|
Samai
| |
| Wednesday, February 14, 2007 - 7:13 am: |
| 
|
"चल ना टेरेस वर जाऊयात फटाके बघायला, येतेस?" सागर रीया ला विचारत होता. सागर एक २५ वर्षांचा, अगदी सालस सरळ मुलगा. एका नामांकीत कंपनी मध्ये कॉम्प्युटर ईंजीनिअर म्हणुन काम करत होता. आई, वडील, सागर स्वतः, बहीण सरिता आणि आजी अस पाच जणांच छोटं आणि सुखी कुटुंब. रीया नुकतीच म्हणजे तरी वर्षभरापुर्वी तीच्या आई, वडील आणि भावाबरोबर सागरच्या शेजारच्या घरात रहायला आली होती. ती स्वतः देखील कॉम्प्युटर ईंजीनिअर म्हणुन काम करत होती. चारी मुलं जवळपास एकाच वयाची. त्यामुळे ओळख मैत्रीत बदलायला फार वेळ लागला नाही. रीयाचं आणि सागर च तस जमायचही खुप. गाण्याची आवड, कुठल्याही गोष्टीशी समरसून जण्याची सवय. दोघही एकमेकांना अगदी compatible . बंध जुळायला असा किती वेळ लागणार? म्हणजे अस कोणी कोणाला विचारल किंवा दाखवलं नव्हतं अजुन. पण मी सुत्रधार ना? मग मला माहीत असणार ना ह्या गोष्टी मुलांबरोबर दोन्ही कुटुंबही छान जवळ आली होती. एकत्र जेवणाचे प्रोग्रॅम काय, ट्रीप ला जाण काय, मजेत आयुष्य चाललं होतं. कितीही दमून आलेला असु दे सागर, रीयाच्या घरी एक चक्कर मारल्याशिवाय त्याला बरच वाटायच नाही. आणि रीया ती ही अशीच वेडी, वाट बघायची हा कधी येतोय म्हणुन. मग कधी गप्पा मारुन, कधी पत्ते खेळुन, कधी गाण्याच्या भेंड्या खेळुन तर कधी नुसताच थोडावेळ TV बघुन मगच सागर झोपायला जायचा. खरतर रीयाच्या आईलाही आश्चर्य वाटत होत, की अगदी रात्र रात्र थांबुन काम करणारी आपली मुलगी जितक लवकर जमेल तितक लवकर घर कस काय गठायला लागली आहे. तीनी आडून आडून विचारयचाही प्रयत्न केला होता, पण सागरला काय वाटत हेच जिथे माहीत नव्हतं तिथे काय सांगणार होति रीया आईला आणि आज दिवाळी, दुपारची जेवणं झाल्यावर सगळी आवरा आवर करण्यात आईला मदत करुन रीया रांगोळीचा डबा घेउन बाहेर आली. सकाळीच तिनी आणि सरितानी मिळुन design select करुन ठेवल होतं. सरिताही आलीच तेव्हढ्यात. दोघींचा रंगोळी काढता काढता चिवचिवाट चालला होता. आणि सागर उगाच मध्ये मध्ये करत होता. ही रेघ निट आली नाहीये. तिथे तो रंग जास्ती चांगला दिसेल, असं उगाच. आणि आता सागर रीयाला हे विचारतोय. "हो, चल जाऊय की, आईऽऽऽ आम्ही फटाके बघुन येतो ग, टेरेसवरच आहोत." चला मंडळी, मी सुत्रधार आहे ना, मग मला तर गेलच पाहीजे वर, तुम्ही येताय? "रीया" "हम" "मी तुला आत्ता वर का बोलावलय माहीत आहे" "फटाके बघायला" " please रिया, no jokes , मला तुझ्याशी थोडं बोलायच आहे." "सागर मला कल्पना आहे त्याची" "मग काय म्हणणं आहे तुझं" "नाही सागर, खर सांगु मी त्या दृष्टिनी अजुन विचारच केला नाहीये" " " "सागर please गैरसमज करुन घेउ नकोस, मलाही तु आवडतोस, पण मला आत्ता काहीच सुचत नाहीये ........... " अरे हे काय होतय, मी अस तर नव्हतं ठरवलं, ही रीया मी सांगीतलं तशी नाही वागते, काहीतरी वेगळच बोलतीये. ह्या एव्हढ्या छान नात्याचं हे काय होऊन बसलय? आज महीना झालाय, ना दोघ एकमेकांशी पहील्यासारखी वागत आहेत, ना बोलत आहेत खरतर दोघही कुढतायत मनातुन, पण मग हे अस का? ना धड जेवण, ना झोप, सतत विचार करुन डोळ्याखाली आलेली वर्तुळं, कामात लक्ष्य नाहीये. मंडळी मला हि हाताबाहेर चाललेली कथा ताळ्यावर आणलीच पाहीजे. मी आलोच रीयाशी बोलुन येतो जरा. हम आता बघा पुढे. लाव, अग लाव ना फोन त्याला .............. "हॅलो, सागर, रीया बोलतीये." "अरे, रीया तु? बोल." "सागर ............. " "बोल ना रीया, काय झालं" "सागर" "आता नुसतीच सागर सागर करत बसणार आहेस की सांगशील काही?" "सागर, अरे मला जरा तुझ्याशी बोलायच होतं, भेटशील मला?" "रीया अग मला यायला आज निदान आठ साडे आठ होतील, ............ बरं ठीक आहे, मी आल्यावर मग बोलु, चालेल ना?" "ठीक आहे" "हा, बोल रीया" मंडळी हा परत टेरेसचा देखावा "सागर, तु मला विचारलेल्या प्रश्नाच माझ उत्तर हो असेल तर .............. " " ............... " "सागर अरे बोल ना काहीतरी please " "रीया ऐक, कदाचीत तुला जड जाईल हे ऐकयला, पण जर विचार केलास तर तुलाही पटेल कदाचीत. रीया तु मला नाही म्हटल्यावर मी नव्यानी ह्या गोष्टीवर विचार केला. आणि मग मला असं जाणवलं की तुझ्या उमेदीच्या कक्षा आणि माझी भरारी यात खुप अंतर आहे गं रीया कदाचीत त्या परमेश्वराच्याच मनात नाहीय बहुतेक. रीया ऐकतीयेस ना? अरे कुठे गेली ही" " " झालं एकीकडे ठिगळ लावायला गेलो तर दुसरीकडे फाटलं आता ह्या सागरला काय झालय कळत नाहीये. जाउ दे झालं, त्यांच आयुष्य त्यांच्या बरोबर. मी सुत्रधार असुनही ...... "हाय सागर, कसा आहेस? आजच तुझा ID मिळाला " मंडळी मी कथा पुढे चालवत नाहिये हं, कारण कथेचा control माझ्या हातून कधीच गेलाय. ही दोघही आपल्याला वाटेल तशी वागून माझ्या कथेच पार वाटोळं करुन टाकलय ह्यांनी. आता जशी कथा पुढे जाईल तशी जाईल, मी फक्त तुम्हाला सांगत जाईन. बर पण तुम्ही म्हणाल की हे काय सुरु झालय आता नवीन, म्हणून सांगतो. मागच्या प्रसंगानंतर मध्ये एक नाही दोन नाही चांगली चार वर्ष गेलीयेत. मधल्या काळात रीयाचही लग्न झाल आणि सागरचही. दोघही आपआपल्या संसारात खुप खुश आहेत. नाही म्हणायला मधुनच कधीतरी दोघांनाही एकमेकांची आठवण येते. पण मग आपल्या जोडीदारावर आपण अन्याय तर करत नाहीये ना? किंवा हे अस दुसर्याकुणाचा विचार करण देखील पाप आहे असा विचार करुन तो विचार आयुष्यातुन बाजुला काढत आपआपला संसार सुखाचा करत होते. common friends असल्यामुळे एखाद दोन कार्यात भेट झाली होती इतकच. आणि अश्याच एका common friend कडुन रीयाला सागरचा याहू ID मिळालाय. "हे रीया, तु? किती दिवसांनी, कशी आहेस? आई बाबा, शेखर कसे आहेत?" "वर्षांनी म्हण बुध्धु, आणी मी मजेत. नवरा, दोन मुली, सासु सासरे असा मोठ्ठा परिवार आहे माझा. दुःखी व्हायला पण वेळ नाहीये आई बाबा पण मजेत. आता शेखरसाठी मुलगी बघतायत. तु बोल, कसा आहेस? बायको, मुलगा कसे आहेत? आणि काका, काकु?" "मी पण एकदम मस्त, मजेत. हो बायकोची नोकरी परत सुरु झाली, मुलगा वर्षाचा झाला ना आता. आई पप्पा पण मजेत." " ...... " "कुठे गेली ही? आहेस का ग?" "हाय सागर sorry रे काल PM नी urgent मिटीन्ग बोलावली आणि मधुनच जावं लागलं" "असु दे असु दे" " ne ys कामात नाहीयेस ना?" "नाही, का ग, बोल ना" "नाही मी आहे कामात म्हणुन म्हटल. :D " "" "चल will catch you later " "हाय रीया आहेस का?" "सागर ..... आहे आहे. बोल." "रीया तुला एक प्रश्न विचारु" " hmmmmmmmm " "रीया तु अजुन माझ्यावर चिडली आहेस?" "तुझ्यावर, कश्याबद्दल? नाही मी नाही चिडलिये तुझ्यावर" "खरच नाही चिडलीये ना, त्या दिवाळीनंतरच्या प्रसंगावरुन" " ........... " "रीया बोल ना." "नाही मी अजिबात चिडली नाहीये. आणि तु?" "मी पण नाही चिडलोय, खुप relaxed वाटतय तु चिडली नाहीयेस हे ऐकुन. मनावरच दडपण उतरल्यासारख" " hmmmmmmm " "पण खरच सांग रीया, तुला मी आवडत नव्हतो ना त्यावेळी" "मग मी तुला स्वतःहुन कश्याला विचारल असतं?" "मग नाही का म्हणाली होतीस पहील्यांदा?" "मी आता कितीही खर सांगीतलं तरी तुझा विश्वास नाही रे बसायचा" "सांगुन तर बघ" "सागर माझं मलाच कळलं नाही रे त्यावेळी मी अस का म्हणले ते आणि नंतर मग वेळ निघुन गेली होती रे." "म्हणजे???? तुला मी आवडत होतो?" " ......... " क्रमशः
|
Sakhi_d
| |
| Wednesday, February 14, 2007 - 11:23 pm: |
| 
|
समई छान आहे........ लवकर पुढचा भाग टाक.
|
Swa_26
| |
| Thursday, February 15, 2007 - 4:28 am: |
| 
|
समई, तुझी कथा छानच लिहित आहेस तु... तु रागावु नकोस, कारण हे मी हे तुला कोणत्याही प्रकारे वैयक्तिक रित्या दुखावण्यासाठी लिहित नाहीय..पण... ह्या आजकालच्या नायक-नायिकांना झालंय तरी काय??? पूर्वी कसे दोघे एकमेकांना आवडले की मग थोड्याफार अडचणी यायच्या आणि मग finally त्यान्चे लग्न व्हायचे and they lived happily everafter हल्ली मात्र trend बदललाय असे वाटते, कारण दोघांचे प्रेम जुळेपर्यंत सगळे ठिक असते, पण मग ते accept करायची तयारी मात्र नाही. आताच्या generation चाच हा problem आहे असे वाटते, प्रत्येक बाबतीत confusion ... आणि मग उपरती होते आपले ह्याच्यावर / हिच्यावर प्रेम होते म्हणून... हे आपले माझे मत... नाहीतर लगेच V&C चालू व्हायचे... असो.
|
Madya
| |
| Friday, February 16, 2007 - 2:53 am: |
| 
|
aata KANK zalay sagalikade.
|
समई, छानच आहे हं, ही कथा!!!!!! पुढच्या भागाची वाट पाहतोय.............. Swa_26, i totally agree with u......
|
|
|