Swara
| |
| Thursday, February 08, 2007 - 12:25 am: |
| 
|
पहीलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्यावा ही विनंती.... एक इतकीशी गोष्ट ती कुशीवर वळली. विचार करत राहिली. नेहेमीसारखा आणि नेहेमीचाच. का अस होत आपलं? का अस कातावतो आपण? हा असाच आहे... असाच तर आहे ना पहिल्यापासून हा! मग आताच का मन आक्रोशत रहात? का संताप होतो ह्याच्या वागण्याचा? अपेक्षांचा? आकांक्षांचा? पुन्हा एकदा तिला तो ओझारता स्पर्श आठवला. हसूच आल तिला स्वतच. एक गृहिणि, एका मुलाची आई आपण! पण त्या स्पर्शातली हुरहुर नाही विसरलो. असा विचार करण नाही शोभत आपल्याला.तिच्या पापभीरू मनान न मागताच कौल दिला. ह्याच्या गुण्दोषांसकट स्वीकारल ना आपण ह्याला? मग आता ती अधूरी कहाणी का घोळते मनात? कुठे तो एक स्पर्श आणि कुठे ही आयुष्यभराची साथ! ह्याच्यावर जीव तोडून प्रेम केलच की आपण! प्रेमच ना ते? हो, प्रेमच की! एरवी कुणी कुणाला अशी निःस्वार्थपणे झोकून देऊन साथ करत नाही. पण मग आता कुठे गेल ते प्रेम? प्रेम पण संपत असेल का? आटत असेल का? आणि संसारातून प्रेम आटल्यावर काय करायच? फक्त निभावत रहायच ना! मुलांसाठी. समाजासाठी. त्याच्याशी जुळला असता सूर तर कस असत आपल आयुष्य! आपण आवडतो त्याला हे माहीत असूनही आपण कधी त्याला खतपाणी नाही घातल. आवडायचा नाही अस नाही! पण नाहीच जमल ते आपल्याला! कितीदा सांगायचा प्रयत्न करायचा तो! पण त्यालाही विचारण नाही जमल. तिच लग्न ठरल्याच्या बातमीवर त्याचा पडलेला चेहेरा आठवला आणि एतक्या वर्षांनंतरही तिला वाईट वाटल. त्याच्याशी झाल असत समजा लग्न! तरी असच आटल असत प्रेम. कुणी सांगाव आयुष्यभर टवटवीत राहिल असत कदचीत. त्यानीतरी समजून घेतल असत आपल्याला? का नही? नक्की घेतल असत. प्रेमाचा पाया लाभला असता की त्या नात्याला. आजुबाजूच्या जोडप्यात तरी कोणी खूश असतील का? की सगळ्यांच आपल्यासारखच असेल? पण काही जोडपी किती प्रेमाने वागतात एकमेकांशी बाहेर. बाहेरून आपणही खूशच वाटत असणार की पण! अधुरेपणातच असते गोडी! पण पूर्णत्वात समाधान असत! हो ना? मग हा उबग कसला? की पुर्णत्वात उबग पण असतो? बाप रे! तिचे विचार असेच भरकटत होते. इतक्यात तिचा सोनुला दचकून जागा झाला. हा शेजारी घोरतोय. पण जाग म्हणून नाही येणार! की जाग आली तरी दाखवत नाही कोण जाणे? ती पुन्हा मनात चरफडली. "शानं ग माझ सोनं ते! स्वप्न पडल का? झोप हं बाळा!" अस म्हणत तिने सोनुल्याला थोपटायला सुरुवात केली. मनातले सगळे विचार सरले आणि शेजारच्या घोरण्याच्या आवाजातही तिच्या चेहेर्यावर एक समाधान पसरल. एक म्हण आठवली आणि ती मनाशीच हसली. ओळखा बर कुठली म्हण...... "स्त्री ही दोन घडीची पत्नी आणि अनंत काळची माता आहे"
|
Sakhi_d
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:03 am: |
| 
|
स्वर, पहिलाच प्रयत्न आहे पण छान आहे. जरा अर्धवट वाटतेय. नक्कि तुला काय म्हणायचे आहे. म्हणजे तुला तिची घुसमत दाखवायची आहे का? म्हणजे नात्यात अडकलेली ती की एक व्यक्ती म्हणुन कि अजुन काहि...... आणि स्री हि क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता हे सर्व ठिक आहे पण त्याआधी ती एक व्यक्ती असते हे कधी लक्षात येणार??
|
Swara
| |
| Thursday, February 08, 2007 - 10:19 am: |
| 
|
हो ग सखी! ही गोष्ट इथे संपत नाही. ही अशीच चालू रहाते. रोजच्या जगण्यात असे घुसमटीचे क्षण येतात. पण आयुष्य म्हणजे घुसमटच नव्हे तर सुखही असत. हा तिच्या मनाचा क्षणाचा विचार म्हणजे उभ आयुष्यच घुसमट बनलय अस नव्हे. तुझ बरोबर आहे. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार व्हायलच हवा. आणि तो बहुतेक होतो ही! पण एखादा संतापाचा, नाउमेदिचा क्षण येतोच तरी. मला इतकच म्हणायच आहे की मन कितीही धावल तरी आपल्या परिश्रमाने बांधलेल्या घरट्यात येत परत. गोष्ट वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप आभार!
|
Raadhika
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:33 am: |
| 
|
swara , जे काही लिहिलंय ते छान लिहिलं आहेस... तो एक घुसमटीचा क्षण, ज्यावेळी वाटतं की आयुष्य किती निरर्थक आहे... पण पुढच्याच क्षणी तुमच्या लक्षात येते, की बरंच काही चांगलही आहे आपल्या आयुष्यात. पण का गं, पुरुषांनाही वाटत असेल असं काही??
|
Chinnu
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:47 am: |
| 
|
स्वरा, छान. अजुन येउ द्या.
|
Manmouji
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:57 pm: |
| 
|
मला इतकच म्हणायच आहे की मन कितीही धावल तरी आपल्या परिश्रमाने बांधलेल्या घरट्यात येत परत. ह्यावरुन मला एक प्रसंग आठवला. आम्ही एकदा offsite ला गेलो होतो. तिथे एक जोडी होती कुत्र्यांची. त्याना आमच्या boss ने बरोबर घेतले फ़िरायला जाताना. त्यातल्या कुत्र्याला साखळीने बांधले होते आणि कुत्रीला मोकळे सोडले होते. कारण तिला मोकळे सोडले तरी ती परत येइल ह्याची खात्री होती. कुत्र्याची नाही.
|
Manya2804
| |
| Friday, February 09, 2007 - 12:12 am: |
| 
|
पण का गं, पुरुषांनाही वाटत असेल असं काही?? >>> पुरुष हा क्षणाचा पती आणि अनंत काळचा 'पतीत' आहे...
|
स्वरा छान आहे गोष्ट.
|
Manuswini
| |
| Friday, February 09, 2007 - 12:03 pm: |
| 
|
पतीत म्हणजे नक्की काय????????
|
स्वरा पहिला प्रयत्नसुनही तु विषय वेगळा निवडलास आणि छान लिहिलेस..!!!
|
पतीत म्हणजे.. पडलेला... सोप्या मराठीत सांगायचं तर "गिरा हुआ इन्सान"
|
Swara
| |
| Saturday, February 10, 2007 - 9:57 am: |
| 
|
manmouji that was funny. manya2804 पतीत! Ya right! Nandini2911 हा मग बरोबर आहे पतीबद्दलची manya2804 ची नवी म्हण. रधिका, चिनू, संघमित्रा, लोपमुद्रा खूप आभर!
|