वैभव,सारंग आधीची कविता सांज होती.
|
Sarang23
| |
| Wednesday, January 10, 2007 - 7:48 am: |
| 
|
वा! ती आत्ताच वाचली म्हणून तिलाही दाद देतो. खासच आहे मित्रा!
|
Mankya
| |
| Wednesday, January 10, 2007 - 9:49 am: |
| 
|
मित्रानो, वाट बघतोय छान कवितान्ची ! होऊन जाऊदे बरसात कवितान्ची यारो ....!
|
Smi_dod
| |
| Thursday, January 11, 2007 - 12:09 am: |
| 
|
रात कितीतरी दिसानी आली पुनवेची रात नभातला चांदवा बघुन चांदणे हसले माझ्या कुशीत.... किणकिणली काकणे तुझ्या माझ्या मिटीत रेशमी विळखा तो कुजबुजला कानात अन लाजला पाकळ्यात..... हुळहुळल्या राती विव्हल त्या आवेगात रिती ओंजळ सुखाची भरली काठोकाठ.... स्पर्श तो झंकारीत होता सतार सुर ते नहात होते आकंठ तृप्तीत..... लपेटुन त्या चांदण्या मधाच्या दवात हिरव्या मखमालीवर हसले हुंकार अर्धोन्मिलित नेत्रात..... स्मि
|
Krishnag
| |
| Thursday, January 11, 2007 - 12:59 am: |
| 
|
पुनव... तृणराशीवर तरुतळी त्या रजनीगंधा उमलली पुनवेतील निशीकांताच्या धवल धारात स्नातली लुकलुकती त्या चंद्रिका नभी सुधांशुस त्या न्याहाळती परी विस्मीत तो रजनीनाथ लुब्ध कोमल सुमनावरती लाजरे जाहले शुभ्र पुष्प ते लपले तृण पाती जाऊनी मोहरूनी उठले कणकण त्याचे शशांकाच्या अमृत धारांनी श्यामल यामिनी सवे तारकाफुले धुंदीत त्या क्षीर वर्षावानी मौन साक्ष हा तरु एकला संतोष पावे मनो मनी
|
वा प्रसाद सुरेख जमलेय. किरूच्या या चित्रावर मी पण पूर्वी लिहीली होती एक मला वाटतं. आता ती आठवत नाहीये आणि नवीन पण सुचत नाहीये.
|
माणिक चित्र तू काढलेस का? खूप दिवसांनी एक प्रयत्न... मिटता डोळे वृक्षाचे या, हळूच उठते धरती. नजरकैद चुकवून कसे मन धावे चंद्रावरती. कथा मीलनाची त्यांच्या तिसरा जाणत नाही. बस् उरे निशाणी गालांवरती चांदीचे व्रण काही. - संघमित्रा
|
Devdattag
| |
| Thursday, January 11, 2007 - 4:57 am: |
| 
|
किरुच्या चित्रावर.. खरंतर सारंग आणि प्रसाद यांच्यानंतर यावर काही टाकणं म्हण्जे.. तरीही रहावलं नाही.. ती पहा पश्चिमेला प्रभा काय सांडली लटके रे पश्चिमा दिवाकराशी भांडली "काय रे ही वेळ झाली आत्ता तुझी यायची चल जा तुझ्याशी मी नाहीच आहे बोलायची" म्हणे रवीही, "काय ते सुंदरीचे रूप वर्णावे बरे तुझिया आठवाविना का दिनही अमुचा सरे" हाय त्या रविकराने तिज स्पर्शिले ऐसे जरा रंगही तो लालिमेचा पश्चिमा ल्याली खरा
|
Mankya
| |
| Thursday, January 11, 2007 - 5:09 am: |
| 
|
स्मि .. शब्द न शब्द सुरेखच ! krishnag.... मस्तच रे ! सन्घमित्रा .... नाही रे, पण मी काढतो बर ! देवा .... जबरीच रे, पुन्हा पुन्हा वाचतोय ! माणिक !
|
Meenu
| |
| Thursday, January 11, 2007 - 5:36 am: |
| 
|
मित्रा सुंदरच जमल्यात गं ओळी अगदी सही कल्पना आहे चांदीच्या व्रणांची ... आहा देवा तुपण मस्तच मांडली आहेस की कल्पना ..
|
Meenu
| |
| Thursday, January 11, 2007 - 5:44 am: |
| 
|
चंद्रकीरणांचा धरुनिया हात उतरे चांदणे भेटाया धरेस त्याचीच छाया फुलाफुलात नाहली धरा लख्ख चांदण्यात उजळली मग हिरवी पाती चांदण्यात आज तीही नहाती तेजाळ अशा या पुनव राती ..
|
Mankya
| |
| Thursday, January 11, 2007 - 6:18 am: |
| 
|
सही ... सही म्हणुन तुही मस्तच लिहिलिस ग मीनु .. सुन्दर !
|
Meenu
| |
| Thursday, January 11, 2007 - 6:29 am: |
| 
|
हे कोण आज या वाटेनी की गेले ? डवरली अशी गवताची ही पाती .. पदस्पर्शाचे चांदणे ईथे सांडले, हळुवार चांदण्या गवतावरी रहाती .. तो चंद्र नभीचा तोही धावत आला, चिंतीत जरासा काळवंडुनी गेला .. "चांदवा नवा हा कोण धरेवर आला, अन पाते पाते पुलकित करुनी गेला ? "
|
Sarang23
| |
| Thursday, January 11, 2007 - 8:52 am: |
| 
|
वा! माणिक चित्र झकास आहे. नक्कीच काहीतरी लिहावं लागणार इथे... मित्रा, welcome back छान वाटले बर्याच दिवसांनी तुझी कविता वाचली. सगळेच जोरात चालू आहेत...
|
Mankya
| |
| Thursday, January 11, 2007 - 9:20 am: |
| 
|
धन्स सारन्ग .... वाट बघतोय तुझ्या कवितेची ! ( नक्किच काहितरी मस्त वाचायला मिळणार म्हणजे सारन्गा ! ) माणिक !
|
Mankya
| |
| Thursday, January 11, 2007 - 1:30 pm: |
| 
|
चला मुलानो, हात जोडा बघु ....! सारन्ग, तुझी कविता pending आहे बर मागच्या चित्रावर !
|
Anandg
| |
| Thursday, January 11, 2007 - 1:36 pm: |
| 
|
माणिक ही आधीच्या चित्रासाठी... निरोप सोसुनिया ऊन वारा ताठ राही देह जीर्ण चान्द टिपण्या आतुर तरी हात हे निष्पर्ण अमृताचे पान नाही जरा करतो प्रोक्षण गर्द आभाळात उडे शुभ्र पिठुर चांदणं उभारुन हात, आर्त एक मागणं रे देवा.. नव्या पात्यांच्या साथीला फेर चांदण्यांनी घ्यावा नव्या जन्माच्या वाटेला देह चांदण्याने न्हावा...
|
Shyamli
| |
| Thursday, January 11, 2007 - 1:38 pm: |
| 
|
वाह.. .. .. .. ..
|
Anandg
| |
| Thursday, January 11, 2007 - 2:53 pm: |
| 
|
आणि ही नव्या चित्रासाठी... गुपित अरे लबाड्या चांदोबा... माझ्यावरती देऊन दान.. झाडामागे लपलास का? लपता छपता, जोडुन हात मागीन ते तु देशिल का? अरे लबाड्या चांदोबा... आई म्हणते.. देवबाप्पाच्या घरास आजी गेली ठावुक आहे मला लबाड्या तूच तिला पळवली अरे लबाड्या चांदोबा... कशी जाणली..गोष्ट तुझ्या रे गुपिताची तुझे चांदणे केसांवर पडता अठवण आजिच्या बोटांची अरे लबाड्या चांदोबा... तुला मागते.. डोळे माझे करुन किलकिले दिसेल ना रे मला आजिचे, तोंड तुझ्या गालावरले?
|
Hems
| |
| Thursday, January 11, 2007 - 5:44 pm: |
| 
|
चित्र छानच आहेत सगळी. चंद्राच्या चित्रावरून सुचलेली : तू भरून राहिला आहेस चंद्रासारखा , पुनवेच्या निःसंदिग्धपणी तू फुलून राहिला आहेस निशाफुलांसम निष्पाप अन आग्रही! तू पसरून राहिला आहेस काळोखातील तारकांगत आश्वासक ओंजळीनी माझ्या निष्पर्णपणातही बघ ना, तुझ्याच अस्तित्वाची ग्वाही
|