|
Ashwini
| |
| Friday, March 02, 2007 - 1:35 pm: |
| 
|
जयू, छान. शेवट परीणामकारक.
|
Adi787
| |
| Friday, March 02, 2007 - 2:31 pm: |
| 
|
सुंदर, अप्रतीम ...खरं तर शब्दच नाहीत... कथेची स्तुती करायला !!! शेवटच्या भागात तर मन कसं चिर्र करुन गेलं. आई तिची मैत्रीण होती... पण ती कधिच आईची मैत्रिण होऊ शकली नाही. आणी ही कथा बरिचशी सत्यतेच्या आस-पास जाणारी आहे.. आपण रागाच्या भरात बरेच वेळा आईला उलटुन बोलतो..तीच्या मनाचा काहीही विचार न करता.
|
Chinnu
| |
| Friday, March 02, 2007 - 3:12 pm: |
| 
|
अदिला, अनुमोदक. फार दिवसांपुर्वी पाहिलेला वहिदा रहेमानचा फागुन आयो रे आठवला. कथा बरीच वेगळी आहे, पण तरी जया भादुडीला शर्वरीच्या भुमीकेत परत एकदा पाहिले! गुड वन जयुताई.
|
Dineshvs
| |
| Saturday, March 03, 2007 - 3:44 am: |
| 
|
जयु सुंदर आहे कथा. ( पण मला शीर्षक फारच ढोबळ वाटले ) मायबोलीला आता अनेक नव्या कथालेखिका मिळाल्या, हि एक चांगली बाब आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तु सलग लिहिली आहेस. खरे तर अशी असूयेची भावना, प्राण्यांमधेहि असते, ( असे दुर्गा भागवतांच्या एका लेखात वाचले होते ) पण माणसाच्या बाबतीत, ती व्यक्त होण्याचे मार्ग वेगळे असतात. चिन्नु प्रमाणेच मलाहि फागुनची आठवण आली. खरे तर त्यातली वहिदा असुरक्षिततेमुळे तसे करत असते, पण तरिही त्यातले संदर्भ फारच वेगळे आहेत. त्यात वहिदा चक्क मराठी दाखवलीय.
|
Jayavi
| |
| Sunday, March 04, 2007 - 12:04 am: |
| 
|
इतक्या छान छान प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार खरं तर मी काहीतरी वेगळंच लिहिणार होते..... पण वेगळंच उतरलं. पण मी ही सगळं जसंच्या तसं उतरू दिलं. म्हटलं बघूया काय होतं ते. दुखान्त खरं तर मलाही आवडत नाही. पण झाला खरा. दिनेश, तू सुचव ना एखादं छानसं शिर्षक. तू म्हणतो आहेस ते अगदी बरोबर आहे..... शिर्षकावरुन कथेचा लगेच अंदाज येतो ना...! शिर्षक कसं एकदम चपखल बसायला हवं.
|
Pooh
| |
| Sunday, March 04, 2007 - 8:42 am: |
| 
|
जयवी, मला असे वाटत होते की तो तिच्या आईच्याच प्रेमात पडलेला आहे पण मधेच ष्टोरी-लाईन में ट्विस्ट.
|
Aashi
| |
| Monday, March 05, 2007 - 12:59 am: |
| 
|
मलाही असच वाटले होत, एकदम मुव्हि टाइप झाले असते मग ते
|
Disha013
| |
| Tuesday, March 06, 2007 - 4:49 pm: |
| 
|
जयावी, छान जमली कथा.
|
|
|