|
Chinnu
| |
| Thursday, March 01, 2007 - 3:14 pm: |
| 
|
श्यामली गुड वन. शलाका पावरीची बावरी धुन मस्त! मानस तात्यांची खुप आठवण येते! त्यांची स्वाक्षरी घेण्यास अंगात १०४ ताप असतांना उभे होते. हे त्यांना कळाले तेव्हा त्यांना खुप वाईट वाटले होते. त्यांनी घरी ये म्हटलं खरं पण.. एक सुवर्णसंधी परीक्षेमुळे गमावली ही खंत नेहेमीच राहील.. बी ते सुमसाम किंवा सुनसान असावं ना? बाकी सब लगे रहो!
|
Daad
| |
| Thursday, March 01, 2007 - 4:47 pm: |
| 
|
सगळ्यांना धन्यवाद! मी_आनंदयात्री, ऊद म्हणजे धूप निखार्यांवर टाकल्यावर धुरातून दरवळतो, तो. अशा उदावर केस वाळवण्याची पद्धत होती (पूर्वी) - केस उदवणे....., श्वास उदवणे?
|
Bee
| |
| Thursday, March 01, 2007 - 9:42 pm: |
| 
|
मीनू छान आहे कविता.. चिन्नू, धन्यवाद!
|
Sumedhap
| |
| Thursday, March 01, 2007 - 11:27 pm: |
| 
|
तेच आयुष्य असतं..... आज कितीही दुःख असले तरी उद्या दारात जे सुख असतं, तेच आयुष्य असतं... प्रत्येक रात्र सरल्यावर पहाटे जे विश्व पाहतो आपण, तेच आयुष्य असतं... रुतले कितीही काटे तरी चेहर्यावर जे हसु असतं, तेच आयुष्य असतं... उद्या मरण येईल अशाप्रकारे आज जे जगतो आपण, तेच आयुष्य असतं... सार्या इच्छा संपुर्ण झाल्यात अशा तृप्तीने जे मरतो आपण, तेच आयुष्य असतं... विश्वासाचं कुणी जे अखेरपर्यंत साथ देतं आपल्याला, तेच आयुष्य असतं... आपल्यानंतरही आपलं नाव राहील असं जे काही करतो आपण, तेच आयुष्य असतं... सारे जगतात स्वतसाठी पण दुसयासाठी जे जगलं जातं तेच आयुष्य असतं... आयुष्य यापेक्षा काही वेगळं नसतं,जे प्रत्येक क्षणी जगायचं असतं तेच आयुष्य असतं...
|
Mankya
| |
| Friday, March 02, 2007 - 3:09 am: |
| 
|
मीनू .... मस्त वेध घेतलायस गं ! छानच उतरलिये ! माणिक !
|
सांग मला तुझ्यावर मी प्रेम कसे करावे ... तेच आयुष्य असतं..... एक म्हातारा Sumedhap खूपच छान...विचार...शब्द... सखी शेजारीणी अशी लिहित रहा....शब्दात फुले गुंफित रहा....
|
आयुष्य... आयुष्य... आयुष्य.... वाळुच्या घड्याळातून घरंगळणारं... अलिप्तपणे निसटणारं... तरीहि आपलंसं वाटणारं आपल्यालाच... निसटलेला वाळुचा कण दिसला जरी सारखा... तरी असतो मात्र वेगळा वेगळा... हे जाणवतं केवळ आपल्यालाच... फक्त आपल्यालाच...
|
Sumedhap
| |
| Saturday, March 03, 2007 - 6:55 am: |
| 
|
धन्यवाद नीलकांती!!!!!!!!! ह्या साईट वर तुम्हा सर्वांकडुन इतकं छान प्रोत्साहन मिळतं की विचारांना नेहमीच नवी उमेद मिळते. Thanks a lot!!
|
Kdgogate
| |
| Saturday, March 03, 2007 - 8:10 am: |
| 
|
कधीतरी एकदा कधीतरी एकदा मला िंंपंजरा तोडून बाहेर पडायचय जगासाठी नाही , कधीतरी एकदा मला माझ्यासाठी जगायचय सकाळी उठून कधी मनसोक्त धावायचय , िदवसभर वार्यात खुप खुप िंहंडायचयं. भन्नाट.... खुप जोरात.. "बाईक" ला माझ्या पळवायचय , लपून नाही.. सगळ्यांसमोर "िसगारेट" ला ही पेटवायचय. नको अभ्यास.. नको परीक्शा.. तरीही पुस्तक वाचायचय , आता पुस्तकातून "Accounts" नाही..नवीन िजवन िशकायचय. "खोटा" िमत्रांचा गराडा सगळा.. ख~या िमत्राला शोधायचय , सापडला तो एकदा की.. खुप काही त्याला सांगायचय. फ़ेसळणा~या समुद्रात एकदा स्वताला सोडायचय , सोनेरी मऊ वाळूत.. गडाबडा लोळायचय. स्वतावर आिण जगावर.. खुप खुप हसायचय , असेच हसतांना कातरवेळी .. कुशीत एका खुप रडायचय. " येईल असं जगता कधी ? " हे माझ मला िवचारायचय , जगीन कधीतरी "स्वतासाठी..असाच " .. अस स्वताला समजवायचय. पण खरंच ... कधीतरी एकदा मला िंंपंजरा .......
|
Kdgogate
| |
| Saturday, March 03, 2007 - 11:30 am: |
| 
|
तकाजा है वक्त का.... कीसी के लीये कीसी को तो मीट जाना होता है.... मीट जाते है जब लम्हे पुराने.... तब ही तो नए लम्हो का नीशां होता है !!
|
Kdgogate
| |
| Saturday, March 03, 2007 - 11:31 am: |
| 
|
झुळुक होवुन वाह्ण्यात पण एक मजा आहे.. वार्याने पण कधीतरी झुळुक होऊन वहावं .. वार्या पासून लपणार्या बटेला.... झूळूक बनूनच कधीतरी उडवावं !!
|
एक संध्याकाळ... अबोल.. समुद्र....भरभरून झेपावणारा... रोरावणारा... तरीही अबोल... ओलसर...बिलगणारी पुळण... तीही अबोल... एक ओठ.... एक आर्जव... अस्वस्थ...शांतता.... अबोल... ..... ....... ..... एक थेंब.....खार्या पाण्याचा... समुद्रात कधी मिसळला... कसा... अबोल....
|
नीलुताई, अबोल.... .... ....!
|
Mankya
| |
| Sunday, March 04, 2007 - 11:43 pm: |
| 
|
एक थेंब.....खार्या पाण्याचा... समुद्रात कधी मिसळला... कसा... अबोल.... ' अबोल ' हो खरंय ... दु : ख अंतर्मुख करते ना, त्यात संध्याकाळ म्हणजे जीवघेणी वेळ आणि उरतात आठवणींच्या समाध्या ... दर्शन घेत रहायचं फक्त ! निलकांती ... मस्तच उतरलिये आर्तता मनातली ! माणिक !
|
Naveen
| |
| Monday, March 05, 2007 - 1:01 am: |
| 
|
मैनेच्या शब्दांनी, कोकिळेच्या स्वरांनी सुर्याच्या किरणांनी, इंद्रधनुष्याच्या रंगांनी दाही दिशांनी झगमगली आळी. आंब्याच्या तोरणांनी, केळीच्या खांबानी विजयी पताकांनी, मळीच्या फुलांनी दाही दिशांनी झगमगली आळी. आज जल्लोषाने फुलली आळी आनंद उत्सवाने सजली आळी आळी शेजारी जत्रा भरली मुला-बाळांची गर्दी जमली. ढोल-ताशांचा गजर झाला माझा दादा लढायी जिंकून आला. हत्ती-घोड्यांच्या मिरवणुकीत माझा दादा सिंहासारखा सजला. दादाच्या दर्शनासाठी माणसांनी परिसर भरला. आरतीचे ताट सजले आईच्या हातात लेकराच्या पराक्रमाने आनंद अश्रु डोळ्यात. ढोल-ताशांचा गजर झाला माझा दादा लढायी जिंकून आला... नवीन
|
Mankya
| |
| Monday, March 05, 2007 - 3:15 am: |
| 
|
धन्य धन्य तु कलयुगा काय काय आम्हा दावले केली आम्ही खात्री निरखुनी कोणतेच पाप व्हायचे ना राहिले विचारा त्या रम्य निशेस तीने श्रृंगार का व्यभिचार पाहिले अन होतात धसका घ्यावा कशा कशाचा न किती गर्भही न स्वस्थ पहुडले मातेच्या उदरात अविरत पेटले स्तोम अधर्माचे वातावरण झाले विकारमय वासनामय दाखवा तुम्हीच प्रकाश भगवन होऊ द्या " तमसो मा ज्योतिर्गमय ! " माणिक !
|
केदार गोगटे, तुमचं स्वागत आहे मायबोली वर

|
नमस्कार मंडळी, मी आजच गझल कार्यशाळेबद्दल वाचले, इथे दिलेले गझलज्ञान वाचुन, मी आज पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे, वैभव, माझी कविता मी इथे टाकत आहे, ती गझल आहे किंवा नाही ते check कराल का? ऋतू येत होते ऋतू जात होते, तुझ्यासाठी जगता, मी कण कण मरत होते.. मद्याचा घोट, ओठ तुझे घेत होते, विष त्या थेंबातील मजला जाळत होते.. पिल्लांना भरविण्या घाम मी गाळत होते, घास ओढूनि त्यांचे, पोट तुझे भरत होते.. शिविगाळ मारहाण तुझी, मी रोजच जगत होते, भोग पूर्व जन्मीचे म्हणत, नशिबा दोष देत होते.. हरेक क्षणाला, तुझे पाप वाढत होते, तुझा घडा भरण्याची, मी वाट पहात होते.. बेधुन्द तू, गाडीखाली येता, मी विधवा झाले होते !! तुझ्या मरणाने माझे दुर्दैव संपले होते !!
|
Meenu
| |
| Monday, March 05, 2007 - 9:48 am: |
| 
|
स्वप्न त्या क्षणापासुन.., पापणीही न लववता, मी शोधतेय माझं, हरवलेलं सोनेरी स्वप्न ज्याक्षणी जाग आली, त्या क्षणापासुन....
|
Sumedhap
| |
| Monday, March 05, 2007 - 11:14 pm: |
| 
|
माणिक...........कलयुगा...जबरदस्त झालीय कविता!!!!!!!! मस्तच.......
|
|
|