|
Jayavi
| |
| Monday, February 19, 2007 - 8:44 am: |
| 
|
वैभव, नंदिनी, सारंग....... तुम्ही सुचवलेला बदल केलाय. खरं म्हणजे मलाही ती अनावश्यक वाटली होती इथल्या हॉस्पिटल मधे हे लोक असे अचानक समोर आले आणि तिथेच जन्मली ही कविता.... पर्समधे सापडलेल्या एका बिलावर पूनम, मयुर, वैभव, स्मि, नंदिनी, राधिका, दिनेश, सारंग........ मनापासून आभार दिनेश.... अरे वाचलंय ते पुस्तक. त्यामधे इराणबद्दल लिहिलंय. भयंकरच आहेत तिथले अनुभव तर.... अगदी शहारा येतो वाचताना! मयुर, अरे बाघी म्हणजे बगावत करणारा देवा...... मला नाही कळली रे तुझी कविता कोणीतरी समजावून सांगा ना प्लीज.
|
Niru_kul
| |
| Monday, February 19, 2007 - 10:49 am: |
| 
|
हॉस्पिटलच्या खाटेवर हॉस्पिटलच्या खाटेवर, मृत्यूशी दोन हात करताना, उगाच तुझा विचार आला मनात...... वाटलं... मी गेल्यावर तुझं काय होईल? तुला त्रास कोण देईल? तुला रोज फोन कोण करेल? तुझ्याशी विविध विषयांवर वाद कोण घालेल? तुझी अखंड बडबड कोण ऐकेल? तुझ्या नाजुक भावनांना कोण समजून घेईल? तुझे सगळे प्रॉब्लेम कोण सोडवेल? तुझी गार्हाणी कोण ऐकून घेईल? तुझ्या गोड आवाजाचे कौतुक कोण करेल? तुझ्यावरती एवढ्या सगळ्या कविता कोण लिहील? तुझ्या साठी गाणी कोण बनवेल? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट..... तुझ्यावर माझ्याइतकं मनापासून प्रेम कोण करेल? हॉस्पिटलच्या खाटेवर, मृत्यूशी दोन हात करताना, उगाच तुझा विचार आला मनात......
|
Manas6
| |
| Monday, February 19, 2007 - 11:43 am: |
| 
|
आपल्या समाजातील आंधळ्या समजुतींचा,रुढींचा अंध:कार दुर व्हावा ह्या सदीच्छेसह ! गेले आडवे मांजर ! गेले आडवे मांजर, चुके ठोका काळजाचा, मांजर बी हळू बोले, गेला उंदीर हातचा!-१ आज हाये अमावस्या, वाटे धाक-धुक फार, झाला पोरगा वकील, आली दारावर तार !-२ कसंनुसं वाटे मले, लेक दारात शिंकली, परं माह्या येड्या मना, तिले सर्दी भाय झाली !-३ पडे हातातुन खाली , कुंकवाचा ग करंडा, पर धनी आने घरी, भरलेला बैलगाडा!-४ जाता तिघे जन संगे, म्हने कामे बिघडती, पर लेकरु आजारी, संगे माय-बाप जाती !-५ जीव वरती खालती, विझे देवाचा ह्यो दिवा, कर थोडा त ईचार, आली जोरात ही हवा !-६ भारी लवे डावा डोळा, काय वाईट आनखी? पर आली दारावर, बगा साईची पालखी !-७ -मानस६
|
Arch
| |
| Monday, February 19, 2007 - 1:02 pm: |
| 
|
जया, केवढ भयानक सत्य आहे न हे! छान पोहोचवल आहेस. मानस, फ़ारच छान. अंध श्रध्दावरती एक कार्यक्रम असतो न TV वर तिकडे पाठवून दे.
|
Jayavi
| |
| Monday, February 19, 2007 - 1:29 pm: |
| 
|
मानस..... मस्तच गावरान भाषेमुळे आणखी जवळ पोचतेय तुझी कविता. आर्च.... धन्यवाद अगं खरंच आम्ही तर इतके भयानक प्रकार ऐकले आहेत ना... असं वाटतं मागच्या जन्मी काय पाप केलं असेल ह्यांनी की ह्या जन्मी स्त्री जन्म मिळाला ह्या देशातला.
|
Daad
| |
| Monday, February 19, 2007 - 5:13 pm: |
| 
|
श्यामले, अगदी खरय. हा 'उद्या' आपण बर्याचदा "आज" आणि "काल" च्या अनुभवावरून ठरवतो. मला तर अनेकदा वाटत की उद्याचा "उद्या" पूर्णपणे नवाच असावा आज आणि काल चा संदर्भ नसलेला? छ्छे! काय मस्त कविता आहे, गं! गणेश, पाट्या आवडली. मयूर, काहीतरी वेगळ वाचल्याचं जाणवतय. स्मि, कान्चन्गंधा, नेहमीप्रमाणेच सुन्दर कविता! देवदत्त, कविता कळली नाही. कुणीतरी (किंवा देवा, तुम्हीच) मदत करा रे (गं). जयश्री, एक सुंदर कविता अगदी आतून आतून आलेली. - 'बुरखे सुद्धा काळेच पुरुषी अहंकारासारखे…'! - किती समर्पक. मानस(सहावा), जयश्रीशी पूर्णपणे सहमत. गावरान भाषेमुळे आणखी जवळ येते कविता. मस्तय. निरज, हॉस्पिटलच्या खाटेवर - अगदी खरय.
|
Pulasti
| |
| Monday, February 19, 2007 - 9:49 pm: |
| 
|
नायगार्याचे मला जाणवलेलं "जीवन"-रूपक. नायगारा ============================ अवखळ अल्लडशा शैशवात - हळुहळू भरू लागतो शक्तिस्रोत. जीवनाने रसरसलेले असे यौवन जेव्हा कोसळते अतीव आवेगाने तेव्हा... त्यातून ऊठतात कर्तृत्वाची मनोहर ईंद्रधनुष्ये! मग हे सर्व ओसरतं - ओसरणंही तसच विलक्षण. अफाट कर्मशीलतेची सगळी रग जिरवून, पचवून उरतात --- शांत अविनाशी तत्वाच्या गवसलेल्या कवडश्यांची लहानमोठी वलयं. जीवनाचा नायगारा अव्याहत चालूच राहतो! -- पुलस्ति
|
पुलस्ती.. 'नायगारा' खरोखरच जीवनाला स्पर्शून गेल्यासारखं जाणवतं! छान रूपक आहे.
|
"अनामिक" मनाच्या खोल तळात... कांहीतरी अनामिक... तरंगत असावे..., असे सतत होतात भास! त्यांच्या तरंगण्याने एरव्ही सळसळणारे ही... दबत आहेत श्वास! काय आहे ते... मलाही माहीत नाही!... पण... जाणीव मात्र होते आहे... मी जेव्हा, जेव्हा... एकटा असतो तेव्हा तेव्हा... मनाच्या खोल तळात... कांहीतरी अनामिक... तरंगत असावे..., एकटे एकटे! गणेश(समीप)
|
Jayavi
| |
| Monday, February 19, 2007 - 11:24 pm: |
| 
|
शलाका........ शुक्रन (हे अरबीतून आभार ) पुलस्ति, नायगारा..... क्या बात है........ जबरी गणेश....... छान उतरलीये तुझी अनामिक!
|
जया, सुंदर गं! जितक्या जमिनी तितका अंधार.. खरंय.
|
Shyamli
| |
| Tuesday, February 20, 2007 - 12:07 am: |
| 
|
जयु सही कविता, आवडली मानस,प्रत्येक कवितेत नवीन काहीतरी असत, मस्तय कविता पुलस्ती नायगरा आवडली अभिप्रायांबद्दल धन्यवाद लोक्स
|
श्यामली छान सुरुवात. जया सुरेख लिहिलीयस गं. कसलं हे जगणं? नवर्याशी वाद घालण्याचे स्वातंत्र्य नसेल तर काय त्या भारंभार दागिन्यांची मजा? नाही का गणेश छान झालीय हं अनामिक. मानस पहिलं कडवं छानय.
|
Smi_dod
| |
| Tuesday, February 20, 2007 - 12:17 am: |
| 
|
शिल्लक!! जाता आयुष्याला म्हटल झालय जगुन आता कर बर जरा हिशोब बर्या वाईटाचा.... जमा खर्चाचा मेळ काही बसेना शिल्लक तर कुठेच दिसेना दिसला तळाशी एक सुकलेला मोगरीचा गजरा हीच श्रीशिल्लक माझ्या सर्वार्थाने निरुपयोगी आयुष्यातली सहस्रावधी दागिन्यांपेक्षा अनमोल.... जाता जाता बघितल हे एक बरं झालं... शिल्लक काहीतरी आहे या आनंदात जगण्याला बळ आल स्मि
|
दाद,ज़यावी, Sanghamitra धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे! गणेश(समीप)
|
Smi_dod
| |
| Tuesday, February 20, 2007 - 1:06 am: |
| 
|
कवडसा!!!! अंधाराचा पददा दूर सारत प्रकाश फ़ाकतो सर्वदूर माझ्या अंधार कोठडीत पण एक तिरीप येते सुर्यकिरणांची काळ्या छपराच्या आभाळात सुर्य होउन येतो एक कवडसा...... आधी असतो छोटा मग मोठा मोठा होतो दिवस मावळत आला की विरत विरत जातो परत अंधाराची चादर पांघरून प्रकाश झोपी जातो मी वाट बघत बसते उद्या परत येईल तो कवडसा माझ्या भेटीला... तो प्रकाशाचा तुकडा आता झालय माझ जग पण कधी कधी आभाळ दाटत सुर्याला लपवतं...मग येत नाही कवडसा माझ्या भेटीला व्याकुल होउन वाट बघते मोकळ्या आभाळाची...सुर्योदयाची अन माझ्या कवडश्याची स्मि
|
Jayavi
| |
| Tuesday, February 20, 2007 - 1:08 am: |
| 
|
स्वाती, श्यामली, मित्रा.... धन्यवाद मित्रा.... वा स्मि..... शिल्लक........ कल्पना सुरेख!
|
Jo_s
| |
| Tuesday, February 20, 2007 - 2:22 am: |
| 
|
काय मस्त मैफिल जमल्ये श्यामली, जयावी, मयुर, मानस, स्मि, निरू मस्तच सारेजण जयावी एकदमच बुरख्याआडची वेदना छानच. ती दिसूनये म्हणूनच बुरखा असतो का? मानस, अंधश्रध्देला काही करू शकत नाही. समुद्राचं पाणी गोड झालय करत अजूनही लोक गर्दी करतात, पितात. गणपती दुध पितो म्हणून रांगालावतात.
|
मानस .. मस्त आहे .. विशेषतः " साईची पालखी " शेवट खूप आवडला पुलस्ति ... रुपक आवडले .. सही . गणेशजी .. अनामिक छान आहे स्मि .. शिल्लक आवडली
|
Athak
| |
| Tuesday, February 20, 2007 - 3:30 am: |
| 
|
वा किती छान लिहिता सर्वजण great great . जयु , इथे आपण कधी हसुन comments करत असु पण खर्या अर्थाने ' या बुरख्या आंत दडलय काय ' अगदी छान शब्दात मांडलस तु .
|
|
|