|
Niru_kul
| |
| Tuesday, January 09, 2007 - 7:27 am: |
| 
|
ओलेत्या संध्यासमयी.... मी जुळवावे भावनांना, तू मिटवावे वेदनांना; हात तू माझा धरावा, एकांतात चालताना..... आकाशीच्या शुभ्र ढगांनी, उतरुन यावे धरतीवरती; स्वप्न हे सत्यात यावे, दिन मावळतीला सांडताना..... मेघांनी मग गर्जून यावे, तुला-मला चिंब भिजवावे; मी शिरावे मिठीत तुझीया, ह्रदयाशी नाते सांधताना..... त्या ओलेत्या संध्यासमयी, मनमिलनाचा योग घडावा; वार्याने मग दोर बनावे, तुला नि मला बांधताना.....
|
R_joshi
| |
| Tuesday, January 09, 2007 - 7:37 am: |
| 
|
एकलव्य मी अर्जुन नाहि बनलो एकलव्याचा वसा घेतला गुरुमुर्ति साधुन संर्घषाचा विडा उचलला मज न ठावे शाश्वत चिरंतर माझाच मी एकला मार्ग निवडला मज न ठावे अग्निदिव्य काय असे परी पार करित असे संघर्षाचे डोंगर मी लढतो एकटाच माझ्या संकटांशी मी देतो गुरुदक्षिणा माझ्याच अस्तित्वाची.... प्रिति तितकिशि जमलि नाहि. चुका नक्कि सुधारा.
|
Kiru
| |
| Tuesday, January 09, 2007 - 8:22 am: |
| 
|
आ हा.. प्रसाद धडाक्यात पुनरागमन!!! 'काही बाही' प्रचंड आवडली.. तु आलास.. खूप बरं वाटलं मित्रा. मिनू, 'पडझड' मस्तच.. JayavI 'जीवनरंग' खूप आवडली. वैभवा.. काय लिहू!! अद्वैताची अनुभूती दिलीस. मला परत पुण्याला यायला लावणार तर तु..
|
वैभव , मिनू, सारंग, प्रसाद , जया आणि प्रसाद मोकाशी, तुम्हा सर्वांचे लेखन आवडले, तुम्ही सर्व खूप छान लिहिता.
|
Neelay
| |
| Tuesday, January 09, 2007 - 10:36 am: |
| 
|
कविता-दुसरा प्रयत्न! आस ओली आभाळ भरून आलेले काळोख काळोख दाटलेला वीज एकाकी लकाकली जलधारांची चाहूल लागलेली मग अचानक तो आला पाऊस हिरवाचिंब ओला डोळ्यांत कितीही साठवला तरीही नेहमी नवनवेला काचेच्या तावदानांवरती त्याने ताल धरलेला माझ्या गरम चहाचा पेला त्याच्या सुरांत बुडलेला झाडांची ठिबकणारी झबली तारांवर पाखरे चिंब भिजलेली जागोजागी डबकी साचलेली माझी कागदी होडी तरंगलेली मग तो अचानक निघून गेला मागे ठेवून पाऊलखुणा ओल्या कुंद आसमन्त सारा भिजलेला जीव माझा तरीही आसुसलेला
|
Saurabh
| |
| Tuesday, January 09, 2007 - 2:16 pm: |
| 
|
कमाल लिहीली आहेस रे वैभव! कहर!
|
Daad
| |
| Tuesday, January 09, 2007 - 11:13 pm: |
| 
|
वैभव, काय लिहून गेलास हे? अतिशय अतिशय सुंदर. ईश्वराचं सान्निध्य कस असावं ते इतक्या clearly define केलयस, तेसुद्धा कवितेतून? -धन्य आहेस! 'मन नितळ जळाची संथ तृप्तता केवळ....., श्वासांमधली हलकेच सरावी वर्दळ........, आणि खास म्हणजे शेवटचं कडव! - 'बाहेर अंतरी एकचि परिचित परिमळ' खूप वेळा वाचली... एखाद्या प्रार्थनेसारखी मनाला "नितळ, संथ, तृप्त" करतेय तुझी ही कविता!
|
Jayavi
| |
| Tuesday, January 09, 2007 - 11:45 pm: |
| 
|
वैभव........ अरे खरंच काही शब्दच नाहीत रे....... अगदी सगळं चिरत तुझी कविता अगदी आतपर्यंत पोचते..... कितीतरी वेळ ती तिच्या जगातून बाहेर येऊच देत नाही. म्हणून तुझी कविता वाचल्यानंतर मी काही वेळ तरी काहीच वाचत नाही. कारण तुझी कविता दुसरं काही आत पोचूच देत नाही........ आता अजून काय लिहू? दाद, तू म्हणतेस तशी ही कविता मात्र मला प्रार्थनेसारखी वाटली नाही....... अर्थात प्रत्येकाचं perception वेगळं असू शकतं म्हणा. मला ही कविता अगदी निर्वाज नात्याची वाटली.... मैत्रीची
|
Meenu
| |
| Wednesday, January 10, 2007 - 12:22 am: |
| 
|
बघ मानस माझे मानसरोवर आता तू यथेच्छ डुंबावेस अंतरी त्राता दोघांस पटावी ओळख ही जन्मांची बाहेर अंतरी एकचि परिचित परिमळ >> वैभव सुंदर तर आहेच रे .. मीही दाद सारखाच spiritual अर्थ घेतला .. पण मग मला शेवटच्या कडव्यात जरा शंका आली बघ. पहील्यापासुन मी 'तु' हा परमेश्वर आहे असं वाचतीये ना .. मग या कडव्यातल्या पहील्या दोन ओळींचा अर्थ कसा लावावा ते कळेना. बरं गृहीतक असं आहे का .. मानसरोवरात मोक्षप्राप्तीसाठी किंवा अंतर शुद्धीसाठी डुबी मारतात .. बाकी चु. भु. दे. घे.
|
Bee
| |
| Wednesday, January 10, 2007 - 12:49 am: |
| 
|
paDjhaD kawita chhan aahe, Meenu.
|
मनःपूर्वक आभार मित्रांनो . खरंतर प्रसादची कविता पोस्ट झाल्यानंतर मी लगेच काही लिहीत नाही . किंवा कुठलीही अप्रतिम कविता पोस्ट झाल्यानंतर त्या कलाकृतीला सलाम म्हणून त्या पानावर काही लिहायचं नाही असा एक जुना नियम घालून घेतला आहे. काल मात्र खूपच आग्रह झाल्याने पोस्ट झाली माझ्याकडून. शलाका , जयावी आणि मीनू... मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियेचं उत्तर किरू च्या पोस्ट मध्ये आहे. संत कबीरांनी वेळोवेळी परमेश्वराचा उल्लेख मित्रासारखा, प्रियकरासारखा, प्रेयसीसारखा केलेला आहे. कुठलंच नाव नसलेलं पण सर्व नात्यांचा अर्क ज्यात आहे असं एक नातं . मल लिहीताना अपेक्षित असंच पवित्र नातं होतं . पण त्यासाठी लायक होण्यास मला समोरच्या देवमाणसासारखं पवित्र होणं गरजेचं आहे आणि ते त्याच माणसाच्या मदतीने होऊ शकतं अशी विचारमालिका होती. "मान सरोवरा" ची उपमा पवित्रतेसाठी दिली आहे. जर तू मला साथ दिलीस तर मी तुझ्यासारखा होऊ शकेन , तर तुला माझ्या मनात बोलावू शकेन आणि तुझा परिमळ माझ्यात पसरेल. इतके दिवस मी बाह्य जगात तुझा परिमळ अनुभवत आलो आहे. पण आता बाहेर अंतरी एकचि परिमळ होताच तुझ्या प्रवेशाने , त्या मानसरोवरात माझ्या मनात असलेल्या "नात्यांच्या व्याख्यांना" मोक्ष मिळेल. अद्वैत !!! तसं पोचलं नसेल तर दिलगीर आहे. सूचना मेलवर कळवल्यास आभारी असेन.
|
Mankya
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:34 am: |
| 
|
Neelay.. प्रयत्न छान आहे हो ! माणिक !
|
Mrinmayee
| |
| Wednesday, January 10, 2007 - 11:18 am: |
| 
|
कुठलीही अप्रतिम कविता पोस्ट झाल्यानंतर त्या कलाकृतीला सलाम म्हणून त्या पानावर काही लिहायचं नाही... क्या बात है वैभव! (असा सलाम मी रोज देते) आपल्या कवीतेनंतर जर वैभवची कवीता दिसली तर समजावं...
|
Mankya
| |
| Wednesday, January 10, 2007 - 11:59 am: |
| 
|
Mrinmayee... हेच .... हेच मनात आले होते ! अगदी खरय
|
Mankya
| |
| Wednesday, January 10, 2007 - 12:54 pm: |
| 
|
विझताना एक सम ई हलकेच माझ्याशी बोलली एक एक शब्द हळवा माझ्या ह्रदयी व्यथा तिची कोरली कधी तिनेही म्हणे प्रकाशाने मन्दिराचा गाभारा भरला होता मिणमिणता का होईना प्रकाश तिनेही दिला होता आज म्हणे तिच्या हातुन अपराध गम्भीर घडला होता विझताना सावरणार्या ओन्जळीलाच सणसणीत चटका तिने दिला होता प्रायश्चिताची काजळी तिच्या मनात दाटत होती कशी समजुत घालू अन कुणाची म्हणुन ती तळमळत होती अन्ति स्वत : ला मालवण्याचा निर्णय तिने घेतला होता काळोख सोडुन जाताना मागे जिव तिचाही जळला होता बहुतेक तिने ओळखले नव्हते माझा हात ज्याने चटका तिचा सोसला होता ....! माणिक !
|
वैभवा, .. .. .. .. या कवितेला दाद देण्यास शब्द नाहीत मित्रा.. सलाम त्रिवार सलाम
|
Ashwini
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:34 pm: |
| 
|
वैभव, मानस सरोवर केवळ आहे रे. काय लिहावं... सुचत नाही.
|
"वेडे" रस्त्यांवर पडलेले काटे मी जमा करत असतो लोकांच्या गुलाबफुलांकडे पाहत पाहत... कारण... हल्ली प्रत्येकाजवळ गुलाब स्वत्:हून जमतात मला मात्र रस्त्यांवर वेगवेगळे काटे भेटतात, अगदी कडकडून! कारण... हल्लीच कळ्लं मला गुलाबफुलांच्या काट्यांना खुप दु:खं असतात म्हणून! मी दंग असतो त्यांना वेचण्यात! अन् लोकांना वाट्तं... मी ठार वेडा असावा! मी आहे थोडा वेडा कारण... त्यांच्याजवळीची गुलाबफुलं सुकून गेलेली असतात 'रेड ऍर्लट' एरीयावर फिरवून फिरवून रात्री कधी तरी...! अन् माइयाजवळचे काटे सकाळीच ज़ालेले असतात नि:श्त्र,शांत... अगदी माइयासारखे... कारण... ते वेडे ज़ालेले असतात नेमके माइयासारखे.. माइयाजवळ,माइया कुशीत येऊन! गणेश (समीप)
|
वा प्रसाद वैभव. शब्द, लय, कल्पना अन् बांधणी सगळेच उत्तम. प्रसाद एकदम बाभंची आठवण होतेय. खूप मजा आली वाचताना. वैभव, तुझी कविता वाचली आणि कवितेचा फेरफटका सफल झाला रे बाबा. - संघमित्रा
|
Niru_kul
| |
| Thursday, January 11, 2007 - 9:56 am: |
| 
|
पुन्हा घायाळ होण्यासाठी....... तुझी प्रत्येक 'अदा' घाव करते, मला घायाळ करण्यासाठी.... तरीही माझी प्रिती सिध्द होते, पुन्हा घायाळ होण्यासाठी.... प्रकाशाच्या प्रत्येक किरणात, मला तुझं अस्तित्व जाणवतं; अंधाराला मी टाळत राहतो, तुझाच सहवास घडण्यासाठी.... निळ्या नभाचा निलीमा मला, तुझ्या डोळ्यांसमोर फिका भासतो; मेघांना मी दूर सारतो, तुझ्या नजरेत बुडण्यासाठी.... खळखळत वाहणारे पाणी, तुझ्या हास्याची आठवण करुन देतं; नदीतटाशी मी बसून राहतो, तुझा मोहक आवाज स्मरण्यासाठी.... तू जवळ असतेस तेव्हा, चैतन्याला उधाण येतं; मोरपिसं मी वहीत सांभाळतो, तुझा रेशमी स्पर्श जपण्यासाठी.... स्वप्नांमध्ये माझ्या आता, तुझा नेहमीच वावर असतो; तरीही मी रात्र-रात्रभर जागतो, तुझ्यावर कविता लिहीण्यासाठी.... वाटते मला, कळावे तुलाही, गूज मनी या लपलेले; पण भावनेला माझ्या शब्द पुरत नाहीत, माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी....
|
|
|