Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 21, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » विनोदी साहित्य » विडंबन » Archive through February 21, 2007 « Previous Next »

Devdattag
Tuesday, February 20, 2007 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भोगतो मी रोज मजला KBC बघावे लागते
केवढे ते पीजे त्याला मज हसावे लागते

वाढले असते खरे ते GK माझे केवढे
पण खानाच्या बोलण्याने शीश धरावे लागते

राहते कच्चेच सगळे पकविले त्याने जरी
अन उद्याच्या आशेवरती फ्रीज करावे लागते

चालते त्याची उधारी पाच रुपयाची सदा
करोडपति झाले असे का कुणी पुसावे लागते

एकदा कोणीतरी त्या उत्तर नेमके ते दिले
मन जिंकण्यास राजा अमित बनावे लागते


Kandapohe
Tuesday, February 20, 2007 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा सही रे. मुळ कविता पण टाक. :-)

Jayavi
Tuesday, February 20, 2007 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा....... क्या बात है रे!
राहते कच्चेच सगळे पकविले त्याने जरी
अन उद्याच्या आशेवरती फ्रीज करावे लागते
हे अगदी जबरी :-)


Kmayuresh2002
Wednesday, February 21, 2007 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा जबरीच रे भो...:-)

Shyamli
Wednesday, February 21, 2007 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन जिंकण्यास राजा अमित बनावे लागते >>>
ये बात बढीया है :-)


Vaibhav_joshi
Wednesday, February 21, 2007 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा .... जयाशी सहमत
:-)


Vaibhav_joshi
Wednesday, February 21, 2007 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ गाणे गुरुवर्य कै . सुरेश भटांचे अप्रतिम भावगीत " पहाटे पहाटे मला जाग आली "

लिंक
लिंक

विडंबन

पहाटे पहाटे मला जाग आली
सुरू लॅपटॉप अन सुरू मायबोली

किती आयडी .. एकही आठवेना
कसा पासवर्ड एक साधा जुळेना
नवे नाव आले .. नवी नोंद झाली

सुरू लॅपटॉप अन सुरू मायबोली

तुम्हां वाटते " हे बहाणे कशाला?"
अहो गुच्छ मिळतो फुले गुंफलेला
पहा स्वागताला समिती निघाली

सुरू लॅपटॉप अन सुरू मायबोली

नव्या चेहर्‍यांनी इथे यायचे मी
जिथे पाहिजे त्या तिथे जायचे मी
सराईत झाल्या पुन्हा हालचाली

सुरू लॅपटॉप अन सुरू मायबोली

मला आण त्या विसरल्या आयडींची
तुम्हां आण त्या घेतल्या आयडींची
कुणीही असू पण असू भोवताली

सुरू लॅपटॉप अन सुरू मायबोली

त.टी :- उच्चाराने स्वागत समिती मधला " मि " दीर्घ येतोय त्या बद्दल दिलगीर आहे पण त्या ओळीचा मोह टाळता नाही आला
:-)


Jo_s
Wednesday, February 21, 2007 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा तू तर करोडोंचं मनोगत लिहीलस, सहीच

वैभवा
सुरू लॅपटॉप अन सुरू मायबोली
हसून हसून पुरे वाट झाली...


Lopamudraa
Wednesday, February 21, 2007 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उच्चाराने स्वागत समिती मधला " मि " दीर्घ येतोय त्या बद्दल दिलगीर आहे पण त्या ओळीचा मोह टाळता नाही आला>>>.
मस्त वैभव.. (स्वगत समितीवर खार का म्हणे???)
बाकी


Vaibhav_joshi
Wednesday, February 21, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खार ? बास का ! कौतुकाने म्हणतोय अगं .. खार कसा असेल .. आत्तापर्यंत मला तीनदा पुष्पगुच्छ मिळालाय



Lopamudraa
Wednesday, February 21, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तीनदा फ़ुले मिळालित...!!! ..

Devdattag
Wednesday, February 21, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद रे सगळ्यांना..
लिंक टाकायला विसरलो खरा
वैभव सहिच..:-)
वैभव तुला तिनदा फुले मिळाली आहेत.. मला फुल्या मिळाल्या आहेत.. ;)


Shyamli
Wednesday, February 21, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भले .. .. .. ..

Sarang23
Wednesday, February 21, 2007 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा! वा! वा!! मनातलं बोललास मित्रा...!

वैभवा, स्वतःत एक सुंदर कविता म्हणूनही आवडली आणि विडंबन म्हणून पण!


Sanghamitra
Wednesday, February 21, 2007 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> पहा स्वागताला समिती निघाली
वैभव



Jayavi
Wednesday, February 21, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहा.... क्या बत है!
सुरू लॅपटॉप अन सुरू मायबोली
वा.......!
माझा नवरा म्हणतो..... अगं दोन मिनिट जरी मिळाले तरी काय बघायचं मायबोलीत.... :-) आता त्याला कसं समजावून सांगू..... अरे हा पण माझाच संसार आहे म्हणून :-)


Dineshvs
Wednesday, February 21, 2007 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव ( ब्रुटस ) , यू टू ?

Swaatee_ambole
Wednesday, February 21, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, ultimate !
मला एकसुद्धा गुच्छ दिलेला नाही अजून कोणी.. स्वागत समिती इकडे लक्ष देईल काय?


Manas6
Wednesday, February 21, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाटा रुते कुणाला
(चाल- काटा रुते कुणाला)

बाटा रुते कुणाला,
आक्रंदतो इथे मी,
मज बूट हे रुतावे,
हा दैवयोग आहे!
(आहे वर जीवघेणी तान घ्यावी,
नाहीतर बूट चावतो आहे
हे लक्षात कसे येणार?)
रुते कुणाला....!

सांगु कशी कुणाला,
कळ हाय अंगठ्याची,
हे बूट घालता मी,
अस्वस्थ फार आहे!
(आ.व.ता.घ्या.)
रुते कुणाला....!

चांभार हाय वैरी,
असतो कुठे दुपारी,
म्हणूनी जुनीच आता,
पायी वहाण आहे!
रुते कुणाला.....!

अंगठा विभक्त झाला,
तळवा फकस्त राहे,
हे चालणे बघा ना,
भलतेच मस्त आहे!
रुते कुणाला....!

फुटले नशीब आता,
ह्या दोन पावलांचे,
माझ्या जुन्या वहाणा,
ढापून चोर 'जा', 'ये'!
(म्हणजे चोर माझ्या जुन्या
वाहाणा घालुन माझ्यासमोरुनच
'ये-जा' करतोय)
रुते कुणाला..!

हा पायगुण माझा,
आहे असा करंटा,
नुकताच मंदिरी त्या,
बदलुन बूट राहे!
रुते कुणाला..!

-मानस६







Swaatee_ambole
Wednesday, February 21, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> (आ.व.ता.घ्या.)

मस्त, मानस!

>>>> राहते कच्चेच सगळे पकविले त्याने जरी
अन उद्याच्या आशेवरती फ्रीज करावे लागते
देवा, सहीच!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators