Shyamli
| |
| Monday, February 19, 2007 - 2:18 am: |
| 
|
अपेक्षा मावळत्या प्रत्येक दिवसाला वचन द्यायचं उद्यापासुन नाहीच ठेवायच्या काही अपेक्षा आणि हा "उद्या"येईल ही अपेक्षा करत रोज वाट बघायची उद्याचीच श्यामली
|
पाट्या हल्ली मी... अंत्ययात्रेवरून परत येतानाच मला एक सारखाच पडतो प्रश्न... स्मशानांच्या वेगवेगळ्या पाट्या पाहील्या की! हिंदुचं स्मशान(वैकुंठभवन)... मुस्लिमांचे कबरस्थान... ख्रिश्चनांचे Cemetry ... तरीही शेवटी मरण ते एक! वाटतं... आपण जन्मणारी,मरणारी... माणसं,माणूसजातीची... जायचे ठिकाण एक!... आपल्याला,आपल्या उदरात सामावून घेणारी... ही जमीन पण नेक! पण... का? ... आपण ह्या पाट्या उभ्या करायच्या आणी.. मरणालाही जाती-धार्मांच्या जागा दाखवायच्या? हल्ली मला... एक सारखाच पडतो प्रश्न... स्मशानांच्या वेगवेगळ्या पाट्या पाहील्या की! गणेश(समीप)
|
मित्रांनो ब-याच दिवसातून कविता लिहीत आहे...तेव्हा सांभाळून घ्यावे. सगळ्यांना ही कविता पटेलच असं नाही...पण जे मनात आलं ते लिहतोय.. ---------------------------------------------------- परवा,काल,आज उद्या ---------------------------------------------------- परवा बापाला कविता ऐकवली... ऐकल्यासारखं करून बाप म्हणाला ,'करीअरचं काय?' मी म्हणालो---काहीच नाही. मनातल्या मनात निश्चय वगैरे केला-- जगातल्या सगळ्या बापांच्या बेकार पोरांवर कादंबरी लिहू... काल बापाशी हुज्जत घालायची अवदसा सुचली... मी विचारले,'शेतक्-यांच्या आत्महत्येबद्दल तुमची भूमिका काय?' विचार-बिचार केल्यासारखं करून बाप म्हणाला,'पुण्यात जागाफ्लट बघून ठेव. भाड्याच्या घरात राहून भणंगपणा येतो. होम-लोन मिळण्याची औकात कधी येणार?' आज बापाशी काहीच बोललो नाही. पेपरमधल्या शंभर-दिडशे शब्दांच्या 'अमूक-तमूक पाहीजेत' च्या जाहीरातीशी आयूष्याचं बार्गेनिंग चालूहे सकाळपासुन. डोक्यात विचार येतोय-- उद्या आपण सुध्दा 'बाप' झाल्यावर अश्या कवितांकडे दुर्लक्ष करणार! हा पिढ्यापिढ्यांचा दरिद्री चोथा वारसाहक्काने पुढे सरकवणार! च्यायला! 'बापै सुखिन: सन्तु||बापै सन्तु निरामय||' ----------------------मयूर--------------------
|
Meghdhara
| |
| Monday, February 19, 2007 - 3:02 am: |
| 
|
श्यामली.. जीना इसीका नाम है! गणेश.. हं.. मयूर अरे बर्याच दिवसांनी निचरा करतोयस तर रेषमाची वाट पहा थोडी. मेघा
|
Smi_dod
| |
| Monday, February 19, 2007 - 3:22 am: |
| 
|
मौन तुझे!!!! मौन तुझे.... मुक करते मलाही तुझ्या प्रत्येक सादेसरशी पालवी फ़ुटते मनाला तु सांगंशील आता आता नक्किच..... ... वाट बघते सतत पण...... तु फ़क़्त सादवतोस आणि गप्प होतो मौनातले अर्थ मग मीच लावत बसते मला हवे तसे स्मि
|
स्मि...तूझे मौन छानच... मेघा..काय म्हणतेस काही कळलं नाही. ही 'रेषमा' कोण??
|
Jayavi
| |
| Monday, February 19, 2007 - 4:00 am: |
| 
|
श्यामली....... अगदी खरंय गणेश..... मयुर.... बाघी हा शब्द ऐकला आहेस कधी? स्मि, मौनानंच साधतात बरेच लोक आपापलं साध्य
|
Jayavi
| |
| Monday, February 19, 2007 - 4:01 am: |
| 
|
काल अचानक माझ्यासमोर अगदी टिपिकल सौदी बायका आल्या….. नवर्यासोबत अगदी दबून असलेल्या. त्या नवर्याच्या चेहर्यावर इतकी मग्रुरी होती ना….. जणू काय त्या सगळ्या बायका त्याची मालमत्ता होती आणि त्याला जसा हवा तसा वापर तो करु शकत होता. त्या बायकांचे वाकलेले खांदे, झुकलेल्या नजरा बघून अगदी कसंतरीच झालं आणि मनात विचार आला……. बुरख्याआडच्या वेदना… गुरफटून राहतात तशाच सोन्याचा मुलामा चढवून…मिरवत राहतात अशाच तेलाच्या खाणीतलं ऐश्वर्य जगापुढे दाखवताना पैसा आणि मग्रुरीच्या कैफ़ात दुनियेला झुकवताना दुर्लक्ष करतात…….. त्या काळ्या बुरख्याआड चिणून टाकलेल्या संवेदनांकडे…. दाबून टाकतात ते सारे उसासे. छोट्याशा डोळ्यांच्या फटीतून… कावर्याबावर्या नजरा भिरभिरत राहतात फ़क्त सवयच होऊन गेलेली त्यांच्या उमाळ्यांना दबून रहायची. त्या छोट्याशा फ़टीतूनच अनुभवायची दुनिया. बुरखे सुद्धा काळेच पुरुषी अहंकारासारखे…! कुठल्याही रंगाच्या भावनेला काळवंडून टाकणारे. त्या उदासी आवरणाला आता रंगाचंच वावडं झालेलं… फुलण्याची….खुलण्याची स्वप्नंच करपलेली…. वखवखलेल्या वासनेची पूर्ती…..हे एकच काम उरलेलं, बुरख्यावरची जरतारी कलाबतूच काय ती थोडी हसते बाकी सगळं भकास…..! कधीतरी एखादी ठिणगी ह्या काळ्याशार अंधारात पेटून उठेल… आणि उजळेल आसमंत थोडावेळ….! अशी आशा तरी जागत असेल हा ह्यांच्या मनात….? की ह्या अंधाराची सोबतच आता त्यांना हवीहवीशी वाटत असेल…. नुसतेच प्रश्न…..! जितक्या जमिनी, तितकेच अंधार पण उगवणारा सूर्य एकच. तो कितीसा पुरणार सगळ्यांना….! आता अंधारालाच पेटून उठावं लागणार आहे कधी ना कधी फाडून टाकावे लागणार आहेत….स्वत:चे बुरखे स्वत:च आणि जन्माला घालावा लागणार आहे आपला स्वत:चा सूर्य !
|
Princess
| |
| Monday, February 19, 2007 - 4:17 am: |
| 
|
वाह जयु... खुपच अप्रतिम... कोणा दुसर्याची वेदना इतक्या प्रभावीपणे मांडलीय की डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. आपला स्वत:चा सुर्य... हम्म... खुप आवडले.
|
वा..जयावी..जबरद्स्त... शब्द--'बाघी'-- हे काय आहे?
|
जया ... खास .. शेवटची ओळ अनावश्यक वाटली .. मला कवितेचा peak point सूर्य शब्दावरच वाटतोय .. चु. भू दे घे
|
Smi_dod
| |
| Monday, February 19, 2007 - 4:57 am: |
| 
|
श्यामली छान मयुर.गणेश.... चांगलीये वाह...जया... अति सुन्दर... खुपच touchy गं...
|
जया, खरंच खूप सुन्दर आणि त्या आपला स्वात्:चा सूर्यला संपती तर खूप्च अर्थपूर्ण वाटली असती.
|
Raadhika
| |
| Monday, February 19, 2007 - 5:33 am: |
| 
|
जया, अप्रतिम... खूप आवडली
|
विश्वास.... एक विश्वास मनापासून दिलेल्या सोबतीचा सहवेदनांचा… सहचाराचा आश्वासक स्पर्शाचा घट्ट धरल्या हाताचा एक विश्वास.... निश्चिंतपणे हक्काने विसावायला एक खांदा आहे याचा कुठलेही वेदना हसत सहन करण्याचा हवाय..फक्त एक विश्वास आणि मग हाच विश्वास देतो उभारी जगण्याला अंतरीच्या सार्या वेदनांना लावतो क्षणार्धात विसरायला ह्या विश्वासावर पादाक्रान्त होतात आव्हाने सारी आयुष्याची.... ह्या विश्वासावरच तरुन जाईल नाव वादळातील अनोख्या सहचर्याची....
|
Devdattag
| |
| Monday, February 19, 2007 - 6:22 am: |
| 
|
चेहरा लाल डोळे बंद अर्ध्या रात्री उमले कळी काही शब्द पेंगुळलेले पुरोहिताचे मूक बळी रात्र दिवस दोन शब्द ओळख सारखीच मात्र सुख ओरबाडलं जात आणि रितंच भिक्षा पात्र झालाच आवाज कसला की फक्त वार्याचे वहाणे घेतला जन्म दानवाचा बाकी फक्त खोटे बहाणे
|
घेतला जन्म दानवाचा बाकी फक्त खोटे बहाणे ... अप्रतिम देवदत्त...केवळ अप्रतिम..
|
Dineshvs
| |
| Monday, February 19, 2007 - 7:16 am: |
| 
|
जयु, आजुबाजुला हे असे दुःख वावरत असताना, तु अशी कविता लिहिणे हे अपेक्षितच होते. श्यामली पण यावर लिहु शकेल. BTW तुम्ही दोघीनी बेटि मेहमुदी चे नॉट विदाऊट माय डॉटर, हे पुस्तक वाचले आहे का ? याच नावाचा सिनेमाहि आहे. बुरख्या आडच्या जगाची थोडी झलक आहे त्यात. आणि तुला अपेक्षित आहे तो प्रतिकारहि आहे.
|
सुख ओरबाडलं जात आणि रितंच भिक्षा पात्र मस्तच....
|
Sarang23
| |
| Monday, February 19, 2007 - 8:14 am: |
| 
|
वा! जयावी सुंदर... मलाही शेवटची ओळ अनावश्यक वाटली. देवा! सुख ओरबाडलं जात आणि रितंच भिक्षा पात्र केवळ सुरेख!
|