|
संध्याकाळची वेळ... सात साडे सात पण नसतील वाजलेले. मी नुकतीच कामावरून आले होते. खूप दमले होते. एक तर मुंबईच्या लोकल्सची सवय नव्हती. त्यातून पहिला जॉब म्हणुन काम पण खूप करायचा प्रयत्न करायचे. घरची खूप आठवण यायची.. पण आता हळूहळू सवय होत आली होती. वर्किंग वूमेन्सच्या या हॉस्टेल लाईफ़शी जुळवून घेण्याचे प्रयत्न अजूनही चालू होते. सुरुवातीला इथे खूप insecure वाटायचं. पण सगळ्याशी ओळख झाली. दिपाली, माझी रूममेट तर खूपच छान मुलगी होती. दुसरी रूममेट, वेदिका. ती आणि मी कधी जास्त भेटलोच नाही. ती रात्री खूप उशिरा यायची आणि बर्याचदा नसायची. रूमवर आल्यावर मी चहा करून घेतला. हा असा चहा करणं allowed नव्हतं. पण हॉस्टेलला आल्यावर मी शिकलेला पहिला नियम म्हणजे. नियम हे मोडण्यासाठी असतात. अजून कुणीच आलं नव्हतं. नाही म्हणायला आमच्या समोरच्या रूममधे राहणार्या केरळी मुलीचा ग्रूप होता पण त्या असणं आणि नसणं याने कूणालाच फ़रक पडत नव्हता. FM वर गाणी ऐकत होते तेवढ्यात रेन्नीचा आवाज आला... "अस्विनी.." हिने माझं नाव दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारायची शपथ घेतली होती. "आ जाओ.. " मी दरवाजा उघडला. गोरी, उंच आणि शेलाट्या बांध्याची रेनी समोर उभी होती. हातात धोबी घेऊन येतो तसे कपडे धरले होते. " Which one is good? " तिने विचारले. रेनी एका वकिलाच्या फ़र्ममधे रीसेप्शनिस्ट होती. त्यामुळे दररोज छान नटून जायची. पण आता तिने हातात धरलेला एकही ड्रेस ऑफ़िसमधे घालायच्या लायकीचा (आणि लांबीचा नव्हता). मला मुळात ते trends वगैरे काही समजत नाही. मी काय बोलणार? "अरे, बता ना. कल पहनना है... "रेनीच्या आवाजाला एक मंगलोरी किनार होती. ऐकताना फ़ार मजा वाटायची. तेवढ्यात सुजाता... रेनीची रूम मेट आली. "कुठचाही ड्रेस चांगला नाही. असं सांग.." ती म्हणाली. "पण हे आता कशाला हवय.." माझ्या आवाजातला त्रासिकपणे मला जाणवला. "अरे. कल valentines Day है.. भूल गयि क्या?" रेनीने माझ्या बेडवरती ते चार ड्रेस टाकले. ओह.... उद्या होता का Valentines Day . सोलापूरसारख्या शहरात माझं बालपण गेलेलं. तिथल्या कॉलेजात असलं काही नव्हतंच. आणि इथे मुंबईत येऊन पण दोनच महिने झालेले. आज ऑफ़िसात पण चर्चा चालू होती खरी. "तू किसके साथ जायेगी?" रेनीनि विचारले. "किधर?" मला प्रश्न पडला. "आशू... कधी गं तुला अक्कल येणार? उद्या तू तुझा व्हेलेंटाईन्स डे कुणाबरोबर celebrate करणार?" "मी... माझा कुणी पण बॉय फ़्रेंड नाहिये. आणि उद्या ऑफ़िस आहे ना?" मी उत्तर दिलं. "पागल... तुझसे तो उम्मिद रखनी बेकार है.. बता मै क्या पहनू कल?" रेनी वैतागून म्हणाली. रेनीचं तिच्याच ऑफ़ीसात प्रेम प्रकरण चालू होतं. तिच्या बॉसच्या मुलासोबत. त्यामुळे ती नक्कीच एखाद्या हाय फ़ाय ठिकाणी जाणार होती. सुजाता, जवळ जवळ तिशीला पोचलेली. पण उत्साह एखाद्या कॉलेजकन्यकेइतकाच. मला पक्की मुंबईची पोरगी बनवण्यासाठी तिची धडपड चालू होती. रेनीचे सगळे ड्रेस मस्तच होते. आमच्या गप्पा चालू झाल्या आणि वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आठ वाजता अर्चना आली. माझ्या बाजूच्या रूम मधे राहणारी. मग तिने तिच्या आणि तिच्या बॉयफ़्रंडच्या प्लॅनबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याचं नाव जय होतं आणि तो हिंदू होता. अर्चना protestant होती. हीच त्याच्या लग्नातली अडचण होती. "बघ.. मी पण तितकीच मराठी आहे जितका तो. पण लोकाच्या मनात एक इमेज असते. ख्रिश्चन मुलगी म्हणजे छोटे ड्रेस घालणार. ड्रिंक्स घेणार. आणी असंच काहीतरी. Thanks to our Hindi films. सगळेच ख्रिश्चन दारुडे मायकल नसतात. आणि जय मला स्विकारायला तयार आहे. मग घरच्याना प्रॉब्लेम होतोच का?" अर्चनाने थेट मला विचारलं. अचानक आलेल्या या हल्ल्याने मी बावरले. खरं तर कुणीही कुणाशीही लग्न केलं तर माझी हरकत नव्हती. मला या प्रेमा बिमाचा काहीच अनुभव नव्हता. पण हॉस्टेलमधे आल्यावर मात्र प्रेम हा फ़ारच गहन विषय असल्याचं जाणवायला लागलं होतं.
|
Very Good Nandeeni चांगली सुरुवात आहे. म्हणजे आता नवीन अध्याय चालु होणार तर? keep Going पहिल्या पासुनच सगळी नावे लक्ष्यात ठेवायला लागणार आहेत. मागच्या अनुभवा-वरुन. पण Friend खुपच चांगली होती आणि या गोष्टीकडुनही तश्याच अपेक्ष्या आहेत. Good Work
|
आठ वाजता दिपाली आली. पण आज काहीतरी बिनसलं होतं. नेहमीसारखा आरडा ओरडा तर अजिबात नव्हता. आल्या आल्या तिनं बॅग टाकली आणि ती वॉशरूमकडे गेली. "काय झालं?" अर्चनाने विचारलं. "खूप रडल्यासारखा वाटत होता तिचा चेहरा.." "माहित नाही. सकाळी तर बरी होती." मी म्हणाले. "अजून काय व्हायचय., बॉय फ़्रेंडबरोबर भांडली असेल." मी माझा अंदाज व्यक्त केला. "लेकिन कौन से बॉय फ़्रेंडके साथ.." रेनी उद्गारली. मला तिचा रोख लक्षात आला नाही. "साली... चार चार पोरगे फ़िरवते. त्यातलाच असेल कुणी... " सुजाता म्हणाली. "ई,, मला नाही वाटत दिपाली असं काही करत असेल." माझ्या मते दिपाली खूपच चांगली मुलगी होती. "तुला काय माहित कोण काय करतय ते? गेल्या तीन वर्षापासून ओळखते मी तिला." सुजाताने उत्तर दिलं. सुजाता या हॉस्टेलमधली सगळ्यात जुनी मेंबर होती. तेवढयात दिपाली परत आली. तिचा ओला चेहरा थोडातरी फ़्रेश वाटत होता. "काय चालू आहे?" तिनं विचारलं. "काही नाही.. valentines day चं डिस्कशन चालू आहे. "अर्चना म्हणाली.. "ओके. " दिपाली आपला चेहरा पुसत म्हणाली. "नुसतं ओके काय? तुझा काय प्लन आहे ते सांग ना" मी म्हटलं. कुठूनतरी "झलक दिखलाजा" सुरू झालं. दिपालीचा मोबाईल वाजत होता. तिनं नंबर पाहिला. "हेलो.." ती बोलायला लागली. "पण मी असं काहीही करणार नाही.. नो.. You will not do anything like that ...... तुला माझी कसम आहे..... Are you mad? थांब मी येतेय. " तिने फ़ोन ठेवून दिला. "गल्स, मी दहा मिनिटात परत येते.. " असं म्हणुन ती निघाली. "दीपा, मेरे लिये डिनर लेके आना. आज हॉस्टेल का खाना खाने को मन नही कर रहा..." रेनीने तिला शंभरची नोट दिली. "त्यापेक्षा असं कर.. सगळ्यासाठीच घेऊन ये. हिशोब नंतर करू.." सुजाता म्हणाली. "नको.. मी हॉस्टेल मधे जेवेन.. " मी म्हणाले. मला हे असं दररोज बाहेरचं खाणं परवडलं नसतं. "दिपाली.. तू जा.." सुजाताने दिपालीला सांगितलं. "अश्विनी.. आज तेरा डिनर मेरे साथ.. अगं.. मला पूर्ण कल्पना आहे या स्ट्रगलच्या दिवसाची. एकटं रहायचं.. घरी पैसे पाठवायचे. आणि स्वत्:साठी वाचवायचं. खूप कठीण असतं. पण हळू हळू सवय होईल तुला." सुजाताने माझ्या खांद्यावर हात ठेवला. खरंच सुजाता किती सहजतेने मला समजावून घेत होती. ती मला एखाद्या मोठ्या बहिणीचा आधार असल्यासारखी होती. दिपाली गेली आणि परत आमच्या गप्पा सुरू झाल्या. आता "रंग दे बसंती" वाजायला लागलं. अर्चनासाठी जयचा फ़ोन होता. ती बाल्कनीत गेली. चांगल्या पंधरा मिनिटं त्याचं बोलणं चालू होतं. हे लोकं इतका वेळ काय बोलत असतील हा प्रश्न मला सारखा पडायचा. "सुजाता, तुला माहित आहे दिपाली कुणाबरोबर गेली ते?" अर्चनाने आत येताच विचारलं. "जाताना काहीच बोलली नाही.. का गं?" "इतका वेळ इथेच खाली उभी होती. एक मस्त चिकना आयटम बाईकवर आला होता. भारी वाद चालू होता. त्याने तिला जोरात थप्पाड मारली. आता तो मुलगा परत गेला." "आणि दिपाली..? " मला तिची काळजी होती. "ती त्या चायनीजवाल्याकडे गेली." अर्चनाने casually सांगितलं. "मग येइल आता परत.. "सुजाता म्हणाली. किती सहजतेने या मुली अशा गोष्टी बोलायच्या. माझ्या गावाकडे जर काही असं झालं असतं ना.. तर बाप रे किती बोंबाबोंब झाली असती. पण मुंबईचं पाणीच वेगळं. दिपाली परत येईस्तवर माझ्या जीवात जीव नव्हता. नक्किच तिला काहीतरी मोठा प्रॉब्लेम होता. पण ती कुणाला सांगत नव्हती. बाकीच्या मुलीच्या गप्पा परत चालू झाल्या. मला त्यात बिल्कुल interst नव्हता. मी कानात रेडिओ घालून शांत बसले. दिपाली परत आली. तीच मुळी गाणं म्हणत. "आज फिर तुम अपे प्यार आया है.. " ती आल्या आल्या मी तिला विचारलं. "काय झालं?" ती खूपच आनंदी दिसत होति. "काय झालं... आशू.. its party time जग उद्या celebrate करेल. आपण आज करायचं. " आम्ही सगळ्या जणी तिच्या तोंडाकडे नुसते बघत होतो. शेवटी सुजाताला सूर सापडला. "दिपाली,, are you ok? " तिने विचारलं. "सुज. i m fine " ती स्वत्:भोवती गिरकी घेत म्हणाली. "इतकं नाचू नको.. चक्कर येईल. " वेदिका रूममधे येत म्हणाली. "वेद, मी आता नाचणार नाही.. पण नाचवणार मात्र आहे. " दिपाली अजूनही हसतच होती. बाकीच्याचं माहित नाही.. पण मला तेव्हाच लक्षात आलं. .. हा valentines day मी आयुष्यात कधीही विसरणार नव्हते.
|
Manuswini
| |
| Monday, February 12, 2007 - 3:06 pm: |
| 
|
मी एक सार्वत्रिक समज बघितला आहे की मुम्बई म्हणजे हे असेच किंवा ते तसेच वगैरे वगैरे specially when it comes to certain things like promiscuous behavior etc etc पण ते तितकेसे खरे नाही. आणि मला काही prove करायचे नाही इथे पण कीव येते काही समजांवर पुन्हा पुन्हा. काही छोट्या ठिकणी अजुन तेवढा बोकाळलेला स्वैराचार नसेल ही तरी तो फक्त मुंबईतच असतो आणी नी हेच मुंबईचे लक्षण हे मुर्खपणाचे आहे. मग खरोखरोच असे म्हणणार्या लोकांचे जग लहान आहे. मी उलट पाहीले की बंधनात अडकुन वाढलेल्या मुले आणी मुले ज्यांना काही गोष्टीचे exposure मिळत नाही किंवा चुकिच्या मार्गाने आकर्षण असते तेच असे प्रकार ज्यास्त करतात. एक उदाहरण द्यायचे म्हणजे,चंदीगढच्या एकदम internal अश्या कुठल्याश्या लहान गावात वाढलेली मुलगी माझ्या US school मध्ये जेव्हा MS करताना भेटली तेव्हा चुणीदार शिवाय दुसरा प्रकार ही माहीत नसलेली तिची एकदम ईकडची fashion बघता(मी कपड्यावर व्यकतीक टिका नाहे करत आहे, मर्जी तीची) वाटे एखादे आकाश मोकळे झालेल्या प्रमाणे वागणे दर्शवुन द्यायचे की ह्यांना balance हा नसतोच, आपण modern आहोत हे स्वःताचा complex लपवुन दाखवायचा प्रयत्न. मुंबईत वाढलो असुन सुद्धा मला व माझ्या मैत्रिणींना तिच्या गावातील मैत्रिणीचे चुप्या रीतीने चाललेल्या खेत मधील गोष्टीचे किस्से एकायला मिळायचे, आम्हाला एकेक धक्के तिच्या क्लुप्त्या एकुन. तिचे ते knowledge एकुन आम्हीच गार. पण हिला करायला मिळायचे नाही कारण वडीलांची सक्त नजर तरी वर शेंडा करुन म्हणायची हीला करायला मौका नाही कारण, इतना बंबई जैसा खुला शहर नहि है न ह्याच्यावर तिला आम्ही इतके झाडले की मग तुझ्या मैत्रिणी कश्या करायच्या?. ग़प बसुन म्हणायची, करनेको कोइ भी कुच भि कर सकता है. हे उत्तर एकुन वाटायचे खरेच कीती मानसिक तोल ढळला आहे ह्या मुलिचा. शेवट काय, अतीशय बंधनात वाढलेली, जुन्या विचारात वाढलेली ह्यांचे तोल लवकर जातात. "सगळेच असे नसतात" पण कीती काळ शहराला नावे ठेवणार हो गावतल्या 'खेत गोष्टी' काय कमी आहेत. शहर म्हणजे बोकाळलेला पणा ह्या समजाखाली आपली मजा करुन घेणे हा प्रकार आहे. अमेरिकेत असे होते, तसे होते मग काय सगळेच जण वाया जातात. करायचे आपण आणि नावे मात्र शहराला. बाकी नंदीनी तुझे चालु दे. मला तुझ्या गोष्टीविषयी काही म्हणणे नाही पण हा किस्सा मात्र आठवला ह्यावरुन. नंदीनी, माफ़ि असावी तुझ्या गोष्टीवरुन माझे हे post टाकले. one more thing, I did not write this post out of offense or anything but out of pity of people's ignorance about city. nothing personal, make a note of it माझा एक मायबोलिवरील पुण्याचा मित्र म्हणायचा, मला मुंबईची मुलगी नको लग्नासाठी मी गमतीनी म्हणायचे हो बाई तु करु सुद्धा नकोस, उगाच तुला complex व्हायचा. ग़ंमत म्हणजे ह्याच्या चांगल्या मैत्रिणी ह्या सर्व मुंबईच्या(च) होत्या. आता इथे पुणे Vs मुंबई वाद घालु नका कुणी.
|
Sakhi_d
| |
| Monday, February 12, 2007 - 11:39 pm: |
| 
|
मनुस्विनी आणि नंदिनी मस्तच....!!! आत पुन्हा एकदा मस्त कथा वाचायला मिळणार.... झकास.....
|
वेदिका, खरं तर मी या मुलीला व्यवस्थित ओळखत पण नव्हते. छोटे कापलेले केस, डोळ्यावर सानिया मिर्झा टाईप चष्मा, आणि कायम तिचे ते so calleed funky dresses मी एकदा तिला तीचं घर कुठे आहे हे विचारलं होतं तेव्हा तिने मला घरच नाही असं चमत्कारिक उत्तर दिलं होतं. सुजाताने मला तिची आई वडील दिल्लीला असतात हे सांगितलं होतं. तशी वेदिका सगळ्याबरोबर हसत खेळत असायची मला मात्र ती कधीच आवडली नाही. एक दोनदा रात्री उशीरा आल्यावर मी तिला धडपडताना पाहिलं होतं.. आणि कधीतरी ती सिगरेट पण ओढायची. आज मात्र ही बया लवकर उगवली होती. "दिपाली... काय चाललय काय?" वेदिकाने प्रश्न केला. तिच्या आवाजात एक प्रकारची हुकुमशाही मला कायम जाणवायची. "वेद.. साहिल आला होता... and guess what? तो मला म्हणाला चल उद्या लग्न करू या... " दिपाली आता फ़क्त उड्या मारायची बाकी होती.. "उद्याच? कसं शक्य आहे?" मी विचारलं. "शक्य असायला सगळं शक्य आहे.. " वेदिका म्हणाली. "अरे, तुमको खाना लाने बोला था?" रेनीने विचारलं. "ऑर्डर दिया है... चल वेद.. घेऊन येऊ या.." दिपाली म्हणाली. "लवकर आणा रे मुलीनो, भूक लागली आहे" अर्चना म्हणाली. दिपाली काहीतरी आठवल्यासारल्ही परत थबकली. "सुजाता, celebrate करणार ना?" तिने डोळा मारला. मला काहीच समजलं नाही. वेदिका मात्र हसली. "का नाही... आज तर सगळे आहेत इथे.. बोला कुणाला काय काय हवय.. दिपाली व्होडका.. हम तो risky whiskey वाले... सुजाता तुला काय country special ?" वेदिका सुजाताची फ़िरकी घेत होती. काय विषय चाललाय हे कळायला मला जरा वेळ लागला. "तुम्ही सगळ्या जणी पिणार?" मी विचारलं. पाचही जणी माझ्या कडे बघायला लागल्या. मुणीच काही बोललं नाही. शेवटी वेदिका म्हणाली.. "नाही... फ़ेस पॅकसाठी घेऊन येतोय.." हास्याचा एक स्फ़ोट झाला. मी मनातल्या मनात खूप चिडले. एक तर मला या असल्या गोष्टीची सवय नव्हती. त्यात हॉस्टेलमधे पकडले गेले असते तर माझंही नाव आलं असतं. मी सुजाताच्या रूम मधे झोपायला जाय्चा विचार केला. उगाच काही गोंधळ झाला तर त्यात आपण नको सापडायल. "आशू.. हे बघ इथे कुणीही पक्कं बेवडं नाही आहे. फ़क्त थोडी मजा. तुला घ्यायची नसेल तर कुणी फ़ोर्स करणार नाही." सुजाता बहुतेक माझा चेहरा वाचू शकत होती. "आणि तुला घ्यायचीच असेल तर कुणी अडवणार नाही." वेदिका म्हणाली. ती आणि दिपाली रोमबाहेर गेल्या. "घाबरू नको, आशु. नी पण घेत नाही." अर्चना म्हनली. हळू हळू परत आमच्या गप्पाची गाडी सुरू झाली. तेवढ्यात निशिने निरोप आणला. माझ्या घरून मेसमधे फ़ोन आला होता. माझ्याकडे तेव्हा मोबाईल नव्हता. मी जवळ जवळ पंधरा मिनिटानी परत आले. घरी आईला माझी नको तितकी काळजी लागली होती. परत कुठलेंतरी स्थळ बघायला येणार होतं. पण मला सुटी नव्हती. त्या वादावादीत बराच वेळ गेला. जिना चढत असताना, मल एका योगायोगाचं आश्चर्य वाटलं. दिपालीशी लग्न करायला कुणीतरी आता या क्षणी तयार होतं. आणि माझं अख्खं खानदान माझ्यासाठी मुलगा शोधत होतं. मी रूम मधे आले तवर इथे चांगलीच महफ़िल जमली होती. दिपालीने जमिनीवर बेडशीट घातलं होतं त्यावर या पाच जणी बसल्या होत्या. आणि सगळि साग्रसंगीत तयारी होती. (वेदिकाच्या सीडीवर गझल लावली होती) "काय म्हणतय घर?" वेदिकाने मला विचारलं. मला उत्तर द्यायच्या आधीच सुजाता ओरडली. "अबे.. दरवाजा लाव. सगळ्या हॉस्तेलला सांगायचं आहे का?" मी मुकाट दरवाजा ओढून घेतला. आणि जाऊन माझ्या बेडवर बसले.
|
गुड एकदम हॉस्टेलवर आल्यासारखे वाटले. लवकर पुढचा भाग येवु देत.
|
अर्चनाने मला एक ग्लास दिला. "नको" मी एवढंच म्हटलं. "आशू.. कोका कोला आहे.. का तोही घेत नाहीस तू?" वेदिकाने मला चिडवलं. "तुमच्या गावात असतं का गं हे Valentines Day? " दिपाली म्हणाली. "इतके दिवस तरी नव्हतं पण आता हळू हळू पसरायला लागलय." खरं तर मला कुणी माझ्या शहराला गाव म्हटलं की फ़ार राग यायचा. पण आता ते सगळं बोलण्याची वेळ नव्हती असं का कुणास ठाऊक मला वाटायला लागलं. "आशूचं माहित नाही पण माझ्या गावाकडे मात्र हे प्रकार अजिबात नसतात.." वेदिका म्हणाली. "पण म्हणजे गावातली प्रत्येक पोरगी सती सावित्री नसते." "अगं लफ़डे करणार्याना गाव काय आणि अमेरिका काय..." अर्चना म्हणाली. रेनी तिच्या मोबाईलवर मेसेजमधे गुंग होती. "म्हणजे तू गावातली आहेस?" मी वेदिकाला विचारलं. "बेळगावच्या पुढे तीस किलोमीटर. कोपनहॡ... बघ म्हणता येत का तुला?" ती माझ्याकडे बघत म्हणाली. "पण मला तू म्हणालीस की.." मला वाक्य कसं पूर्ण करायचं ते कळेना.. माझी घालमेल सुजाताला कळली असावी, तिने ट्रॅक बदलला. "दिपाली... हा साहिल कोण?" तिने विचारलं. दिपालीने वेदिकाकडे पाहिलं. "जाने दो. आणि एकदम शांतपणे ती म्हणाली. "साहिल.. माझं त्याच्यावर कॉलेजमधे असताना प्रेम होतं. पण त्याला दुबईचा जॉब आला आणि तो तिकडं गेला. मला सोडून. आज परत आलाय." वेदिकाने दिपालीच्या खांद्यावर हात ठेवला. "ते राहू दे. तो लग्नाचं म्हणत होता ना..." अर्चना म्हणाली. "येस्स्स्स.. तो उद्या करायचं म्हणतोय.. पण मी नाही म्हटलं..." दिपाली अजुनही शांत होती. "का नाही म्हनतेस तू? अगं जो मुलगा तुझ्यासाठी इतक्या दिवसानी परत आलाय त्याला तू का नको म्हणतेयस?" मी खरंच खूप संभ्रमात पडले. "कारण तो अशा क्षणी निघून गेला ज्यावेळेला मला त्याची गरज होती," दिपाली म्हणाली. "अगं पण जर मुलगा चांगला असेल, आणि तुझ्यावर प्रेम करत असेल तर मग जुन्या गोष्टी विसरून जा," मी तिला सल्ला दिला. वेदिकाने माझ्याकडे पाहिलं "आशू,.. तू जे काही म्हणतेयस ते मला मान्य आहे पण according to me दिपाली ने त्याच्याशी लग्न करू नये. बाकी निर्णय तर तिचाच आहे." ती म्हणाली. मला तिचा राग आला. जर साहिल परत आला असेल तर दिपालीला लग्न करायला काय प्रॉब्लेम होता. नोकरीसाठी तर तो तिला सोडून गेला होता ना... " I will never forgive him " दिपाली म्हणत होती. "साहिल... माझं त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम होतं. सगळे जण सांगायचे त्यच्या नादाला लागू नको. पण नाही.... मी त्याच्याच बरोबर असायचे. मी थर्ड इयरला होते... आणि मला दिवस गेले...." दिपालीच्या डोळ्यात किंचित पाणी होतं. रूममधे एक शांतता पसरली. "आणि त्याने मला डिच केलं. मी हॉस्पिटलमधे खूप रडले. मला वाटलं तो आज येइल उद्या येइल.. पण तो आलाच नाही. मला सहा महिन्यानी भेटला. जुन्या प्रेमाच्या आणाभाका घेत. तोपर्यंत माझं काय झालं असेल याची त्याला गरजच वाटली नाही...." कुणीच काही बोलत नव्हतं. दिपाली इतकं दु:ख घेऊन जगत असेल याची मला कधीच कल्पना आली नाही. "आणि आज तो परत आलाय जवळ जवळ सात वर्षानी. गेले महिनाभर मला पटवतोय. चक्क लग्न करू या म्हणतोय. ... पण आता नाही... कधीच नाही. " दिपालीने तिच्या हातातला ग्लास खाली ठेवला. अर्चना उठली.. "यार, मी जाते झोपायला. उद्या जय लवकर येइल. आणि मला हे असे लग्नभंगाचे किस्से ऐकले की जाम टेन्शन येतं." सगळ्याजणी हसल्या. वेदिकाने उठून दरवाजा लावला. "दिपाली.. तू कधी बोलली नाहीस गं हे सगळं..." मी म्हणाले. "तू काय केलं असतस ऐकून?" सुजाताने मला विचारलं. "दु:ख ही एकट्यानेच भोगायची असतात. त्यात वाटेकरी नसतो" "आशू, तुने कभी प्यार किया है?" रेनिने मला विचारलं... "नाही... " "का? कुणी मिळालं नाही का?" वेदिकाचा सूर एकदम छद्मी झाला. मला एकदम माझ्या आत्याची आठवण झाली. ती पण याच सुरात म्हणाली होती "इतक्या काळ्या मुलीशी कोण लग्न करणार?"
|
Lampan
| |
| Tuesday, February 13, 2007 - 8:01 am: |
| 
|
नंदिनी तुझ्या सगळ्या नायिका काळ्या का असतात ???
|
का कुणास ठाऊक.. मला तिथून निघून जावंसं वाटायला लागलं. "आशू.. खरंच कधी कुणावर प्रेम केलं नाहीस?" सुजाताने मला विचारलं. "नाही.. कारण मला असल्या थिल्लर गोष्टी करायला वेळ नव्हता. " मी संतापात होते. डोळ्यासमोरून माझं घर गेलं. सकाळी घरची कामं, त्यानतंर शाळा. ती गावातच पण कॉलेजसाठी अडीच तासाचा बस प्रवास आणि संध्याकाळी आल्यावर परत आईला मदत. दिवस कसा संपायचा कळायचंच नाही. वर कधी सुट्टी असली तर शेतातली कामं. पण या मुलीना काय कळणार माझं जगणं... त्यातून वेदिकासारख्या मुलीला... "प्रेमाला थिल्लर म्हणू नकोस.. कमीत कमी आज तरी..." दिपाली म्हणाली. "१४ फ़ेबला अजून वेळ आहे..." वेद हसत होती. " yaar.. i will set the remindef for midnight, so that we will be able to wish each other on time "रेनी म्हणाली. दिपालीला बहुतेक दारू चढली असावी, कारण ती एकदम शांत बसून होती. "सुजाता, तू कधी कुणावर प्रेम केलयस?" मी विचारलं. "हो" ती एवढंच म्हणाली. "कुणावर?" "माझ्या नवर्यावर...." तिने माझ्याकडे बघत उत्तर दिलं. "म्हणजे तुझं लग्न झालय.." मी चमकून विचारलं. "झालं होतं... " ती शांतपणे म्हणाली.. "पण मग?" "पाच वर्षाचं प्रेम आणि तीन वर्षांचं लग्न.. तो जातीबाहेरचा म्हणून पळून जाऊन लग्न केलं. आणि मग त्याला एक दिवस साक्षात्कार झाला की त्याचं माझ्यावर प्रेम नाही. दुसरंच कुणी मिळालं ना म्हणून... मग मी सोडलं त्याला.. कायमचं..." सुजाताने बोटातली अंगठी काढून परत घातली. मला परत एकदा सुजाताच्या थंडपणाची कमाल वाटली. किती सहजतेने तिनं हे सगळं सांगितलं. "लगता है आज सब कन्फ़ेशन मूडमे है.." वेदिका रेनीला म्हणाली. रेनी काहीच बोलली नाही. "एक मात्र आहे.. रेनी तू जाम लकी आहेस.. अगं बॉसचा मुलगा पटवलास.." रेनी खाली मान घालून गप बसली होती. "क्या बात है.. Is there any problem? " दिपालीने तिला विचारलं.. ती अजूनही शांत बसली होती. "हे, माझं आवडतं गाणं.." वेदिका ओरडली. सीडीवर "तुम मुझे युन भुला न पाओगे" लागलं होतं... "सुजाता.. एक बात बोलू?" रेनीने बर्याच वेळाने विचारले. तिचा आवाज एकदम कापरा झाला होता. वेदिकाने गाण्याचा आवाज कमी केला. "बोल ना रेनी.." सुजाता म्हणाली. "मेरा किसीके साथ कोइ अफ़ेअर नही है.." रेनीने डोळ्यातलं पाणी पुसत सांगितलं. आज रात्रीत काय विचित्र गोष्टी मला ऐकाव्या लागणार होत्या कुणास ठाऊक? "मैने झूठ बोला तुमसे. मेरा कोई बॉयफ़्रेंड नही है. वो सब गिफ़्ट्स मुझे मेरा बॉस देता है.. " कुणालाच काय बोलायचं ते सुचेना.. शेवटी वेदिका म्हणाली. "रेनी, म्हणजे तु....?" "तेस, I sleep with that bloody sixty yeared moron because i need money.. रास्ते पे खडे होने से तो अच्चा है ना.." रेनी हुंदके देऊन रडायला लागली. सुजाताने तिला शांत केलं. "सुजाता, खूप झालं आता. तिला रूममधे घेऊन जा. आणि झोपव.." वेदिका म्हणाली. सुजाताने रेनीला आधार देऊन उठवलं. दिपाली पण उठली. "तू कुठे चाललीस?" वेदिकाने विचारलं. "मी पण सुजाताच्या रूम मधे जाणार.. "दिपालीचे म्हणाली. "चला.. मी सोडून येते तुम्हाला" वेदिकाने दिपालीचा हात धरला. चौघीजणी रूमचा बाहेर गेल्या आणि मला आठवन झाली की मला खूप भूक लागली आहे. दिपलीने आणलेलं पार्सल मी उघडलं. आणि ते हक्का नूडल्स नावाचं प्रकरण मी प्लेटमधे वाढून घेतलं. वेदिका रूममधे परत आली. "अरे, तु डीनर करते.. चालु दे.. i will have one more peg" ती खाली बसली. जवळ जवळ पाच मिनिटे कुणीच बोललं नाही.
|
"वेदिका, मला हे असं एवढे प्रॉब्लेम्स घेऊन कधीच जगता येणार नाही." मी हळूच तिला म्हटलं. "सवय होत जाते हळू हळू" "तू कधी कुणावर प्रेम केलयस.." "कधीच नाही... " "का? तुलाही कुणी मिळालं नाही का?" मी जराशा तिखटपणानेच विचारलं. "मिळाले तर बरेच. पण बात कभी जमी नही..." ती सुस्कारा सोडत म्हणाली. "एक सांगू.... हे एवढं सगळं ऐकून मला वाटायला लागलय की आपली भारतीय पद्धत... arrange marriage च बरी आहे." वेदिकाने माझ्याकडे पाहिलं आणी तिओ स्वत्:शीच हसली. "तू मुर्ख आहेस का?" "नाही... पण हे प्रेम वगैरे भान्गड मला नाही जमणार?" "अगं प्रेम म्हणजे काय भूमिती आहे का बीजगणित न जमायला. आणि असं ठरवून कधी प्रेम होत नसतं." "तुला माहित आहे.. माझ्या लग्नासाठी घरून प्रयत्न सुरू आहेत.. कदाचित पुढच्या सहा महिन्यात होऊन जाईल. योग आहे आता मला..." वेदिका आता मात्र खळखळून हसली. "तुला लग्नाची इतकी घाई आहे.. " "मग? आता शिक्षण झालय. नोकरी पण चांगली आहे.." "आशू.. तुझ्यासारख्या लग्नाच्या बाजारात उभ्या असलेल्या मुली पाहिल्या ना की मला खूप मजा वाटते. कुणीतरी या आणि आम्हाला पसंद करून न्या... एवढंच म्हणणं असतं ना तुमचं.." "तू कधीच लग्न करणार नाहीस?" मी तिला विचारलं. "करेन ना. पण माझ्या आवडीचा मुलगा मिळेपर्यंत माझी थांबायची तयारी आहे. " "आणि जर कधी मिळालाच नाहीतर ..." "तर.. मी एकटी आयुष्य काढायला समर्थ आहे." तिने सिगरेट पेटवली. "प्लीज वेदिका तू इथे नको स्मोक करू.. मला त्रास होतो," मी त्रासिकपणे तिला सांगितलं. "ओके तू पण रेनीसारखीच आहेस" मला तिने रेनीबरोबर नेऊन बसवलं हे बिल्कुल आवडलं नाही. "काही पण बोलू नकोस. मी तिच्यासारखी मुलगी नाही." "ते माहित आहे मला.. कारण तुझ्या बापाने दुसरं लग्न केलं नाही. तुझ्या सावत्र आईने तुला मध्य रात्री घराबाहेर काढलं नाही.. तुला कल्पना नाही रेनी कशा कशातून गेली असेल." "तिच्यावर खूप वेळ आलीही असेल पण म्हणून तिने निवडलेला मार्ग मला पटत नाही." मी आज सगळ्यावरच चिडले होते. कारण मलाही माहित नव्हतं. "आशू, जोपर्यंत तु त्या situation मधे जात नाहीस तोपर्यंत तू तुझं पटणं न पटणं दोन्हीइ सारखंच.." "मी हे तुझ्या बाबतीत ही बोल्लु शकते ना.." "हो का नाही..." "मघाशी तू जे काही लग्नाचा बाजार वगैरे म्हणालीस ना.. ते आता लक्षात घे." "आशु, मी त्यावर comment करु शकते कारण मी स्वत्: त्याच्यातून गेलेली आहे. तू लहान आहेस अजून, जग पाहिलं नाहीस.." "तू पाहिलंस?" "तीन वर्षे झाली मुंबईला येऊन. अधुन मधून युएस, युके वगैरे जाउन आले. खूप माणसं पाहिली. आणि खूप शिकले मी त्याच्याकडुन.. आपल्याला कायम वाटत राहतं की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. पण दुसर्याकडे बघितले ना तर खूप सुखी असतो आपण.." मला वेदिकाकडून या अशा सेरियस बोलण्याची अपेक्षा नव्हती. "वेदिका, जाऊ दे.. ज्या वाटेला मला जायचंच नाही त्याचा पता कशाला विचारू? माझ्या आयुष्याच्या अपेक्षा खूप साध्या आहेत. तुझ्यासारखं unorthodox thinking नाही माझं." "आशू, जे हवं असतं ते मिळत गेलं असतं ना तर जगण्याची मजाच काय राहिली असती," "तुझा सूर इतका निराशावादि का असतो?' "निराशावादी नाही.. प्रयत्नवादी म्हण... कारण जेव्हा काही मिळण्याची शक्यता नसते तेव्हाच तर प्रयत्न करावे लागतात." मी काहीच बोलले नाही. "आशू, एक सांगू.. मला कधी कधी तुझ्यासारखं व्हावंसं वाटतं. हे नव्याने उगवलेलं शहाणपण सोडून परत हे असं एखाद्या चौकटीत बंदिस्त व्हावं. पण आता शक्य नाही. परतीचे सगळे दोर मीच कापले आहेत." "म्हणजे?" "मी गेल्या दोन वर्षात घरी गेले नाही. मला सुट्टी मिळाली नाही. के खोटं कारण.. खरं कारण हल्ली जावंसंच वाटत नाही. खरं तर जिथे लहानपण गेलं त्या जागेची त्या माणसाची किती ओढ वाटायला पाहिजे ना.. पण मला वाटतच नाही. घरातल्या सगळ्यानी पण मला मला बाजूला काढून फ़ेकलय.." वेदिकाचा सूर खूप हळवा झाला होता. मि उठून तिच्या खांद्यावर हात ठेवला. "कशाला काळजी करतेस? सगळं ठीक होईल. माझी आई कायम म्हणते. खूप दु:ख आली ना की ओळखायचं की आता सुख येणार आहे. एकदा घरी जाऊन ये कदाचित तुझा गैरसमज झाला असेल. " वेदिकाने माझ्याकडे पाहिलं. आणि ती हसली. "आशू.. तू मुलगी मस्त आहेस. पण खूप भोळी आहेस. तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा मजा येईल" "वेदिका, अजून तुझी गाडी त्याच रुळावर?" "काय करू? Love is in the air " मला हसू आलं. आयुष्यात पहिल्यादा वाटलं कुणाच्यातरी प्रेमात पडावं. "उन आखो का हसना ही क्या जिन आखो मे पानी न हो वो जवानी जवानी नही... जिसकी कोई कहानी न हो.." तेवढ्यात रेनीचा मोबाईल वाजला. बारा वाजले होते. " Happy Valenties Day" वेदिका म्हणाली. आज १४ फ़ेब्रुवारी होता. प्रेमाचा दिवस पण त्याहूनही महत्वाचा विश्वासाचा दिवस. " Happy Valentines Day... " =========================== समाप्त. ============================
|
Jhuluuk
| |
| Wednesday, February 14, 2007 - 5:39 am: |
| 
|
good one मागची friend लक्षात राहुन असे वातले की ही पण मस्त मोठी कथा बनणार, पण थोडक्यातच सम्पवलीस.. अलग-अलग व्यक्तिरेखा छान मांडल्यास, आणि हॉस्टेलची पार्श्वभुमि घेतलीस ते ही छान..
|
R_joshi
| |
| Wednesday, February 14, 2007 - 6:54 am: |
| 
|
नंदिनी कथा फारच आवडली. सरळ सुटसुटित लिखाण अन मानसिक भावनांचा मेळ चान बसलाय. कथा योग्यवेळी संपविलिस हे अजुन एक वैशिष्टय म्हणाव लागेल.
|
Chinnu
| |
| Friday, February 16, 2007 - 10:50 am: |
| 
|
नंदिनी छान गोष्ट. बरेच कंगोरे अजुन स्पष्ट करता आले असते. तरीही छान. स्वत:च स्वत: जगतांना कोलमडुन न पडता वेळोवेळी सावरणार्या जुन्या मैत्रीणी आठवल्या.
|
Jayavi
| |
| Friday, February 16, 2007 - 11:45 pm: |
| 
|
नंदिनी.... मनाला स्पर्शून गेली गं तुझी गोष्ट. छान लिहितेस तू.
|
|
|