Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 20, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » कविता » Archive through January 20, 2007 « Previous Next »

Shree_tirthe
Thursday, January 18, 2007 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मेल्यावर...

यायचं तर आताच ये
मी मेल्यावर येऊ नकोस
असेल तुझं माझ्यावर प्रेम
पण, चार अश्रु ढाळू नकोस

मी जिवंत असताना आली नाही
पण, मी मेल्यावर मात्र ती आली
प्रिये तुझी ऐवढी सोपी कोडी
पण, मला सोडविता नाही आली

असेल तुझं माझ्यावर प्रेम
पण, चार अश्रु ढाळू नकोस

त्रास होईल मला
तुझे अश्रु बघताना
मी जिवंत होईल
मेलेला असताना

दु:खी होऊ नकोस
मला जिवंत पाहून
तुझे अश्रु पुसण्याईतका
वेळ घेतला आहे मागुन

तुझा एक एक अश्रु
अनमोल आहे
समुद्र मंथनातून निघालेल्या
रन्तांपेक्षाही मोलाचा आहे

तुझे अश्रु मी पुसले "सखे"
मागीतलेला वळही संपला आहे
पुन्हा तुझ्या डोळ्यात येणार नाहीत अश्रु
कारण त्यांचा समुद्रही आता आटला आहे

तुला कसलाही त्रास होऊ नये म्हणून
मी तुझ्यापासून दुर जात आहे
जाताना यम म्हणाला,"बघ
तुझ्या विरहामुळे ती रडत आहे"

अरे यमा तुला कळणार नाही
माझ्या जिवनाची कथा
तिचे अश्रु दु:खाचे नसुन आनंदाचे आहेत
आता तरी कळली का माझी व्यथा

प्रिये खरं प्रेम दुसर्‍याच्या प्रेमात असतं
तु कोठेही रहा पण, सुखी असावीस वाटतं

श्री


Shree_tirthe
Thursday, January 18, 2007 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्दयी सुख

सुखांनो येऊ
नका माझ्या घरी
अंगणात माझ्या
पडलीय दरी

हे जग तुमचे
तुम्ही जगाचे
आता आपले नाते
आहेत तरी कशाचे?

द्यायचे नव्हते सुख
तर, दु:खं का दिले?
माझ्याच डोळ्यांनी
माझे अश्रु का पिले?

आता, हे दु:ख माझे
मी दु:खाचा
का आशा ठेवू
मिळेल एक क्षण सुखाचा.

श्री


Moderator_2
Thursday, January 18, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Priyasathi,
तुमची कविता वरती आर्काईव्स मधे सर्व हक्कासहीत सुरक्षीत आहे. परत परत तीच कविता पोष्ट करु नये हि विनंती.
ही खालिल लिंक पहा.


/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=910305#POST910305

Meenu
Thursday, January 18, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड २ .. .. .. ..

Meenu
Thursday, January 18, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाले शब्द भारंभार,
नाही अर्थ ना आकार ..
मित्रा कसा विसरला,
सारासार तु विचार ..?

प्रत्येकाला व्यथा आहे,
प्रत्येकाची कथा आहे,
तरीही पाळायाची ..
विवेकाची प्रथा आहे

रोजरोजचे रडणे,
प्रेमकथा तीच जुनी ..
किती दिवस दळणे,
तीच जुनी गाथा आहे ..?

तुझ्या व्यथांच्या पल्याड,
वास्तवाचे गाव आहे ..
प्रत्येकाच्या काळजाचा,
चुकलेला ठाव आहे ..


Mankya
Thursday, January 18, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येकाला व्यथा आहे,
प्रत्येकाची कथा आहे,
तरीही पाळायाची ..
विवेकाची प्रथा आहे

मीनु .... अशक्य लिहिलयस अगदी !
जबरीच मीनु, हो जबरीच !

माणिक !


Manogat
Friday, January 19, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"एक प्रश्न माझ्या मनातला"

शब्द आहेत थोडे पण मनोगत आहे खुप,

आयुश्याच्या वळणावर प्रश्न आहेत खुप,

छोटस मन माझ शब्दांच्या जाळ्यत फ़सत,

प्रश्ननांचि उत्तर नाहित म्हणुन मुसु मुसु रडत.


प्रश्ननात शब्द अनि शब्दत प्रश्न,

उत्तरांचा ठाव या मनानि गाठायच कुठन,

उत्तर सापडवायला मन जाळ्या च्या टोकापर्यंत जात,

परततांना मात्र रिकाम्या हातांनिच फिरत.


प्रश्ननांच जाळ या मननिच गुम्फ़ल,

उत्तरांचा ठाव नसतांनाहि त्या धाग्यांना ओढल,

आता पाउल ठेवतांना हळुवारपणाने ठेवत,

जाळ टुटाव नही म्हणुन त्याला हि सांभाळतात.


या निरागस मनाला ठेवाव कुठे,

प्रश्ननाला सोडवता येइल अस् न्याव कुठे,

प्रश्ननाला सोडवता येइल अस् न्याव कुठे..................
}

Swaatee_ambole
Friday, January 19, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मूळ हिंदी कवितेचं मराठी भाषांतर पोस्ट करत आहे.

जबाबदार

शेवटी मनाशी म्हटलं,
' खूप काळ लोटलाय एव्हाना..
पदोपदी तुझी आठवण करून देणार्‍या
सगळ्या गोष्टी नाहीश्या करायची वेळ आल्ये बहुधा..'
आणि इतकं म्हणेपर्यंत
आरशाकडे लक्ष गेलं..

'माझी कुणाबद्दलही तक्रार नाही..
माझ्या मृत्यूला फक्त मीच जबाबदार आहे..'


Sarang23
Friday, January 19, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्रे...! कहर...! मुळ हिंदी कविताही वाचायला आवडेल!
धक्का खतरनाक साधलायस निनावी!


Gandhar
Friday, January 19, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती अ प्र ति म!!!        

Shyamli
Friday, January 19, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईशप्पथ..........................
बाहेर यायला होत नाहीये यातुन
मुळकविता???


Mankya
Friday, January 19, 2007 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबाबदार .......... अप्रतिम !
हिंदी कविता पाठवच आता स्वाती !

माणिक


Meenu
Friday, January 19, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचल्यावर खरं म्हणजे 'निःशब्द' ईतकीच खरी प्रतिक्रीया झाली.
स्वाती मुळ हिंदी कविता blog वर टाकुन लिंक देतेस का ..?
नाहीतर मेल कर ..


Swaatee_ambole
Friday, January 19, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दोस्त्स.
इथे ब्लॉगची लिंक द्यावी की नाही हे कळे ना. पण देते.
मूळ हिंदी कविता
इथे आहे.

Seema_
Friday, January 19, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती मस्त कविता आहे . आवडली एकदम .

Vaijayantee
Friday, January 19, 2007 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यथा

परदेशी येणारे आम्ही एकटे नाही; सांगायला जवळ तसे वेगळे नाही
नेहमीची आमची भारताची वारी
यंदाही आमची नेहमीचीच तयारी
मनाच्या लोलकांची गणती नाही
पण चकाकणारे कुठे काही नाही
आता आमची ओळख कुणा नाही; तरी भेटीची ओढ आटली नाही

वर्षागणिक दुरावली सगळी नाती
जपून नव्या जगाच्या नव्या चाहुली
इथे ते तिथे ;समजले न फक्त खुळे
तरी धरावी ओंजळी अपुलीच माती
हळवे होण्याची म्हणे मुभा नाही; रडक्याकडे पाहणारा कोणी नाही

होती काही वर्षे नव्याची नवलाई
कधी परदेशस्थाची ती कौतुकाई
ओठाआड डोळ्याआड लपणाऱ्या
त्या होत्या गंधाळल्या हळव्या सई!
उगाच मीही त्यांना थोपवले नाही; कुणाला कारणही समजले नाही

माणसांच्या गर्दीत मुंगीला न जागा
दूरवर उभ्या इमारतींच्या भव्य बागा
तशी भीती मला गर्दीची उरली नाही
गहाळ माणुसकीची खंत कुणा नाही
थोड्या मदतीने काही बदलले नाही; कुणाशिवाय कुणाचे अडले नाही







Peshawa
Friday, January 19, 2007 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा रस्ता कुठे जातो?
माझ्या प्रष्णा पासून दुर ...
हा मोहर झाडावरचा
हा बर्फ़ामधला लाल पक्षी
दोन रुळासारखे डोळे माझे
स्वप्न धावते सोडत धूर

हा रस्ता थांबतो जिथे
तिथे इमारत गगन्चुंबी
खिडक्या भरून उजेड फ़ेकत
दारा मागे दार लपवून
माझ्यासाठी दबा धरलेली




Sanghamitra
Friday, January 19, 2007 - 9:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू सही आहे.
स्वाती कविता छान आहेच पण मराठीच जास्त आवडली. :-)


Meenu
Friday, January 19, 2007 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रा .. स्वाती मित्राला अनुमोदन मराठीच जास्त आवडली ..

तुझ्या आठवणी

आठवणींना जेव्हा मी,
रंगवायचं ठरवलं तेव्हा ..
सातही रंगात रंगल्या होत्या,
तुझ्या आठवणी ....
आठवणींना जेव्हा मी,
गायचं ठरवलं तेव्हा ..
तीनही वेळी गायल्या होत्या,
तुझ्या आठवणी ....
आठवणींना जेव्हा मी,
पहायचं ठरवलं तेव्हा ..
डोळे मिटुनही दिसल्या होत्या,
तुझ्या आठवणी ....
आठवणींना जेव्हा मी,
जगायचं ठरवलं तेव्हा ..
तेव्हा मात्र ..
वास्तवाला पर्याय नाही,
आठवणी त्या आठवणी ....!


Psg
Saturday, January 20, 2007 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती.. मस्त आहे.. :-) पंच उच्च आहे.. जबरदस्त बसतो! :-)

मीनु, वा!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators