Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 10, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » काहीच्या काही कविता » Archive through January 10, 2007 « Previous Next »

Devdattag
Wednesday, January 03, 2007 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हझलचा एक प्रयत्न..

तो पहा मोकाट वेडा जात आहे
त्याच हाती शुभ्र माझा दात आहे

चाललो होतो जरा मी खात दाणे
का खडा माहीत होते त्यात आहे

हासला तो पाहुनी मी गाल धृता
बोलला तो ह्यात माझा हात आहे

गाठले मी दंत वैद्या त्याच रात्री
फीज त्याची काय वेड्या ज्ञात आहे?

बोलती बा सोड त्यांना काय त्याचे
मी अता चाटून गोळ्या खात आहे..
-देवदत्त


Prasad_shir
Wednesday, January 03, 2007 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा देवदत्त! मस्तच... छान हजल आहे... मजा आली!

Sarang23
Wednesday, January 03, 2007 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे!!!
perfect हझल देवा
गालगागा सहीच आहे रे!


Psg
Wednesday, January 03, 2007 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अता चाटून गोळ्या खात आहे..
अरेरे मस्त देवा!

मी गाल धृता
म्हणजे काय? :-(

Devdattag
Wednesday, January 03, 2007 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थँक्स प्रसाद, सारंग आणि पूनम..:-)
पूनम गाल धृता म्हणजे गाल धरलेला..:-)


Kmayuresh2002
Wednesday, January 03, 2007 - 10:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा,मस्तच रे हझल.. मजा आ गया:-)

Devdattag
Thursday, January 04, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स रे मयुरेश

प्रसादच्या अप्रतिम गझलेचे मुक्त विडंबन
इथे अशासाठी की हे परफ़ेक्ट विडंबनही नाहिये आणि पूर्णपणे विनोदीही नाहिये..

तुला सांगतो देवदत्ता..

तुला सांगतो देवदत्ता हे असे वाढणे असू नये
तुला खालचा रस्ता दिसतो, मला तसा का दिसू नये

वस्त्र जेवढे तागाचे घे, साडि नऊवारीही
पायजम्याच्या मापावरती, पँटेस उसवत बसू नये

कशास चालत जावे आपण चुकून कोणी हलायचे
शंका कसली भिती वाटते जमीन पुन्हा धसू नये

या विश्वाच्या शीशमहाली आरसेच छोटे सारे
अर्ध्यामाझ्या प्रतिबिंबाला उगाच कोणी हसू नये

हृदय भंगही रोज व्हायचा माहित आहे मजला ही
देवाशी रे एक मागणे बघ हृदयात कोणी ठसू नये

दिसे जरी बघ चेहरा माझा आनंदाने सजलेला
आजवरीच्या अभिनयाला मीच अखेरीस फसू नये



Shyamli
Thursday, January 04, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या विश्वाच्या शीशमहाली आरसेच छोटे सारे
अर्ध्यामाझ्या प्रतिबिंबाला उगाच कोणी हसू नये>>>
जियो...देवा,
विडंबन म्हणलायस म्हणुन,
नाहितर काय मस्त आहे हा शेर शेरच म्हणायच ना


हझलहि चांगलीच जमलीये की रे



Mankya
Monday, January 08, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Celebration म्हणजे...

एक सन्ध्याकाळ
चार मित्र
एक पाउस
चार कप चहा

जुनी आवडती गाडी
पेट्रोलने भरलेली टाकी
मोकळा लाम्ब रस्ता

गरम नुडल्स
वसतिग्रुहातिल खोलि
पहाटे ४.१५ ची वेळ

३ जुने मित्र
३ वेगळ्या शहरात
३ कप कॉफी
१ इस्टन्ट मेसेन्जर

तुम्ही आणि आई
उन्हाळ्यातिल रात्र
बाटली खोबरेल तेलाची
डोक्याला मालिश
घरातील गैरहजर लोकाबद्द्ल चर्चा !

माणिक !


Jayavi
Tuesday, January 09, 2007 - 12:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा........... मस्तच हं....... सुरवात प्रचंड आवड्ली :-)

Meenu
Tuesday, January 09, 2007 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा बढो .. सही जमलय की हे ..

Sarang23
Tuesday, January 09, 2007 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! माणिक... छान आहे, पण इथे का? कवितेच्या विभागात पाहिजे होते... खूप छान...!

Psg
Tuesday, January 09, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला खालचा रस्ता दिसतो, मला तसा का दिसू नये
देवा मस्त जमलय रे..

माणिक, वा! मस्त आहे..


Vaibhav_joshi
Tuesday, January 09, 2007 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा मतला सही जमलाय

माणिक ... छान आहे लगे रहो


Kmayuresh2002
Tuesday, January 09, 2007 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा,जियो.. जबरी आहे रे:-)

Neel_ved
Tuesday, January 09, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय देवाऽऽऽऽ. ह. ह. पु. वा.

Shree_tirthe
Tuesday, January 09, 2007 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! वा!!! बढीया है.

श्री


Mankya
Tuesday, January 09, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सारन्ग, Psg , आणि मित्रा (वैभव)

Devdattag
Wednesday, January 10, 2007 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स लोक्स.... .. ...:-)

Devdattag
Wednesday, January 10, 2007 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटते तुलाही की आहे मीच दोषी
कशाला अबोला अन बेदर्द फाशी

दोष आहेच यात त्या रातचा जरा
उगीच का स्वत:शी ती लाजली धरा

तो चंद्रही जरासा खट्याळ भासला ग
पाहुनी चंद्रीकेस हळूच हासला ग

आठवते तुला का वार्‍याचे वहाणे ते
कलिकेस चुंबण्याचे कित्येक बहाणे ते

का दोषही तसा मी त्यांस द्यावा उगा
जो सोडला तु नजरांनी "तीर ऐसा लगा"





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators