Himscool
| |
| Wednesday, January 10, 2007 - 4:21 am: |
| 
|
"अगं आता वळ की पटाकन! मगा पासून बघतो आहे साधे वळण घेता येत नाही! नुसता ट्रॅफिक जाम करून ठेवला आहेस तो.." तरी विचार करत होतो बायकोला गाडी चालवायला द्यायला नको.. घातला सगळा घोळ तिनी.. आता उतरून वाहतूक सुरळीत करणे आले ना! "हे कुठे गेले आता? गाडी पटकन गर्दीतून बाहेर काढली तरी ह्यांच्यामुळे पोचायला उशिर होणारच.. छे कायम असेच करतात कधी म्हणून नाटकाला वेळेवर जात नाही आम्ही.. कायम अंधारात जागा शोधावी लागते.." झाली एकदाची वाहतूक सुरळीत पण आमची गाडी कुठे गेली.. अरे बापरे! आता हीला कुठे शोधू परत.. जाऊन पोचली असेल पुढच्या चौकात आणि मलाच शिव्या देत असेल.. रिक्षा करून जावे लागेल आता तिला शोधत.. "कुठे गेला होतात हो नेहमी प्रमाणे? प्रत्येम वेळेस काही तरी गडबड ही व्हायलाच पाहिजेना. चला बसा आता पटकन गाडीत.. नाहीतर नाटकाची सुरवात जाईल नेहमीप्रमाणे..." काय त्रास आहे.. प्रत्येक वेळेस चुका ही करणार आणि मलाच दोष देणार.. देवा हिला सुबुद्धी कधी देणार तू.. आजकाल हे प्रकार जरा वाढतच चालले आहेत... "अहो गाडी लावा ना पार्किंगमध्ये पटकन. तोपर्यंत मी आपल्या जागा शोधून ठेवते. नाटक सुरु होईल इतक्यात. प्लीज..." हिच्या ह्या अशा प्रेमळ बोलण्यामुळे नेहमीच गोची होते माझी. गप गुमान गाडी लावायला जातो मी. आणि तिथे जागा मिळणे ही नेहमीच महा कठीण गोष्ट असते.. मी उगाच सगळ्या गाड्यांवरुन नजर फिरवतो.. बघतो तर प्रत्येक गाडीत माझ्या सारखाच एक पुरुष बसलेला असतो चिंताक्रांत... गाडी लावायला जागा शोधत.. "अहो.. शुक शुक.. इकडे, इकडे या.. इथे आहे आपली सीट.. कुठे गेला होतात एवढा वेळ? आणि पाण्याची बाटली आणलीत का गाडीत ठेवलेली? वाटलंच मला नेहमी प्रमाणे विसरलात ना.. आता मध्यंतरात जाऊन घेऊन या.. आणि चुकवलीत ना नाटकची सुरवात तुम्ही नेहमीप्रमाणे.. कुठलं तरी नाटक पहिल्यापासून बघितले आहे का हो तुम्ही.. " मी नक्कि कशासाठी आलो होतो इथे ह्याचाच विसर पडायला लागतो मला.. हळू हळू डोकं दुखायला सुरुवात होते.. नाटकात काय चाललय हे कळतच नाही. बाजूला हीची अखंड बडबड चालूच असते.. ह्या नटानी ना त्या दुसर्या नाटकात काय सुरेख काम केले आहे. आज काही जमतच नाही आहे त्याला वगैरे वगैरे... आणि नाटकाचा मध्यंतर होतो.. "अहो पटकन जाऊन तेवढी पाण्याची बाटली घेऊन या ना गाडीतून... आणि तुम्हाला काय पाहिजे खायला.. वडा पाव घेणार.. नको त्रास होतो तुम्हाला लगेच त्याचा. घसा बसतो.. त्यापेक्षा तुमच्या साठी पॉपकॉर्न घेते.. आणि चहा घेणार आहात का नंतर.. चहा नको कोल्ड्रिंकच घेते चालेल ना तुम्हाला" मी तिला समजवायचा निष्फळ प्रयत्न करतो. अग बिसलरी घे आता. गाडी फार लांब आहे आणि वेळ लागेल जाऊन यायला. पण व्यर्थ! मान खाली घालून बाटली आणायाला जावेच लागते.. तशी तिला कळेल इतपतच मान खाली घालून मी जातो.. आजुबाजुला असलेल्या जोडप्यांकडे बघत मी नाट्यगृहाच्या बाहेर पडतो आणि गाडीकडे पोहोचतो... "मला वाटलं आता पण उशीर करणार तुम्ही पण आलात बाई वेळेवर.. हे घ्या खाणार आहात ना तुम्ही.. " जे काहि खायला आणि प्यायला आणलेले असते त्यातले मला काहीच मिळत नाही कारण ते तिने तिच्यासाठीच आणलेले असते.. मला फक्त विचारायचा सोपस्कार केलेला असतो.. पॉपकॉर्न असते तोपर्यंत मी नाटक नीट बघत असतो आणि त्यात काय चालू आहे ते मला सगळे कळत असते.. पण तेवढ्यात, अहो जरा पाण्याची बाटली देता का तुमच्या हातातली असे वाक्य कानावर पडते आणि त्यानंतर मला नाटकाच्या ऐवजी पुन्हा तिचेच संवाद ऐकू यायला लागतात... नाटक संपते आणि आम्ही बाहेर पडतो.. मी त्या प्रचंड गर्दीतून कशी बशी गाडी बाहेर काढतो आणि आम्ही मार्गस्थ होतो.. "काय सुरेख नाटक होते नाही.. वा काय सुरेख काम केलीत सगळ्यांनी.. मला तर बाई फारच आवडले ही नाटक.. बाकीच्यां बरोबर परत एकदा बघायला पाहिजे नाही का हो.. " मी आपला गाडी चालवता चालवता जमेल तश्या प्रतिक्रिया देत गाडी घरी नेतो.. आणि घरात जाऊन बामची मागणी करतो.. "अहो काय होतय तुम्हाला? डोकं दुखतय का फार? आत्ता तर बरे होतात की? अचानक काय झालं?" आता काय सांगू हिला! पुढच्या वेळेस नाटकाला जाताना तुला गाडी चालवू देणार नाही हे.. की परत तुझ्या बरोबर नाटक पहायला येणार नाही हे.. की डोके नाटकामुळे नाही तर तुझ्या बडबडीमुळे दुखते आहे के.. की अजुन काही.. .. ..
|
Sakhi_d
| |
| Wednesday, January 10, 2007 - 5:32 am: |
| 
|
हिम्स...... छान लिहिले आहे. मजा आली वाचुन... पण अस नेहमीच होत नाही, काही वेळेस उलटेही होते.
|
Smi_dod
| |
| Wednesday, January 10, 2007 - 5:36 am: |
| 
|
हिम्स... छान रे... ..... अगदी स्वानुभवाचे बोल का?
|
च्या मारी फ़ारच नाटकी दिसतेयं ही बया... हिम्स...
|
Shyamli
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:13 am: |
| 
|
हिम्या तुला रे काय माहीत, अस्सच होतं ते 
|
Vinaydesai
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:37 am: |
| 
|
हिम्या.. म्हणून Direct Theater वर भेटतील अश्या व्यक्तींबरोबर नाटकाला जावं...
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, January 10, 2007 - 12:03 pm: |
| 
|
सही. शेवटचा प्यारा मस्त आहे.
|
हिम्या,सही रे.. मस्त लिहिलयस
|
Jhuluuk
| |
| Thursday, January 11, 2007 - 1:30 am: |
| 
|
सहि आहे, too good
|
Psg
| |
| Thursday, January 11, 2007 - 1:42 am: |
| 
|
हिम्या मस्तच! पण अगदी खरं घडल्याप्रमाणे वर्णन केले आहेस.. दालमें कुछ काला तो नही?
|
Devdattag
| |
| Thursday, January 11, 2007 - 2:05 am: |
| 
|
हिम्या.. माझ्या घरून नाटकाला जायच म्हणत होतास त्यादिवशी, तेंव्हाच काय रे घडलं हे..
|
हिम्स, काय दांडगा अनुभव आहे रे तुझा... मज्जा आली वाचुन
|
प्रिय हिम्स, हे तुला कधीपासून जमायला लागले बुवा? मस्त मजा आली. वाचून खूप आनंद झाला. कल्पना शक्तीची तारीफ करायला पाहिजे.
|
Arun
| |
| Thursday, January 11, 2007 - 3:27 am: |
| 
|
हिम्या : छान लिहिलं आहेस. अनुभव अनुभव म्हणतात तो हाच का ?????????????
|
Himscool
| |
| Thursday, January 11, 2007 - 5:28 am: |
| 
|
मंडळी आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद...
|
Meenu
| |
| Thursday, January 11, 2007 - 11:34 pm: |
| 
|
हिम्या पुनमला अनुमोदन रे ..
|
Nalini
| |
| Friday, January 12, 2007 - 10:29 am: |
| 
|
हिम्स, मस्तच लिहिलेस.
|
R_joshi
| |
| Saturday, January 13, 2007 - 5:40 am: |
| 
|
हिम्स... जगातल्या अर्ध्याहुन अधिक जोडप्याचा हा अनुभव असेल सुरेख लिहिलेस.
|
Kandapohe
| |
| Saturday, January 20, 2007 - 3:17 pm: |
| 
|
हीम्या, कालेमे दाल का? असो. छान भट्टी जमली आहे.
|
Dineshvs
| |
| Sunday, January 21, 2007 - 1:20 pm: |
| 
|
himscool , छान जमलाय लेख.
|