Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 09, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » कविता » Archive through March 09, 2007 « Previous Next »

Mayurlankeshwar
Thursday, March 08, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे झाड (की झाद?)
शेवटी तुही झालासच व्यक्त!!
झाड...कविता एकदम जिंदाबाद!!


Mayurlankeshwar
Thursday, March 08, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाडा... एकदम कलरफुल्ल कविता!
'आज नाहीत ' भलतीच सुंदर!
माझ्यासारखा माणूसही रोम्यांटीक झाला!

इथे कलर मध्ये कसं लिहायचं हे कोणी तरी सांगावे.


Shree_tirthe
Thursday, March 08, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा!!! एकाहून एक कविता आहेत. सर्वांच्या.

- श्री


Neelkantee
Thursday, March 08, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नात्याचा हा नाजूक बहर
जयवि, नात्यांचा 'पारिजाती' बहर... असं म्हण ना... एकदम फिट्ट बसेल पुढच्या ओळीला...

mayur,
अन आठवतो केव्हाची
ती धुक्यांत सजली पहाट!
मला वाटलं म्हणावं

अन पावला पावलात थबकते...
धुक्यात सजलेली पहाट...


Mankya,
आज ठरवलय
स्वतःला एकट्यात गाठायचं
समजायचं समजवायचं
कसं काय ? पुसायचं
ह्याच कडव्याप्रमाणे पुढे लिहिलस तर...
म्हणजे... बघ बरं असं...
'वाकायचं...'
स्विकारायचं...
'प्रखरपणे जळायचं...'
आणि 'जगन्नियत्याला' म्हणायचं आहे का तुला...
विझायचं...
टाकायचं
करायचं...'

वेगळाच अर्थ भावला मला...

Mayurlankeshwar
Thursday, March 08, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि शिवण मस्तच!
माणिक फळयाला लख्ख करावं हे छानच!
पहिल्या कडव्यात्--स्वत:ला गाठून काय काय समजवायचं हे इतर चार कडव्यातुन व्यक्त होत आहे किंवा कसे?


Aparnas
Thursday, March 08, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, आनंदयत्री, परागकण, बी धन्यवाद.
नीलूताई, तुमच्या इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खास धन्यवाद :-)

सगळ्यांच्याच कविता मस्त आहेत.
स्मि, दोन्ही कविता आवडल्या.
झाड, कविता छानच आहे पण मंझील शब्द जरा वेगळा वाटतोय.


Mayurlankeshwar
Thursday, March 08, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलू... मस्त बदल सुचविलास...
अन पावला पावलात थबकते
धुक्यांत सजली पहाट! :-)
अतिशय धन्यवाद!


Mankya
Thursday, March 08, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलकांती धन्यवाद !

मयुरा मस्तच रे पहाट !
झाड शब्द मस्तच वापरले रे !

नीलकांती,
अगं मी तशीच लिहिलीं होती गं !
नंतर बदल केला मी !
मयुरा ... बरोबर ओळखलं आहेस रे !

माणिक !


Shree_tirthe
Thursday, March 08, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या पुण्यवान लोकांच्या शहरात
आता पुण्यच घडत नाही
आई-वडिलांसाठी आजचा
श्रावण बाळ कष्टच करत नाही
ह्या पुण्यवान लोकांच्या शहरात...

आता फक्त म्हणण्यापुरतं राहीलं
"पुणं तिथं काय उणं"
प्रत्यक्षात मात्र...
काहीच राहीलं नाही जुनं
ना घर ना दार आणि हो ना ही संस्कार
आता घरो-दारी वाढतोय फक्त अहंकार
ह्या पुण्यवान लोकांच्या शहरात...

आपले म्हणणारे माणसं
आता परके होत आहेत
रक्ताचे नातेदेखील
आता रंग बदलत आहेत

ह्या पुण्यवान लोकांच्या शहरात
आता पुण्यच घडत नाही.

श्री


Mayurlankeshwar
Thursday, March 08, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री... ग़्लोबलाईझेशन च्या युगात 'पुण्य' म्हणजे काय हे कसं डिफाईन करणार?? तुमची नेमकी कशाबद्दल खंत आहे हे समजलं नाही. परंपरेबद्दल की पुण्याई बद्दल?
चू.भू.दे.घे.


Shree_tirthe
Thursday, March 08, 2007 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्य डिफाईन करणं थोडसं अवघड आहे. रोज जे काही वर्तमान पत्रातून वाचाण्यास मिळतं आणि जे काही प्रत्यक्षपणे बघितलेलं आहे त्यातूनच हे लिहिलं आहे. परंपरा आता बदलत आहे आणि पुण्याई करताना फार कमी लोकं दिसतात.

श्री


Meenu
Friday, March 09, 2007 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच्या महिला दिनाबद्दल.. शुभेच्छांसह ..

सागरगोटे खेळणार्‍या,
परकराचा घेर सावरत,
घरभर बागडणार्‍या..
आईसारखी साडी नेसुन,
टिकली लावणार्‍या..
पदर सावरुन,
बोहल्यावर चढणार्‍या..
आई होऊन,
घास भरवणार्‍या..
कधी माता, कधी दुर्गा होणार्‍या
रडणार्‍या, हसणार्‍या,
राबणार्‍या, सोसणार्‍या, झगडणार्‍या
त्या सगळ्या जणींशी जोडणारं
म्हणुनच हवसं वाटणारं..
माझं स्त्रीपण..


Naveen
Friday, March 09, 2007 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खाली लिहिलेली कविता सर्व स्त्रियांना उद्देशून लिहिली नाही. त्यामूळे कुणीही गैरसमज करून घेवू नये.

प्रत्येक बाबतीत स्त्रियांनी
भरारी घेतली
पुरुषाच्या खांद्याला खांदा
मिळवत काम करण्यास निघाली

परवा तर कहरच झाला
रस्त्यावरून एक स्त्रि जात होती
तिला पाहिल्यावर प्रत्येक पुरूषाची
मान लाजेने वाकत होती

ह्या फॅशनच्या जगात
ति(स्त्रि) फारच रमली
शरीर झाकण्यासाठी
तिने शाॅर्ट कापडं वापरली

तिचा तो देह पाहून
पुरूषांनाच लाज वाटली
म्हणूनच त्यांची मान
लाजेनं वाकली

हे स्त्रि नमस्कार करतो तुला
तु धन्य आहेस
स्वत:च्या देहाचं प्रदर्शन
तु का करत आहेस?

स्वत:ची अब्रू ठेव जपून
पैसा कमवू नकोस हा देह विकून

नवीन


Mayurlankeshwar
Friday, March 09, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु.. छान आहे कविता...
तस्लिमा नसरीनच्या कवितेची आठवण झाली!!

नविन...
तुमचा आक्षेप कशाबद्दल आहे?
एकूणच फशन बद्दल की स्त्री तत्वाच्या विटंबनेबद्दल??

शेवटी प्रदर्शनाचे आयोजन करणा-यांपेक्षा
प्रदर्शनामध्ये हुंदडणारे जास्त शौकीन असतात असं तुम्हाला वाटंत नाही काय?

'स्वत:ची अब्रू ठेव जपून
पैसा कमवू नकोस हा देह विकून '
ह्या ओळी थोड्याशा संकुचित वाटतात...म्हणजे विषयाच्या आवाक्याशी संबंधीत ह्या ओळी आहेत असं मला वाटंत नाही.
'तो' विषय पूर्णत्: वेगळा आहे...
तुम्ही 'गोलपिठा' वाचलं आहे काय? नसेल तर अवश्य वाचा.
शेवटच्या ओळी जाणून-बुजून भरकटल्यासारख्या वाटतात.
बाकी छान!
चू.भू,दे.घे. :-)





Mankya
Friday, March 09, 2007 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू ... खुप खुप छान कविता !

नवीन ... एकाच बाजूवर विचार करणं बरोबर नाही मित्रा !
एक सांगावस वाटतं तुला ....
इथे मायबोलीवर आपण एक कुटुंब म्हणून वावरतो, तेंव्हा विषय जरी मांडण्यासारखा असला तरी शब्दांचं भान जसं घरी ठेवतो तसच इथही अपेक्षीत आहेच की. Positively विचार करशील अशी आशा करतो !

माणिक !


Nandini2911
Friday, March 09, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन, छोटे कपडे घालणार्‍या सगळ्याच स्त्रिया अब्रू विकतात असे नाही आणि अंगभर कपडे घालणारे "सगळेच" अब्रुदार असतात असेही नाही.
जरी ही कविता सर्व स्त्रियाना उद्देशुन लीहिली नसली तरी तिचा उद्देशच चुकीचा आहे.. गोलपीठा सारखं नाटक किंवा चमेली सारखा चित्रपट बघ.
अब्रू विकणार्‍या स्त्रियाची दु:खे वेगळी असतात.


Bhramar_vihar
Friday, March 09, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन, वरील सूचनांचा अवश्य विचार करा!

Tawaal
Friday, March 09, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविनची "कविता" कुठे आहे. जे काही आहे ते मुम्बई चौफेर किंवा पुण्यनगरी इ.इ. तत्सम पेपरमधे 'कबुतर जा जा...' असल्या काही नावाच्या सदरांमध्ये तमाम वखवखलेल्या प्रेमविरांनी केलेल्या प्रेमविलापाच्या जातीचे काही आहे.

(नाव आणि ओळख लपवल्यामुळे आपण आता कुणालाच भित नाही,
Mods सोडुन)

Mayurlankeshwar
Friday, March 09, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक च्या मताशी नवीन बाबत पूर्णपणे सहमत!

वास्तववादी असणं आवश्यक आहे... पण त्याच सोबत शब्दांतुन त्याचं पूर्णपणे अर्थस्पष्ट समर्थन करणंही जमलं पाहिजे ना!
नाही तर मित्रा ते पराचा कावळा करणे का काय तसं होतं!


Naveen
Friday, March 09, 2007 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या सर्वांचं म्हणणं पटतय मला.

मयुर आक्षेप असं काही नाही पण आजकालची फॅशन बर्‍याच गोष्टींना आमत्रंण देते असं नाही वाटत. फॅशन बद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल माझा आक्षेप नाही. जो तो आपलं चांगलं वाईट कशात आहे हे जाणतो. पण, आपल्या देशात (भारतात) कमी कपडे घालणार्‍यांकडे वाईट नजरेनं बघितलं जातं. आणि त्यातूनच स्त्रियांवर अतिप्रसंग ओढवले जातात. अशी एखादी फॅशन काय कामाची जी आपल्याच जीवावर बेतेल!

नवीन ... एकाच बाजूवर विचार करणं बरोबर नाही मित्रा !
हे पटलं माणिक मित्रा. म्हणूनच मी खाली माणसांवर लिहिलेली एक कविता देत आहे. अर्थात सर्व माणसांना उद्देशून नव्हे.

नवीन, छोटे कपडे घालणार्‍या सगळ्याच स्त्रिया अब्रू विकतात असे नाही आणि अंगभर कपडे घालणारे "सगळेच" अब्रुदार असतात असेही नाही.
नंदिनि तुमच म्हणणं शंभर टक्के पटलं. गोलपीटा, चमेली दोन्ही बघितले.
पण, मजबूरी आहे, दु:ख आहे म्हणून एखादं वाईट काम करणं हे योग्य आहे का?

नवीन





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators