Adm
| |
| Sunday, February 11, 2007 - 9:19 pm: |
| 
|
अमेरीकन कंपनी साठी चालू असलेलं माझं एक प्रोजेक्ट संपलं आणि माझी दुसर्या department ला बदली झाली... बदली च्या दरम्यान चांगली १० दिवसांची रजा घेऊन आणि ताजीतवानी होऊन मी नविन department मधे दाखल झाले...माझ्या आधिच्या department मधले अनेक लोकं आधिच तिथे दाखल झालेले होते.. इथेही एका अमेरीकन कंपनी साठीच अनेक प्रोजेक्ट चालू होती.. सुरवातीला काही दिवस येणार्या नविन कामासाठी मला राखून ठेवलन होतं पण जरा delay झाल्यावर एका चालू असलेल्या प्रोजेक्ट वर offshore manager म्हणून काम करणार का असं विचारण्यात आलं... त्या प्रोजेक्ट च्या अधिच्या manager नी कंपनी सोडली होती त्यामूळे कोणी lead नव्हता... काम चांगलं होतं आणि एकूणच चांगली संधी वाट्ल्याने मी लगेच होकार कळवला. .. offshore team नविन होती पण कामसू होती.. त्यांना योग्य अश्या मार्गदर्शनाची गरज होती असं मला त्यांच्या बरोबरच्या मिटिंग वरुन लक्ष्यात आलं.. दुसर्यादिवशी सकाळी onsite team बरोबर मिटिंग होती.. त्या पैकी रोहित तिथला manager होता तर मानस आणि अजून एक नविन मुलगा निशांत असे इतर दोघे होते... रोहित ला तर मी चांगलीच ओळखत होते... in fact तो आणि मी एकाच सुमारास लागल्याने चांगले तो माझा चांगला मित्र होता.. मानस बरोबर देखिल मी माझ्या मागच्या प्रोजेक्ट मधे काम केलेलं होतं आणि आमच अतिशय छान जमत असे.. मानस कामाच्या बाबतित एकदम perfect होता आणि स्वभावाने ही खूपच चांगला होता... नुसतं त्याच्या असण्याने देखिल वातावरण कसं उत्साही होत असे... मुळचा मारवडी असलेला मानस कट्टर धार्मिक होता... मी ब्राम्हण असून देखिल non veg खाते ह्याचा त्याला कधिकधि राग येत असे.. मी जरी त्याची boss असले तरी ती कामापुरती त्यामूळे नंतर आमच्यात अश्या खूप गरमागरम चर्चा होत असत.. एकूणच काय तर ह्या नविन प्रोजेक्ट ची टिम मस्त होती... कामाला सुरूवात अगोदर झालेलीच होती...त्यामुळे मलाच system अधिकाधिक समजून घेणं गरजेचं होतं आणि शिवाय आधिचा manager आधिच गेलेला असल्याने handover वगैरे काही झालाच नव्हता..
|
Adm
| |
| Sunday, February 11, 2007 - 9:41 pm: |
| 
|
लागेल तेव्हा onsite बरोबर फोन वरून तर offshore बरोबर तर रोजच सुमारे २४ बसून माझा अभ्यास चालू होता.. प्रोजेक्ट मधला पुढचा रिलिज़ २ महिन्यात असल्याने मला offshore Team कडून योग्य ते काम करून घेणं आवश्यक होतं.. आणि त्यांनी केलेलं काम तपासायच म्हणजे म्हणजे मुळात मला ते माहित असणं गरजेच होतं.. रोहित बरोबर तर रोजच बोलण होत असे तर कधिकधि मानस आणि निशांत बरोबर देखिल बोलणं होतं असे... एक दिवस अचानक रोहित ने मला फोन वर सांगितलं की मानस ला भारतात परत यायचय.. आणि त्यानी repalcement शोधायला सांगितली आहे... माझ्या साठी हा तर पूर्ण धक्का होता.... एकतर प्रोजेक्ट नुकतच कुठे स्थिर होत होतं आणि मानस सारखा team member onsite ला असल्याने निदान मला तिथली तरी चिंता नव्हती.. आणि अजून एक गोष्ट म्हणजेमानस स्वत:च भांडून onsite गेला होता... आणि ते देखिल त्याला long term हवं होतं... आमच्या आधिच्या department मधे तशी संधी न मिळाल्याने त्याने apprisal च्या वेळी खूप भांडण केलं होतं आणि त्यामुळे तिथलं काम संपल्यासंपल्या त्याला लगेच ही संधी देण्यात आली होती... रोहित नी मला हे ही सांगितलं की जायच्या वेळी एक वर्ष रहायला मला काही हरकत नाही असं तो म्हणाला होता.. एकूण रोहीत त्याच्यावर खूपच वैतागला होता कारण त्या दोघांच तसही विशेष पटलं नव्हतं.. मी पण काय कारण असू शकेल ह्याचा जरा विचार करत होते..
|
Princess
| |
| Monday, February 12, 2007 - 12:39 am: |
| 
|
छान आहे सुरुवात. तुमची या आधीची disk crash पण आवडली होती मला.
|
Vaatsaru
| |
| Monday, February 12, 2007 - 5:07 pm: |
| 
|
वा भारतातल्या Delivery Organization ची नाडी एकदम मस्त पकडली आहे, नक्कीच Patni, Wipro, Infy, Satyam, Cogni च Experience असावा 
|
Adm
| |
| Monday, February 12, 2007 - 11:30 pm: |
| 
|
रात्री अपेक्षेनुसार मानस चा माझ्या मोबाईल वर फोन आला... "भारती, कुच भी करो लेकीन मेरा उधर आना बोहोत जरूरी है.." असं अगदी काकूळती ला येऊन म्हणत होता.. काही ठोस कारण नसताना आणि त्याच्या carrier ला फारशी हानी पोहोचू देता त्याला परत आणणं मला देखिल जरा अवघडच होतं.. शेवटी मी त्याला म्हंटलं काय आहे ते मला खरं सांग तर मी काहितरी करू शकेन... माझ्या अंदाजानुसार प्रेमाचीच भानगड होती... तसा तो सुरुवातीला मझ्याच प्रोजेक्ट मधे असल्याने family background बद्द्ल मला महिती होतीच... मुंबई च्या अगदी मध्यवर्ती भागात रहणार्या मारवाडी परिवारातला आणि एकत्र कुटूंबातला हा सगळ्यात लहान मुलगा... घर जरी मध्यवर्ती भागात असलं तरी घरातल्या माणसांच्या मानाने तस लहानच... तश्यातच घरी अतिशय धर्मिक वातावरण.. non veg वगैरे फारच दूर पण घरात कांदा लसूण देखिल निशिध्द मानले जात असे.. शिवाय घरात वडिलांची कडक शिस्त.. त्यामूळे संध्याकाळी दिवे लागणीला रात्री ची जेवणे झालीच पहिजेत, सकाळी उन्ह वर यायच्या आत उठून सगळ्यांची आन्हीके आटोपलीच पाहिजेत असे कडक नियम...घरात सर्व व्रतवैकल्ये, सणवार अगदी साग्रसंगीत पध्द्तीने पार पडत.. त्यामूळे मुंबई सारख्या शहरात राहूनही डिस्क, पार्टीज, लेट नाईट hang around रात्रीचे पिक्चर हे सगळं अगदी अभवानेच केलेलं... घरात राहून झालेल्या संस्कारांमुळे म्हणाअ किंवा मुळातच असल्याने म्हणा पण शेंडेफळ असूनही स्वभाव खूप समजूतदार आणि सहनशिल आणि त्यामुळेच वेळच्यावेळी अभ्यास करुन अभ्यासाथी चमकत असे... बाकी कितीही orthodox मतं असली तरी घरात शिक्षणाला मात्र प्रोत्साहन मिळतच असे... कोणाला ह्याच्या हुशारीची एव्हडी कल्पना नसल्याने १० वी मधे मेरीट लिस्ट्मधे नाव आल्यावर पूर्ण गल्लीत दिवाळीच साजरी झाली होती.... आता हा लवकरच graduate होऊन आपल्या कपड्यांच्या दुकानाला हातभार लावेल अशी वडीलांची अपेक्षा होती...पण ह्याने Engineering ला जायची इच्छा बोलून दाखवली..
|
Adm
| |
| Tuesday, February 13, 2007 - 1:15 am: |
| 
|
Engineering ला जायला वडिलांची हरकत नव्हती पण त्याचा खर्च परवडेल की नाही ह्याची त्यांना काळजी वाटत होती.. मार्क्स चांगले असल्याने free seat मिळणार हे नक्की होतं.. मग त्यानेच घरी सांगितलं की तुम्ही फ़क्त फ़ी द्या.. बाकीच्या खर्चाच मी बघेन.. कुठेतरी तास दोन तास नोकरी केली तर सोय होऊन जाईल.. त्यांच्याच ओळखिच्या दोन मुलांची शिकवणी घ्यायचं नक्की झाल्याने तो प्रश्ण ही मिटला.. शिकवणी घरीच असल्याने त्याला आणखी कुठे जावं लागत नसे आणि घरीच अभ्यास करायला पुरेसा वेळ देखिल मिळत असे.. त्याच्या आईला ह्या गोष्टिच खूप वाईट वाटत असे पण ह्यावेळ पुरती तरी सोय झाली होती आणि मुलाची इच्छा पूर्ण होत होती ह्याचन तरी तिला सहाधान होतं.. Engineering संपल्या वर नोकरी साठी दोन पर्याय होते एकतर आमच्या कंपनीत बंगलोर ला किंवा दुसर्या एका साधारण कंपनीत मुंबईला... पण एव्हडी चांगली संधी मिळते आहे तर कशाला सोडा आणि शिवाय काहितरी भव्य करून दाखवायचं म्हणून घरा पासून दूर जायचं होतं तरी ह्याने आमची कंपनी निवडली... बंगलोर ला दाखल झाल्यावर नव्याची नवलाई enjoy करण्न चालू होतं... काम कराय्चा खूप उत्साह होता, त्याच बरोबर हातात पैसा होता, काटकसर करायची आता गरज नव्हती आणी मुख्य म्हणाजे घरची शिस्त नव्हती आणि मोकळ, मनासारख वागता येत होतं... एकत्र कुटूंबाचे जसे फ़ायदे असतात तसेच तोटे ही असतातच... नाही म्हटंल तरी adjustments कराव्या लगतातच.. बंगलोरच हे सगळं वातावर्ण अगदी मुक्तपणे अनुभवणं चालू होतं... तश्यातच तिच्याशी मैत्री झाली... मुंबईच्याच मराठी मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेली सुरेखा बाकीच्या hi fi लोकांपेक्षा त्याला भवून गेली... पुढे दोघंचीही बदली पुण्यात झाली आम्ही सगळ्यांनीच त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं होतं.. आणि अनेकदा चिडवाचिडवी पण केली होती. पण त्या दोघांनी सर्वांसमक्ष कधिच काहीच कबूल न केल्याने कोणी फ़ार serisouly घेत नसे... ताशातच मानस ची onsite trip ठरली आणि कामच्या व्यापत माझाही त्याचाशी जास्त contact राहीला नव्हता.. पुधे मी त्यच्याच प्रोजेक्ट मधे manager म्हणून आले तरी ह्या सगळ्याबद्द्ल काही बोलणं झालं नाही इतक्या दिवसात...
|
Adm
| |
| Tuesday, February 13, 2007 - 6:05 pm: |
| 
|
सुरेखा त्याच्याच वयाची होती आणि आता तिच्या घरी लग्नाची घाई चालू झाली होती... ह्याने जायच्या आधी घरी सांगयचा प्रयत्न केला होता तर आपल्या समाजातिल मुलगी नाही म्हणून वडिलांनी परवानगी साफ़ नाकरली होती... आणि त्यातच त्यांची तब्येत बरी नसल्याने ह्याने देखिल फार बोलणं वाढवलं नव्हतं.. मानस onsite गेल्यानंतर सुरेखाच्या घरून खूपच दबाव यायला लागला आणी मानस च्या घरच्यांची आधिच परवानगी नसल्याने त्यांना भिती वाटायला लागली... त्यामुळे मानस ला अमेरीकेहून तातडीने परत येऊन लग्न नाहितर निदान engagement तरी करायची होती... तस बघायला गेलं तर मला दोन्ही बाजू पटत होत्या पण शेवटी सग्ळ्या निर्णयांवर माझं ही नियंत्रण नव्हतं.. त्यातच मानस चं promotion देखिल due होतं आणि त्याचा हा परत यायचा निर्णय होऊ घातलेल्या प्रमोशन वर परिणाम करू शकला असता... सगळ्या बाजूंनी चर्चेची गुर्हाळं झाल्यानंतर शेवटी २ महिन्यांनी मानस ची परत यायची तारिख नक्की झाली.... इकडे प्रोजेक्ट च काम जोरात चालू होतं.. रिलिज अगदीच तोंडावर आला होता आणि त्यात मानस च्या transition चं काम देखिल चालू होतं.. त्याच्या जागी जाणार्याला सगळं नव्याने शिकावावं लागणार होतं... आणि त्यात आमच्याच ग्रुप मधे नविन project चालू झाल्याने मला थोडं फार त्यात ही लक्ष घालावं लागत होतं.. मानस पारत आल्यावर ह्या प्रोजेक्ट चं पूर्ण काम बघणार होता जे त्याच्या प्रमोशन च्या द्रुष्टीने फ़ायद्याचं झालं असतं आणि मला पण नविन प्रोजेक्ट च्या सुरुवातीला त्याकडे बघता आलं असतं.. आणि हे आम्च्या department head ना देखिल पटल्याने माझी चिंता जरी कमी झाली होती.. अखेर ठरल्याप्रमाणे २ महिन्यांनी मानस परत आला पण रोहितची नाराजी ओढवूनच...कारण रिलिज १५ दिवसांवर आला असताना तो परत आल अहोत.. दोघांचिही बाजू ऐकून घेऊन त्यांना समजावताना मधल्यामधे माझी मात्र वाट लागत असे.. . परत आल्यावर मात्र मानस आगदी खूष होता.. दोघेही खूष आणि आनंदात होते... कदाचित पुढिल आयुष्याची स्वप्ने रंगवण्यात मग्न होते.. दर्म्यान एक दिवस मिटिंगच्या वेळी मानस जरा upset दिसला.. नंतर बोलतान म्हणाला की घरचे अजूनही लग्नाला परवानगी देत नाहियेत.. हरप्रकारे समजावून पाहिलं पण तरिही ते ऐकायला तयार नहियेत.. आणी आम्हाला कळत नाहिये आता काय कारवं.... त्यादोघांची मैत्री अनेक दिवस होती हे आम्ही बघत आलो होतोच.. आणी आता एक्मेकांपासून वेगळं होणं त्यांना जमलं नसतं आणि ते करण्यात अर्थ ही नव्हता असं माझं तरी स्पष्ट मत होतं... घरच्यांच्या क्षणिक समाधानासाठी ह्या दोघांनी आयुष्याभराचा आनंद गमावून बसू नये असं मला तरी वाटंत होतं... ह्या सगळ्यात एक positive गोष्ट होती ती म्हणजे सुरेखाच्या घरून लग्नाला परवानगी मिळाली होती..
|
Adm
| |
| Tuesday, February 13, 2007 - 7:23 pm: |
| 
|
हो नाही करण्यात दिवस चालले होते.. माझ्या मागचा कामाचा व्याप वाढतच होता... निदान एका प्रोजेक्ट्चं बरचसं काम मानस संभाळत असल्याने जरा बरं होतं... मला तर प्रत्येक अडल्या ठिकाणी त्याची मदत होतसे आणि कुठल्या प्रश्णासाठी त्याच्याकडे उपाय नाही असं होत नसे.... त्यातच प्रमोशन ची यादी बाहेर आली... माझ्या बाजूने मी जंग जंग पछाडून ही मानस च नाव त्या यादीत नव्हतं... कदाचित रोहित ने दिलेल negative feedback म्हणा किंवा त्याचा प्रोजेक्ट अर्धवट सोडून परात यायचा निर्णत म्हणा काहितरी एक त्याचा promotion वर परीणाम करून गेलं होतं.. त्याच्या आधिच्या किंवा आत्ताच्या उत्तम performance कडे सोयिस्कर दूर्लक्ष केलं गेलं होतं.. मी promotion cousil ला कारणं विचारल्यावर काहीतरी थातूर मातूर कारणं देऊन ६ महिन्यांनी निघणार्या पुढच्या यादीत त्याचं नाव नक्की असेल असं म्ला सांगण्यात आलं... ह्या सगळ्याप्रकारावर मानस ची reaction अगदीच अनपेक्षित होती... तो ना चिडचिड करत होता ना माझ्याशी त्या विषयावर बोलायला आला... त्याच्या normal वाग़ण्याचाच मला त्रास व्ह्यायला लागला... शेवटी मी च त्याला बोलावून त्याला माझ्या आणि promotion counsil मधल्या meeting बद्दल सांगितलं... त्यावर तो म्हणाला "भारती, आप मुझे ये क्यू बता राही हो...मैने पूछा ही नही उसके बारे मे..." मला कळत होतं हे फ़क्त वरवरच बोलणं आहे... " Personal हो या Professional एक भी चिझ सिधी तरिके से होती नही है... किस किस के बारे मे सोचके अपना mood खराब करनेका? जिस टाईम मुझे onsite जाना थ तब नही मिला, जब वापस आना था तब भी नहि हो पाया... अब right time पे promotion नही हो रहा...मै मेरे पसंद की लडकी से शादी करना चाहता हूं तो वो भी नही हो रहा.. आप ही बताओ.. किस किस का बूरा माननेका..." त्याने हे सगळं बोलून टाकल्यावर मलाच बरं वाटलं.. मी माझ्या परीने समजावल त्याला.. पण माहित नाही किती पटलं ते.. दुसर्या दिवशी मानस चा leave application माझ्याकडे आलेला होता.. नंतर येऊन त्याने मला सांगितलं की आम्ही register लग्न करून टकायचं ठरवलं आहे.. पुढे काय होईल ते नंतर पाहू... पण आता मानसिक ताण सहन होत नाही.. त्याची रजा मी लगेच मंजूर करून टकली अआणी काही मदत लागली तर सांग असही सांगितलं... १० दिवसांनी दोघजणं परात आले ते मिठाई चा box घेऊनच.. दोघही खूष दिसत होते.. त्यामूळे मी पण उगाच सगळे details विचारत बसले नाही... नंतर त्याने सगळा व्रूत्तांत सांगितला..शेवट पर्यंत घरून परवानगी मिळालीच नाही.. शेवटी सुरेखाच्या आई वडिलांनी register लग्न करून दिलं.. नंतर घरी सांगितल्यावर घरून अर्थातच टोकाची reaction आली.. वडिलांची तब्येत आणखिनच बिघडली आणि त्यांना अजून त्रास होण्यापेक्षातुम्ही नंतर कधितरी भेटायल या असं घरून सांगितलं..
|
Adm
| |
| Tuesday, February 13, 2007 - 8:06 pm: |
| 
|
तो परत आल्याआल्या लगेच एक चांगली onsite opportunity आली आणि त्यासाठी मी त्याला विचारल्यावर त्याने लगेच होकार दिला कारण सुरेखाच ही महिन्या दोन महिन्यात onsite जायचा plan चालूच होता.. लोकेशन एकच असल्याने दोघांचही long term ठरत असल्याने दोघेही खूप उत्सूक होती आणि शिवाय चालू होणारं नविन प्रोजेक्ट critical असल्याने मानस सारखा team member तिकडे असणं माझ्यासाठीही फ़ायद्याचच होतं... भराभर formalities आटोपून मानस पून्हा एकदा onsite रवाना झाला सुरेखा १ महिन्यानंतर जाणार होती... पण मानस म्हणाल्याप्रमाणेच कुठलिच गोष्ट सुरळीत पार पडायचा जणू योगच नव्हता... आता सागळं जुळून येत होतं तर सुरेखाचं येऊ घातलेलं नविन project cancel झालं... आणि तिच्या group मधून त्याच ठिकाणी दुसरं कोणतं प्रोजेक्ट देखिल नव्हतं... मी तिला मज्या Group मधे घ्यायला तायर होते पण त्याच्या साठी दोन्ही Group Leader ची परवानगी हवी होती जी काही कारणांनी मिळत नव्हती... ह्या सगळ्या प्रकारात दोघेही जण प्रचंड frust झाले होते.. मानस ला फोन वर आणि सुरेखाला office मधे समजावून मी च कधिकधि दमून जात असे.. एकदा मानस शी बोलण्यातून मला उगाच असं वाटलं की त्याचा मझ्यावरपण विश्वास राहिला नाहिये.. आणि शिवाय अत्तापार्यंत त्याच्या कामावर कधी ह्या सगळ्याचा परीणाम झाला नव्हता तो ही मला कुठेतरी जाणवला होता... मी एकदज़ा दोनदा तसं त्याला बोलून दाखवलं... दरम्यान सुरेखा ला दुसरी onsite opportunity मिळायला ३ महिने लागले आणि ती ३ महिन्यांनी अमेरीकेला गेली... पुढची प्रमोशन लिस्ट आली आणि ह्यावेळी सुरेखाच प्रमोशन झालं होतं तर मानस नाव यंदाही वगळंल होतं.. ह्या सगळ्या प्रकारचा मलाच इतका उबग आला होता की मी ह्या वेळी मी ना promotion counsil शी बोलायल गेले ना मानस ला समजावायला गेले... परीणाम व्ह्यायचा तोच... मानस ला माझ्याबद्दल च गैरसमज झाला.. दरम्यान इकडे सणासुदिचे दिवस चालू झाले.. गणपती, नवरात्र ह्या सगळ्याच्या क्रुपेने म्हणा किंवा ओषधांमुळे म्हणा मानस च्या वडिलांची तब्येत एकदम सुधारल्याच सुरेखा नी एकदा सांगितलं.. तसच सणासुदीच्या दिवसात मुलगा घरी नसल्याचं त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी मानस ला लवकर भारतात ये असं स्वत्:ह फ़ोन करून सांगितलं.... दोघांच्या परत यायच्या वेळेला मानस ने आमची कंपनी सोडायचं नक्की करूनच आला. यायच्या आधिच दुसरा job बघून आणि resignation later देऊनच परत आला.. परत आल्यावर घरून त्याचा लग्नाला मान्यता मीळाली.. आज दोघेही खूप आनंदात, सुखात आहे... पण मला मत्र एक चांगला couligue दूर गेल्याची रुखरुख लागली आहे ती कायमची -Adm
|
Psg
| |
| Wednesday, February 14, 2007 - 12:31 am: |
| 
|
adm छान लिहिलं आहे. software industry चं अगदी व्यवस्थित वर्णन केलय तुम्ही..
|
Saee
| |
| Wednesday, February 14, 2007 - 6:35 am: |
| 
|
आम्हालाही रुखरुख pass केलीस.. अगदी मुद्देसुद लिहीतेस तू. (पण असं वाटतं सगळं सुरळीत झाल्यावर त्याच्याशी बोलून गैरसमज दूर करता आले असते भारतीला. कारण आता तो समजुन घेण्याच्या मन:स्थितीत असेल.)
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 14, 2007 - 11:37 am: |
| 
|
Adm मलाहि अशी अनेक प्रकरणे हाताळावी लागतात. दहावीच्या परिक्षेचे कसे सगळी मुले जबरदस्त टेंशन घेतात, तसेच या गोष्टीचा मुलगा, मुलगी आणि त्यांच्या घरचे, सगळेच फार बाऊ करतात. आणि दहावीच्या परिक्षेचा, जसा पुढे फारसा संदर्भ रहात नाही, तसेच ईथेहि होते. पण हे दिवस सगळ्यानाच तणावात टाकतात, एवढे खरे.
|
Bee
| |
| Wednesday, February 14, 2007 - 9:10 pm: |
| 
|
काहीतरी नविन प्रकारची कथा वाचायला मिळाली.. मला वाटतं इतक्या सहजासहजी खरी मैत्री तुटत नाही. काही दिवस गेल्यानंतर परत एकदा तुमच्या भेटीगाठी होतीलच किंवा आता लग्न झाल्यामुळे त्याला कुणाच्या मैत्रीची फ़ारशी पर्वा वाटत नसावी..
|
Adm
| |
| Thursday, February 15, 2007 - 10:04 am: |
| 
|
अभिप्रायांबद्द्ल धन्यावाद... ही सत्यकथा नाहिये.. ! सई, "अगदी मुद्देसुद लिहीतेस तू" पेक्षा अगदी मुद्देसुद "लिहीतोस" तू will be better .. ;) मला एक narrative story लिहून बघयची होती.. and in this situation, I found it better to be narrated by a female.. Bee , अजुन एक गोष्ट म्हण्जे, professional life मधे झालेली मैत्री हि १०० रात ९५ वेळा कमापुरती असते..म्हणजे "गरज सरो वैद्य मरो" type .. अस माझं साधाराण observation आहे.. त्यामूळे कदाचित आज मानस आणि भारती चा contact नसेलही.. Any ways, thanks agian.. Keep the suggestions flowing in..
|
Srk
| |
| Friday, February 16, 2007 - 2:10 pm: |
| 
|
adm तुमचं म्हणणं पटलं. कामामुळे झालेल्या ओळखी किंवा मैत्री खुपदा व्यावहारीकच असतात. त्यातुन जरा आपुलकी वाटली तरी ती ईतके पक्के बंध नाही बांधु शकत. काही प्रसंगच असे असतात कि आपली बाजु समोरचा ऐकुन घेण्याच्या मनस्थितीतच नसतो, तितका वेळही नसतो. तेव्हा शक्य होईल तिथे नंतर स्पष्टीकरण देणं इतकच आपण करु शकतो.
|