Deep_tush
| |
| Monday, January 08, 2007 - 12:55 am: |
| 
|
दु:ख़ाला कवटाळून बसण्यात काय अर्थ आहे..... पण दु:ख़च जर नसल तर मात्र हे जीवनसुध्दा निरर्थक आहे...... तुषार.......
|
Shyamli
| |
| Monday, January 08, 2007 - 2:05 am: |
| 
|
लोकहो ईथे फक्त आपण केलेल्याच चारोळ्या टाकायच्या असतात गप्पा मारायला दुसरे अनेक BB आहेत झुळकेचेच जरा जुने अर्काविज उघडुन बघा लिखाणची उंचि कळेल तुम्हाला अगदिच राहवल नाहि म्हणु लिहितीये.... माफ करा
|
Mankya
| |
| Monday, January 08, 2007 - 2:16 am: |
| 
|
खरय Bhramar_vihar .. अर्थ आहे रे तुषार मस्तच काल माझ्या बहिणीचे लग्न ठरले.. त्याबद्दल आज दिन सुखाचा आज दिन आनन्दाच तुला लाभला सखे आज साथीदार जन्माचा ! आज दोन कुटुम्बातील ऋणानुबन्ध साकारले पाहुनी सोहळ तो नेत्रही सुखाश्रुनी थरारले ! माणिक !
|
Mankya
| |
| Monday, January 08, 2007 - 2:40 am: |
| 
|
तुषार.. नको समजु जीवना निरर्थक ते तर नियतीचे सुन्दर गीत आहे अनेक भावरुपी रन्गानी भारलेले प्रचन्ड विश्वशक्तिचे वस्तल स्मित आहे ! माणिक !
|
Meenu
| |
| Monday, January 08, 2007 - 2:52 am: |
| 
|
हं श्यामली ईथेच नाही तर कवितेवर पण दर्जा खुप खालावला आहे. लोकं अगदी आपण आपल्या डायरीत काही पण लिहावे तसं लिहायला लागलेत ईथे. त्यामुळे चांगल्या कविता लिहीणारे ईथे लिहीनासे झाले आहेत. मला वाटतं प्रतिक्रीयांवरुन आपल्या लिखाणाचा दर्जा कसा आहे ते प्रत्येकानं ओळखावं. आणि फक्त दर्जेदार लिखाणच ईथे टाकावं. बाकी सारं काही लिहायला आपल्या डायर्या आहेतच की घरी. काही दर्जेदार सुचत नसेल तर नं लिहीलेलं बरं.
|
Mankya
| |
| Monday, January 08, 2007 - 3:40 am: |
| 
|
मार्गदर्शन अपेक्षित आहे...! काहि चुकल असेल तर क्षमस्व!
|
Meenu
| |
| Monday, January 08, 2007 - 3:48 am: |
| 
|
माणिक मी काय मार्गदर्शन करणार ..? पण श्यामली म्हणतेय त्याप्रमाणे जुने archieves बघायला काय हरकत अहे ..? चुकलं वगैरे असं नाही. पण कवितांचा दर्जा फारसा चांगला नसेल तर ईथे कुणी प्रतिक्रीया देत नाही. त्यावेळी साधारणपणे आत्मपरीक्षणच करुन पहावं. ज्या कवितांना झुळुकांना आत्तापर्यंत भरभरुन दाद मिळाली आहे त्यांचा दर्जा पाहुन त्याच्याशी आपल्या लेखनाच्या दर्जाची तुलना करता येईल. तुलना करताना .. विषय वैविध्य, शब्दरचना, आशय या सर्वाचा विचार करता येईल. बरं पण ही चर्चा करायची ही जागा नाहीये. नेमस्तक ओरडतील आता नाहीतर
|
जेव्हा मित्र-मैत्रिणी वाद विवाद करतात, खूप त्रास होतो मला देवा आता सहन होत नाही हा त्रास तुझ्याजवळ बोलवून घे मला श्री
|
R_joshi
| |
| Tuesday, January 09, 2007 - 3:57 am: |
| 
|
मीनु येथे येणारे बहुतेकजण माझ्यामते नविन असतात,त्यामुळे आपल्या कवितांचा दर्जा प्रत्येकालाच ठरवता येत नाहि. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण गरजेचे असते.
|
R_joshi
| |
| Tuesday, January 09, 2007 - 4:08 am: |
| 
|
जीवनाचे सर्वात सुंदर रुप दु:ख आहे... आपल्या जीवनाचा ते आयाम आहे... सर्व दुर असले तरी ते समिप राहते आपले कोण हे ओळखायला शिकवते... जगण्याच्या शिकवणितील दु:ख हा नियम आहे अंधार रात्रिचा नसुन पहाटेचा तो किरण आहे. प्रिति
|
वा!!! प्रिति खूपचं सुंदर लिहिलंस. श्री
|
जगण्याच्या शिकवणितील दु:ख हा नियम आहे अंधार रात्रिचा नसुन पहाटेचा तो किरण आहे. आज तु झूळकेवर लिहिलेल हे सत्य जगातला कोणताही व्यक्ती नाकारू शकत नाही दिवस रात्रीचा हा खेळ कोणीच थांबवू शकत नाही श्री
|
Mankya
| |
| Tuesday, January 09, 2007 - 5:55 am: |
| 
|
दर्जा.... मार्गदर्शन... खरय प्रिति ३ वेगळ्या चारोळ्या वाटतच नाहित....एकच छान कविता वाटतेय... पण सुन्दर आहे हो... श्री बरोबर....
|
"श्री","प्रीती" छानच! गणेश (समीप)
|
"मी काट्यांवर खुप प्रेम करतो म्हणून फ़ुलांनी एकदा बंड केलं! मी फुलांचे वार सहन करावेत म्हणून काट्यांनीच मला अगोदरच धड केलं!" गणेश (समीप)
|
R_joshi
| |
| Tuesday, January 09, 2007 - 7:10 am: |
| 
|
धन्यवाद श्री, गणेश, माणिक माणिक ती कविताच आहे पाऊलवाट काट्यांची असलि तरी ती पार कराविच लागते "काट्यांनाहि मन असते" हे हे त्यांच्या बोचण्यावरुन शिकायचे असते. प्रिति
|
R_joshi
| |
| Tuesday, January 09, 2007 - 7:14 am: |
| 
|
फुल बनुन मी जाणल काट्याचि इच्छा काय असते अविरत राहुन फुलाबरोबर विरक्ति म्हणजे काय असते.... प्रिति
|
Mankya
| |
| Tuesday, January 09, 2007 - 8:27 am: |
| 
|
प्रिति सुन्दरच... इथे कुठली विरक्ति कुठली इच्छा प्रत्येक जणच डागाळलेला कुठे काटयाची जाणिव तर कुठे जाणिवेचाच काटा निघालेला ! माणिक !
|
"तुइया सोबत फिरण्याचा मला प्रत्येक अनुभव हवा असतो! कारण त्या प्रत्येक दिवशी मी अगदीच नवा असतो!" गणेश (समीप)
|
प्रिति, "काट्यांनाहि मन असते" हे हे त्यांच्या बोचण्यावरुन शिकायचे असते. " किती संवेदनशील ओळी! वा! क्या बात है!! गणेश (समीप)
|