Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 16, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » झुळूक » Archive through January 16, 2007 « Previous Next »

Jo_s
Saturday, January 13, 2007 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

नेहमीच करायच्या गोष्टी ज्या
विसरून जातो आपण त्या
आथवण देण्या आम्हा त्यांची
योजना ही संक्रांतीची
तिळगूळ देऊ अथवा घेऊ
आपण सदा गोड बोलू

सुधीर


R_joshi
Saturday, January 13, 2007 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेश सुंदर :-)
जो तुला आणि सर्व काव्यप्रेमीना संक्रातिच्या शुभेच्छा :-)

सण येतात ते
मन जुळवण्यासाठिच
आनंदाच्या वर्षावात
आपल्या माणसांसोबत जगण्यासाठी

प्रिति:-)


R_joshi
Saturday, January 13, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझी आठवण यावी
म्हणुन बहाणे लागत नाहित
नेत्रांच्या दर्पणातुन
तुझी छबी जात नाहि

प्रिति:-)


Adi787
Saturday, January 13, 2007 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवण ही आली तुझी अश्या कातरवेळी
मना लावुन गेली हुरहुर जगावेगळी :-)

R_joshi
Monday, January 15, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या डोळ्यातील भाव
मन माझे ओळखतात
शब्दावाचुन बोलण्याची
किमया ते साधतात.

प्रिति:-)


R_joshi
Monday, January 15, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज आसमंत
काळ्या ढगांनी वेढलेले
त्यांच्या अचानक येण्यातच
काहितरी गुढ दडलेले

ओळखिचि वाटली मला
त्या ढगांची काजळी
कधि हि न बरसलेलि
एक अनोखि काळजी

बरसण्याची त्याच्या
मी वाट पाहत होते
त्याने न केलेला प्रहार
मी आज साहत होते

न बरसताच आसमंत
निरभ्र होत गेले
वादळापुर्विची ही शांतता
हेच मला ते सांगत होते
हेच मला ते सांगत होते

प्रिति:-)


Deep_tush
Monday, January 15, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी कधी तुझे डोळे
ख़ुप काही सांगुन जातात.....
भाव तुझ्या मनीचे
नकळत बोलुन जातात....

तुषार............


Mankya
Monday, January 15, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार छान !
प्रिति ... छान .... पण कविता इथे का ?


Poojas
Monday, January 15, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहीच बोलले मी.. काही तसे..तरी त्या..
नि:शब्द आर्जवांनी संवाद साधलाही...
अव्यक्त भाव सारे.. शब्दात मांडताना
बोलून दोन डोळे..गेले बरेच काही...!!!!!


Poojas
Monday, January 15, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलू नकोस काही.. जाणेन मी तरीही..
देऊ नकोस काही.. मागेन मी तरीही....
येऊ नको अवेळी.. स्वप्नात गं सखे "तू"
अडवून पापण्यांना.. जागेन मी तरीही..!!!!



Poojas
Monday, January 15, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जागून काढलेल्या.. रात्री निघून गेल्या
रात्री शहारलेल्या... नेत्री भिजून ओल्या..
विस्तीर्ण आठवांचे आकाश पांघरोनी..
अधुर्‍याचं स्वप्न कलिका.. हलके निजून गेल्या..!!!


Ganesh_kulkarni
Tuesday, January 16, 2007 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आभाळ भरुन आलं की...
तुझी आठवण येते
आणी तू जवळ नसलीस तरीही...
तुझी आभाळ भरुन भेट होते!"

गणेश(समीप)


Sanghamitra
Tuesday, January 16, 2007 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूजा तिन्ही चारोळ्या सुरेख आहेत.

>> विस्तीर्ण आठवांचे आकाश पांघरोनी..
वा.

R_joshi
Tuesday, January 16, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक चारोळिच लिहित होते, पण शब्द सुचत गेले आणि येथे उतर गेले.
बाकि आज झुळुका धीरगंभिर आणि हलक्या फुलक्या आहेत.
पुजा खुपच छान:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators