|
Admin
| |
| Monday, January 22, 2007 - 12:11 am: |
| 
|
साहित्यिकांची मांदियाळी अजूनही नीट आठवतात ते दिवस, अगदी कालपरवा घडल्यासारखे..ऑक्टोबर १९९८.. US मधे मी नुकताच दाखल झालो होतो, पुण्यातले घर सोडून प्रथमच असा बाहेर.. सोबत टीपीकल north Indian culture मधे वाढलेली मुले.. म्हणजे सोबत अशी नाहीच.. आजूबाजूला सगळे गोरे, देशी कुणीच नाही, मग मराठी माणसाची आशाच नको.. प्रचंड होमसिक.. हे कुठे येऊन पडलो अशी भावना.. आणि यातच एका मित्राने मायबोलीची ओळख करून दिली आणि सारी भाषाच बदलली.. निराशाग्रस्त मनाला मिळाला एक आशेचा किरण आणि एक खरीखुरी सोबत.. मानसिक सोबत, आपुलकी आणि जिव्हाळा.. पुढच्या अनेक दृढ नात्यांची ही फ़क्त नांदीच होती.. त्यावेळी मायबोलीवर फ़ार मंडळी नसायचीच.. नियमीतपणे येणारे म्हणजे राजा (फ़ंटू), असामी, शोनू, मेधा रंगी, कार्टा, स्वप्ना आणि असेच थोडे अजून.. त्यामुळे साहित्यही तसे कमीच असायचे.. शोनू एवढे छान लिहिते, पण तेव्हा काही लिहायची नाही (कदाचित 'बेनझीर काय म्हणेल?' म्हणून असेल ), पण प्रसिध्द साहित्यिकांच्या कविता लोक जरूर टाकायचे..या मित्र मैत्रिणींबरोबरच ते साहित्यही मायबोलीची ओढ वाढण्यामागचे एक कारण होतेच. कार्टाची स्फ़ुटं मस्त असायची.. 'सरपटी, फ़ुलटॉस, नॉट आऊट' हे गच्ची क्रिकेटवरचे तर अजून आठवते.. त्यासोबत जगनबुआ, परशुराम यांच्या कविता असायच्या, स्वप्नाचे एखादे ललित... मजा यायची वाचायला... गुलमोहर असा वेगळा विभाग नव्हताच... हळुहळू साहित्यिकांची वर्दळ वाढायला लागली आणि आमची उठबस आपोआप साहित्यिकांमधे व्हायला लागली. मायबोलीवर येण्याआधी मी चुकुनही कधी काही लिहिले नव्हते. कॉलेजमधे मित्रांबरोबर हिंदी गाण्यांची केलेली तोडफ़ोड इतपर्यंतच आपली मजल. कवितांची तोडफ़ोड करायला मुक्त व्यासपीठ मिळालं ते मायबोलीचं आणि प्रोत्साहन मिळालं तेही मायबोलीकरांचच. त्यामुळे मी जी काही बरीवाईट विडंबनं करतो त्याचं श्रेय मायबोली व मायबोलीकर यांनाच द्यावे लागेल. असो! त्यावेळी हितगूजवर ५ मेधा होत्या.. 'कुठली मेधा कोण?' याचा फ़ार गोंधळ व्हायचा.. त्यावर मी एक 'काहीच्या काही कविता' केलेली.. ते माझे मायबोलीवर केलेले पहिले लिखाण.. म्हणजे पहिल्या लिखाणातही मायबोलीवरच्या 'पंचकाकूंचा' हात होताच...त्याच काळात मी एक कविताही केलेली, पण तुमच्या सुदैवानी मी त्या फ़ंदात परत फ़ारसा पडलो नाही. अशातच कार्टाने नेटवरची पहिली कादंबरी 'सोबती' लिहिली आणि ती सर्वांना खूप आवडली. जगनबुआ गायब झाले पण त्यांची जागा 'गोंद्या'च्या गीतांनी घेतली. अजूनही नवीन कवी येऊ लागले. आल्याआल्याच 'सोबती'ची 'सोप व बत्ती' अशी चिरफ़ाड करून पेशव्याने झोकातच एंट्री घेतली आणि पुढे अनेक उत्तमोत्तम (आणि कळणार्याही बरका) कवितांचा नजराणा पेश केला. पेशवा आणि असामीनी लिहिलेल्या 'त्या वळणावर'ने सर्व मायबोलीकरांना एकदम झपाटून टाकले.. आणि 'जावाकसम' हे पहिले STY कोण विसरेल? जावाकसमला साहित्यिक मूल्य काही नसेल, पण जर 'त्या वळणावर' मायबोलीच्या साहित्यिक इतिहासातला मैलाचा दगड असेल, तर जावाकसम हे हळुवार मनात जपलेल्या मोरपीसासारखेच. शैलेशने सुरू केलेले जावाकसम लिहिताना मी, असामी, डॅमिट, समर्या, किरण आणि इतर बरेच.. सर्वांनीच खूप धमाल केली. मायबोली जशी झपाट्याने वाढू लागली, तसेच तिच्या साहित्यिक वाटचालीतले साहित्यकर्मी सुध्दा. परागकण, शुभा ( rshubha ), रूपा ( rmd ), शुमा, कॅचमी, सत्यजीत ( satyajit_m ), बेटी, सखी, क्षिप्रा, असे अनेक कवी/ कवियत्री हितगुजकरांना आपल्या प्रतिभेनी मुग्ध करत होते. त्यावेळी इतके कवी/ कवियत्री हितगुजवर होते की कधीकधी त्यांच्यात जुगलबंदी व्हायची. अशी जुगलबंदी म्हणजे काव्य रसिकांना पर्वणीच.. प्रत्येकाची शैली वेगळी, धाटणी वेगळी.. पीकेने तिरळे गाजवले आणि काही तरल कविताही पेश केल्या तर रूपाच्या बहुतेक कवितांना दु:खी झालर, सत्याच्या काही सामजिक, तर पेशव्याच्या अतर्क्य.. वेगळीच बोली बोलणार्या.. असे असले तरी त्यांना जोडणारा एक दुवा म्हणजे त्यांची काव्यप्रतिभा. याच सुमारास कोणीतरी दिवाळी अंकाची कल्पना काढली आणि इतर अनेक उपक्रमांसारखाच याही उपक्रमाला मायबोलीकरांनी भरघोस पाठींबा दिला. मायबोलीचा पहिला दिवाळी अंक २००० साली प्रसिध्द झाला. नेटवर प्रसिध्द झालेला तो पहिलाच दिवळी अंक असावा...तेव्हापासुन सुरु झालेली ही साहित्यिक वारी अजुनही सुरु आहे आणि पुढेही सुरुच राहील हे नक्की. पण वारीत जसे नुसते वारकरीच सामिल होत नाहीत तर इतर ऐरेगैरे पण सामिल होतात तसेच झाले. मायबोलीचा 'बालपणीचा काळ सुखाचा' एव्हाना संपला होता. सूरज बडजात्याच्या गूडीगूडी मूव्हीज सारखे असलेले हितगुजचे स्वरूपही 'वास्तव'दर्शी होऊ लागले. कवींच्या जुगलबंदींबरोबरच इतर अनेक जुगलबंद्या रंगू लागल्या. ऍडमिनने त्यांना views and comments असे गोंडस नाव दिले. ह्या गोष्टीचा फ़ायदा घेणार नाही ती हवाहवाई कसली? तिने 'कुजबुज' सुरू करून हितगुजवर धमाल उडवून दिली. २००१ च्या अखेरीस कधीतरी प्रसाद शिरगावकर अवतीर्ण झाला आणि त्याने एकसे एक विडंबने टाकून सर्वांनाच खूप हसवले. हितगूजला मराठी गझलांची ओळखही त्यानेच करून दिली. कवी मंडळी अशी साहित्याच्या वारीत 'रिंगण' घालत असताना लेखक मंडळीही काही मागे नव्हती.. 'हम ढील दे चुके सनम', 'त्या वळणावर्-२', जी१च्या कथा, जी.एसह्या गूढकथा, योग, विनयदेसाई आणि हेम्स यांच्या कथा असे भरीव योगदान होतेच. जोडीला वेगेवेगळ्या जणांनी लिहिलेले ललित, स्फ़ुट लेखन. कितीही जणांची नावं घेतली तरी कमीच पडेल. जुन्या काळातील साहित्यिकांचे स्मरण करताना सध्या वारी गाजवत असलेल्या साहित्यिकांचा उल्लेख न करणे म्हणजे गावस्करचं कौतुक करताना तेंडुलकरला विसरल्यासारखे होईल.. वैभव, प्रसाद मोकाशी, निनावी (ही पूर्वीही लिहायची, पण इतक्या जोमात नाही), मीनू, श्यामली, लोपा, झाड, बापू यांच्या कविता, राहुलफाटक, श्रद्धा, रचना, अजय यांच्या कथा किंवा मऊण्मयी, गंधार, बडी व इतर अनेक जणांनी लिहिलेलं ललित.. बर्याच जणांचे नावे इथे नजरचुकीनी राहिलेली असतील. रोज साहित्यिक वारीत असे कित्येक वारकरी सामिल होत आहेत आणि होत राहतील आणि ही परंपरा अशीच चालत राहील. सर्व साहित्यिकांचा उल्लेख करताना दाद देणार्या रसिक वाचकांना विसरणे कृतघ्नपणाचे ठरेल, कारण तेच खरे पांडुरंग ज्यांची दिव्यदृष्टी आपल्यावर पडावी म्हणून ही वारी अखंड चालू आहे. गेल्या आठ वर्षात मायबोलीने मला खूप काही दिले.. कित्येक जीवाभावाचे सोबती, कितीतरे नवे ऋणानुबंध, नव्या ओळखी, 'प्रेम', आपुलकी, जिव्हाळा, सर्व काही... खर्या अर्थाने जीवन समृध्द केले. मी साहित्यप्रेमी कधीच नव्हतो, पण मायबोलीनी मला साहित्याची गोडी लावली आणि यात मोठा वाटा आहे या मांदीयाळीतल्या साहित्यिकांचा. त्यांनी मला आणि सर्वांनाच या कटकटीच्या, रहाटगाडग्यासारख्या चालणार्या जीवनात नुसते विरंगुळ्याचे क्षणच नाही दिले, तर खर्या अर्थानी जीवनातील अनेक पैलूंची ओळख करून दिली. काँप्युटरवर बसल्या बसल्या C, C++, Java शिकता शिकताच मायबोलीकर साहित्यिकांनी आपुलकी आणि प्रेमाची नवीन भाषाच शिकवली. इतकेच नव्हे तर माझ्यातल्याच 'मी' चे काही पैलू जे मला आत्तापर्यंत अज्ञात होते त्याचीही ओळख करून दिली. त्यामुळेच मायबोलीबरोबरच ह्या सर्वांचेच ऋण मानावे तेवढे थोडेच. माझा या सर्वांना विनम्र प्रणाम आणि हा लेख म्हणजे त्यांच्या ह्या ऋणातून अंशत: मुक्त होण्याचा केलेला एक छोटा प्रयत्न. आणि शेवटचे पण सर्वात महत्वाचे म्हणजे मायबोलीमुळे मला एक प्रेमळ, मला समजुन आणि संभाळुन घेणारी अशी जीवनसाथी मिळाली. तिच्या प्रोत्सहानामुळेच तर हा लेख लिहु शकलोय. कितीही लिहिले तरी मायबोलीवर लिहिणे कमीच पडेल कारण शेवटी मायबोली ही एक संस्कृती आहे, आपली सर्वांचीच एकमेकांवर असलेली प्रिती आहे आणि आपल्याच आत्म्याची आपल्याला आलेली प्रचिती आहे. ~मिलिंद छत्रे पुणे
|
Meenu
| |
| Monday, January 22, 2007 - 3:26 am: |
| 
|
अरेच्चा मिल्या ..! तु असं एकदम गंभीर का भावनाविवश का काय म्हणतात ते नको बुवा होउस .. तरी पण ठांकु ठांकु .. एकंदरीत बरेच archieves वाचायला लागणार आता वेळ काढुन ..
|
Manmouji
| |
| Monday, January 22, 2007 - 5:08 am: |
| 
|
मिल्या, माझि आठवण आहे हे बघुन बरे वाटले. असामीची पण आठवण झाली. मेधा प्रमाणे अर्चना पण अनेक होत्या त्यावेळी. एकदम १९९८ मध्ये गेलो.
|
Asami
| |
| Monday, January 22, 2007 - 1:42 pm: |
| 
|
अहो मनमॉजी मी अजून इथेच आहे. तुमच्यासारखाच readonly फ़क्त मिल्या लेका एकदम र्हुणातून मुक्त होण्याचा प्रयत्न etc वाचून HG सोडून चाललास कि काय असे वाटले JK मधे एक मह्त्वाचे पात्र विसरलास कि - storvi. वोह नही होती तोह JK च्या आधी अजून २ STY लिहिलेली पण ती उडवली गेली I guess before I could take backup. नावे आठवत नाहीत पण Clue देतो एक - अंधेरी रात आणी पोत्यात काय आहे ? HDA ची कल्पना HH ची होती I guess
|
Peshawa
| |
| Monday, January 22, 2007 - 5:17 pm: |
| 
|
अगदी अगदी मिल्या सत्याभाइ आणी रुपा ह्यांचि bus वारी अजुनही आठवते. त्याच प्रमाणे श्रिणि गुरुदेवांच्या zen कथा ...
|
Wah.... June diwas aathavle...!! Maayboli ne barach kahi dilay... anek wela gharchya aathvanine man udas hyaayche, tevha maaybolicha virangula hich ek sobat hoti..!! Sagle june savangadi aathavle maayboli warche...je aata firkat naheet ekade..kinva Sansaaraat...jivanachya dhavpalit ramun geleyat...!! Nastolgic hyaayla zala re milya 
|
Storvi
| |
| Tuesday, January 23, 2007 - 4:09 pm: |
| 
|
ओ! चत्रे बुवा काय राओ JK चे नाव आणि AMWAY च्या येजंट ला विसरलात? आता कसले ऋणातुन मुक्त होताय? BTW मला एका केशकर्तनालयाची आठवण झाली आणि ताजमहाल की तेजोमहाल... असाम्या याद है क्या boss ? 
|
Dhumketu
| |
| Wednesday, January 24, 2007 - 12:25 am: |
| 
|
मस्त आहे रे लेख
|
Manmouji
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:36 am: |
| 
|
मिल्या mail टाकली आहे. pl चेक कर.
|
माझ्यातल्याच 'मी' चे काही पैलू जे मला आत्तापर्यंत अज्ञात होते त्याचीही ओळख करून दिली.>>.. हो ना एक सुंदर व्यासपीठ दिलं मायबोलीन सगळ्यांना... पण मिल्या आपण इतके serious नका लिहु, विडंबन टाका आता एखादं..
|
Asami
| |
| Wednesday, January 24, 2007 - 11:56 am: |
| 
|
शिल्पे तुला काय काय आठवेल सांग्ता येत नाही
|
Storvi
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:03 pm: |
| 
|
याद आ गया वोह गुजरा जमाना और वडाका पार, और दुध की डेअरी और AIT अर्थात Aryan Invasion Theory और जीटीपी और श्री महराज ( कुठले ते तुम्ही समजुन घ्या ) 
|
Shyamli
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:26 pm: |
| 
|
वा! मिल्या, ठांकु वेरी मच रे ह्या झेन कथांबद्दल बरच ऐकलय, अजुन आहेत का ह्या ईथे?
|
Milya
| |
| Thursday, January 25, 2007 - 4:07 am: |
| 
|
असाम्या JK च्या आधी दोन का एक STY ? नक्की आठवत नाही आणि नाव पण नाही आठवत आता. पेशवा : हो रे झेन कथा विसरलो. तसे बर्याच जणांचे उल्लेख राहुन गेलेयत ह्या लेखात रे... (स्मृतीशब्दमर्यादा होती ना) बोडक्या : चला ह्यानिमित्तने बरीच मंडळी रोमातुन जागी झाली मनमौजी : अरे किती वेळा id बदलशील. तुझ्या मेलला चौकशी करुन re देतो शिल्पे तू JK च्या नावाने त्यावेळी बोटे मोडायचीस म्हणून मी माझ्या लेखात तुझ्या नावाने बोटे मोडली नाहित तर तू माझ्याच नावाने बोटे मोडायला लागलीस की परत... मीनु, धुमकेतू, श्यामली, लोपा धन्यवाद लोपा अहो जाहो म्हणू नकोस गं. म्हातारे झाल्यासारखे वाटते 
|
>>>>> कारण शेवटी मायबोली ही एक संस्कृती आहे कसं बोललास!! - आपली नम्र, निनावी तेंडुलकर. 
|
Asami
| |
| Thursday, January 25, 2007 - 1:03 pm: |
| 
|
JK च्या आधी दोन रे. पहिल्याचे नाव आठवत नाही. दुसर्याचे नावे " अंधेरी रात मे पोता तेरे हाथ मे " , तिसरे JK नि मग " हम ढिल दे चुके सनम "
|
Storvi
| |
| Thursday, January 25, 2007 - 1:36 pm: |
| 
|
>>शिल्पे तू JK च्या नावाने त्यावेळी बोटे मोडायचीस >> कहां गये वोह दिन: पण मी नुसतीच बोटं नाही मोडायची JK बंद पाडण्याचे बरेच प्रयत्न केले, पण असाम्या आणि समर्या वगैरे मंडळी पेटलेली होती. मी बंद पाडली की 'हे सगळे स्वप्न होते' वगैरे लिहुन पुन्हा सुरुवात व्हायची 
|
Asami
| |
| Thursday, January 25, 2007 - 2:16 pm: |
| 
|
मिल्या तेंव्हा वेगळ्या स्वप्नांमधे होता ग त्यामूळे त्याला आठवत नसेल
|
Mrinmayee
| |
| Monday, January 29, 2007 - 10:58 am: |
| 
|
मिलिंद, आज सवडीनी तुझा लेख वाचला. खूप आवडला! तुझी मायबोलीची ओढ ही बर्याच 'प्रेम'ळ कारणांनी होती हे जाणवलं! आता अर्काइव्ह्ज वाचायला घेईन म्हणते. ललीतात उल्लेखलेली 'मऊण्मयी' मीच अशी मी माझी गोड समजूत करून घेतलीय. (ती खरी असल्यास मन्:पूर्वक धन्यवाद). पण इथे अश्या आणखी काही 'मृण्मया' (महामाया सारखं वाटतंय) होत्या. तु त्यातली कुणी म्हणंत असशील तर...
|
Prajaktad
| |
| Monday, January 29, 2007 - 3:12 pm: |
| 
|
मिल्या! लोपाशी सहमत..बरेच दिवसात विडंबन आले नाही..आता लिहा एखादे फ़र्मास..
|
Manuswini
| |
| Monday, January 29, 2007 - 10:55 pm: |
| 
|
मिल्या, लेख छान आहे. मायबोलि म्हणजे 'रेशीमगाठी' चे ठिकाण अगदी माझे जवळ जवळ तीन लहानपणीचे friends इथे भेटले. अगदी lost n found सारखे. ते पण माझी कुठलीशी post वाचुन नी फक्त नाव वाचुन की ही ती 'तीच' असणार. तशीच 'सडक तडक बोलणारी'. , actually ते मराठी आहेत हे माहीत सुद्धा न्हवते कारण school मध्ये कधीच मराठे बोलले नाहीत. असो. त्याना पण 'इथेच' सहधर्मचारीणी मिळाल्या.(पूनमचा 'च' 'सहधर्मचारीणी' शब्द चोरुन). .........
|
Upas
| |
| Tuesday, January 30, 2007 - 11:06 am: |
| 
|
सही रे मिल्या.. जुगलबंदी मधे वेगळीच धुंदी असायची.. आणि कुजबुज तर केवळ असायचे तेव्हा.. कित्येक bb GTP मुळे बंद पडायला लागले.. नंतरचा काळ केड्या, वेल्ड्या, श्रिनी, मुकुंद, RAR आणि इतर कैक जणानी गाजवला.. वो दिन.. जब याद आये.. बहोत याद आये!!
|
Milya
| |
| Tuesday, January 30, 2007 - 1:00 pm: |
| 
|
स्वाती, मृण्मयी, प्राजक्ता, मनु, उपास : धन्यवाद... मृण्मयी तूच गं ती... मनु : मग तू तुझ्या मित्रांकडुन काही बोध घेत आहेस की नाही? ~D उपास : हो रे त्या काळात मी गायब होतो इथुन त्यामुळे त्या सर्वांचेच उल्लेख राहिले आहेत.. परत एकद स्मृतीमर्यादा... 
|
Manuswini
| |
| Tuesday, January 30, 2007 - 5:33 pm: |
| 
|
मिल्या, बोध घेवुन काय करु बहुतेक जागा भरल्या इथील लेट entry झाली इथे. कोइ गम नहि,अपनेको यहा आनेके सौ और अछे reasons है माझ्या friends ने त्यांची रंगतदार कहाणी सांगीतली पण ते जुने दिवस around 1999 - 2002 पर्यन्त खुप मजा होती म्हणे असे त्यांचे म्हणणे............ असो. maayboli rocks anytime
|
|
|