आलाच.. पूनमला तर तो फोन नकोसाच झाला होता.. "अगं आपलं उद्याचच ठरलं होतं ना गं? मी विसरलेच गं टोटल!! अगं उद्या सिनेमाला जातोय.. मीच काढली तिकिटं आत्ता!" "धन्य बाई तुझी, अशी विसरलीस कशी? आपण किती कायकाय ठरवलं होतं." "माझं नेहेमीचच confusion गं! शुक्रवार की शनिवार.. त्यातून 'याने' कधी नव्हे ते विचारलं सिनेमाचं, म्हणलं पाहू.. इतका आनंद झाला मला की बाकी सगळं विसरलेच मी त्या भरात.." "बरं बाई.. जा, बघ सिनेमा, enjoy !" आता मात्र पूनमचा मूड गेलाच. तिनेच स्वातीला फोन केला.. "अगं उद्याबद्दल.." "हं, मी तुला काॅल करणारच होते.. उद्याच अगं upcoming गजलकारांची कार्यशाळा आहे दिवसभर. मग ते इतकं जड होईल ना डोक्याला की मला काहीच सुधरणार नाही नंतर.. आपण गप्पा मारू त्याही डोक्यात शिरणार नाहीत माझ्या.. I will be so out of place! .. शिवाय गजल करायची पण आहे घरी गेल्यावर.. असा गृहपाठच देतात ते म्हणे.. सो माझं धरूच नकोस काही.." आता पूनमनी वाट पाहिली नाही.. मृण्मयी आणि लालूनी काही सबबी सांगायच्या आत तिनेच त्यांना फोन करून program cancel केला.. त्यात मृण्मयीनी सांगितलच तिला की उद्याच एक cooking class ला जायचे होते तिला.. लालू बोलली नाही काही, पण तिने सुटकेचा श्वास सोडलेला पूनमला स्पष्टपणे ऐकू आला.. थकून भागून बिचारी घरी आली.. बघते तर काय, नवरा चक्क घरी आला होता.. मुलानी पसारा आवरलेला होता.. ती घरी आल्या आल्या नवर्यानी तिचं स्वागत केलं.. "ये दमलीस? तुझीच वाट पाहतोय आम्ही, चहा करतो तुला.." "अरे तू करतोस? कशाला? मी करते ना?" "अगं नको, मी करतो ना.. छोटू, आईला पाणी देतोस?" मुलानी पाणी न सांडता आणलं, नवर्यानी फ़ारसा पसारा न करता, फ़ारशी सांडलवंड न करता चहा केला.. जरा पांचटच होता, पण आयता मिळाला ना.. बास! तिला बरं वाटलं त्याहीपेक्षा आश्चर्य वाटलं.. "छान वाटतंय.. पण काय आहे आज?" "अगं आज महिला दिन नाही का? रोज किती करतेस तू आमच्यासाठी? म्हणलं आज आपण चहा तरी करावा.. आणि छोटूपण शहाण्यासारखा वागलाय आज.. दंगा नाही, धडपड नाही.." पूनमला भरूनच आलं एकदम. तिने त्या भरात नवर्यला त्यांच्या उद्याच्या प्लॅनचा झालेला फ़ियास्को सांगितला.. नवर्याची भरपूर करमणूक झाली ते ऐकून.. मग त्यानेही हळूच विचारलं तिला.. "काय गं, एवितेवी तुझं महिला मंडळ येणार नाहीच आहे, तर उद्याचा 'बुधवार' आपल्याकडेच करूया, काय? कोणीतरी घरी आल्याशी, गप्पा हाणल्याशी कारण, काय? हां तुला थोडे करावे लागेल.. खाणे आणू आपण बाहेरून, पण बाकीचे थोडेफ़ार असतेच ना.. तेव्हढे बघशील ना प्लीज?" नवर्यानी चहा वगैरे पाजून पूनमला गार केलेच होते. तिच्याकडे हताशपणानी मान डोलावण्याशिवाय पर्यायच नव्हता!!
|
Zakasrao
| |
| Thursday, March 08, 2007 - 6:38 am: |
| 
|
एक नंबर महिला दिन. सही लिहलय पुनम. स्वानुभव वाटत?
|
Deemdu
| |
| Thursday, March 08, 2007 - 6:38 am: |
| 
|
पूनम मस्त जमलय .. ..
|
Badbadi
| |
| Thursday, March 08, 2007 - 6:41 am: |
| 
|
पूनम, या सगळ्यात मला विसरलीस पण!!! ये अच्छी बात नहि है...
|
जागतिक महिला दिन की दीन?
|
Abhi_
| |
| Thursday, March 08, 2007 - 7:03 am: |
| 
|
पूनम छान लिहिलं आहेस... BTW बुधवार कधी आहे तुमच्याकडे? लिस्टमध्ये नाव लिहा, येईनच असं नाही..
|
Meenu
| |
| Thursday, March 08, 2007 - 7:58 am: |
| 
|
आयला पुनम किती त्या थापा ... बोलवायचं नाही ते नाहीच वर वेगवेगळी संकटं आमच्यावर आणुन आमचं येणं रद्द पण करायचं हे म्हणजे जरा अतिच बाई ... झकास लिहीलस हो पण .. ह्या बायकांच्या कार्यक्रमाचं नेहेमीचच रडगाणं आहे हे. नसत्या सामाजिक जबाबदार्यांच उगीच ओझं वागवत फिरतात झालं. जणु काय यांच्या नसण्यानी सगळ जग थांबुनच राहणार आहे btw पुढच्या वेळी मेलमधे किमान चार ओळी तरी लिहाव्यात म्हणते
|
Chinnu
| |
| Thursday, March 08, 2007 - 8:36 am: |
| 
|
पूनम, हा हा हा! सगळी पात्रं चपखल बसवली आहेस! महिला दिनाची सुरुवात छान झाली! धन्यवाद. (नवर्याने पांचट चहा केलाय. तो पित पितच वाचत होते )
|
Lalu
| |
| Thursday, March 08, 2007 - 11:02 am: |
| 
|
Lol, पूनम. बघ चरफडत का होईना मी आले असते! आणि ते बुधवार साजरा करणार हे आधी कळले असते तर... जरा उसासा वेस लांघून गेला तुला वाटले निःश्वास टाकत होते... श्यामली ~d
|
हे विनोदी? ह्यालाच ' जळजळीत वास्तव' की काय म्हणतात ना? डोळ्यांत पाणी आणलंस गं पूनम!!
|
Disha013
| |
| Thursday, March 08, 2007 - 11:42 am: |
| 
|
perfect पूनम! कहाणी घर घर की. BTW , वाढदिवसाला घे पुरेपूर बदला.
|
Asami
| |
| Thursday, March 08, 2007 - 12:11 pm: |
| 
|
BTW , वाढदिवसाला घे पुरेपूर बदला. >> बिचारा already भोगतोय ना ... आणखी कशाला ? psg दिवे घे ग
|
Shonoo
| |
| Thursday, March 08, 2007 - 12:37 pm: |
| 
|
psg मस्तच लिहिलंयस. सारी खुदाई एक तरफ़ नवर्याने स्वत:हून करून दिलेला चहा एक तरफ़ तेव्हढा चहा कधीतरी मिळाला तरी नशीब म्हणायचं.
|
पूनम मस्तच.. >>>>ह्या बायकांच्या कार्यक्रमाचं नेहेमीचच रडगाणं आहे हे पुरुषांचंही असं होतं बरं का.. १० बुधवार फिस्कटतात तेव्हा कुठे १ साजरा होतो.. पण ते हार मानत नाही.. तुम्ही मात्र एकाच फटक्यात.. त्या एकता कपुरकडून शिका काहितरी..
|
Supermom
| |
| Thursday, March 08, 2007 - 3:36 pm: |
| 
|
पूनम, मस्तच लिहिलस ग. खूप आवडलं.
|
Arch
| |
| Thursday, March 08, 2007 - 3:57 pm: |
| 
|
बघ पूनम, मला include केल असतस तर अशी वेळ आली नसती. नेहेमीप्रमाणे छान 
|
Badbadi
| |
| Thursday, March 08, 2007 - 11:25 pm: |
| 
|
छे बाई पूनम, मिल्या ने चहा करावा आणि तो(चहा) पाणचट झाला तरी तू तो(चहा) आनंदाचे पिशील हे सांगायला इतकि मोठी गोष्ट का रचावी लागते!!!
|
Shyamli
| |
| Friday, March 09, 2007 - 12:07 am: |
| 
|
महिला दिन संपल्यावर वाचायला मिळाल हे मज्जा आली वाचायला. आपण पुन्हा कधी तरी साजरा करुया हं उगी उगी.
|
Jo_s
| |
| Friday, March 09, 2007 - 12:09 am: |
| 
|
पुनम छान लिहीलय, पण हा दिन "दीन"वाणा केलासकी शेवटी." घरी वाचायला देतो हे आता 
|
Princess
| |
| Friday, March 09, 2007 - 3:50 am: |
| 
|
आइ ग...पूनम, हहपुवा... जबरदस्त लिहिलय ग. शोनू आणि स्वातीला अनुमोदन... नवर्याच्या हातचा चहा मिळाला तेच भाग्य समज.
|
|
|