Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 06, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » तुझ्याशिवाय » Archive through March 06, 2007 « Previous Next »

Nandini2911
Monday, March 05, 2007 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिने स्वत्:भोवती एक गिरकी घेतली.. आज अरमान परत येणार होता..
अंहं.. डॉक्टर अरमान येणार होता.. ती खुपच खुश होती. गेल्या कित्येक दिवसात ती इतकी आनंदी कधीच नव्हती. रोहितने दिलेल्या धोक्यानंतर ती जणू सुकून गेली होती. पण तरीही अरमान येणार हे कळल्यावर मात्र ती मोहरुन गेली होती.

हल्ली घरात पण हीच बोलणी चालू होती. अरमानमध्ये खोट काढण्यासारखे काहीच नव्हते. तिच्या आजोबाची हरकत नव्हती. मग कोण काय बोलणार? अरमानला याची कल्पनाही नसेल. कळेल तेव्हा काय मज्जा येईल.. एकवार तिने आरश्यात पाहिलं. गोरीपान, काळे डोळे गुलाबी ओठ, आणि सडसडीत बांधा.. लांबसडक केस. स्वत्:कडे पाहतानाच ती खुदकन हसली. तिने घुंगरू हातात घेतले. लहानपणी ती पहाटे पहाटे जेव्हा रियाज करायची, तेव्हा तो त्याच्या रूममधूनच ओरडायचा.."मी अभ्यास करतोय. हा भूकंप थोड्या वेळाने झाला तर नाही का चालणार?"

आता ही छन छन त्याच्या आयुष्यात कायमची येणार..
"प्रिया.. प्रिया..." बाहेरून आवाज आला. ती भानावर आली.

"काय मुलगी आहेस तू? बघावं तेचा आरश्याच्या पुढ्यात.. " तिची मोठी चुलत बहीण आत येत म्हणाली.
"ताई, अगं मी अशीच बघत होते.." प्रियाने सारवासारव करायचा प्रयत्न केला.
"तुला जायचं आहे की नाही" केतकी जरा गुश्श्यातच म्हणाली.
"निघालेच मी आता" प्रियाने परत एकदा आरशात आपल्या छबीकडे पाहिलं.
"प्रिया, अगं आज काही तुझा डान्स नाही आहे..समजलं ना?" केतकी बाहेर गेली.
प्रियाच्या नटण्या मुरडण्यावर तिचे कायम नको तितके लक्ष असायचे. प्रिया पेक्षा फ़ार तर दोन तीन वर्षानी मोठी असेल पण दरवेळेला मोठेपण दाखवायचा एकशी चान्स सोडायची नाही.
प्रियाने तिच्या पाठून तिला वाकुल्या दाखवल्या आणि परत एकदा आरशात पाहिलं.
अरमान काही आज तिला पहिल्यादा बघणार नव्हता. पण तरीही....

ती पडवीत आली तेव्हा सकाळचे आठ वाजले होते.
घरातली कामं चालु झाली होती, गडी माणसं न्याहारी आटोपत होते.

नचिकेत, तिचा लाडका भाचा अंगणात दुडूदुडू धावत होता. नुकताच चालायला शिकला होता.
धावता धावता अचानक त्याचा तोल गेला आणि अंगणातच तो धपकन बसला. प्रियाला हसू आवरले नाही.
"प्रिया, अगं बेटा निघणार आहेस की नाही" आईचा आवाज आला.
"आई, निघालेच मी." प्रिया लगबगिने गाडीकडे गेली.
"एकटी नीट जाशील ना की तुळसाला देऊ बरोबर?" बाबानी झोपाळ्यावरून विचारलं.
"नको. मी जाईन" तिने दरवाजा उघडत सांगितलं.
मुळात अर्ध्या पाऊण तासाचा तर रस्ता होता. आणि खरंतर तिला आज तिच्या अरमानच्या मधे कुणी सुध्दा नको होतं.
मारूतीने गावातले लाल रस्ते सोडले. आणि ती हायवेला लागली.

तिला लहानपणचा अरमान आठवला.
त्याला डॉक्टरच व्हायचं होतं. आणि तो डॉक्टर होईल. याची तिला पूर्ण खात्री होती.

त्याचं आणि तिचं बालपण वेगळं असं कधीच नव्हतं.
अशरफ़, अरमानचे अब्बा प्रियाच्या आजोबाच्या बागेत काम करायचे. एके दिवशी माडावरून खाली येताना त्याचा तोल गेला आणि अरमानच्या जन्माआधीच होत्याचं नव्हतं झालं.

या घटनेनंतर तीन महिन्यानी अरमान जन्मला. आणि पंधरा दिवसानी प्रिया.



(क्रमश:-)



Zakasrao
Monday, March 05, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत प्रिया. ते ही इतकी सोज्वळ? अजुन मागची प्रिया लक्षात आहे.
अरमान आणी प्रिया
ठिक आहे अजुन येवु दे पण मी तरी मागच्यावेळसारख सारखा मस्का लावणार नाही.


Nandini2911
Monday, March 05, 2007 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तिने गाडी भरधाव सोडली होती. केव्हा एकदा अरमानला बघु असं तिला वाटत होतं. कित्येक वर्षापासून तो तिचा बेस्ट फ़्रेंड होता.. आता मात्र हे नातं तिला पुढे न्यायचं होतं.

खरंच कधी कधी सगळंच कसं विपरित घडत जातं. अरमान आणि ती एकाच शाळेत शिकले. ती अभ्यासात कधीच चांगली नव्हती. त्याने पहिला नंबर कधीच सोडला नाही. तिने सहाव्या वर्षापासून कथ्थक शिकायला सुरुवात केली. साधारण पंधरा वर्षाची असल्यापासून तिने जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली. पण कधीच करिअर या द्रुष्टिने तिने त्याकडे पाहिलं नव्हतं.

अरमानला पुढे शिकायला मुंबईला ठेवलं. त्याच्या अम्मीची परिस्थिती नव्हती पण प्रियाच्या आजीने सगळी मदत केली. अरमानने दर वेळेला चांगले मार्क्स मिळवले.

तो एम बी बी एसच्या दुसर्या वर्षाला होता तेव्हा प्रियाला रोहित जोशीचं स्थळ आलं. पहिल्यान्दाच "बघण्याचा" कार्यक्रम होता. ती खूप चलबिचल झाली होती. काहि न सुचून तिने अरमानला फ़ोन केला. तोही रातोरात इकडे आला होता.
पसंती झाली. सगळ्या गोष्टी ठरल्या आणि प्रियाच्या आयुष्यातले ते सोनेरी दिवस सुरू झाले, तिला रोहित खूप आवडला होता. त्याच्याबरोबर अख्खं आयुष्य घालवायला एका पायावर तयार होती… पण सगळंच मनासारखं थोडीच घडतं.

प्रियाने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. ट्रेन यायला अजून अर्धा तास होता. एक तर कोकण रेल्वे नुकतीच चालू झाली होती. कधीच वेळेवर यायची नाही. तिच्या गावापासून स्टेशन लांब होतं, फ़क्त पसेन्जर गाडीच थाम्बायची तिथे.
पण अरमानल बसच्या प्रवासापेक्षा ट्रेनचा प्रवास आवडायचा. निवांतपणे पुस्तक वाचता येतं ना म्हणून..

वेडा अरमान्… नुसता पुस्तकी किडा होता. धडेच्या धडे त्याला पाठ असायचे. तिचा ग्रुहपाठ ही त्याचीच जबाबदारी होती..

स्टेशनवर आल्या आल्या तिने इकडे तिकडे पाहिले. पूर्ण शुक शुकाट होता. तिने स्टेशन मास्तराना ट्रेन केव्हा येणार आहे ते विचारलं. त्यानी तिला काहीच उत्तर दिलं नाही. तीन चारदा तोच प्रश्न विचारल्यावर ते चिडून म्हणाले "हे बघा, चिपळूनजवळ गाडीला काहीइ तरी प्रोब्लेम झाला आहे, काय ते मलाही ठाऊक नाहि, त्यामुळे तुम्ही मला सतावू नका"

हिरमुसली होऊन प्रिया स्टेशनवरच्या एकमेव बाकावर येऊन बसली. आता किती वेळ वाट बघायला लागणार होती कुणास ठाऊक?

पण आज अरमान येईपर्‍यंत इथेच थांबायचे तिने मनाशी निश्चय केला. आज ती अरमानला विचारणार होती की त्याला तिच्याशी लग्न करायला आवडेल?

ती एकटीच हसली. एवढ्या निर्लज्जपणे विचारतात का कुणी? पण मग अरमानच्या पुढ्यात लाजायचे कसे?

ख़रंच अरमान तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. रोहितचं आणि तिचं लग्न मोडल्यावर तिला सगळ्यानी खूप समजावलं पण फ़क्त अरमानचा सल्ला तिला पटला होता. " May be he never deserved you, so be happy "

तिची हरेक भावना तो पटकन समजून घ्यायचा… काही सांगावं नाही लागायचं. तिलाही त्याला काय म्हणायचय ते बरोबर कळायचं.

साधारण दहावीला असताना प्रिया आणि अरमान शाळेतून घरी येत होते. तिची अखंड बडबड चालू होती. तो शांतपणे तिचं आणि त्याचं दप्तर घेऊन नेहमी सारखा चालत होता.

मधेच प्रियाने त्याला विचारलं, "अरमान, तुला ती निदा काझी आवडते ना रे?" अरमान चालता चालता थांबला.

"तुला कुणी सांगितलं?" त्याने रूक्ष आवाजात तिला विचारलं.

"सांगायला कशाला पाहिजे? वर्गात बघाबघी चाललेली मला दिसत नाही का?" ती हसत म्हणाली.

तो पुढे चालत राहिला.

"अरमान, तू म्हणत असशील तर मी बोलू तिच्याबरोबर?"

"काही नको.
"का?"

त्याने पाठी वळून तिच्यकडे पाहिलं.
"हे बघ्… ती आहे काझी आणि मी दालदी मुसलमान, वर बामणाच्या अंगणात झोपडी बांधून राहतो… कधीतरी शक्य आहे का?"

प्रिया कपाळावर आठी घालून तशीच उभी राहिली. आरमानने स्वत्:च्या परिस्थितीचा उल्लेख केलेला तिला बिल्कुल खपायचे नाही.

"चल ना आता का थांबलीस?" त्याने विचारलं.
ती काहीच बोलली नाही. ख़्हाली मान घालून चालत राहिली. टिचा राग त्याला समजत होता, पण तरी तो तिला काहीच बोलला नाही.

नंतर प्रियाने त्याला कधीच कुठल्याही मुलीवरून चिडवलं नाही.

पूर्ण वाडीत प्रिया आणि अरमानची मैत्री जाहीर होती. एकत्रच लहानाचे मोठे झाले होते त्यामुळे कुणालाच त्यात काही वावगं वाटलं नाही. त्याच्या नात्यावर पहिला प्रश्न उठवला रोहितने.

लग्न ठरल्यावर रोहितच्या आई वडेलानी प्रियाला मुंबईला लग्नाच्या खरेदीसाठी बोलावलं. ती आणि केतकी गेल्या होत्या. अरमान पण मुंबईत होता. जवळ जवळ सहा महिन्यानी ती अरमानला भेटत होती. मात्र रोहित तिच्यावर जरा चिडलेला होता. तिने त्याला कारण विचारलं, तो काहीच बोलला नाही, ती मुंबईवरून परत आली, तिसर्या दिवशी लग्न मोडल्याचा निरोप आला. लग्नाला पंधरा दिवस शिल्लक असताना.

कारण त्यानी सांगितलं नाही.. पण प्रियाला ते कळून चुकलं. कित्येक महिने तिने पायात घुंगरू बांधले नाहीत.. पूर्णपणे कोलमडून गेली.

एक लग्न मोडताच तिच्या आई वडेलाना तिचं लवकरात लवकर लग्न जमवण्याचा ध्यास लागला. पण आता ती तयार नव्हती, येणारं प्रत्येक स्थळ पण हेच विचारायचं "लग्न का मोडलं?" अर्थात त्याना ही ठाऊक असायचंच, आणि या सगळ्याचा उपयोग हुंड्याचा रेट वाढावायला व्हायचा.. प्रियाला या सगळ्याचा उबग आला होता.

एके दिवशी तिने स्पष्ट सांगितलं की तिला न्रुत्यातच करीअर करायचे आहे. स्वत्:ला लग्नापासून वाचवण्यासाठी तिने स्टेजवर झोकून दिले.

फ़क्त अरमानला तिच्या मनात काय चालले आहे ते समजले होते.

त्याने कित्येकदा तिला समजावलं होतं. पण तिला आता नवीन खेळ मांडायचाच नव्हता, निदान त्याच्याशिवाय…..

केतकीने पहिल्यान्दा हा विषय काढला होता.

"अरमानमधे काय कमी आहे?" तिने प्रियाला एके दिवशी विचारलं.

ख़रंच अरमानमधे काय कमी आहे? त्याच्या सारखा जोडीदार शोधूनही सापडला नसता,,, चोवीस वर्षे आपण एकमेकाना ओळखतो, त्याचा स्वभाव आपल्याला माहित आहे, आपल्याविषयी त्याला सर्व माहीत आहे मग अडचण काय आहे?

धर्म… तिच्या पुढ्यात उत्तर उभं राहिलं. पक्क्या कोकणस्थ कुटुंबात वाढलेली ती. तिच्या घरचे तयार होतील? रोज ती याचाच विचार करायची. तिची चल बिचल घरात सगळ्याच्या लक्षात आली होती. आणि आडून आडून तिला तसं विचारतही होते.

मुळात अरमान तयार होईल का? तो या घरातला नोकर होता. याच घरच्या मालकिणीला तो आपलं म्हणेल?

कुठच्याच रितीने हे नातं जुळलं नसतं. पण तिने आता ठरवलं होतं. तिच्या आयुष्याचा जोडीदार फ़क्त आणि फ़क्त अरमान होता.

एके दिवशी जेव्हा नवीन स्थळाची चर्चा चालू होती, तेव्हा तिने तिचा निर्णय सगळ्याना सांगितला.


Neelu_n
Monday, March 05, 2007 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा नंदिनी नवीन कथा चालु पण झाली.:-) टाक टाक लवकर पुढचा भग.... intresting story !!!

Nandini2911
Monday, March 05, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जवळ जवळ दुपारचे दोन वाजले तरी ट्रेनचा पता नव्हता. उन्हाचे चटके बसत होते स्टेशनवर तिच्याशिवाय कुणीच नव्हतं. स्टेशनमास्तर पण कुठेतरी गायब होते. गाडीत जरा निवांत बसावं असा विचार करून ती बाहेर आली.
पण गाडिच्या जवळ यायच्या आधीच तो तिला दिसला. पाठमोरा.
"अरमान.." ती ओरडली.

त्याने वळून तुच्याकडे पाहिलं. डोळ्यावरचा गॉगल काढला. आणि तो हसला.

"इथे काय करतोस तू? मी केव्हाची वाट
बघतेय तुझी. होतास कुठे तू? मुर्खासारखी मी तिथे बसलीये आणि तू इथे आहेस?
" प्रियाने प्रश्नाची सरबत्ती सुरू केली.
तो हाताची घडी घालू शांतपणे उभा राहिला.
"झालं तुझं? मी बोलू काही?" त्याने विचारलं.
"बोलायला परमिशन लागते का?" ती म्हणाली. "पण तू आलास कसा? ट्रेन तर अजून आलीच नाही"
"ट्रेन वाटेत अजूनही थांबली आहे. मी दुसर्‍या वाटेने आलो"
"बसने?" तो उत्तरादाखल नुसता हसला.
"घरी गेलो होतो पण तिथे कळलं की तू इथे आहेस म्हणून इथे थांबलोय."
"ठीक आहे. आता चल घरी. आपण वाटेत बोलु.." ति म्हणाली. दोघं गाडीत बसले.
प्रियाने गाडी स्टार्ट केली. आणि परत एकदा त्याच्याकडे पाहिलं. ती एकदा त्याला म्हणाली होती "रितिक रोशन अगदी तुझ्यासारखा दिसतो."
टिपिकल अफ़गाणी चेहरा होता त्याचा. निळसर डोळे. सरळ नाक आणि सहा फ़ूटाची उंची. पन प्रियाला सगळ्यात जास्त आवडायचं ते त्याचं हसणं. त्याच्या या हसण्यावर तिची किती तरी दु:ख पळाली होती. पहिल्यादा दहाविला कमी मार्क्स मिळाले.बी ए ला दोन विषय राहिले. रोहितचं प्रकरण.. तिला जेव्हा जेव्हा आधाराची गरज भासली तेव्हा तेव्हा अरमान हजर होता. आजच्यासारखाच.
"मुंबई बरीच मानवली आहे तुला.." तिने त्याला चिडवलं.
तो काही बोलला नाही. अत्यंत मितभाषी होता. पण प्रियाला त्याची आता सवय झाली होती. घरातले म्हणायचे सुध्धा प्रियाची बडबड ऐकूनच अरमान एवढा शांत रहायला शिकलाय.

प्रियाने जवळ जवळ आठ दिवस प्रक्टीस केली होती त्याच्याशी बोलण्याची पण आता त्याची गरज राहिलीच नव्हती. ती नेहमीप्रमाणे त्याच्याबरोबर बोलायला लागली. अख्खा रस्ता तिने अरमानला गावात काय भानगडी झाल्या आहेत, तिच्या डान्सचे प्रोग़्राम कसे झाले. घरातले काय म्हणतात हे ऐकवण्यात घालवल.
वाडी जवळ आली तरी तिला विषय काही सुरू करता येईन. ती स्वत्:वरच चिडली.
"प्रिया, गाडी था.बव इथे आपण चालत जाऊ." अरमान म्हणाला.

"आणि गाडी...?"
"गडी घेऊन येतील.."
तिने गाडी बाजुला लावली. दोघं खाली उतरली. तिला वाटलं परत आपण लहान झालोय आणि याच रस्त्याने शाळेत जातोय.
"अरमान, आठवतं हा रस्ता शाळेला जायचा.." त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तो चालायला लागला. ती त्याच्या पाठुन निघाली. परत तिची बड्बड चालू झाली. शाळेल्तल्या कितीतरि गमती होत्या. "प्रिया, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे.." तो म्हणाला.
ती थबकली... म्हणजे अरमानला कुणीतरी कळवलं होतं का? तिला प्रश्न पडला. पण ती काहीच बोलली नाही.


Marathi_manoos
Monday, March 05, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

When I read the first line I thought it would be Nandini's story and yes it was.
about the story...
Finally this Priya is Fair....
:-)

Runi
Monday, March 05, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी,
लवकर टाक ग पुढचे भाग... छान सुरुवात झालीये कथेची.
रुनि


Princess
Monday, March 05, 2007 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा प्रिया... sorry नंदिनी छान लिहितेयेस:-)
हिंदु मुस्लिम एकोप्यासाठी आपले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत:-) just kidding
नेहमीप्रमाणेच छान लिहितेयेस. येउ दे अजुन.



Zakasrao
Monday, March 05, 2007 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लगे रहो नंदिनी. छान लिहितेस. असच भराभर लिहित जा.

Nandini2911
Monday, March 05, 2007 - 11:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



त्या पायवाटेवरति एक लहानसा ओढा होता. पावसाळ्यात तुफ़ान भरून व्हायचा पण सध्या रिकामा होता. तिथेच बाजुला धुणी धुवून सपाट झालेला एक दगड होर्ता. अरमान त्याच्यावर बसला. प्रिया उभीच राहिली. तिच्या ह्रिदयाचे ठोके तिला स्वत्:ला ऐकू येत होते.

"प्रिया, खरंतर मी इथे यायच्या आधी मला असं वा टत होतं की मि तुझ्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करतोय, पण आता मात्र मला मी केलं ते बरोबर केलय असं वाटतय."

"तु काय बोलतोयस मला कळत नाहि. माझ्या आयुष्यात तुझ्यापासून लपवण्यासारखं काहीही नव्हतं आणि नसेल. आणि तुला कदाचित माहित नसेल पण मी माझं आयुष्य तुझ्याचसोबत घालवायचं ठरवलं आहे."

अरमान जमीनीकडे बघत होता. एक क्षण तो काहीच बोलला नाही. मग म्हणाला..
"ते माहित आहे मला. म्हणूनच मि तुला भेटायला आलोय. तुला समजवण्यासाठी...."

"समजवण्यासाठी? काय? अरमान...प्लीज असं कोड्यात बोलू नकोस. हे बघ मी घरि खूप भांडलेय तुझ्यासाठी. जीव देण्याची पण धमकी दिली होती.. आणि आज तू हे असं का बोलतोयस?"

"कारण परिस्थिती वेगळि आहे?"
"म्हणजे?"

"प्रिया, मला प्रत्येक गोष्ट नाही सांगता येणार तुला.. मी काय सांगतोय ते ऐक. मी थोड्या दिवसापूर्वी रोहितला जाऊन भेटलो. त्याने अजून लग्न केलेलं नाही... त्याच्या मनातले सगळे गैरसमज मी दूर केले. कुराण्-ए-शरीफ़वर हात ठेऊन सांगितलं की माझ्या मनात तुझ्याविषयी काहीही पाप नाही.... तो दोन तीन दिवसात इथे येतोय...."

प्रियाला वातलं की कुणीतरी तिच्या डोक्यात घण घालत आहे.
"कुणी सांगितलं तुला हे सगळं करायला... मला माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क आहे. आणि मी सांगते की मला फ़क्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे." ती संतापाने थरथरत होती.

अरमानने शांतपणे तिच्याकडे पाहिलं.
"सॉरी,, प्रिया.. पण शक्य नाही..." त्याच्या आवाजात एक तीव्र वेदना होती.

"का?"

तो काहीच बोलला नाही.
"अरमान, तुझ्या मनात दुसरी कुणी आहे का? आज पर्‍यंत माझ्यापासुन तू काहिही लपवलं नाहीस. मला तू खरं कात आहे ते सांग.. दुसरं कुणी आहे का?"

अरमाने नकारर्थी मान हलवली.

"मग तू का असं बोलतोयस? अरमान.. मी तुझ्यासाठी सगळं सोडायला तयार आहे. तू फ़क्त हो म्हण.. घरात कुणी काही म्हणणार नाही तुला... प्लीज माझं ऐक..."

तो उठला आणि चालायला लागल.
"प्रिया, चल घरी जाऊ.. वेळ फ़ार थोडा आहे.."
"कसला वेळ... तू विषय अर्धवट सोडुन जाऊ नकोस.. "
पण तो पुढे गेला होता. ती त्याच्या पाठुन धावली.
"आल्या पासून बघतेय मी.. अरमान. तू खूप बदलला आहेस." तो पुढे चालतच राहिला.
पाचेक मिनिटानंअतर प्रियाची बाग लागली. अजून दोन तीन मिनिटावर तिचं घर होतं.

अरमान थांबला..
"प्रिया, रोहित चांगला मुलगा आहे.. आणि त्याचं तुझ्यावर प्रेम आहे.."
"अरमान... बास.. तु नाही म्हणून सांगितलस ना मला? आता तुला या विषयावर बोलण्याचा काही अधिकार नाही. मी बघून घेईन माझं मी."

"तेच तर मला हवय प्रिया. तू माझ्याशिवाय जगायला शीक." त्यने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"का? पण अरमान.. मला कारण हवय. अशी कुठली गोष्ट आहे की जी तुला आणि मला दूर ठेवतेय. "

तिला वाटलं की त्याच्या डोळ्या किंचित पाणी आलं.
त्याने तिच्याकडे पाठ केली. प्रियाच्या मनात अनेक शंका कुशंका चे वारं व्हायला लागलं.
"अरमान. खरं सांग तू एखाद्या टेररीSट ग्रूपसाठी नाहि ना काम वगैरे करत आहेस?" तिच्या आवाजात भिती होती.
तो हसला. "मूर्ख. देवाने तुला कमी अक्कल दिली आहे हे मला माही आहे.. सारखं सांगु नकोस."
"माझ्या प्रश्नाचं उत्तर दे.."
"नाही. मी असल्या कुठल्याही कामात गुंतलेलो नाही.. ओके?"
पण प्रियाचं समाधान झालं नाही. तिच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह त्याला बहुधा समजलं असावं.

"प्रिया, मी तुला एक खरं सान्गू? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत.."
प्रियाने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
"पण तरीही तुला माझ्याशिवाय जगणं शिकावंच लागेल. मी तुझा साथ कधीच सोडणार नव्हतो.. पण मग.. सगळंच माझ्या हातात थोडीच आहे? प्रिया, तू माझी मैत्रीण आहेस.. आणि याहून पुढे या नात्याला काही अर्थ नाही. माझा जास्त विचार करू नकोस, मी अर्ध्यावर सोडून जाणार्‍यातला आहे.."

त्याच्या डोळ्यातुन अश्रू वाहत होते.
प्रियाने हाताने ते टिपले.
"का? अरमान? का? एवढंच उत्तर मला दे.."
"आताच नाही,, पण तुला उत्तर मिळेल.."
तिने त्यच्या डोळ्यात पाहिलं. कुठलीतरी एक खोल वेदना त्यात उमटलेली होती.
"जा.. घरी जा.." तो बर्याच वेळाने म्हणाला.
"मी गाडी घेऊन येतो." त्याने आजूबाजुला पाहिलं. एका कोपर्यात कण्हेर फ़ुलली होती. तिची दोन फ़ुलं त्याने तिच्या हातात दिली. "तुझ्यासाठी.. " आणि तो पाठी वळला.

प्रिया हातातली फ़ुले बघत चालत राहिली. अरमानच्या बोलण्यचा काहि अर्थ तिला लागला नव्हता. घर जवळ आलं तसं तिला आठवलं की गाडीची चावी तर तिच्याचजवळ आहे.. बरं झालं.. ती मनात म्हणाली. असल्या उन्हाचा मस्त डबल फ़ेरा बसेल त्याला...

घराच्या समोर खूप माणसं होती. पोलिसाची गाडी पण होती. ती धावत घराकडे आली. सगळे शांत होते. अरमानची अम्मी एका कोअर्‍यात रडत होती. प्रियचे सगळे घरवाले, गडी माणसं सगळे तिथे होते. आणि तो पण तिथे होताच.

इतक्या गर्दीतही तो तिला दिसला. झोपलेला होता तरी दिसला. तोंडावर पांढरी चादर होती तरी दिसला. ज्या अनंगणात त्यादोघानीही पहिलीपावलं टाकली होती तिथेच तो होता. नेहमीसारखा शांत. केतकी पाठुन तिला बिलगली. ती पण रडत होती..
"पहाटे नागोठण्याजवळ ट्रेनचा accident झाला. अरमान होता त्या बोगीमधेच... केव्हाचे तुला शोधतोय.. "

पुढचे शब्द प्रियाने ऐकलेच नाहीत. तिच्या हातातली कण्हेर केव्हाच चुरगळली होती..


(समाप्त)


Yogita_dear
Tuesday, March 06, 2007 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान होती कथा आणि मन हेलावुन टाकणारी सुद्धा..

Zakasrao
Tuesday, March 06, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान लिहिली आहेस. मस्त शेवटी

Proffspider
Tuesday, March 06, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान होती ही कथा....शेवट वाचुन अगदी डोळ्यात पाणी आल!!

Neelu_n
Tuesday, March 06, 2007 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी.. छोटी आणि सुंदर कथा!! मनाला चटका लावुन जाणारी पण..

Chinnu
Tuesday, March 06, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी पुन्हा एकदा सहज सुंदर कथा! खुप छान.

Maitreyee
Tuesday, March 06, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी गोष्ट चांगली आहे पण एक नाही पटलं! ते 'टेररिस्ट आहेस का' वगैरे कशासाठी? तो केवळ 'अरमान' आहे, मुस्लीम आहे म्हणून? उगीच फ़िल्मी वाटलं ते बोलणं मला.. cbdg

Ashwini
Tuesday, March 06, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, एकदम touching ग. खूप आवडली.

Kshitij_s
Tuesday, March 06, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुन्दर कथा नन्दिनी.
really touching.

Swaatee_ambole
Tuesday, March 06, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे! मस्त गोष्ट.
आणि त्या terrorist comment बाबत मैत्रेयीला अनुमोदन.


Dineshvs
Tuesday, March 06, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, चांगली कथा, पण मलाहि मैत्रेयीसारखेच वाटले.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators