|
Lopamudraa
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:28 am: |
| 
|
एखादे पान भिरभिरत समोर येउन पडते आणि लक्षात येते... ह... Autumn आला. मग हिरव्यात तांबडा.. तांबड्यात पिवळा, पिवळ्यात तपकिरी असे रंग मिसळत जातात. झाडांच्या बुंध्यावरुन ठिबकत ठिबकत मातीशी एकरुप होतात. आणि चोहोकडे फ़क्त सापळे शिल्लक राहतात... झाडांचे सापळे. एखाद्याची स्वप्ने रोजच्या रहाटगाड्यात हळु हळु गळुन जावी आणि मागे फ़क्त खिन्न मन रहावे तसे... रस्त्याने चालता चालता आसापास हिरवळिवर वावरणारे ससे, किलबिल किलबिल करुन झाड डोक्यावर घेणारे पक्षी,दबकत दबकत रस्ता cross करणरे Hedghog आता हे सुध्दा काही दिवसांनी दिसेनासे होणार असते. लुकलुकणार्या डोळ्यांनी रस्ता शोधत हेजहोग ची पलटन रस्ता ओलांन्डतांना बघणे यासारखे सुख नाही.जवळ जाव्वुन त्यांची फ़िरकी घ्यावी की हे लगेच गोल चेंडु बनुन गपगार पडणार, जस काही मी बुद्दु च आहे. थोडे लांब जायचे नाटक करावे मग लगेच स्वारी तुरु तुरु पळत आल्या दिशेने धुम ठोकते, आणि झाडीत दिसेनाशी होते.त्याचे तुरु तुरु पळणे मला तर वेड लावते.पटकन त्याला उचलुन घ्यावे असे मला खुपदा वाटते पण त्या भ्यालेल्या जीवाला अजुन का भिती दाखवा म्हणून मी तो मोह टाळते. तो तीथुन धुम ठोकेपर्यन्त मी त्याच्याकडे बघत तीथेच घुटमळते. Badger मात्र दिसतो न दिसतो तोवर दिसेनासा होतो. आता winter जवळ जवळ येत असतो. सुर्य महाराजही सकाळचे आठ वाजले तरी आळसाउन अंथरुणातच असतात. धुक्याची पांढरी शुभ्र दुलई असल्यावर झोप कशी उडेल बर..!!! सकाळी उठुन खिडकीबाहेर बघितले तर वाटते. ह.. रोज दिसणार्या painting वर कोणीतरी आज white wash दिलेला आहे.त्या धवल दुनियेत मी हलकेच पाउल ठेवते. न जाणो एखादि परी आकाशातुन या धरतीवर या सुंदर वातावरणाला मोहुन यायची आणि आपली तीची अचानक धुक्यात गाठ पडायची..! मागचे पुढचे काही ही दिसत नसते. फ़क्त आता पाउल कुठे ठेवायचेय तेवढएच समज्ते. खरतर रोजच जीवनही असच जगल पाहिजे ना.. भविष्यात काय आहे भुतकाळात काय झाले काहिच आठवु नका फ़क्त " आज " वर लक्ष द्या. अशा दाट धुक्यात Woods मध्ये जाउन धवल वलयांनमधुन एखादी हरिणी आपल्यासमोर तीच्या पारिवारा सकट प्रगट होते आणी तीचे हरीणाक्ष रोखुन दुसर्या क्षणाला दिसेनाशी सुध्दा होते. आपल्याला सोबतीला धिट pheasant ची डौलात चालणारी जोडी (रंगीत पिसांच्या)असतेच. अर्धवट गळालेल्या ओकावर खरुताई चिर्र्र SSS करत आवडती फ़ळं खात तीची वेगळीच कसरत सुरु असते. या क्षणाला तीला कोणाचीच पर्वा नसते. पाणथळ जागी पक्षांची चिव चिव.. आणी धुक्यातुन झिरपणारे उन पुन्हा डोळ्यासमोर पुर्वीचे चित्र आकार घेउ लागते.गवताची हिरवी पाती चमकु लागतात. कोळ्याच्या जाळ्यात, निश्पर्ण फ़ांद्यावर दवबिंदु चमकु लागतात. सुर्य माथ्यावर आलेला असतो.आणि या.... धुक्याच्या मायावी दुनियेतुन माझ्यासोबत सारी सृष्टी बाहेर येते. पानगळ झाली म्हणुन झाडे मला उगाचच उदास वाटायची. आता तीथे मला काष्ट शिल्प दिसु लागली. सुंदर modern art सारखी. डौलदार कमनिय उंच उंच फ़ांद्या, सोबतीला झिर मिर झिर मिर पाउस.. कितीही कपडे घातले तरी कुडकुडायला लावणारी थंडी अहा.. winter आला तर त्या थंडीत गुलाबी होण्याचा वेगळाच आंअद आहे. आता रस्त्याने लांबच लांब पसरलेल्या हिरव्यागार लहान मोठया टेकड्यांवर काही उंच काही, बुटकी काही खुरटी, काही कमनिय काही ओबडधोबड अशीही झाडांची शिल्प दिसु लागलीयेत. माझे लाडके hedghog मात्र दिसत नाहित. ते आता खोल खोल भुमातेच्या कुशित wintersleep घेत असतील.. मागच्या महिन्यात हेलनने मला हाताला ओढुन घाई घाईने मागच्या दारी नेले.. बघते तर आख्खी बाग खोदल्यासारखी जागिजागी मातीचे ढिगारे.. तर बाईसाहेब म्हणातात अग माझ्या बागेत Mole आहे, बघ छोटी छोटी तीची पिल्ल असतील किति बिळ कोरलियेत बघ तीच्या नजरेत खुप आनंद होता निरागस आंनद एकदा नगरला घरात उंदीर पळतांना दिसला. माझ्या मुलाला त्याच्याकडे बघुन इतका आंनाद झाला. तो धावतच माझ्याकडे आला.. नतर त्याच्या पप्पांना सांगायला पळाला. विकासने काय करावे तर लगेच एक झाडु घेतला आणी उंदराला फ़टका मारला.. उंदीर निपचित पडला.ते पाहुन त्या तीन वर्शाच्या जिवाच्या चेहर्यावरचे हावभाव झरझर बदलले.. निरागस आंअदाची जागा मोठ्या भोकाडाने घेतली. मग आमची दोघांची त्या उंदराला जागे करण्यासाठी धांदल उडाली. शेवटी एकदाचे ते महाशय जागे झाले मग गाडीत घालुन त्याला लांब नेउन सोडले...त्याच्या घरी पाठवले अशी आम्ही मग मुलाची सम्जुत काढली. लोकं mole ना मारण्यासाठी काय काय करतात आणी हेलन त्यांना बघुन खुश झाली होती. तेव्हा मला तीच्या चेहर्यावर तोच निरागस आनंद दिसला. winter मध्ये सुध्धा जाउन बसाव असा छोटासा झरा आहे माझ्या घराजवळ.. फ़क्त आता त्यात पाय बुडवुन बसायची माझी तयारी नसते. थोड्या दिवसात पुन्हा ह्या शांततेची जागा नव्या किलबिलाट घेइल. स्रुष्टी आपल्या विविध रुपातुन नविन सुर छेडेल. त्या सगळ्या सुरांचे नविन सुरेल गाणे तयार होइल... जीवनगाणे... धरती और आकाश का रिश्ता जुडा हुआ है इसलिये चिडिया उडती है इसलिये नदिया बहती है इसलिये कहिं से कुछ अच्छा है.. कुछ खोटा है कुछ सच्चा है रात और दिन के बीच कही सपना जिंदा है! धरती और आकाश का रिश्ता जुडा हुआ है!
|
Lopamudraa
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:42 am: |
| 
|
Autumn
|
Shyamli
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:42 am: |
| 
|
वाह वैशाली.... फ्रेश वाट्ल बघ हे वाचुन एकदम खरच सृष्टीचा साधा नीयम आहे ना हा, पण आपण लक्षात नाही ठेवत आणि दु:खाला कुरावाळात बसतो पण नंतर सुख येणारच आहे हे तेंव्हा विसरलेलो असतो नाही का?
|
Lopamudraa
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:45 am: |
| 
|
Winter..
|
Lalu
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:49 am: |
| 
|
छान लिहिले आहेस लोपा! ( यावेळी सलग विचार केलास वाटतं, जरा टिंबं कमी झालेली दिसतात. ~D) smk च्या 'पानगळ' ची आठवण झाली.
|
Kshipra
| |
| Thursday, January 11, 2007 - 12:11 am: |
| 
|
lalu, good one and agreed. Lopa, mast.
|
Bee
| |
| Thursday, January 11, 2007 - 1:36 am: |
| 
|
लोपमुद्रा, सुंदर लिहिलसं आणि छायाचित्रही अचूक निवडलीस. लालूला अनुमोदन, smk च्या 'पानगळ' प्रमाणे वाटलं हे लिखाण. winter/autumn/woods ला मराठी शब्द आणखी चांगले वाटले असते.
|
लोपा, अतिशय ओघवता आणि सहज लिहिलेला लेख. एकदम मस्तच आणि त्यात भर घातलीय त्या दोन फोटोंनी...  
|
लोप्स! क्या बात है! अगदी मस्तच आणि फोटो तर वाह व्वा!
|
Jhuluuk
| |
| Thursday, January 11, 2007 - 3:21 am: |
| 
|
लोपमुद्रा, लेखबरोबर फ़ोटोजही छान आहेत..
|
मंडळी thank you! .. smk चा long form सांगता का?
|
लोपाताई, फ़ारच छान........! अजुन लिहित राहा.
|
Deep_tush
| |
| Thursday, January 11, 2007 - 6:07 am: |
| 
|
वा लोपा मस्त लिहलेल आहेस निसर्गाविषयाबद्द्ल वाचून मन अगदी प्रसन्न झाल...ख़ुपच छान.... तुषार.......
|
Seema_
| |
| Thursday, January 11, 2007 - 11:59 am: |
| 
|
लोपा चांगल लिहिलयस . fall आहे रंग रुप आणि स्पर्शाचा आणि winter आहे माणसाला अंतर्मुख बनवणारा आणि म्हणुणच अजिबात distractions न ठेवणारा . म्हणुण तर निसर्ग इतका ओकाबोका असतो यावेळी .
|
लोपा.. मौसम..टू ग़ुड.. फोटोची सोबत तर १दम सहीच.. 
|
लोपा ताइ फ़ारच सुंदर.. वाचतच रहावे.. न थांबता... असा लेख.. आवडला..
|
Nalini
| |
| Friday, January 12, 2007 - 10:31 am: |
| 
|
लोपा, लेखाला साजेशे फोटो आणि फोटोला साजेसा लेख.
|
Prajaktad
| |
| Friday, January 12, 2007 - 4:36 pm: |
| 
|
निसर्ग हरघडी काहितरी शिकवतच असतो,गरज असते फ़क़्त द्रुश्टिकोनाची..फोटो लेखाला समर्पक!.. लोपा जमेल तशी तुझी कथाही पुर्ण कर ना!
|
Disha013
| |
| Friday, January 12, 2007 - 5:05 pm: |
| 
|
छान लेख लोपा. आता जरा कथाही पुर्ण कर हं.
|
Kandapohe
| |
| Saturday, January 20, 2007 - 3:11 pm: |
| 
|
छान लिहीले आहे की. आज वेळ मिळला वाचायला.
|
Dineshvs
| |
| Sunday, January 21, 2007 - 1:24 pm: |
| 
|
लोपा, खुप सुंदर लिहिले आहेस. बघ ना तुला किती जणांची साथसोबत आहे ती.
|
|
|