Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 20, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » मराठी गझल » Archive through February 20, 2007 « Previous Next »

Sarang23
Monday, February 19, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

          दिवा

भलतेच काजवे हे घुसले घरात माझ्या !
उपराच राहिलो मी तारांगणात माझ्या !

मी तुळस लावलेली, जाई-गुलाब सुद्धा
पण बाभळीच रुजली या अंगणात माझ्या !

मीही मठात गेलो; अन मंदिरात गेलो
मी चार धाम फिरलो, शांती मनात माझ्या !!

नजरेत पाप आले, मन वासनेत न्हाले
नुस्त्याच आरत्या पण ताला-सुरात माझ्या !!

ना तेल मी दिलेले, ना वातही दिव्याला
अंधार लख्ख अंती दिपला उरात माझ्या...!

सारंग


Ganesh_kulkarni
Tuesday, February 20, 2007 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग,
तुम्ही किती छान गझल लिहीता!

मीही मठात गेलो; अन मंदिरात गेलो
मी चार धाम फिरलो, शांती मनात माझ्या !!
क्या बात है!


Shyamli
Tuesday, February 20, 2007 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नजरेत पाप आले, मन वासनेत न्हाले
नुस्त्याच आरत्या पण ताला-सुरात माझ्या !!>>
वा!!


Meenu
Tuesday, February 20, 2007 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तुळस लावलेली, जाई-गुलाब सुद्धा
पण बाभळीच रुजली या अंगणात माझ्या ! .>>>> हे मस्त
पहील्या शेरावर विचार करतेय.
बाकी सगळ्या शेरांच्या अर्थात माझा गोंधळ झाला ...
शांती मनात होती मग का मठात, मंदिरात, चार धामला गेला ..?

नजरेत पाप आले, मन वासनेत न्हाले
नुस्त्याच आरत्या पण ताला-सुरात माझ्या !! >>> इथे पण खटकतोय मला .. अर्थाच्या दृष्टीने ..
आणि अंधार दिपला ..?
चु. भु. दे. घे.


Devdattag
Tuesday, February 20, 2007 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग छान रे..
मीनु तो मठात, मंदिरात आणि चारी धाम गेला याचीच शांती त्याच्या मनात होती..


Sarang23
Tuesday, February 20, 2007 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो आभारी आहे...

मिनू...
शांती मनात होती मग का मठात, मंदिरात, चार धामला गेला ..?
तरीही गेला!!! :-)

इथे पण खटकतोय मला .. अर्थाच्या दृष्टीने ..
नक्की काय खटकलं ते न कळल्यामुळे काहीही सांगू शकत नाही... बाकी सगळ्याच निकषांवर तो "पण" चपखल आहे असे वाटते.

आणि अंधार दिपला ..?
नुसताच दिपला नाही, लख्ख दिपलाय...
ना तेल मी दिलेले, ना वातही दिव्याला
अंधार लख्ख अंती दिपला उरात माझ्या…!

इथे स्वतःचा पुर्ण जन्म उगीच वाया घातलेल्या माणसाला शेवटी का होईना साक्षात्कार झाला आणि अंधार लख्ख उजळलाय ही भावना दिसून येते... हा अगदी सरळ अर्थ...
आणि दुसर्‍या अंगाने विचार केला तर आता तो अंधारच अधीकाधीक गडद होत चाललाय... कारण पुर्वी कधी हे सगळे जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही आणि आता कळतय पण त्याचा उपयोग नाही अशा अवस्थेत तो अंधार अधीकच दाट झालाय. मळभ दाटलाय असाही अर्थ होऊ शकतो.

एकंदर कुठलेच विरोधाभास आपल्या लक्षात आलेले दिसत नाहीयेत, तुम्ही परत वाचा अशी विनंती..

चु.भु.दे.घे.

देवा, इतका सरळ अर्थ नाहीये त्या शेराचा... तो मठात जातो, मंदिरात जातो, गाव गाव फिरतो शांतीसाठी... पण त्याची फसगत बघ... काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी आहे. शांती तर त्याच्या मनात आहे.




Vaibhav_joshi
Tuesday, February 20, 2007 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ... मस्त गज़ल .. आवडली

भलतेच काजवे हे घुसले घरात माझ्या !
उपराच राहिलो मी तारांगणात माझ्या !

क्या बात है सारंगा

( स्वातीचा " भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता " शेर आठवला . अर्थात तुझा मतला पूर्णतः वेगळा आहे . फक्त त्या निमित्ताने तिची गज़ल पण पुन्हा वाचून झाली )

मी तुळस लावलेली, जाई-गुलाब सुद्धा
पण बाभळीच रुजली या अंगणात माझ्या

मस्त .. फक्त
मी तुळस लावली अन जाई - गुलाबसुद्धा

असे केले तर चालेल काय ? quantifying मिसरा असल्याने " अन " मुळे कनेक्ट होईल असे वाटते

मीही मठात गेलो; अन मंदिरात गेलो
मी चार धाम फिरलो, शांती मनात माझ्या !

छान ... तिचं नाव " शांती " आहे होय ?
:-)
jokes apart मस्त शेर
मीनू .. का गोंधळ झाला ? बहुतेकवेळा हे सगळं माहीत असूनही शेवटीच कळतं ना ?

नजरेत पाप आले, मन वासनेत न्हाले
नुस्त्याच आरत्या पण ताला-सुरात माझ्या !!

वाह !!!!

" आले " , " न्हाले " हे र्‍हिदम साठी आकर्षक असलं तरी पूर्ण शेर मध्ये वर्तमानाकाळाची एक झाक आहे असे वाटते ...

नजरेत पाप असते , मन वासनेत न्हाते
असतात आरत्या पण ताला सुरात माझ्या

असं काहीसं चालेल काय ?

बाकी स्पष्टीकरणं तू दिलीच आहेत .
मी ज्या काही किरकोळ सुचवण्या लिहील्या आहेत त्या गज़ल पुन्हा पुन्हा वाचताना डोक्यात आलेल्या आहेत .
ते बदल नाही पटले तरीही मला ही गज़ल आवडली आहे
पुढील लेखनप्रवासाला शुभेच्छा



Sarang23
Tuesday, February 20, 2007 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, धन्यवाद...
तू म्हणतोस तशी स्वातीची गझल मलाही आठवली, कदाचीत ती गझल माझ्याही डोक्यात कुठेतरी असेल म्हणून... आणि दुसरे साम्यस्थळ म्हणजे वृत्त सेम आहे. पण अर्थ पुर्ण वेगळा आहे. (अर्थात ते तुही सांगितलं आहेस म्हणा.)

तीचं नाव शांती नको रे बाबा :-) असलं तर बदलावं लागेल.

वर्तमानकाळाबद्दल म्हणशील तर पुर्ण गझल एकाच काळात ठेवण्यासाठी ते तसं केलं आहे. नाहीतर वाचताना मजा गेली असती.
या सगळ्या गोष्टी ज्या तू सांगितल्या, त्यावर आधीच विचार झाला होता रे...

जसे...
मीही मठात जातो; अन मंदिरात जातो
मी चार धाम फिरतो, शांती मनात माझ्या !
हे असंही बसेल ना...

किंवा

मी तुळस लावतो अन जाई-गुलाब सुद्धा
पण बाभळीच रुजते या अंगणात माझ्या !

आणि तुला खोटं वाटेल, पण पहिल्यांदा ही पुर्ण गझल अशीच लिहिली होती मी. नंतर बदल करून टाकली. वर्तमानकाळात.
आता हा बदल मी का केला हे तुझ्या लक्षात येईल...! :-)


Nandini2911
Tuesday, February 20, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भलतेच काजवे हे घुसले घरात माझ्या !
उपराच राहिलो मी तारांगणात माझ्या

सारंग.. हे मस्त आहे..


Jayavi
Tuesday, February 20, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भलतेच काजवे हे घुसले घरात माझ्या !
उपराच राहिलो मी तारांगणात माझ्या
अहा....... मलाही हे जास्त भावलं :-)


Daad
Tuesday, February 20, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, मस्तच आहे गज़ल. प्रत्येक शेरातला विरोधाभास छानच आहे. दुसरा शेर अगदी आवडला.

वैभवराव, हे " quantifying मिसरा" किस झाड की मूली का नाम आहे ते सांगून टाकाल का? (पटकन?) किंवा 'राजा सारन्गा, डोलकरा...' तू तरी!
( sorry लोक्स. )


Vaibhav_joshi
Tuesday, February 20, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके पटकन तर पटकन ...
:-)
अगं quantifying म्हणजे hybrid भाषा वापरली गेली लिहीताना .. तो तुळस , जाई आणि गुलाब म्हणतोय ना म्हणून मध्ये जोडायला " अन " लागेल असं वाटलं .. कदाचित माझ वाक्य चुकलं असेल ..
:-)


Sanghamitra
Tuesday, February 20, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग सुरेख आणि सहज.
प्रत्येक शेरात छान पंच आहे.


Pulasti
Tuesday, February 20, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग - दिवा आवडली!
आरत्या आणि मक्ता विशेष भावला..
--पुलस्ति

Swaatee_ambole
Tuesday, February 20, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, मस्त जमली आहे गज़ल. मक्ता सुंदर आहे. आपलीच खोली बघून उरातला अंधार दिपला... आणि नेमका तोच त्याचा उजळण्याचा क्षण.. वा!

Meghdhara
Tuesday, February 20, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग
क्या बात है! वाह!


Dineshvs
Tuesday, February 20, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग मलाहि पहिला शेर खुपच आवडला.
तिसर्‍या शेरातल्या पण वर थोडेसे थांबायला होतेय.
आर्त्यांमधे भक्तिभाव नाही, पण दिखावा आहे, असा अर्थ असेल, तर तो नीट जाणवत नाही.
पण आरत्या नुसत्याच तालासुरात माझ्या

किंवा

तरि आरत्याच नुसत्या तालासुरात माझ्या

असे काहितरी बसतेय का ?
या गुस्ताखीबद्दल लिहितानाच कान पकडले आहेत रे बाबा !


Paragkan
Tuesday, February 20, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिला आणि शेवटचा शेर आवडेश!

Chanakya
Tuesday, February 20, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, गज़ल छान आहे. मक्ता आवडला...
पण मीही मठात गेलो मधला 'ही' खटकला किंवा समजला नाही.

स्वातीच्या सुंदर गज़लची आठवण मला पण झाली...

sorry बर्‍याच दिवसांनी यायला जमले.... त्यामुळे मागच्या महिन्यातला thread पुढे सुरु करतो...

योग - धन्यवाद.... तुम्ही खूप चांगले स्पष्टीकरण दिलेत.... ते भोगलेले प्रथम पुरुषी तर तापलेले थोडे तृतियपुरुषी वाटते असा एक वेगळाच दृष्टीकोन दिलात तुम्ही....

तसेच वैभवनी सुचवला 'तुडवलेला' हा बदल मला पण रुचला नव्हता... पण का रुचत नाहीये हे स्पष्टपणे मांडता नाही आले तेही मस्त मांडलेत तुम्ही...

लग्नाची उपमा ही आवडली पण चर्चा झाली तर काहीच हरकत नाही.. नविन नविन विचार कळतात आणि सुधारणा ह्यायला मदतच होते


वैभव - वाटु लागे बाबत तुमचे म्हणणे एकदम बरोबर. मीही तिथे अडलो होतो.. पण गज़ल म्हणताना उच्चार र्हस्व वाटला म्हणून तसाच वापरला...
वाटू लागे ऐवजी वाटताहे असा छोटा बदल चालु शकेल काय?

बाकी विचारधारा पुढे नेण्याची ही प्रक्रीया अशीच चालु ठेवावी...


Swaatee_ambole
Tuesday, February 20, 2007 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाणक्य, मीही मधून बहुधा गतानुगतिकता व्यक्त करायची असावी असं मला वाटतंय. चार लोकं जातात म्हणून मी ही गेलो.. खरा शोध कुठे घ्यायला हवा आहे याचा विचार केला नाही..

अर्थात, सारंग सांगेलच त्याला काय अभिप्रेत आहे ते.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators