दे मला आणून आता राहिलेले क्षण जरासे ना तरी झाले जुने ते तू दिलेले वण जरासे
|
आठवांनी ... पाळला निर्धार नाही वेदनेला .... आज पारावार नाही
|
पाहिले आहेत सारे चेहरे मी मुखवट्यांना मानतो आता खरे मी
|
Meenu
| |
| Sunday, January 21, 2007 - 1:20 am: |
| 
|
पाहिले आहेत सारे चेहरे मी मुखवट्यांना मानतो आता खरे मी >>> तु असं म्हणल्याने मित्रा, बघ किती गोंधळ उडालाय .. मुखवटा खरा की चेहरा माझा, आता मलाही प्रश्न पडलाय ..
|
Meenu
| |
| Sunday, January 21, 2007 - 1:27 am: |
| 
|
अच्छा असं आहे तर .. तुला भेटायला येताना मुखवटा चढवुनच येईन म्हणते, माझा चेहरा तुला रुचला नाही तर ..?
|
Meenu
| |
| Sunday, January 21, 2007 - 1:33 am: |
| 
|
वण राहीलेत म्हणतोस, म्हणजे भरलीये तर जखम .. राहीलेले क्षण देईन रे, भरल्यावर ही जखम ..
|
Meenu
| |
| Sunday, January 21, 2007 - 1:35 am: |
| 
|
वण राहीलेत म्हणतानाही, वार करुन गेलास .. तेव्हा नव्हतास असा, आता माझ्याही पुढे गेलास ..
|
Meenu
| |
| Sunday, January 21, 2007 - 1:37 am: |
| 
|
वेदनेचं खापर, आठवांवर फोड .. दुसर्याला दोष द्यायचं, आता तरी सोड ..
|
Poojas
| |
| Sunday, January 21, 2007 - 4:51 am: |
| 
|
वेदनेला आसवांचा शाप आहे.. आठवांना चिंतणेही पाप आहे...?? झेलताना वार मी..तरबेज झालो दोष देणेही आता..मज माफ आहे..!!!!!!!!
|
Poojas
| |
| Sunday, January 21, 2007 - 5:16 am: |
| 
|
वादळाची कारणे स्मरणार नाही... वेंधळ्या वार्यापुढे हरणार नाही.. जो स्वत्: उध्वस्त आहे.. अन दिशाहीन.. त्यापुढे हतबल कधी ठरणार नाही..!!!!!!
|
Shyamli
| |
| Sunday, January 21, 2007 - 6:07 am: |
| 
|
सांगु नको अजुनी वादळाची कारणे अपुरीच घातली तु भोवताली कुंपणे श्यामली!!!
|
Shyamli
| |
| Sunday, January 21, 2007 - 6:17 am: |
| 
|
काय अजुनी तुजकडे आठवांचा गाव आहे? हास वेड्या, बघ अजुनी जगण्यास जरा वाव आहे श्यामली!!!
|
माझं आणि तिचं प्रेमाचं नातं लोकांच्या घरचं काय जातं? असं जळू नका हो आमच्यावर बंद दारामागे का केलं तुम्ही रात्रभर? आम्ही काही केलं तर बिघडलं कुठे? तुमचीच पुनरावृत्ती केली ईथे. ति माझी मी तिचा तुम्ही कोण कुठले? प्रेमाच्या विरोधात तुमचे हात उठले? श्री
|
Devdattag
| |
| Sunday, January 21, 2007 - 8:11 am: |
| 
|
ओळखीच्या लोकांनी मज ओळखण्याचे सोडले मीही मग जगणे मुखवट्यावरच सोडले आले काही अनोळखी बोलण्यासाठी जरी मीच माझ्याशी अता बोलण्याचे सोडले
|
Devdattag
| |
| Sunday, January 21, 2007 - 8:14 am: |
| 
|
कोण म्हणाले मी अता वादळांना घाबरतो होती इथे जरा आगळी जराशी मी त्या झुळकेस थोडा घाबरतो
|
वा!!! वा!!! देवदत्त मस्तं.
|
फुलं तोडले म्हणून काटे मरत नसतात दुसरं फुल येणार या आशेवर जगत असतात श्री
|
Meenu
| |
| Sunday, January 21, 2007 - 11:48 am: |
| 
|
कुणी नसतं आसपास, तेव्हा मुखवट्याशिवायची मी असते .. पण खरं सांगायचं तर, मुखवट्यातच मी जास्त बरी दिसते ..
|
Meenu
| |
| Sunday, January 21, 2007 - 11:50 am: |
| 
|
मुखवटा काढुन स्वतःकडे, बघायची हिम्मत होत नाही .. खरं तर तेच कारण आहे ना, की मी मुखवटा उतरवत नाही ..
|
विचार करत होतेच हल्ली परत करावेत तुझे क्षण. पण ते मात्र मागू नकोस प्राणात खोल रुतलेले वण.
|