Aparnas
| |
| Tuesday, March 06, 2007 - 12:35 am: |
| 
|
एकांत एकांत तसा आपल्याला एकटा कधीच भेटत नाही जेव्हा जेव्हा भेटतो, सोबत आणतोच काही ना काही एकांत कधी हळवा, सोबत ठेवणीतल्या आठवणी क्षणात हलकेच हसू, तर क्षणात डोळ्यात पाणी आठवणींच्या गावातून मग परत येताच येत नाही आणि मग एकांत एकटा भेटतच नाही..... कधी एकांत कातरवेळी हूरहूर सोबत घेऊन येतो, सरत्या क्षणांच्या गडद सावल्या मानामधे ठेवून जातो मनाचे दिवे उजळले तरी हूरहूर मात्र शमत नाही आणि मग एकांत एकटा भेटतच नाही..... कधी एकांत बोलका होतो, शब्दांचं मग चांदणं होतं एक शब्द उच्चारला तरी त्याचंसुद्धा गाणं होतं गाण्यच्या त्या स्वरांची साथ मग सुटत नाही आणि मग एकांत एकटा भेटतच नाही..... कधी एकांत दोघांचा होऊन दोन मनं सांधू लागतो एकेका स्वप्नाची काडी घेऊन प्रेमाचं घरटं बांधू लागतो स्वप्नांच्या त्या घरट्यातून मन बाहेर येतच नाही आणि मग एकांत एकटा भेटतच नाही..... कुणही सोबत आला तरी त्याचं एकच सांगणं असतं एकांत काही क्षणांचाच बाकी सोबतच जगणं असतं त्या काही क्षणातच वेचावं स्वत:साठी थोडं काही म्हणूनच तर एकांत एकटा कधी भेटत नाही
|
Mankya
| |
| Tuesday, March 06, 2007 - 12:45 am: |
| 
|
खुप खुप धन्यवाद सुमेधा ! मीनू ..... नेहमीप्रमाणेच ....Great!!! अपर्णा ... कन्सेप्ट तर खुपच आवडला गं .... सगळ्याच कल्पना सुंदर आहे जराSSS गद्यात्मक वाटतय गं ! बाकी जाणकार लोक सांगतीलच ! एकांत कधीच एकटा येत नाही ..... हळवं, मनाचे दिवे, शब्दांचं चांदणं, एका शब्दाचं गाण, घरटं, वेचावं ..... खुप मस्तय हं अन खरही ! माणिक !
|
अपर्णा, पाडगावकर आठवले यमक वाचताना... खरंच आहे एकांत कधीच एकटा येत नाही..
|
अपर्णा, एकदा तुला एकांतात भेटायलाच हवं काय मस्त आहे सगळंच आपलेच शब्द आपलेच ओठ धरून घट्ट आपलेच बोट... फिरवून आणतात मायानगरीत.... तरंगत.... तरंगत.... तरंगत.... पिसाहूनही हलके.... हलकेच उतरवतात भू वर... असं वाटलं
|
Paragkan
| |
| Tuesday, March 06, 2007 - 9:10 pm: |
| 
|
wah Aparnas .. ekaant khaasach!
|
Smi_dod
| |
| Tuesday, March 06, 2007 - 11:22 pm: |
| 
|
शिवण... मधेच सुटलेला टाका अंधुकशी जाणीव देत होता निसटत चाललेल्या शिवणीची जपलं खुपं....एक एक टाका कसोशीने..... पण सुटत सुटतच गेली शिवण विरविरणार्या वस्त्राला आता परत शिवणही बसणार नव्हती अन् ठिगळही...... उसवलेला तुकडा तसाच होता उघडा...पोरका येणार्या वार्यासरशी हेलकावणारा स्मि
|
Mankya
| |
| Wednesday, March 07, 2007 - 12:21 am: |
| 
|
स्मि .... शिवण छान आहे हो ! उघडा...पोरका येणार्या वार्यासरशी हेलकावणारा .... आहा ! सहिच वाटल्या या ओळी ! फक्त जपल खुपं ऐवजी जपलं खुप ... असं म्हणायच आहे का तुला, जरा बघ बरं ? माणिक !
|
Zaad
| |
| Wednesday, March 07, 2007 - 12:24 am: |
| 
|
आज नाहीत गडे किनारी तुझ्या पावलांचे आज नाहीत ठसे कालचे हसू कालचे डोळ्यांमध्ये खारटलेले आज नाहीत फेस फुलांचे आठवते ना याच किनारी सर्व किनारे मिटले होते अडले अवघडलेले सारे फेसफुलासम फुटले होते असे का गं भलत्या वेळी सलते डोळ्यांमध्ये पाणी हातामध्ये हात असे का आले अन सुटले होते? गडे किनारी तुझ्या पावलांचे आज नाहीत ठसे कालचे
|
Mankya
| |
| Wednesday, March 07, 2007 - 12:45 am: |
| 
|
झाड .... आज नाहीत ... शब्द खुप छान वापरलेत .. सुंदर ! ' गडे ' ... फारच गोड वाटतय इथे ! सलते डोळ्यांमध्ये पाणी ... विशेष भावलं बरं ! फेसफुलासम का फेस फुलासम ? चु.भु.दे.घे. सुंदरच आहे हं कविता ! माणिक !
|
Smi_dod
| |
| Wednesday, March 07, 2007 - 12:55 am: |
| 
|
सख्खी सखी ये ना... कितीही आर्जव केली पण तशीच रुसुन बघतेय खुप बोलायचय गं तुझ्याशी गुज सगळे सांगते मी तुला गुपीत माझे फ़क़्त तुलाच माहित समरसुन त्या भावनांशी अल्लद उतरतेस मग ओळी ओळीतुन अन तुच अशी रुसलीस? माहीतेय मला आत्ता तु येणारच नाहीस मी कट्टी फ़ु केल्या वर मात्र धावत येशील... पण त्या वेळेस मी पण बोलणारच नाही स्मि
|
Zaad
| |
| Wednesday, March 07, 2007 - 9:33 am: |
| 
|
माणिक धन्यवाद. तो शब्द फेसफुलासम असाच आहे, समुद्रकिनारी लाटा आदळल्याने झालेल्या फेसालाच फेसफुले म्हटलंय.
|
Jayavi
| |
| Wednesday, March 07, 2007 - 12:41 pm: |
| 
|
मोहर नात्याचा का गुंतत जातो आपण नात्याच्या गुंत्यात का आवळत जातो गाठी अपेक्षांच्या बंधनात नात्याचा हा नाजूक बहर कोमेजत जातो नकळत अपेक्षांच्या ओझ्यानं झडत जातो नकळत नातं मनसोक्त फुलू द्यावं रानफुलासारखं मोकळं त्याला विहरु द्यावं स्वच्छंदी पाखरासारखं नाती नकोत मौसमी भूछत्र्यांसारखी कायम हसत बहरावी ती गुलमोहरासारखी नकोत फुलं भरमसाठ नात्याच्या ताटव्यात डौलदार तुरे मात्र हमखास असावे त्यात....!
|
Shyamli
| |
| Wednesday, March 07, 2007 - 1:02 pm: |
| 
|
नाती नकोत मौसमी भूछत्र्यांसारखी कायम हसत बहरावी ती गुलमोहरासारखी >>>>> क्या बात है रे
|
Princess
| |
| Wednesday, March 07, 2007 - 10:06 pm: |
| 
|
जयु...मोहर नात्याचा आवडली. पहिले कडवे एकदम खास.
|
Mankya
| |
| Wednesday, March 07, 2007 - 11:10 pm: |
| 
|
स्मि ... खुलाश्यानंतर खुपच छान वाटतंय वाचायला ! सख्खी सखी ... नावातच बरच काही आहे ! जया ... क्या बात है ! एकंदरीत खासच ओ ! माणिक !
|
Mankya
| |
| Thursday, March 08, 2007 - 12:33 am: |
| 
|
आज ठरवलय स्वतःला एकट्यात गाठायचं समजायचं समजवायचं कसं काय ? पुसायचं प्रचंड विश्वशक्तिपुढे नम्रपणे श्रद्धेने वाकावं तिचा राग, स्मित मानून समान स्विकारावं जगावं कसं प्राजक्तासारखं ... दोन क्षण निरपेक्ष निरागस फक्त सुगंधाचीच उधळण दिसभर प्रकाश देत प्रखरपणे जळावं रात्री जगन्नियत्याला स्मरून शांतपणे विझावं कालचं घडलेलं सगळं पुसून टाकावं नित्य नव्या दिनी फळ्याला लख्ख करावं ! माणिक !
|
Bee
| |
| Thursday, March 08, 2007 - 12:35 am: |
| 
|
एकांत खूप आवडली, अपर्णा! स्मि, झाड, मीनू, जयवी, तुमच्याही कविता छान आहेत.
|
----पहाट---------- --------------------- रोज हळव्या ओठांवरुनी फेकतो मी खरे खोटे हासू आभाळ अस्से लहरी की चांदण्याचे होतात आसू! रोज रोज बोलतो मी त्याच त्या शब्दांची भाषा तिला म्हणे गवसली-- स्मशानात जगण्याची आशा! रोजच कसा पेलतो मी आत्म्याचा पाठीवरती भार असह्य झाले की पुन्हा माझ्याच पाठीत वार! रोज वळून मागे पाहतो माझ्या जखमांची वाट अन आठवतो केव्हाची ती धुक्यांत सजली पहाट! -------मयूर्-----------
|
Zaad
| |
| Thursday, March 08, 2007 - 4:39 am: |
| 
|
व्वा मयूरा, जोरात की!!
|
Zaad
| |
| Thursday, March 08, 2007 - 4:43 am: |
| 
|
व्यक्त मिटून पडल्या एकांताला अशी नजर ही भिरभिरणारी. ऊन कोवळे सळसळताना एक सावली थरथरणारी. वळून चुकल्या रस्त्यालाही मंझीलाची अचूक ग्वाही. अव्यक्ताचे धुके दाटता व्यक्त साठते दवबिंदूसम...
|