Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 22, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » कविता » Archive through February 22, 2007 « Previous Next »

Sarang23
Wednesday, February 21, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भरपूर कविता येऊन गेल्यात इथे...
जोरदार चालू आहे सगळ्यांचच लिखाण!

मयूर... जमले नाही सुंदर लिहिली आहेस! कविता छान पकड घेते हे विशेष!
शिरीष कौशल्य आवडली...!

स्मी, जाता आयुष्याला म्हटल??? मला कळाले नाही
जात्या आयुष्याला असं म्हणायचं आहे का?


Pulasti
Wednesday, February 21, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाचा कोपरा, कौशल्य, सुख, चाकोरी -- आवडल्या!

केदार, देवा - वेद आणि योगांबद्दल messages वाचले. काही नोंदी -

१. कर्मयोग आणि कर्मकांड यात प्रचंड फरक आहे.
२. "योग" विचार करायचा झाला तर योग २ नाही, ३ नाही तर ४ आहेत. ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग आणि भक्तियोग.

अर्थात हे सर्व इथल्या बर्‍याच जणांना माहीत असेलच, तरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता कुणाचाही गैरसमज होऊ नये.. हाच उद्देश.

-- पुलस्ति.

Neelkantee
Wednesday, February 21, 2007 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल अचानक माझ्यासमोर अगदी टिपिकल सौदी बायका आल्या…..आयला, बुरख्याच्या आडून बरंच काही...
अप्रतीम!
१९ फेब्रु. ची बात करतेय मी...


Neelkantee
Wednesday, February 21, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२० फेब्रु.
अरे...काय छान लिहिलय तुम्ही सगळ्यांनीच!
नायगारा... अंधश्रद्धा...शिल्लक....कमाल आहे...
luv u all

Meghdhara
Wednesday, February 21, 2007 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निसटलेले धागे
पुन्हा पकडायच्या प्रयत्नात
कधी कधी
बोटात उरते ती चुटपूट
हट्टाला पेटते..
केवीलवाणी,
मनातल्या कापसात
पिंजत रहाते.
कातू बघते,
याच कापसातुन
विरलेलं रेषीम.
या निसटण्या- पकडण्याच्या छंदात,
रंगवत रहाते सांजेला.
थकून..
करते निजेला आर्जवं.
'येते' 'येते' म्हणत
नीज काळोखाशी
काचापाणीचा डाव मांडते..
खळ्ळ
ssss
'ती' पुन्हा कार्यरत होते
पकडण्यात, निसटाण्यात
हरवण्यात
उलटत रहाते रात्रीसोबत.

मेघा



Smi_dod
Wednesday, February 21, 2007 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग... मला जाता जाता च म्हणायच आहे.मी जाता जाता या आयुष्यातून शिल्लक काय आहे हे बघितले. ..:-)

Neelkantee
Thursday, February 22, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मला अजून जमत नाही'
बरोबर आहे...तु अजून लहान आहेस...वयाने नाही म्हणायचं मला...
शितावरुन भाताची परीक्षा करू शकतो आपण...
पण श्लोकावरुन धर्माची नाही...
धर्मकांड... कर्मकांड... ह्यापलिकडे एक 'सहजयोग' सांगितला आहे...
सह जायते इति सहज...
सहज जन्माला येते ते...
आता हे प्रत्येक गोष्टीला apply कर...
वेदना जाऊन त्याची जागा संवेदना घेईल...
मग समज येईल... 'समाजा'ची संकल्पना बदलेल...
त्रास होणार नाही...
आपल्या मंत्र-तंत्रात उच्चारामुळे निर्माण होणार्‍या vibration ला खूप महत्व आहे...
आपण ज्याला vibes म्हणतो ते...
skin level ला विचार केलास तर ते समजणार नाही...
थोडा खोल खोल जा...
मग आपला 'विवेकानंद' व्हायला वेळ लागत नाही 'आपल्यापुरता'
धर्म मूलत पाखंडी नसतो...
execute करणारे आपण पाखंडी असतो...
Roman धर्मगुरूंबद्दल काय म्हणशील...?
Jesus ने छानच सांगितलं... पण त्याचे पुढे काय झाले...
तुझे शब्द नुसते नव्हते...कुठंतरी तुला आतल्याआत त्रास होतो आहे असे वाटले म्हणून...
हा उपद्व्याप...
beauty lies in the eyes of the beholder
दृष्टी आपली असते...
दृष्टीकोनही आपलाच













Smi_dod
Thursday, February 22, 2007 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दृष्टी आपली असते...
दृष्टीकोनही आपलाच
>>>>>नीलु ताई,.. व्वा...खरय...
फ़ारच आशयघन..


Ssbhave
Thursday, February 22, 2007 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यांचा सोबती तर पाण्याचा डोह आहे
एखादे दुख: झाले तर त्या डोहातील एक एक थेम्ब बाहेर पडतो,
तो डोह माझा नेहेमी भरलेला असतो
रोज एकदा तरी त्या डोहातिल पाण्याला माझ्या गालावर येउ वाटते
पण त्या अश्रुना कय माहिती मला ह्रुदयात किती दुख: होते
आता ते अश्रु मल खुप जवळेचे झाले आहेत
असे नको व्हायला की शब्द मुके अन नजरा आंधळ्या
म्हणुन अश्रुंनी माझी सोबत धरली आहे
याच अश्रुतून मला एक यशाची अन ज्ञानाची वाट दिसते
असे नको व्हायला की फ़ुलांच्या आधी काटे उगवायला
मायबापा मला सोडले पण अश्रु कसे मला सोडतील
पण तेच अश्रु कोणितरी प्रेमाने हातावर पुसून घ्यावे, त्यात प्रेम घालावे
कारण ते अश्रु माझ्या डोळ्यातील थेंब आहेत जसे पणतितील तेलच आहेत

सारीका जाधव गुरूकूल चिंचवड


Smi_dod
Thursday, February 22, 2007 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तुझे....

शब्द तुझे घेउन
सुगंधीत झुळुक आली
स्पर्शुन तनाला
मन घेउन गेली....

स्पर्श तुझे लेवुन
चांदणे हसले आकाशी
मिठीत चंद्रम्याच्या
मोहरून गेले

पापण्यां आडचे ओले घन
चिंब भिजवुन गेले
जाता जाता मोत्यांनी
ओंजळ भरून गेले

आठवांच्या चाहुली
चहुबाजुंनी जागल्या
जागेपणी डोळ्यात
स्वप्न ठेवुन गेल्या

स्मि


Ganesh_kulkarni
Thursday, February 22, 2007 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" नशीबी "
माझ्या चेहर्‍याला...
शरीराला, त्याच्यां
व्यंगाला पाहून खूप...
हसतात लोकं!,
तेव्हा...
मला त्यांचा कधीच...
राग येत नाही!...,
कारण..
माझ्या इतकं तरी... हक्काच
आहे नशीबी सुख...
लोकानां दुखवण्यापेक्षा...त्यानां
हसवत ठेवण्याचं!
गणेश(समीप)


Mayurlankeshwar
Thursday, February 22, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग धन्यवाद!
मेघधारा... निसटलेले धागे छान आहेत!
गणेश 'नशीबी' खूप आवडली..:-)

नीलकंठी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
मी श्लोका वरून धर्माची परीक्षा केली हा तुमचा एक प्रचंड गैरसमज झाला आहे!
तेवढा मी 'मोठा' नाही..'लहान' आहे हे तुम्ही आधीच नमूद केलेत हे विशेष!

पण तरीही तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला 'सहज' म्हणून सहजयोगाचा जप करणे तुमच्याप्रमाणे प्रत्येकाला कसे जमेल?
स्व:ताची 'स्किन' लेव्हल सोडुन आत्म्-मश्गुल 'व्हाईब्स'च्या नादी लागणं मला जमत नाही हा माझा 'लहान' पणा एकदम मंजूर!
समाजाची संकल्पना बदलण्यासाठी आधी भौतिक जीवन-शैली मधील समानता महत्वाची असते!
धर्माला मी पाखंडी म्हटलेच नाही.
माणसाच्या उध्दारासाठी असा काही अल्गोरीदम नाही. पण 'जाणीवा ' प्रायोरीटाईज केल्या पाहीजेत!
जगण्याच्या पातळीवर अजुनही माणसे हल्लक असताना 'मोक्षा' ची बात कशाला असे मला वाटते!!
दृष्टी आपलीच आणि दृष्टीकोनही आपलाच... अगदी साहजिक
पण तरीही दुस-यांच्या नजरेतून एकदा तरी जग पाहयचा प्रयत्न करावा 'माणसा'ने...

'तुझे शब्द नुसते नव्हते...कुठंतरी तुला आतल्याआत त्रास होतो आहे असे वाटले म्हणून....'

अगदी खरंय हे... मी मातीवर जगणारा 'लहान' माणूस आहे... आणि म्हणूनच 'यातना' सोसणाराही! आभाळाकडे 'टक' लावुन याचना करणे मला जमत नाही..ती माझी औकात ही नव्हे!



Mayurlankeshwar
Thursday, February 22, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मला जमत नाही' ह्या कवितेतून कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतु नव्हता आणि नाही.
पण तरीही कुणाला तसे काही जाणवले असल्यास मी अत्यंत क्षमस्व आहे.
चूक भूल देणे घेणे :-)


Mankya
Thursday, February 22, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांनीच छान लिहिलय !

Mayurlankeshwar
.... कविता नाहि दिसली माझ्या संगणकावर ... पण विश्लेषणावरुन जबरीच प्रकार वाटतोय !

निलुताई ...Beauty lies....I believe in it!!

स्मि .... तुझे ... नेहमीप्रमाणेच गोड कविता ! ( तुम्हा लोकांना असे शब्द कसे सुचतात देव जाणे ?)

चाकोरी ... शब्दात छान पकडलेस ह्या विषयाला !

सुख ... खरय ! मस्त उतरलिये !

मेघा ... भावना पोचल्या नाहीत ! (Definitely my problem, can you please explain!)

माणिक !


Neelkantee
Thursday, February 22, 2007 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरा...आपण दोघेही वेडेच आहोत वाटते... अरे, शब्द काहीवेळेला घोळ घालतात हेच खरं...



Neelkantee
Thursday, February 22, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला काहीच म्हणायचे नव्हते... असं कसं म्हणू...
शब्दांनाच घाई होती... असंही कसं म्हणू...
निसटले ओठातून...
पाझरले बोटातून...
ओठही माझे...
बोटेही माझीच...
मग शब्द मात्र माझे नाहीत असं कसं म्हणू...
(मयूरा, शब्दांचं हे असं असतं...)
त्यांनाही म्हणायचं काहीच नव्हतं...
पण उमटल्यानंतर हे असं मी तरी कसं म्हणू...
ही प्रतिक्रिया नाही...उमटलेले बोल आहेत...


Lopamudraa
Thursday, February 22, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त नीलुताई.. खुप छान..!!!!

ही प्रतीक्रिया की कविता
जे आहे ते फ़ार सुंदर आहे......


Raadhika
Thursday, February 22, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता आणि प्रतिक्रिया छानच आहेत सर्व

Manas6
Thursday, February 22, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांना स्व.सुरेश भटांची कविता, गज़ल समज़ली आहे,
त्यांना ही कविता नक्कीच कळेल, आणि कदाचित आवडेल सुद्धा!
-----------------------------------------------------------------

सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये


सावलीच प्रिय असणाऱ्यांनी, उन्हात पाऊल ठेऊ नये,
अन धग सोसवत नाही , त्यांनी सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये!

कवाडेच बंद ठेवणाऱ्यांनी प्रकाशाची तिरिप मागु नये,
नि सुर्यालाच नाकारतात,त्यांनी सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये!

आखीव-रेखीव जगतात, त्यांनी ह्या कलंदाराला तोलु नये,
आणि विहिरीतील मंडूकांनी, सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये!

फ़ुंकर घालताच कोसळतात, त्यांनी वादळाला आव्हान देऊ नये,
अन कागदी घोडे नाचवितात, त्यांनी सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये!

चेहरेच लपविणाऱ्यांनी कधीही आरश्यात पाहु नये,
आणि मुखवट्यात वावरतात,त्यांनी सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये!

सुईलाही घाबरतात, त्यांनी दुधारी तलवार मागु नये,
अन 'एल्गार' पाहुनच पळतात,त्यांनी सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये!
-मानस६







Mayurlankeshwar
Thursday, February 22, 2007 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलू ताई.. चूकून काही जास्त बोललो असेन तर खरंच माफी मागतोय... जाऊ देत हा विषय आता बंद केलेलाच बरा:-)

'असं कसं म्हणू...' हे बोल खूप आवडले... शब्दांचं आणि भावनांचं नातं सहजपणे मनाला स्पर्शून जातंय :-)

मानस ६ 'सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये' भारीच जमलीयं...
धमकीवजा सूचना असल्याचा भास होतो!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators