Smi_dod
| |
| Wednesday, February 21, 2007 - 1:22 am: |
| 
|
जया,सुधीर,वैभव,मयुर,भ्रमर,प्रिन्सेस,रधिका.परागकण अभिप्रायाबद्दल मनःपुर्वक आभार..... आपण लिहीतो ते कितीही स्वान्तसुखाय म्हटल तरी अशी दाद मिळाली की अजुन लिहिण्या साठी प्रोत्साहन मिळते... लिहावे अजुन ही भावना जागत ठेवते.. स्मि
|
Manogat
| |
| Wednesday, February 21, 2007 - 1:36 am: |
| 
|
मयुरलंकेश्वर, पुलिस्त धन्यवाद असेच प्रोत्साहन तुम्हा लोकांन कडुन मिळाल तर माझ्या सरख्या नव कविला पण कहि लिहिण्याच उत्तेजन मिळत, Thanks
|
Shyamli
| |
| Wednesday, February 21, 2007 - 1:55 am: |
| 
|
शलाका !!!!! स्मि शील्लक वाह
|
Shirishk
| |
| Wednesday, February 21, 2007 - 2:12 am: |
| 
|
प्रतिक्षा किती हा उशीर! जेव्हा कोसळले मी, तेव्हा जवळ असतास तर कदाचित कळली असतीही तुला माझी कधीच न जाणवलेली वेदना कदाचित कळली असतीही माझ्याबरोबरच मिटणारी माझी एकच याचना! आजतरी लवकर यायला पाहिजे होतस तू सगळ्या गात्रांमधलं त्राण निघुन गेलं तरी मी प्राणांना कसं बसं धरुन ठेवलेलं त्याना समजावत होते, इतके दिवस इतकी वाट पहिलीत, आता थोडाच काळ... पण तेही वेडे इतके हट्टाला पेटलेले की मला न जुमानताच निघुन गेले ..(तुझ्यासारखेच!) पण अजुनही आठवतं, कोसळताना वेडी आशा होती कदाचित ह्या शेवटच्या क्षणी तरी माझी हाक तुझ्या मनापर्यंत पोहोचेल आणि तु येशील ----- अन आता ह्या सगळ्याच्या पार जाउनही मी पुन्हा इथेच! कारण? कारण... ही तशीच अतृप्त इच्छा ही अनन्तापर्यन्त्ची प्रतिक्षा ही कधीही न संपणारी शिक्षा ही कधीही न संपणारी शिक्षा शिरीष
|
Shyamli
| |
| Wednesday, February 21, 2007 - 2:15 am: |
| 
|
वाह.. .. .. .. अन आता ह्या सगळ्याच्या पार जाउनही मी पुन्हा इथेच!>>> !!!!!!!
|
आवडलीकविता छान आहे. पुधील लेखनाला शुभेछ्ह
|
Dhund_ravi
| |
| Wednesday, February 21, 2007 - 2:33 am: |
| 
|
सहीच ग शिरीष... तुझ्या बाकीच्या कवितापण टाक ना धुंद रवी
|
शिरीष कधीही न संपणारी शिक्षा आवडली!
|
Ssbhave
| |
| Wednesday, February 21, 2007 - 2:45 am: |
| 
|
मस्त ग अशीच लिहित रहा. आम्ही असेच वाचत राहू.
|
Vinaysm
| |
| Wednesday, February 21, 2007 - 2:53 am: |
| 
|
अप्रतिम! खरंच खुप छान. येत राहूदे...
|
Meghdhara
| |
| Wednesday, February 21, 2007 - 3:13 am: |
| 
|
शिरीष.. व्वा.... कधीही न संपणारी.. मेघा
|
Sherloc
| |
| Wednesday, February 21, 2007 - 3:31 am: |
| 
|
इथे लिहिलेल्या सगळ्या कवितांवर "वा, खुप छान" असंच म्हणायची पद्धत आहे का? असल्यास माझ्याकडुनही सर्वच कवितांना "वाह!"
|
Smi_dod
| |
| Wednesday, February 21, 2007 - 4:01 am: |
| 
|
शिरीष... सुंदर... चाकोरी!!!!! तीच चाकोरी त्याच मळलेल्या पायवाटा आखुन दिलेल्या सुबक, गुळगुळीत शिक्षण, नोकरी,मुल वासनेच रहाटगाडग चालु असत नंतर त्या चाकोरीत विरक्त झालेल मन आसक्ती विरक्तीच्या हिंदोळ्यावर मागे पुढे होत....कधी कधी चाकोरी सोडुन धावत.... अवखळपणे बर्याचदा जखमी होउन परत फ़िरत चाकोरीत....पराभूत पणे क्वचित कधी ठेचकाळत,चुकत मार्गही सापडतो वेगळा...... कधीतरी विरक्तीच्या मार्गावरही उतरत चोखाळली जाते वेगळी वाट.... स्मि
|
Lopamudraa
| |
| Wednesday, February 21, 2007 - 4:21 am: |
| 
|
इथे दोन दिवसात भरपुर काही घडुन गेलेल दिसतय आता काय काय वाचु अस झालय..!!!
|
Shirishk
| |
| Wednesday, February 21, 2007 - 4:31 am: |
| 
|
Thanks re sagalyna! Mi ithali regular member nahi /navhate... Mazi anakhin ek kavita attach keratiye..

|
स्मि..फ़ारच मोठ्या विषयाला शब्दांकीत केलंयस... 'कधीतरी विरक्तीच्या मार्गावरही उतरत चोखाळली जाते वेगळी वाट....' ह्याचा अर्थ समजला नाही
|
Smi_dod
| |
| Wednesday, February 21, 2007 - 5:13 am: |
| 
|
मयुर आसक्ती आणि विरक्तीच्या हिंदोळ्यात आपण सगळेच येतो कधी न कधी.. .. पण विरक्तीचा मार्ग तरी सगळेच स्विकारतात असे नाही. काहीजणच पुर्ण पणे विरक्त होतात.आणि मग हा विरक्तीचा मार्ग भिन्न नाही का?ईतरांपेक्षा?... असा अर्थ मला अपेक्षित आहे..
|
Smi_dod
| |
| Wednesday, February 21, 2007 - 5:16 am: |
| 
|
सुख!!!! सुखाच्या शोधात निघाले खुप पायपीट केली ठायी ठायी जे जे म्हणुन सुख असावेसे वाटले ते ते पारखुन बघितले हेच आहे का सुख? कि अगोदर होते ते सुखावह होते छे!कशास म्हणावे सुख या शोधात गात्रे थकली मन थकले... थकल्या मनाने विसावल्यावर जाणवले देण्यातल्या आनंदातल ते सुख सुख हवय म्हणुन मागण्यात नसत वाट्याला येईल त्यालाच सुख म्हणुन स्विकारण्यात असत स्मि
|
अच्छा.. असं आहे होय! विरक्तीचा मार्ग हीच वेगळी वाट आहे आधी मी कन्फ्यूज झालो होतो थोडासा काहीतरी 'चाकोरी' बाहेरचं वाचल्याचं जाणवलं! शिरीष 'कौशल्य' सुंदर आहे.
|
Krishnag
| |
| Wednesday, February 21, 2007 - 6:27 am: |
| 
|
स्मि,.. खरय सुख मानण्यात असतं.. सुख मागण्यात नसतं सुख मानण्यातं असतं वाट्याला आलेले सुखावह म्हणुन मिरवण्यात असतं देण्यानं सुखावलेले चेहरे पहाण्यात असतं तृषार्तांच्या ओठी जलाची ओंजळ धरण्यात असतं क्षुधीतांच्या तोंडी चारा घालण्यात असतं म्हणुनच सुख मागण्यात नसतं तर देण्यात असतं देता देता मिळालेल्या आनंदात असतं
|